top of page

APRIL 2022 Issue:
MATERNAL AND CHILD HEALTH month

साप्ताहिक कार्यक्रम

7th March - Womens' Day Celebration

We celebrated Women's Day on 7th March 2022 by felicitating three dynamic women, who have done commendable job in their respective field.

  • Dr. Mrs Priyanka Khophar Kale, is a post doctorate researcher for international AIDS society Switzerland and a peer reviewer for an international journal "AIDS Research and Human Retro Virus". Her research work is on molecular virology. She comes from a very humble background. Her journey since childhood till today was full of hard work. She completed her education under 'Earn and Learn' scheme. She worked in Crosswords, a book store as a sales girl. While studying her perseverance and passion for knowledge and research, helped her reach this stage. Her journey is very commendable and inspiring.

  • The second young lady whom we felicitated was Mrs.Prachi Diwekar, who has an overall 15+ years experience in IT industry. She is currently a senior engagement program manager at G. S. Lab and Enterprise Agile coach. She is associated with Leela Poonawala Foundation since 2005. She has also received the Leela poonawalla Foundation scholarship. She suffered from a life threatening illness in her young age. Her positive attitude towards life and sense of gratitude towards all those who helped her in her difficult times and has made her journey rewarding. Her positive attitude towards life was inspiring.

  • The third dynamic woman whom we felicitated was Mrs Anita Gosavi, who is the only woman ambulance driver in the district. During the difficult Covid Times, she drove many Covid patients to various hospitals, she also delivered more than 200+ dead bodies for their last rituals all by herself. In spite of her educational handicap, she supported her family with her courage, grit and a smiling face in difficult situations.

  • We had another dynamic lady who was the chief guest for the event, Captain Vidul Shamsher Keshikar. She was captain in Indian Army from 2007 to 2012. She has won Sainya Seva Medal and Special service medal twice. Currently she is working as a Drone pilot, a very unique profession, which is male dominated.

 

The Life stories of all the four women were very inspiring. Prachi Diwekar and Vidul Kelshikar were suggested by PDG Deepak Shikarpur. Priyanka Khophar Kale and Anita Gosavi were suggested by PP Dr Rao. The program was compered by Rtn. PE Dr. Mrs Mrinal Nerlekar.

Rtn. PE Dr. Mrs Mrinal Nerlekar.

१४ मार्च - पांडुरंग मुखडे यांना व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार

दरवर्षी आपल्या क्लबतर्फे विविध व्यवसायात उत्कृष्ट काम करणार्‍या व्यक्तींना आपण व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार प्रदान करतो. यावर्षी आपण ज्येष्ठ तबलावादक आणि संगीत शिक्षक श्री पांडुरंग मुखडे यांना सन्मानित केले. श्री मुखडे हे व्यावसायिक तबलावादक असून त्यांनी पंडित भीमसेन जोशी, पंडित वसंतराव देशपांडे व मालिनी राजूरकर यासारख्या दिग्गज कलाकारांना साथ केली आहे. गेल्या पंचवीस वर्षात त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांना संगीताचे शिक्षण दिले आहे. सध्या ते अखिल भारतीय गांधर्व महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहतात.


गेल्या सोमवारी १४ मार्चला त्यांना सदर पुरस्कार प्रेसिडेंट डॉ. शोभा राव यांच्या हस्ते देण्यात आला. त्यानंतर त्यांनी त्यांच्या सहकलाकारांसोबत एक बहारदार कार्यक्रम सादर केला. शास्त्रीय संगीत, गझल, भावगीत, चित्रपटगीत, नाटयसंगीत इत्यादी संगीत प्रकाराला तबल्याची साथ ही कशी वेगवेगळी असते हे त्यांनी स्वतः वाजवून विशद केले. त्यांच्याबरोबर त्यांची कन्या आरती बोरकर हिने अतिशय सुंदर तबला वादन सादर केले. श्री राजेंद्र दीक्षित आणि श्री कुमार करंदीकर यांच्या गायनाने आणि पेटीच्या साथीने कार्यक्रम बहारदार झाला.

 

रो. शिरीष क्षीरसागर

20th March - Heritage Walk at Khunya Muralidhar Mandir

The summer had just set in. It was a pleasant Sunday morning. After a long gap, the heritage walk program was announced and about 40 members of the club had registered for it. Rotarian Pratima Durugkar was going to tell us about the Khunya Muralidhar Mandir. Everybody was excited. The added attraction was the morning breakfast at Prabha Vishranti Gruha. It was a delectable treat of batata and sabudana wadas and misal with the thirst-quenching and soothing panhe.

After everyone was completely satiated we started walking and reached the Khunya Muralidhar Mandir without feeling any strain.

Pratima narrated that the Mandir dates back to the Peshwa era.

The story goes that Gadre the savkar brought beautifully sculpted Radha Krishna idols from Jaipur. The Peshwa was infatuated by them and wanted them for himself. However, Gadre had no such inclination. He consulted a very holy priest Khare of Trimbakeshwar who was on a visit. He said once the idols are consecrated and established in place (pran prathishtha)  then they can't be moved out and taken away.

The Peshwa got wind of it and sent his army to get the idols. A gory battle ensued between them and the Gardi bodyguards of Gadre savkar. The deities were consecrated by then so they couldn't be moved.

Since many were killed in the skirmish it got its name Khunya Muralidhar Mandir.

Later Chapekar Brothers killed English officer Rand. They were having meetings in this temple. One person viz. Dravid informed this later to the Police. Eventually, Dravid was also murdered. This instance also highlighted the name 'Khunya' to this Murlidhar.

Pune has so many Heritage structures that in unison there was an appeal to have more such programs- once a month. It was great learning from the lucid narration of very erudite Pratima Durugkar.  She left us wanting for more!

Dr. Dilip Dhamankar

28 मार्च - नाट्यवाचन (मीरा मधुरा)

 

रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वती यांनी आयोजित केलेल्या नाट्यवाचन स्पर्धेत आपल्या क्लबला सांघिक उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. सुप्रसिद्ध नाटककार वसंत कानेटकर यांचे सर्वात आवडते नाटक 'मीरा मधुरा' या नाटकातील अखेरचा आणि तिसरा प्रवेश या वाचनासाठी निवडला होता. रो. अश्विनी अंबिके हिचे दिग्दर्शन होते. 

या नाट्यवाचनाचे पुनर्वाचन सालाबादप्रमाणे २८ मार्च रोजी आपल्या क्लबमध्ये आयोजित केले होते. खास आपल्या खुमासदार शैलीतून, आपल्या क्लबचे सभासद रोटेरियन चंद्रशेखर यार्दी, ॲन गिरीजा , रोटेरियन वृंदा वाळिंबे, रोटेरियन अश्विनी अंबिके यांनी सादर केले. आवश्यक प्रसंगांमध्ये आवाजातील चढ-उतार अतिशय उत्तमरित्या सादर केले.

सामाजिक प्रकल्प

१ मार्च - सार्थकला मार्च महिन्यातील धान्य पोचले 

WhatsApp Image 2022-03-15 at 12.36.00 PM.jpeg

४ मार्च - एकलव्यला मार्च महिन्यातील धान्य पोचले 

WhatsApp Image 2022-03-15 at 12.37.19 PM.jpeg

स्पर्धा परीक्षांसाठी लागणाऱ्या पुस्तकांसाठी आपण शेलार सरांना मदत केली होती. त्यांच्या गावातल्या मुलांसाठी ही पुस्तकं त्यांनी खरेदी केली आहेत.

WhatsApp Image 2022-03-15 at 12.45.22 PM.jpeg
WhatsApp Image 2022-03-15 at 12.45.22 PM (1).jpeg

१६ मार्च रोजी आपटे मूकबधिर स्कूल मधील मुलांचे वाढदिवस साजरे केले. त्यांना वॉटर बाॅटल्स दिल्या. ॲन नेत्रा, ॲन निरूपमा, ॲन जयश्री, ॲन अंजली आणि अध्यक्ष शोभाताई असे पाच जण उपस्थित होते. त्यांना वाढदिवसाचा केक आणि खाऊ दिला.

आरोग्यदर्पण

Breast Cancer Awareness program was organised in association with Unique educational foundation on 26th March 2022 at Mohan nagar,Dhankawadi, Pune. More more than 80 women from different bachat gats attended the program.


Dr. Smita Jog explained the importance of early detection of breast cancer. She explained the way to carry out self breast examination, different modes of investigations and modalities of the treatment available. It was stressed that one can lead a disease free life for many years when the cancer is detected at an early stage and treated properly.
 

After the talk, ladies were asked simple questions and a ball pen was given to the lady as a token reward who answered correctly. This was enjoyed a lot by the ladies.bvBrochures giving information of ca breast and adolescent health were  distributed.


Mrs. Varsha Tapkir, corporator of Dhankawadi , Mrs Mane coordinator of Unique educational foundation were also present.

Rtn. Dr. Smita Jog

Jaipur Foot Project

On 15 th March, the 'Jaipur Foot Project' was completed with the handing over of 17 modular feet to needy persons. We handed over the cheque to BVS. Rtn. Milind Palkar was instrumental in executing the project. Thanks to all members for their generous donations. The function was attended by Dr. Smita jog, Milind Palkar , Yashwant Gokhale, Aniruddha Inamdar, Guru Palekar, and Dr.Rao were present.

खबर बखर

1. Modern College Shivajinagar won thirteen prizes in prestigious Firodiya Karandank competition. We have our Rotaract Club there. Kamble sir (Spouse of Rtn Alka Kamble) is Chairman Arts Circle.

2. १७ मार्च रोजी रोटरी क्लब पार्वती आयोजित नाट्यवाचन स्पर्धा पार पडली. आपल्या क्लबने  वसंत कानेटकर लिखित ' मीरा मधुरा' ह्या नाटकाचा तिसरा व अखेरचा अंक सादर केला. शेखर, गिरिजा, अश्विनी आणि वृंदाने यात भाग घेतला होता.

WhatsApp Image 2022-03-19 at 4.11.55 PM.jpeg

उपलब्धी....अभिनंदन

1. २७ मार्च रोजी रो. प्रमोद पाठक याने ओ. पी. नय्यर  वरती उत्कृष्ट कार्यक्रम सादर केला 

WhatsApp Image 2022-03-27 at 10.47.54 PM.jpeg
WhatsApp Image 2022-03-27 at 10.47.55 PM.jpeg

2. पी डी जी दीपक शिकारपूर याचे 'डिजिटल फ्यूचर' या विषयावरील ४४ वे पुस्तक प्रकाशित झाले.

Publication of 44th Book describing future Digital life in Pune Metro. The first book has QR codes hence audio-video information is a click away for readers. Milind Joshi president Marathi Sahitya parishad and Bharat Sasane President Marathi Sahitya Sammelan and Rajiv Barve Dilipraj Prakashan graced occasion.

WhatsApp Image 2022-04-04 at 4.01.53 PM.jpeg

3. March 1st Lokmat Newspaper - P D G Deepak's Article on "Career in Robotics" was published. With Virtualisation, Automation becoming buzzwords in new normal a very promising career option for professionals as well as entrepreneurs.

4. पी पी गौरी शिकारपूर हिने डिस्ट्रिक्ट सांस्कृतिक कमिटीने ४ मार्च रोजी आयोजित केलेल्या 'साऊंड ऑफ म्युझिक' या कार्यक्रमात भाग घेऊन सतारवादन केले. त्याचप्रमाणे पी पी शिरीष क्षीरसागर याने सुद्धा व्हायोलिन वादन केले. 

WhatsApp Image 2022-03-15 at 9.23.41 PM (1).jpeg
WhatsApp Image 2022-03-15 at 9.23.41 PM.jpeg

5. PDG Deepak Addressed scientists of the National Institute of Virology on 5th March who have proved to be great warriors who are helping the Nation fight all viruses. 

WhatsApp Image 2022-03-15 at 9.25.27 PM.jpeg

6. ११ मार्च रोजी डॉ. भागवत कराड केंद्रीय अर्थ राज्यमंत्री यांच्या हस्ते रो. बाळकृष्ण दामले याचा सत्कार झाला.

WhatsApp Image 2022-03-15 at 9.27.45 PM.jpeg

7. Abhishek, son of Rtn. Sanjeev and Meena Chaudhari got Admit confirmation from CMU - Carnegie Mellon and Buffalo University. For MS in MIS Management Information Systems. He fulfilled the profound dream of his mother Meena.....says Sanjeev. 

8. Devashish, Son of Rtn. Pratap and Pallavi Gokhale got a mention in the International news section of the Indian education diary. 

9. रो. संजय व सुषमा देशपांडे यांची मुलगी मधुरा व जावई मयूर यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. नवजात शिशूचे नाव  मिथिल ठेवण्यात आले आहे.

10. १३ मार्च रोजी प्रतिमा दुरुगकरचा लेख "अद्भुतरम्य केबेक" पुण्यनगरी वृत्तपत्रात आला होता

11. रो. वृंदा वाळिंबे रोटरी क्लब ऑफ पुणे पर्वती या क्लबची ऍन आहे. तिने त्या क्लबकडून घेतल्या गेलेल्या नाट्यवाचन स्पर्धेच्या २१ मार्च रोजी आयोजित केल्या गेलेल्या पारितोषिक सोहळ्याचे सूत्रसंचालन तिने केले.

12. पी डी जी दीपक याचा 'घातक सेल्फी' हा लेख 'पुढारी'  वर्तमानपत्रात २० मार्च रोजी प्रकाशित झाला.

13. P D G Deepak Shikarpur was Appointed as mentor/advisor on March 17th, 2022 for Redemption Digital Technology Pvt Ltd. for the crypto token project.

14. P D G Deepak's article in Lokmat was published on the subject "Future career in Virtual world of Metaverse 2028++"

15. एप्रिल महिन्याच्या 'किशोर' मासिकात प्रतिमा दुरुगकरचा लेख "आमची मनी झाशीची राणी" हा आला होता.

16. Rtn. Deepak Shikarpur received the Certificate for trying Rifle Shooting from Maestro Anjali Bhagwat Arjuna awardee and former India No 1.

17. Rtn. Deepak Shikarpur's article on "Drone an excellent career option 2022" was published in Lokmat.

18. Rtn. Deepak Shikarpur was invited to be the guest of honor in the program named "Padarpan" to address the RID 3142 Leadership team 2022-23.

19. PP Shirish was felicitated by DG Pankaj Shah for a district musical concert on Lata Mangeshkar.

WhatsApp Image 2022-04-03 at 5.31.14 PM.jpeg

20. २७ मार्चला पुण्यनगरीत ' दलाई लामांच्या भूमीत ' या विषयावर प्रतिमाचा लेख आला होता.

एप्रिल

औक्षवंत व्हा, सुखी व्हा !

२ एप्रिल.    -  पल्लवी कापरे
५ एप्रिल.    -    हर्ष बर्वे
७ एप्रिल.   -  राजेंद्र वाईकर
८ एप्रिल.    -  विनया रायगावकर
१० एप्रिल.  - प्रमोद पाठक
१२ एप्रिल. - शोभना दाते
१३ एप्रिल. - शुभांगी वाळवेकर
१५ एप्रिल. - सोनिया शिकारपूर 
१५ एप्रिल. - अंजली गोडबोले
१६ एप्रिल. - दिलीप धामणकर
१६ एप्रिल. - अनिरुद्ध इनामदार
१९ एप्रिल. - मोहिनी बर्वे
२१ एप्रिल. - रोहिणी पालेकर

रेशीमगाठी वर्धापनाच्या हार्दिक शुभेच्छा !

२१ एप्रिल. - प्रमोद आणि नेहा पाठक
२२ एप्रिल. - संजय आणि सुषमा देशपांडे
२३ एप्रिल - आनंद आणि जयश्री नवाथे.

Birthday Fellowship LeaderMarch / April

Ann Rohini Palekar

Monthly Support Group April

Rtn.Ashok Gadgil (Leader)
Rtn. Milind Palkar
Ann. Vandana Palkar
Rtn. Prakash Gaikwad
Ann Poonam Gaikwad
Rtn Chandrakant Godse
Ann. Hematai Godse.

Rotary Information

April is Maternal and Child Health Month

Every day, over 800 women die from pregnancy or childbirth-related causes. An additional 6500 newborn babies die daily - most from causes that are preventable or treatable.

 

The COVID-19 pandemic has caused major disruptions to health services that are exacerbating these risks. Financial impacts are also making it harder for countries to sustain quality health care. Maternal health refers to the health of women during pregnancy, childbirth, and the postnatal period. Each stage should be a positive experience, ensuring women and their babies reach their full potential for health and well-being. 

The most common direct causes of maternal injury and death are excessive blood loss, infection, high blood pressure, unsafe abortion, and obstructed labor, as well as indirect causes such as anemia, malaria, and heart disease. Most maternal deaths are preventable with timely management by a skilled health professional working in a supportive environment. 

Ending preventable maternal death must remain at the top of the global agenda. At the same time, simply surviving pregnancy and childbirth can never be the marker of successful maternal health care. It is critical to expanding efforts to reduce maternal injury and disability to promote health and well-being.

Every pregnancy and birth is unique. Addressing inequalities that affect health outcomes, especially reproductive health and rights and gender, is fundamental to ensuring all women have access to respectful and high-quality maternity care.

P P Yashwant Gokhale

Projects in April 2022

1. Food grain supply to Ekalawya Nyas
2. Food grain supply to Sarthak Seva Sangh
3. Health Expo organized on 3rd April.
4. We will have Heritage walks, possibly 2
5. Club day will be celebrated on 30th April.
6. Bawarchi night will be celebrated.

Programs in April 2022

3rd April - Health Expo
4th April ( Monday) Holiday
11th April - Owners of Shreyas Hotel - Chintamani and Mrinalini Chitale will talk about their charitable work
18th April - Lt. Gen Rajendra Nimbhorkar will talk on Kashmir Files

25th April - To be announced
30th April - Club Day

डिस्ट्रिक्टच्या घडामोडी

1. On 27th March,  'KHUBSURAT' program organised by District First Lady Priya, Pres. Shobhatai Rao was felicitated as Lady President. In addition, our club received two more certificates; one for having more Lady Directors in BoD and one for having significant Lady Rotarians in our club.

WhatsApp Image 2022-03-28 at 7.46.49 AM.jpeg

2. Jagruti
Interact Conference District 3131
5th March 2022


Jagruti, as the name suggests, was truly an eye-opener, bringing in a change of mindset and perspective. A successful event worth cherishing, wherein the interactors, teachers, Rotarians, the chief guests, and the speakers were testimony to a new awakening.
Altogether there were 250 registrations. 157 had logged in through Zoom.
The success of the Conference was due to the teamwork and proper coordination between the Interact Team, Host Clubs, and their teams. 
 
There was an overwhelming response to the singing, dancing, and monologue competitions. Along with that, almost 20 videos on group dances were received. 


We had the following distinguished panel of judges.
Rtn. Shirish Kshirsagar RCP Shivajinagar
Rtn. Mrunal Godse RCP Karvenagar
Rtn. Ashwini Ambike RCP Shivajinagar
 
The Technical team was headed by the Avenue Secretary Rtn. Sameer Mohire and ably supported by Rtn Rajendra Erande and Rtn Srikant Joshi.
 
The power team was the following Host clubs.
RC Baramati, RC Daund, RCP Metro, RCP Katraj, RC Poona, and RCP Magarpatta Elite worked very hard along with the District Interact Committee and were instrumental in getting good Registrations.
The following clubs had maximum registration. 
RCP Metro followed by RC Baramati
 
The Interact Chair Rtn Asha  Amonkar took special pains to make the event a grand success. She was timely supported by Rtn Jayashree Deshpande, Rtn Hemant Godbole, Rtn Pradnya Rajopadhye, Rtn Rupali Pawar, Rtn Pushkraj Muley, Rtn Daljeet kaur Raizada, *Rtn Vivek Kulkarni, Rtn Sanjay Dudhal, Rtn Shalini Pawar, Rtn Rajendrakumar Saraf played their roles meticulously.
 
 
Finally the Captain of the ship, the Youth  Director *Rtn Gauri Shikarpur kept everyone in harmony and synchronization which she does in her daily life as well. The guests and speakers added colors to the event. 
 
Though DG Rtn Pankaj Shah couldn't attend due to technical reasons, he appreciated the efforts taken by everyone and motivated all the participants.
 
Keynote Speaker-Corporator and founder of Balranjan, Mrs. Madhuritai Sahastrabudhe could immediately connect with the interactors. She guided them on various issues like the importance of good habits, good company, staying away from addictions, and political glamour and influence.
 
Abhijeet Pokharnikar of 'Dadachi Shala' made everyone aware of the hardships his school and students have to undergo and how they overcome it with their determination and willpower, in spite of having limited resources, as it is rightly said ‘Where there’s a will there’s a way.’


During his speech, one could make out the high regard that he has for his mentor and role model, Late Sindhutai Sapkal, and her philanthropic work.
 
Pinak Naik-Guinness Record Holder
This was really an eye-opener for those who are depressed after failure. He inspired everyone by sharing how he converted his failure into success as his parents believed in him and stood like a rock behind him when he needed them the most. This indeed is an important lesson to be learned for everyone, the young and the old. He also took us virtually on a journey of his Guinness Record feat which again was a team effort and success of everyone involved.
 
Rtn. Divakaran Pillai
Reviewed the conference and guided the interactors and the youth team on able governance and the smooth functioning of the clubs.

 

The winners and participants were aptly awarded certificates. 


 

Rtn. Sameer Mohire
Avenue Secretary Youth

3. Rotaract District 3131 Participated in Rotasia Chennai 2022.

 
We gave District presentation. We gave a Cultural presentation. We participated in the entire Agendas set by the Host district. DRR Parth attended and represented both the meetings of the House of DRRs of South Asia. The district Rotasia coordinator Rtr Satyajeet did fantastic work in organizing the entire team.

Rotaract District 3131 Won the Best Disciplined District in Rotasia Chennai.

PP Gauri Shikarpur

4. Tirupati Trip - Dr. Suryaprakasa Rao and Dr. Shobha Rao organized a District Tirupati Trip in the month of March

5. DTTS (District Team Training Seminar)


१३ मार्च रोजी डिस्ट्रिक्ट ट्रेनिंग सेमिनार कमिन्स कॉलेज येथे पार पडला. त्यामधे डिस्ट्रिक्टचे सर्व अॅव्हिन्यूचे  रोटरी वर्ष २०२२-२३ चे डायरेक्टर आणि त्यांच्या टीम्स यांचे ट्रेनिंग होतं. सुरुवातीला सकाळच्या प्लेनरी स्टेशन मध्ये डिस्ट्रिक्ट ट्रेनर डाॅ  गिरीश गुणे तसेच पीडीजी मोहन पालेशा व पीडीजी डाॅ. शैलेश पालेकर यांची सुंदर लेक्चर्स झाली. तसेच RID 3141 चे आय पीडीजी सुनील मेहरा यांचे उत्कृष्ट भाषण झाले. कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे होते  World Rotaract Chair- रवि वदलमानी. डिलिवर हॅपिनेस, स्प्रेड स्माईलस, एन्जॉय रोटरी या विषयावर अगदी भारावून टाकणारे सुंदर लेक्चर झाले. त्यानंतर दुपारच्या ब्रेक आउट स्टेशन मध्ये सर्व सात फोकस एरीयाजचे डायरेक्टर्स एकाच रूम मध्ये होते आणि इतर अॅव्हिन्युज वेगवेगळ्या रूम मधे  होते.


पीपी प्रदीप "इंटरनॅशनल पीस आणि कॉनफ्लिक्ट रिझोल्युशन"चा कौन्सिलर असल्यामुळे त्यांचे प्रेझेंटेशन होते. पीपी गौरी  एन्व्हायरमेंट व्हिन्यूची डायरेक्टर असल्यामुळे तिचे प्रेझेंटेशन होते. मी "मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थ"ची डायरेक्टर असल्यामुळे माझे प्रेझेंटेशन होते. संजीवने वेबसाईट कमिटीचा मेंबर म्हणून मीटिंग अटेंड केली होती.  पीपी सी डी महाजन यांचे "मेंबरशिप ओरिएंटेशन अँड रिटेन्शन" यावर प्रेझेंटेशन होतं. आणि या संपूर्ण दिवसभराच्या कार्यक्रमाचे मास्टर ऑफ सेरेमनी म्हणून पीपी वृंदाने उत्कृष्ट काम केलं. 
पी पी शरद आणि ए जी ऋजुताने पण मिटींग
टेंड केली. एकुणात आपल्या क्लबचे छान रिप्रेझेंटेशन होते.

रो. शोभा राव

6. रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 तर्फे कुंभारगाव दत्तक घेत राबवले महत्वपूर्ण उपक्रम

शोकसंदेश

WhatsApp Image 2022-03-15 at 9.26.52 PM.jpeg

Rotary International

The Rotary Foundation creates channel for direct humanitarian support in the Ukraine region


In response to the deepening humanitarian crisis in Ukraine, The Rotary Foundation has created an official channel for donors around the world to contribute funds to support the relief efforts underway by Rotary districts and has designated its Disaster Response Fund as the main avenue for contributions.

To this end, The Rotary Foundation has approved:

Now through 30 June 2022, designated Rotary districts that border Ukraine and the Rotary district in Ukraine may apply for grants of up to $50,000 each from the Disaster Response Fund. These expedited disaster response grants can be used to provide relief to refugees or other victims of the crisis including items such as water, food, shelter, medicine and clothing.
 

During this same period, other impacted Rotary districts that wish to offer support to refugees or other victims of the crisis in their district can apply for $25,000 grants from the Disaster Response Fund. Now through 30 April 2022, Rotary districts can transfer unallocated District Designated Funds (DDF) to support the Disaster Response Fund, directly supporting these Ukraine-specific humanitarian grants. Contributions to the Disaster Relief Fund in support of Ukraine can be made here. All funds need to be received into the Disaster Response Fund by 30 April 2022 in order to qualify for use in support of the Ukrainian relief efforts.
 

Although the Disaster Response Fund will be the main avenue for Rotary Foundation support, Rotary and Rotaract clubs are also encouraged to create their own responses to the humanitarian crisis in Ukraine.


In addition to support provided through the Disaster Response Fund, the Foundation is coordinating with partners and regional leaders, exploring effective solutions to the increased humanitarian needs. We are in contact with the United Nations High Commission on Refugees – USA to prepare for and respond to the needs of those being displaced in Ukraine and to neighboring countries.


ShelterBox, our project partner for disaster response, is in communication with Rotary members in Eastern Europe to explore how it may offer support with temporary transitional housing and other essential supplies.
 

The Rotary Action Group for Refugees, Forced Displacement, and Migration is also mobilizing its resources to assist in this crisis.
 

More than 2 million people have fled Ukraine and are in dire need of emergency aid. The United Nations estimates that number could grow to as many as 5 million people displaced. Rotary clubs in Europe and around the world have stepped up their relief work, some working on the ground to help displaced families.

 

We will continue to monitor the situation in Ukraine and neighboring countries. Visit My Rotary and follow Rotary on social media to stay updated on how clubs can get involved and what actions Rotary members have taken and the impact it has had for people in the region.

 

For all other questions and to obtain more information, please contact the Rotary Support Center at rotarysupportcenter@rotary.org.

P D G Deepak Shikarpur

Rtn. T.N. Raju Subramanian elected as RI Director 2023-25

WhatsApp Image 2022-03-15 at 9.24.33 PM.jpeg
w0262_1s_Watercolor-Floral-Pattern-Wallpaper-for-Walls-Pastel-Flowers_Repeating-Pattern-Sa
Lalit Vibhag.png
Gokhale Madhuri 1.jpg

होममेकर्स आणि बरंच काही

'कनवाळू'  माधुरी  

 

लहानपणी ऐकायला आवडलेल्या गोष्टीत एक गोष्ट हमखास असायची ती म्हणजे एक आटपाट नगर होतं. तिथला राजा खूप शूर उदार आणि विद्या व कलाप्रेमी होता त्याचं त्याच्या प्रजेवर खूप प्रेम होतं. त्याची राणी अतिशय देखणी होती. त्यांना एक मुलगी होती. ही राजकन्या ही आईप्रमाणेच दिसायला देखणी आणि खूप हसरी, बडबडी होती. नगरातली सर्व मुले-मुली तिचे सवंगडी होते. राजाप्रमाणेच तिलाही सगळे नगरवासी आपलेच वाटत. नगरातल्या कोणत्याही घरात ती केव्हाही जाई आणि तिचं तिथे खूप प्रेमाने स्वागत होई. यथावकाश राजकन्या मोठी झाली, उपवर झाली. एका सुंदर उमद्या राजपुत्राशी तिचा थाटामाटात विवाह झाला आणि ही आटपाट नगराची लाडकी राजकन्या तिच्या पतीची राणी म्हणून सुखाने नांदू लागली.

 

आज ही गोष्ट आठवायचं कारण आपली माधुरी  --- माधुरी गोखले. 


खळखळून हसणारी बोलकी माधुरी पूर्वाश्रमीची माधुरी ओगले. ती लहानाची मोठी झाली ती ओगलेवाडीतच..तेव्हाची ओगलेवाडी आणि माधुरीचे तिथलं आयुष्य हे आपल्या गोष्टीतल्या नगरासारखं आणि त्या नगराच्या राजकन्येच्या  आयुष्यासाऱखं  होतं. त्यावेळी ओगलेवाडी ही एक अतिशय सुंदर टुमदार अशी वसाहत होती. ओगलेवाडीचा त्या वेळी प्रसिद्ध असलेला काचकारखाना माधुरीच्या आजोबांनी सुरू केला होता, पुढे हा कारखाना तिचे काका पाहात. माधुरीच्या वडिलांनी स्वतःचा वेगळा कारखाना काढला होता. त्यावेळी ओगलेवाडीचे स्वरूप आणि तिथलं वातावरण आपल्या गोष्टीतल्या आटपाटनगरासारखं सुंदर होतं. सुरेख बागा, भरपूर प्रकारची फुलं हिरव्यागार हिरवळीने आणि सर्व सुखसोयींनी युक्त अशा त्या वसाहतीत जणू एक मोठं कुटुंब रहात असे, सारे सण समारंभ एकत्रितपणे आनंदाने उत्साहाने साजरे करत. साहजिकच सर्व मुले ही एकमेकांची दोस्त होती. अशा वातावरणात माधुरी लहानाची मोठी झाली. तिचे वडील कलाप्रेमी होते, त्यामुळे तिथे होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निमित्ताने येणारी सर्व कलाकार मंडळी साहित्यिक हे सगळे जण त्यांच्या घरी उतरत असत, मग ते भीमसेन जोशी असोत, व. पु काळे असोत किंवा परवीन सुलताना असो. एक मजेशीर गोष्ट म्हणजे परवीन सुलतानाला माधुरीच्या घरी एका स्वतंत्र खोलीत एकटीने झोपणे काही स्वस्थतेचं  वाटे ना  तेव्हा छोटी माधुरी तिच्यासोबत तिच्या खोलीत झोपायला गेली!

.
तर अशा ओगलेवाडीत माधुरी लहानाची मोठी झाली. बारावीनंतर तिला शिक्षणासाठी पुण्यात पाठवण्यात आलं आणि ती एस.पी. कॉलेजच्या हॉस्टेलवर राहू लागली. हेतू हा होता की ओगलेवाडीच्या 'कोझी' वातावरणाबाहेरचं जग माधुरीला दिसावं आणि तिथलं टक्के टोणप्यांसहितचं जीवनही कळावं.


पण माधुरीला पुणं  नवीन नव्हतं. त्यांच्या प्रभात रोड वरच्या बंगल्यात ती नेहमी सुट्टीसाठी राहायला येत असे. तिचे खूप लाड करणाऱ्या तिच्या आत्या जशा पुण्यात होत्या तसंच एस.पी.च्या होस्टेलवरही ओगलेवाडीसारखाच तिचा प्रेमळ मित्र-मैत्रिणींचा गोतावळा तिने निर्माण केला. तिचे हसरे,बोलके व्यक्तिमत्व आणि आस्थेवाईक स्वभाव त्यामुळे होस्टेलवर ही तिला बरोबरीच्या तसेच जूनियर आणि सीनियर अशा सर्व गटातल्या जिवाभावाच्या मैत्रिणी मिळाल्या. साहजिकच ओगलेवाडीप्रमाणेच इथेही लाडाकोडात तिचं आयुष्य पुढे सरकत राहिलं.


माधुरीच्या  वडिलांना कुत्र्यांचे खूप प्रेम होतं. ते ग्रेट डेनचं ब्रिडींगही करत त्यामुळे कधीकधी घरात एका वेळी वीस वीस कुत्रेही असत. सहाजिकच माधुरीच्या मनातही प्राण्यांबद्दल खूप प्रेम निर्माण झालं. एकदा तर तिच्या वडिलांनी सिंहाचा बछडा घरी आणला होता. पण त्याला मात्र जास्त दिवस घरात  ठेवता आलं नाही असं माधुरीनं सांगितलं .


ओगलेवाडीत होणाऱ्या विविध विषयांच्या सभा संमेलनांमुळे आणि त्या अनुषंगाने त्यांच्या घरी राहायला येणाऱ्या विविध क्षेत्रातल्या मान्यवरांमुळे माधुरीला एकूणच या सर्व गोष्टींची लहानपणापासूनच फार जवळून ओळख झाली. त्याचं प्रत्यंतर आपल्या सर्वांनाच क्लबच्या विविध उपक्रमांत हिरीरीने कोणत्याही जबाबदाऱ्या सांभाळत आहे, त्यावरून आपल्या सर्वांनाच आलेला आहे.


'भूगोल' हा विषय घेऊन पदवी मिळवल्यानंतर लगेचच माधुरीचा विवाह विजयबरोबर झाला. विजयचं कुटुंब दिल्लीतलं. त्यामुळे विजय दिल्लीतच लहानाचा मोठा झाला. नोकरीच्या निमित्ताने तो मुंबईत आला तेव्हा त्यांचा विवाह झाला आणि माधुरी अंधेरीत राहू लागली. अंधेरीतलं छोटं घर आणि घरातली सर्व कामं दिवसभर एकटीनेच करणं हा सर्वच फार मोठा बदल त्यावेळी माधुरीला अनुभवावा लागला. पण ही स्थिती जेमतेम सहा महिने होती. विजयने नोकरी बदलली आणि माधुरी विजय पुण्यात आले. पुणं अर्थातच माधुरीच्या सवयीचं. शिवाय येथे नातेवाईक आणि मित्रमंडळी खूप. हे दोघे पुण्यात राहू लागले म्हणून विजयचे आई-वडीलही दिल्ली सोडून पुण्यात आले. 


पुण्यात आल्यावर लॉ ची पदवी घ्यावी म्हणून माधुरीने अभ्यास सुरू केला पण मृण्मयी चा जन्म झाला आणि माधुरीच्या अभ्यासाला पूर्णविराम मिळाला. तसही शिक्षणानंतर आपण नोकरी करावी असं माधुरीचे ध्येय कधीच नव्हतं. पण तिच्या मनात प्रथमपासूनच एक पक्क होतं की ज्याला मदतीची गरज आहे त्यांच्यासाठी आपण काम करावं. हा विचार तिच्या मनात रुजण्याचं कारण तिची आजी. माधुरी म्हणाली, "माझ्या आईच्या आईला सोशल वर्कची फार आवड होती. ती नेहमीच विविध वृद्धाश्रमांमध्ये जात असे. तसंच बाबा आमटे यांच्या आनंदवनात ही जात असे. दोन्हीकडे तिथल्या लोकांना ज्या गोष्टीत मदतीची गरज भासेल त्या त्या बाबतीत काम करणं तिच्या आजीला खूप आवडत असे तिच्या सहवासामुळे अपंगांसाठी आपण काही काम करावं अशी भावना माधुरीच्या मनात पक्की झाली होती.


त्यामुळे तिची मावस बहीण एका गतिमंद मुलांच्या शाळेत ड्रॉईंग शिकवायला जाते हे समजल्याबरोबर तिने 'विद्या ज्योती शाळा' गाठली ती तिथे गतिमंद मुलांना इंग्रजी व शास्त्र  शिकवू लागली. वास्तविक  कोणत्याही दिव्यांगांना शिक्षण देण्याच्या पद्धतीची तंत्रे आता दिवसेंदिवस विकसित होत आहेत आणि ते तंत्र शिकण्याच्या सोयीही उपलब्ध आहेत. पण माधुरीच्या मनातली या कामासाठीची तिला पुरेशी तळमळ होती. शाळेतल्या मुलांना शिकवत शिकवत आणि मुख्याध्यापक बाईंच्या मार्गदर्शनाखाली माधुरी उत्तम शिक्षक झाली.


अर्थात अशा कामासाठी मनात केवळ इच्छा असून भागत नाही तर प्रत्यक्ष काम करताना लागणारा पेशन्स, ते काम करण्याबद्दलचा मनाचा निश्चय, केलेल्या प्रयत्नांना खूप उशिराने मिळणारे यश स्वीकारण्याचा धीर अशा अनेक गोष्टींची गरज असते. अर्थात या साऱ्या गोष्टींचा अनुभव हा प्रत्यक्ष काम  केल्यावरच येणार. पण त्या अनुभवा पर्यंत पोहोचण्याची मानसिक तयारी मात्र असण्याची गरज असते. याविषयी माधुरीशी बोलल्यावर ती म्हणाली, "गतिमंद मुलांना शिकवायचं  तर आपला पेशन्स ही महत्त्वाची एकमेव  गरज आहे असं मी ऐकलं होतं आणि मी तर चिडकी मग कस बर जमणार? अशी मनात शंका होती. पेशन्स तर लागतोच त्याबद्दल दुमत नाहीच पण त्याहूनही अधिक या मुलांबद्दल मनात प्रेम हवं असं मला वाटतं. आपल्या मनात त्यांच्याबद्दल  असलेलं प्रेम आपली तळमळ त्यांना व्यवस्थित समजते आणि ते त्यांना जाणवलं की ही मुलं तुमच्या बरोबर एकदम मोकळी होतात ती तुमचं म्हणणं ऐकतात तसच आपल्या सर्व प्रयत्नांना सर्वतोपरी साथ देतात." याबाबत माधुरीशी सविस्तर बोलल्यावर एक जाणवलं ते माधुरीच्या हसऱ्या, बडबड्या स्वभावाच्या तळाशी असलेला आस्था आणि जिव्हाळ्याचा स्थायीभाव !


या कामाबद्दल चे तिचे अनुभव खरोखरीच हृदयस्पर्शी आहेत. तिची एक विद्यार्थिनी, जिना चढायला अतिशय घाबरायची, जिन्याच्या पायरीपासून  मागे फिरायची. तिला समजावून सांगत. धीर देत पायरी चढायला माधुरीने उद्युक्त केलं एवढंच नव्हे तर त्या मुलीला आत्मविश्वास देऊन हळूहळू एक एक पायरी चढायची वाढवत जेव्हा ती मुलगी, संपूर्ण जिना चढू लागली ना त्या गोष्टीचा आनंद मोजायला परिमाण नाही हेच खरं! जिन्याची पायरी सुद्धा न चढू शकणारी मुलगी आता आत्मविश्वासाने चक्क नोकरी करत आहे. तिच्या आयुष्यात झालेला हा केवढा प्रचंड बदल आहे आणि तोही तिच्यासह  सर्वांनाच आनंद देणारा ! 

असाच एक माधुरीचा विद्यार्थी कधीही काहीही बोलतच नसे. तो सदैव गप्प बसून राही. शिक्षकांशी तर नाहीच पण वर्गातल्या मुलांबरोबरही  तो कधीही बोलत नसे. घरी  पण तो सदैव गप्पच असे. सर्वांनी त्याच्या पुढे हात टेकले अशा मुलाला चिकाटीने समजावत त्याच्या मनात आपल्याविषयी विश्वास निर्माण करत अखेर त्याला बोलतं करण्यात माधुरी यशस्वी झाली. 

आता हा मुलगा किंवा ती जिन्याच्या पायऱ्या चढू लागलेली मुलगी यांच्या मनात माधुरी बद्दल काय भावना असतील, तिच्याविषयी किती विश्वास असेल आणि तिच्या सोबत बोलायला किती मोकळ वाटत असेल याची आपण कल्पना करू शकतो. मग  ही  मुलं माधुरी शिकवेल ते शिकायला उत्साह न दाखवतील तरच नवल ! 

या मुलांना इतक्या चिकाटीने आणि त्यांच्या कलाकलाने घेत प्रगतीपथावर आणताना माधुरीला शारीरिक तसेच मानसिक कष्ट खूप जाणवले .या मुलांमध्ये  ती फार गुंतून गेली, गुंतून राहू लागली. याचा परिणाम म्हणजे तिला रक्तदाबाचा त्रास होऊ लागला .तेव्हा डॉक्टरांनी तिला  हे काम थांबवण्याचा सल्ला दिला. ओगलेवाडीच्या या राजकन्येनं, या मुलांसाठी खरं तर झोकून देऊन काम केलं होतं पण नाइलाजाने तिला  डॉक्टरांचा सल्ला मानावा लागला आणि दहा बारा वर्ष सातत्याने केलेलं गतिमंद मुलांना शिकवण्याचं काम तिने थांबवलं. हे काम थांबवलं तरी तिच्यातला शिक्षक सदैव डोकं वर काढत असतो त्यामुळेच मोरे विद्यालयात कच्च्या मुलांना शिकवायला जाण्याच्या उपक्रमात तिने ताबडतोब भाग घेतला. अर्थात फक्त शिकवण्याच्याच नव्हे तर इतरही उपक्रमात ती सातत्याने पुढाकार घेते. 'रेड  डॉट' मोहिमेत तिने कामाचा  किती सपाटा लावला ते आपण पाहिलंच आहे. 

शाळेचे काम थांबवलं तरी त्या मुलांमधलं तिचं मन आत्ता ही त्यांचा विचार करतच आहे. त्यांना शिकवताना आलेल्या अनुभवांवरून त्यांना कशा पद्धतीने शिकवलं तर त्यांना सुलभ होतं हे तिला तर चांगलं अवगत झालंय त्यावेळी तिने काढलेल्या नोट्स, चित्र, नकाशे असं विपुल साहित्य तिच्याजवळ साठलं आहे. सध्याचे शिक्षक त्याचा उपयोग करतच आहेत. पण हा अनुभव पुढच्या लोकांना सदैव साहाय्यकारी ठरेल असं तिला वाटतं म्हणून तिच्या साहित्यातून तसंच मनात साठलेल्या अनुभवातून पुस्तकं तयार करावी असा माधुरीचा विचार आहे त्यादृष्टीने ती पुस्तकांच्या मांडणीची तयारी करत आहे. यात विजयच नव्हे तर तिची मुलगी मृण्मयी पण तिला मोलाचे सहाय्य करत आहे कारण त्या दोघांनाही माधुरीच्या ज्ञानाचा अनुभवाचा उपयोग इतरांना होणे नितांत गरजेचे वाटत आहे .


माधुरीच्या मनात या मुलांबद्दलच आस्था आहे, जिव्हाळा आहे, असं नाही. तिचा तो स्थायी भावच आहे. शिवाय तिची सेवावृत्ती. ज्याला मदतीची गरज आहे त्याला शक्य ती मदत करायची हे  तिने  ठरवलेलच आहे. त्यामुळे  तिच्या जवळ राहायला तिची आजी किंवा तिच्या आजेसासुबाई अशी वृध्द मंडळी सदैव तयार असत. माधुरीने त्यांचंही प्रेमाने  केलं  हे  सांगायची  गरजच  नाही. हे तिच्या आस्थेवाईक स्वभावाचंच द्योतक आहे असं मला वाटतं. माधुरी म्हणाली, "माझे सासरे म्हणजे तर माझे बेस्ट फ्रेंड आहेत. ते सदैव खूप पॉझिटिव असतात तसंच त्यांना गप्पा मारायला खूप आवडतात. माझे वडीलही असेच गप्पिष्ट होते." त्यांच्यामुळे बहुधा माधुरी बोलकी झाली असावी. तर अशा बोलक्या माधुरीला स्टेज  फ्राईट कधीच नव्हती. त्यामुळे विद्यार्थी दशेत वक्तृत्वात तिने प्रावीण्य मिळवलं यात काहीच नवल नाही. आई वडिलांमुळे तिला वाचनाची गोडी लागली तसंच बॅडमिंटन खेळणे, भरत काम करणं तिला खूप आवडतं. प्रवासाची ही तिला खूप आवड आहे. त्यामुळे शाळेत जाऊन मुलांना शिकवणं थांबवलं तरी त्या शाळेसाठी पुस्तकं तयार करणं आणि तेव्हाच मनमुराद प्रवास करणं तिच्या अजेंड्यावर आहे. याखेरीज आपल्या क्लबसाठीच्या विविध उपक्रमात तिचा उत्साही धडाडीचा पुढाकार असावा आणि आपल्यालाही तिच्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग व्हावा अशी अपेक्षा मी आपल्या तर्फे व्यक्त करते.

 

न सरिता  भावे

कांदा मुळा भाजी...अवघी विठाई माझी

ह्या विडिओमध्ये ॲन शिल्पाने निवडुंगाची माहिती दिली आहे

कथाकथन

रो. रेश्मा कुलकर्णीने "भरपाई" या कथेचं वाचन केलं आहे

खाण्यासाठी जन्म अपुला- ॲन नेत्रा वाघ

Baked Beans On Toast 

मनाचे श्लोक - रो. मृणाल नेर्लेकर १२ वा श्लोकाचे निरूपण करीत आहे.

हस्त सामुद्रिक शास्त्र

रविरेषा

रविरेषेवरून व्यक्तीची त्याच्या आयुष्यातील होणारे यश-अपयश हे दर्शविले जाते. व्यक्तीचा आत्मविश्वास, तल्लखपणा, कीर्ती, अधिकार योग, कला इत्यादी गोष्टींचा बोध होतो. ही रेषा नेहमी सांगितल्याप्रमाणे चांगली असेल तर त्या व्यक्तीला वरील सर्व योग प्राप्त होतात. आता कोणत्याही गोष्टी व्यक्ती करते त्यात त्याला यश मिळते. मग ते कोणत्याही प्रकारचे असो.


या रेषेचा उगम मनगटापासून सुरू होऊन रवीच्या उंचवट्यावर व बोटापर्यंत प्रवास करत जातो. ही रेषा मनगटापासून सुरु होत असेल तर आयुष्याच्या सुरुवातीपासूनच यश मिळत राहते. ही रेषा जिथे खंड पडते त्या वेळेने दर्शविलेल्या वयात यशात खंड पडते. ही रेषा कलात्मक मग ते संगीत, नाट्य, ॲक्टिंग, नृत्य या मार्गात यश दर्शवते.


धनरेषा व रवीरेषा यात परस्पर संबंध असतोच. या दोन्ही रेषा चांगल्या असतील तर यश व संपत्ती ही दोन्ही व्यक्तीला प्राप्त होतात. रवीरेषा मस्तकरेषा अथवा हृदयरेषा यापासून सुरू होत असेल तर वयाच्या पस्तीस, चाळीस वर्षापासून व्यक्तीला यश प्राप्त होते. म्हणजेच थोडे उशिरा प्राप्त होते. हाताच्या मध्यभागातून ही रेषा सुरू होत असेल तर कष्ट करून यश प्राप्त होते.
 

चंद्र उंचवट्यावरुन सुरू होत असेल तर चंचल स्वभावामुळे व्यक्तीच्या वर्तणुकीवर परिणाम होऊन यशात अडचणी निर्माण होतात. या रेषेवर संरक्षक चिन्ह असतील तर त्या व्यक्तीला वेगवेगळ्या अडचणी आल्या तरी त्यातून ती निभावून पुढे जाते. या रेषेवर स्टार असेल तर हे एक चांगले लक्षण आहे.


ही रेषा फुली, आडव्या रेषा, ठिपके यांनी खंडित असेल तर अपयश, अब्रूनुकसानी वगैरे दर्शवते. तसेच भागीदारीत नुकसान दर्शविते. रवि उंचवटा उठावदार नसेल तर प्रकृती चांगली राहत नाही. दोन रवीरेषा अथवा रवीरेषेला समांतर दुसरी रेषा व्यक्तिला वारसाहक्काने संपत्ती दर्शवते. तसेच विवाह, लॉटरी या मार्गाने सुद्धा संपत्ती योग दर्शवते.


या रेषेचा शेवट रवी बोटाच्या खाली तीन समान खाचात होत असेल तर ती व्यक्ती जागतिक कीर्ती असणारी होते.

 

पी. पी. अशोक गाडगीळ

fig 1.jpg

आरोग्यवर्धिनी

फॉस्फरस

हा शरिरातला दुसरा महत्वाचा क्षार आहे असे म्हटले तरी चालेल. फॉस्फरस हा शरिरातील इतर पदार्थांत मिसळतो व फॉस्फरस तयार होतात. अनेक अन्नपदार्थातून फॉस्फेटस मिळतात. सर्वसाधारणपणे जे पदार्थ प्रथिनांचा स्त्रोत आहेत त्या पदार्थात फॉस्फरस हा क्षार नैसर्गिकपणे असतोच.

हा क्षार हाडे व दात तयार होण्यासाठी लागतो. त्याचप्रमाणे स्निग्धांश आणि कार्बोदके ह्यांच्या वापरासाठी उपयोगी असतो. पेशी आणि स्नायू ह्यांची दुरूस्ती आणि राखण होण्यासाठी ह्याची गरज असते. ATP हे पेशींच्या ऊर्जेचे चलन आहे आणि ATP तयार होण्यासाठी फॉस्फेट हे अत्यंत महत्वाचे असतात. ह्या क्षाराच्या साठयापैकी 85% फॉस्फेट ह्या स्वरुपात हाडांमध्ये साठवलेला असतो व उरलेला सर्व शरीरभर स्नायूंमध्ये असतो. ह्याची दैनंदिन गरज 700 mg एवढी असते. ह्या कॅल्शियमच्या विरूद्ध दिशेने काम करतो. खर म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम व फॉस्फरस हे तिन्ही क्षार पेशींच्या अनेक महत्वाच्या कार्यात गरजेचे असतात आणि किडनी त्यांना नियंत्रित करत असते. कॅल्शियम व फॉस्फरसचे प्रमाण हे साधारणपणे 2:1 असे असते. त्याच प्रमाणे कॅल्शियम व मॅग्नेशियमचे प्रमाण सुद्धा 2:1 असे असणे गरजेचे आहे. कॅल्शियम चे प्रमाण जेव्हा खूप जास्त असते तेव्हा फॉस्फरस कमी शोषला जातो.

ह्या क्षाराचे रक्तात शोषण हे लहान आतड्यातील सुरवातीच्या भागात होत. सोडियमच्या वाहक बरोबरच ह्याचे शोषण होते. आणि ड जीवनसत्वामुळे ह्याचे शोषण चांगले होते. ह्या क्षाराच्या अभावाने हाडांमध्ये दुखणे, सांधे आखडणे, हाडे ठिसूळ होणे, स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवणे, चिडचिड, बधिरपणा वगैरे लक्षणे दिसून येतात. फॉस्फरसच्या कमतरतेची अनेक कारणे असू शकतात. उदाहरणार्थ मधुमेह, मद्यपान, अॅटासिड्स वरचेवर घेणे, नेहमी diuretics घेणे वगैरे. परंतु सहसा ह्या क्षाराची कमतरता झालेली आढळत नाही. त्याचप्रमाणे ह्या क्षाराची खूप जास्त पातळी झाल्यावर दिसणारी लक्षणे सुद्धा त्याच्या कमतरतेत दिसणार्‍या लक्षणांसारखीच दिसतात. सांधे दुखणे, स्नायुंमध्ये दुखणे, अंगाला खाज सुटणे, डोळे लाल होणे अशी लक्षणे दिसतात. फॉस्फरसची रक्तातील पातळी 2.5 – 4.5 mg/dL एवढी असते. निरनिराळ्या पदार्थातून मिळणार्‍या फॉस्फरसचे प्रमाण खालील तक्त्यात दिले आहे.

asd.png

जस्त (Zn)

जस्त हा अजून एक अतिसूक्ष्म क्षार असून त्याची आपल्या शरीराला गरज असते. त्या क्षारांचा इतर क्षारांप्रमाणे शरीरात साठा नसल्याने तो आहारातूनच मिळवावा लागतो. शरीरातील सर्व पेशींमध्ये हा असतो आणि पेशींच्या वाढीसाठी, रोगप्रतिकार शक्ति व्यवस्थितपणे कार्यक्षम राहण्यासाठी, पेशींच्या विभाजनासाठी, जखमा भरून येण्यासाठी इत्यादी महत्त्वाच्या कामात गरजेचा असतो. शरीरातील जवळजवळ 300 च्या वर रासायनिक क्रियांमध्ये हजर असतो. त्यात enzymatic क्रिया, डीएनए अभिव्यक्ती आणि मुलांमध्ये शारीरिक वाढ ह्या क्रियांचा समावेश तसेच त्वचेचे आरोग्य आणि वास आणि चव ह्यांच्या संवेदनेच्यासाठी अशा महत्वाच्या कार्यासाठी पण त्याची गरज लागते.

इतर क्षारांच्या तुलनेत ह्याची दैनंदिन गरज खूपच कमी म्हणजे 8 mg इतकीच आहे. म्हणून त्याला अतिसूक्ष्म क्षारांच्या गटात सामील केले गेले आहे. बहुतेक सर्व मुख्य अन्नपदार्थातून तो मिळतो. परंतु त्याची रक्तात शोषले जाण्याची उपलब्धता कमी आहे. झिंक सायट्रेट ह्या स्वरुपात तो जास्त शोषला जातो. त्यामुळे पुन्हा एकदा लिंबाचे महत्व अधोरेखित होते. ह्या क्षाराच्या कमतरतेमुळे त्वचेवर पुरळ येणे, मुलांमध्ये अतिसार, भूक मंदावणे, डोक्याच्या केसांचा दर्जा खालावणे तसेच पुरुषांमध्ये वंध्यत्व असे विकार घडतात. रक्तातील ह्याची पातळीची चाचणी सहसा करत नाहीत. परंतु कधी कधी लघवी किंवा केसांची तपासणी करून पाहिले जाते. गरोदर मातांना आणि लहान मुलांना ह्या क्षाराची अत्यंत गरज आहे. निरनिराळ्या पदार्थांमधील जस्ताचे प्रमाण खूपच कमी असल्याने त्याचा स्वतंत्र तक्ता दिला नाही. तृणधान्ये व डाळींमध्ये ते तर 100 ग्रॅमला 2 ते 3 मि.ग्रॅ. एवढे असते. तर कडधान्यात ते थोडे जास्त म्हणजे 4 ते 5 मि.ग्रॅ. एवढे असते. पालेभाज्या, फळभाज्या व कंदमुळे ह्यात तर नगण्यच असते. तेलबिया किंवा सुक्यामेव्यामध्ये ते 4 ते 6 मि.ग्रॅ. एवढे असते. तिळामध्ये मात्र जास्त म्हणजे 12 मि.ग्रॅ. एवढे असते.

रो. शोभा राव

bottom of page