top of page

JUNE 2022 Issue:
RECREATIONAL & VOCATIONAL FELLOWSHIP month

साप्ताहिक कार्यक्रम

23 May 2022

Dr. Pushkar Sohoni was the guest speaker in the weekly program of 23rd May 2022. Dr. Pushkar is an architect by basic training and an architectural and cultural historian. He heads the Department of Humanities and Social Sciences at IISER Pune. Dr. Sohoni spoke on the “Maratha Temples”.  According to the Archaeological Society of India, the earliest temples date back to about 425 AD.  The temples of Maratha are not belonging to any particular style and are also not very scientifically constructed.  The Deogard temple was built about 100 years later and it has no decorations outside the temple. About 200 years later, the Latina style of temple construction evolved in North India. Three versions of the Latina style are Kalinga, Vesara, and Bhoomija in Orissa, Karnataka, and MP-Maharashtra region. We also find the Shekri temples which consist of a main “Shikhar” and several small “shikars”. The temples in 13tth and 18th centuries are exemplified by the Gondheswar temple in Sinnar and Koteshwar temple in Limb, Satara, which have minars and a dome, unlike many of the classical temples. There were several such examples and each example was accompanied by a commentary on its architecture.

It was a scholarly talk based on several years of scientific study and analysis. For the benefit of those who missed the talk, links for the video and the slides are given below.

PP Dr. V. Suryaprakasa Rao

Link for the presentation

बावर्ची नाईट 

२८ मे रोजी संध्याकाळी बावर्ची नाईट शिरीषच्या फार्महाऊसवर झाली. होस्ट शिरीषने खूप कष्ट घेतले होते. वेन्यू सुंदर सुशोभित केला होता. नितीन आणि शिल्पाने अरेंजमेंट खूप छान केली होती. सगळ्या बावर्चिंनी फार सुंदर पदार्थ केले होते. नितीन व रविकिरणने घेतलेल्या क्विझने फार धमाल आली. राहुल,दीपक व आशिषची गाणी लाजवाब झाली. कार्यक्रम एकदम देखणा झाला. या सर्वांच्या कष्टामुळे बावर्ची नाईट हसत-खेळत आनंद लुटत झाली.

 

ॲन रंजना दामले

सामाजिक प्रकल्प

२ जूनला सार्थकला जून महिन्याचे धान्य पोचले. 

WhatsApp Image 2022-06-02 at 10.33.42 PM.jpeg

एकलव्यला मे महिन्याचे धान्य पोचले

WhatsApp Image 2022-06-05 at 10.32.09 PM.jpeg

रो. रविकिरण व रो. ऋजुता यांची मुलगी मनाली हिने ८ मे  रोजी ऋजुताच्या मातोश्रींच्या श्राद्धाच्या निमित्ताने 'सार्थक' येथे विद्यार्थ्यांना आम्रखंड पुरी भोजनाची व्यवस्था केली होती.    

WhatsApp Image 2022-05-24 at 6.04.53 PM.jpeg
WhatsApp Image 2022-05-24 at 6.04.54 PM.jpeg

Installation of Rotaract Club at Modern College

माॅडर्न कॉलेज येथील रोटरॅक्ट क्लबचे इन्स्टॉलेशन सोमवारी दि ३० मे रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले. हा क्लब खूप ॲक्टिव आहे. परंतु करोनाच्या काळात त्याचे इन्स्टॉलेशन लांबले होते. डाॅ  झुंजार राव, माॅडर्न कॉलेजचे प्रिन्सिपल, यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपन्न झाला. प्रथम प्रिन्सिपल डॉ झुंजार राव यांनी आपला रोट्रॅक्ट क्लब गेली अनेक वर्षे कसा काम करतोय आणि रोटरीचा कसा अनेक प्रसंगात त्यांना फायदा झाला हे सांगितले. त्यामुळे आम्ही पुढेही हा क्लब चालू ठेवणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर रोटरॅक्ट क्लबचे महत्व आणि त्याचा पुढील आयुष्यात कसा उपयोग होऊ शकतो हे डॉक्टर शोभा राव यांनी विस्ताराने सांगितले. त्याचप्रमाणे पास्ट प्रेसिडेंट अंजली हिने सुद्धा रोटरॅक्ट चे महत्व थोडक्यात सांगितले. त्यानंतर सोनिया येनपुरे प्रेसिडेंट, सेक्रेटरी साक्षी डागा आणि ट्रेझरर निकीता कोट्टीमणी यांची नावे जाहीर झाली. त्या तिघांनाही प्रेसिडेंट शोभा, ऋजुता आणि अंजली यांनी रोटरी पिन्स लावल्या आणि समारंभाची पूर्तता झाली. यासाठी चेअरमन ऋजुता आली होती, त्याचप्रमाणे पुढच्या वर्षीचा डायरेक्टर संजीव चौधरी आणि पीपी अंजली रावेतकर, डॉक्टर राव आणि मी असे सर्वजण उपस्थित होतो.

प्रे. डॉ. शोभा राव

उपलब्धी............अभिनंदन

1. पीडीजी डॉ. दीपक शिकारपूर :

  • बडवे उद्योगसमूहाच्या फिनेस ऑटोच्या संचालकपदी माहिती तंत्रज्ञान तज्ञ पीडीजी डॉ. दीपक शिकारपूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

  • On 13th may Deepak addressed Pets Sets of RID 32040 at Waynad Kerala

  • Deepak addressed RYLA for Divyang Students (Rotaract Club Divyazep formed by RCP East).

  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जन्मदिनानिमित्त, दै. तरुण भारतने प्रकाशित केलेला विशेषांकामधे पीडीजी दीपकचा लेख  प्रकाशित झाला.

  • Deepak's article on 'Binaural Bits' digital addiction was published Pudhari.

  • On 12th may Deepak's article" Careers in Fintech" was published in Lokmat

  • Startups is now new buzzword. Every startup aims to become Unicorns ($ 1 Billion Valuation) . Deepak,'s article in Lokmat newspaper (all India Editorial) .

  • On 19th may,"App Development is a Bright Career for all Ages".Deepak's article in Lokmat Newspaper
  • Deepak addressed RYLA for Divyang Students (Rotaract Club Divyazep formed by RCP East).

2. PP Pradeep Wagh was invited by ROTARY INDORE to be chief Guest for their ROTARY HINDI KAVYA MANCH online Sammelan today 21 May 22 . He was presented with a Citation in welcome. The theme was ROTARY PEACE FOCUS. He briefed our RCP Shivajinagar's  excellent efforts in PEACE.

3.  Life time achievement award to Dr Satish Ravetkar by Imapac Singapore at world vaccine summit.

4.  Prez. Shobhatai Rao was invited by Rotary Club Sahawas for a talk on 20th May.

5. Rtn. Dr.Smitatai Jog's daughter Dr. Kimaya was felicitated at All India conference of Ophthalmologists at Mumbai.

खबर बखर

1. On 4th June a visit to a plastic upcycling unit of Ecokaari founded by Nandan Bhat was arranged by our club.

2. On 19th may a visit was arranged at Khalapur where our club initiated adult literacy work. These ladies were able to write their names and could read big headlines in Sakal.

WhatsApp Image 2022-06-04 at 5.10.06 PM (1).jpeg
WhatsApp Image 2022-06-04 at 5.10.06 PM.jpeg

3. पी पी यशवंत गोखले यांनी नुकतीच रोटरी क्लब ऑफ अटलांटा या क्लबला भेट दिली. त्यावेळी CEO केन यांच्याबरोबर...  

WhatsApp Image 2022-06-03 at 2.25.25 PM.jpeg
WhatsApp Image 2022-06-03 at 2.25.12 PM.jpeg

5. PDG Dr. Deepak and PP Rtn Gauri have paid US$ 11,500 to TRF and have become Major Donor Level 3, with a total contribution of $ 50,000. They are the first Major Donors Level 3 from RCPS.  PDG Deepak has also got first CSR Grant for RCPS from eZest ($ 20K).  PDG Deepak and Gauri were recognised at the hands of Mr. Anand Deshpande at the District Conference. 

6. Prez Shobhatai and Dr Rao paid $ 2725 to TRF towards Global Grant. With this, they have completed the milestone of $ 10,000 and have become Major Donor Level 1. 

Programs in June

6 जून
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त
अभिषेक कवितकर
CEO & Chairman Tree Public Foundation

13 जून
मॉडर्न कॉलेज च्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा
फिरोदिया करंडक विजेते
आणि पंतप्रधान मोदींकडून शाबासकी मिळवलेले गुणी विद्यार्थी

20 जून
My Vocation My Profession
Rtn अलका कांबळे
Rtn हर्षद खोंडे
Rtn बाळकृष्ण दामले

27 जून
Review Meeting

औक्षवंत व्हा...सुखी व्हा !

१ जून. आनंद नवाथे

४ जून. संजय देशपांडे
५ जून. श्रीकांत भावे
५ जून. कल्पना काकडे
८ जून. प्रतिभा गोखले
१० जून. उदय चिपलकट्टी
१२ जून. राजश्री वाईकर
१३ जून. वैशाली तपस्वी
१५ जून. यशवंत गोखले
१५ जून. माधुरी गोखले
२० जून. रंजना दामले
२५ जून. मंदाताई इनामदार
२८ जून. सी. डी. महाजन
२९ जून. प्रवीण वाळवेकर

रेशीमगाठी वर्धापनाच्या हार्दिक शुभेच्छा

४ जून. उज्ज्वल आणि सविता मराठे
५ जून. विकास आणि कल्पना काकडे
२० जून. गुरू आणि रोहिणी पालेकर
२४ जून. मनीष आणि भाग्यश्री पत्रिकर
२६ जून. दत्ता आणि मंदाताई इनामदार
२९ जून. हर्ष आणि मोहिनी बर्वे.

Monthly Support Group
Nitin Abhyankar- Leader
Alka Abhyankar
Vinoobhau Dani
Madhuri Gokhale
Vijay Gokhale
Vikrant Karandikar
Aslesha Karandikar
Shrikant Date
Shobhana Date

Birthday fellowship Leader for May/June 22
Ann Vaishali Tapaswi

Highlights of Minutes of Board Meeting held on 10th on 29th April 2022 @ 6:45 PM

  • Installation of new Interact club at Muktangan English Medium school is planned on 15th /16th June 22.

  • Graphics design course at Apte school which was partially funded by us is progressing smoothly.

  • Two Jaipur modular foot units were provided from the donation of Rtn. Bharati Dole.

  • 9th May/16th May/30th May there will be no meeting.

  • 23rd May- Lecture on Temple architecture is organized.

  • Bavarchi night is planned on 28th May at farmhouse of PP Shirish.

  • Total APF contribution is $12232 as against goal of $ 10000.

  •  GG & CSR are going ahead as planned.  Last 2 years GG projects are closed.

  • Eco bricks project will be undertaken.  PP Vrinda informed about an old age home ‘Apale Manus’ which has several requirements. Rs 10,000/- were sanctioned for food grains.

  • All the formalities of CSR project are completed and will be started soon.

  • We will be participating in a district project on adult literacy and have contributed Rs.10,000/-

  • We will be participating in district project on environment where in ‘Unsung heroes’ will be felicitated.  We have contributed Rs, 4000/- for the same.

  • Joint BOD is planned on 18th June 22 & review meeting is planned on 27th June 2022

Rtn. Ajay Godbole, Secreatary

June Projects

1. Food grain supply to Ekalawya Nyas
2. Food grain supply to Sarthak Seva Sangh
3. Skill development for deaf and dumb girls from Apte school
4. Graphic design course for 20 deaf and dumb boys for 2 months will continue.
5. Anns' project for Tray Garden will be arranged
6.12th June is planning assembly.
7. We are participating in district program of facilitating Environment Heroes on 4th June.
8.On 18th June we will have  a Joint BoD .
9. On 27th June we will have Review Meeting at Ganesh Hall.

डिस्ट्रिक्टच्या घडामोडी

Mega Medical Camp in Kashmir

Rotary international districts 3131, 3132, 3060, 3070, jointly conducted the Mega Health Camp with Director Health Services Kashmir (DHSK) from 11 May. This camp was conceived by Divisional Commissioner Kashmir along with Dr Rajeev Pradhan, District Governors of all the four districts and Rotary Club of Kashmir and Srinagar.

The surgeries were conducted at four locations including GMC Baramulla, SDH Sopore, District Hospital Kupwara and District Hospital Ganderbal for nine days from May 11 to May 19. Meanwhile, operation theatres and bed capacity of theatres have been augmented to cater to more patients.

Rotary plans to have many such activities in future also within Jammu and Kashmir and all the doctors who came in this camp from different states of the country were providing service free of cost and along with Rotary serving humanity.

After visiting the camp, DG Pankaj Shah tweeted as follows:-

 
After day 1 visit @ Baramulla
Day 2 Visit was at Sopore @ Kupwara.

Felt blessed to serve the society in J&K and also understand the ground level circumstances.

We have touched 395 cases till now. Figures will increase on Day 3 of Camp.

Many Rotary Moments Created

Rtn. Pankaj Shah
District Governor 21-22, Rotary International District 3131

District Conference “Utsav”

Rotary District Conference is one event that every Rotarian eagerly waits for every year. This year’s Conference was named “Utsav” and took place in the 5-star setting of J W Marriott hotel  on May 7 and 8, 2022. The Conference was originally scheduled for January 2022 but due to restrictions on congregation, it had to be postponed. The Conference was probably one of the best in the history of District 3131. The Rotary International  President Representative (RIPR) was PDG Sharmila Bhatt from Rotary District 9211 Tanzania and Uganda,  and she was accompanied by her spouse Harish Bhatt. Distinguished inspirational speakers, excellent time management, nice presentations by Directors of all avenues, and felicitation of Rotarians and clubs for their performance during the year, interspersed with cultural programs marked the Conference agenda.  

The conference started with a flag-past by serving Presidents of Rotary Clubs of District 3131 on 7th May. This was followed by Ganesh Vandana dance presentation. DG Pankaj Shah welcomed all the dignitaries. This was followed by Rotary related presentations by various district officials and address by RIPR, Sharmila Bhatt.  She highlighted that membership is key to success of Rotary, we should keep evolving for future of Rotary. RI President Shekhar Mehta and RI Director Mahesh Kotbagi joined the Conference online. Rtn. Shekhar Mehta lauded the achievements of District 3131 and Rotary’s role in national development. Presentations were made on service projects and membership avenue by the respective Directors.  Dr. Madhuri Kanitkar, Lt. General (Retd.) and VC of Maharashtra Health University spoke about her career in army and how she climbed the ranks in a male-predominant service conquering various hurdles, and converting challenges to opportunities. She also unfolded her vision about the Health University.

 

Padma Shri awardee Shri Girish Prabhune spoke about his journey in rehabilitating nomadic tribal community of Phase pardhis. Noted film critic Padma Shri Bhavana Somaiya was interviewed by R J Sangram. Starting from a film reporter, she rose to become editor of Screen. She lucidly narrated her experiences while writing reviews for various films. The day ended with an amazing talk by Shubhash Ghai narrating on making of several of his classics and his efforts in setting up “Whistling Woods International, a  world class communication and art institute which is rated among top 10 institutes in the World. This is what he tweeted :

“Rotary event pune # rid 3131 7th May 22

I spoke on subject of cinema and society today ‘ to 900 rotarians with my 30 mts speech.

BUT Ecstatic audience pushed me to speak for one hour n 45 mts talking about stories behind stories.

I equally Loved it”

The second day started with a “Ghumar” dance performance. The pick of the day was the interview of Ruma Devi by Rtn. Sangeeta Lalwani.  Born in Rawatsar in Barmer in Gujarat, having left school in 8th standard, married at the age of 17, she fended her way to become an entrepreneur and training over 30,000 women from Barmer, and organising fashion shows across the world. She is the recipient of Nari Shakti Award in 2019, the highest civilian award for women.

 

Equally inspirational was the talk by Bhavesh Bhatia, a visually challenged entrepreneur, who founded “Sunrise Candles” in Mahabaleshwar. Starting with one dye and 5 kg wax and selling candles on footpath, today the company has over 70 manufacturing units employing nearly 10,000 diffently abled persons.

 

Another interesting event in the conference was the interview of Dr. Anand Deshpande, founder of "Persistent Systems” in Pune by our own member PDG Dr. Deepak Shikarpur. Dr. Deshpande narrated how he had to struggle to start this firm at Bhosari and how it has grown to a company with  21000+  software engineers. He also talked of his foundation “deASRA” with a mission to find and solve some hard problem in India that would benefit the masses. deAsra’s primary focus is to tackle the tough problem of ‘job creation’ with entrepreneurship. He mentioned his company’s initiatives in healthcare, of developing human genome database for breast cancer and diabetes.

All these presentations by invited speakers were received with applause and standing ovation in the fully-packed conference hall.

Presentations were made on the achievements of the district in various avenues like Global grants, CSR, club administration, RYE, Public image, NGSE, Vocational and Youth Avenues. Clubs with significant achievements in these avenues were felicitated at the hands of RIPR and other dignitaries. Invitation was extended for District Conference  2022-23 “Josh”  at Amby Valley.

The conference ended with a short business session and concluding remarks by RIPR Sharmila Bhatt, who lauded the achievements of the district 3131, and vote of thanks by District Secretary and the host club.  

RCPS had a good presence in the Conference with 13 members. Our club’s contributions were   mentioned in several avenue presentations.  As already mentioned, PDG Dr. Deepak interviewed Dr. Anand DeshpandePP Gauri, as the Director of Youth Service, made presentation for the avenue. GML team led by PP Vrinda brought out a special issue of GML which was released at the hands of RIPR. Our club received recognition for being in the top TRF donors and for having 3 major donors during the year, for approval of a global grant and for the CSR fund received from Ezest. Individual felicitations included the three major donors, viz., Deepak and Gauri Shikarpur for becoming major donor level 3, Ujwal and Savita Marathe, and Shobha Rao and Suryaprakasa Rao for becoming major donor level 1.  

 

PP Dr. V. Suryaprakasa Rao    

President Dr Shobha and PP Dr Rao felicitated for Major Donor Level 1

WhatsApp Image 2022-05-30 at 6.30.25 PM.jpeg

RCPS was felicitated for maximum number of major donors

WhatsApp Image 2022-05-30 at 6.31.57 PM.jpeg

Rotary Information

June is designated Rotary Fellowships Month to recognize the importance of international fellowship and goodwill among Rotarians with similar recreational and vocational interests, promote increased participation in fellowships, and increase understanding of this program. The RI Board encourages these groups to celebrate Rotary Fellowships Month through projects, activities, and events.

What are the benefits for Rotarians in joining the Rotary Fellowships? Fellowship provides opportunities for Rotarians to make lasting friendships outside their own Club, District or country. Fellowships contribute to the advancement of world understanding and peace. Also, Fellowships serve as an incentive for attracting new members to Rotary and retaining our existing members. Indeed, Rotary Fellowship, together with the Rotarian Action Groups, serve as an effective tool in promoting membership development and should be actively promoted in our Districts.


There are many Fellowships that would be of interest to our members, and they are detailed on http://www.rotary.org/fellowships. You may find many extensive activities of the Rotary Fellowships that your profession, business or industry area has already established. If not, why not think about starting one yourself! Fellowships contribute to the advancement of world understanding and peace. Interested Rotarians can join a Rotary Fellowship by viewing the Rotary Fellowships Handbook (729) or even start a prospective Rotary Fellowship if their recreational or vocational interest is not on the list of approved Rotary Fellowships. The Rotary Fellowships are expected to facilitate communication among their members and maintain regular communication with RI.
 

When we talk about "Rotary Fellowships", we actually refer to the  groups of Rotarians, Rotarian spouses and Rotaractors who join together to:

Share a common interest in worthwhile recreational activities (sports, hobbies, etc.);
Further their vocational development through acquaintance with others of the same profession;
Make new friends around the world;
Explore new opportunities for service; and
Have fun and enhance their experience in Rotary.


Examples of Rotary Fellowships include Rotarians on the Internet (ROTI),  International Fellowship of Rotarians of Amateur Radio (ROAR), International Computer Users Fellowship of Rotarians (ICUFR), International Fellowship of Rotary Convention Goers, International Golfing Fellowship of Rotarians, International Fellowship of Rotarians Musicians, Rotary Global History Fellowship, etc.

The fields are varied and include marathon running, scuba diving, flying, bird watching, chess, doll lovers, environment, Esperanto, gourmets, lawyers, magic, nurses, police and law enforcement professionals, recreational vehicles, singles, stockbrokers, venture capitalists, wine and yoga.

PP Yashwant Gokhale

Rotary International

Why Attend Rotary International Conventions?

 

Last week some of us attended the Rotary District Conference which is a mandatory event which every District Governor has to conduct  in his/her Duration of Service. It Depends on the culture and weather.    Gauri and I had attended District Conference in Yorkshire (UK) in August 2014 as RI President Representative.   Rtn Vikas and Kalpana Kakade also attended the same.

RI  President has to conduct International Convention which all Rotarians can attend   Rotary’s 113th annual international convention on June 4-8, 2022 will be held in Houston USA . Around 20,000 plus Delegates will attend it.

 

I have attended two RI Conventions and I strongly recommend every Rotarian to attend atleast one Convention to understand Global Footprint of Rotary .

 

By participating in an RI Convention, you'll gain a broader appreciation of Rotary's global impact and strengthen your commitment to service. Rotary members from more than 130 countries meet at the convention every year. This is your unique opportunity to connect with old friends, make new ones, and share stories about your club’s current and future projects.  At the RI convention, we are constantly reminded we are more than local or national citizens, we are world citizens.

Here are some other great reasons to attend a convention:
 

  • Service projects. Find out how fellow Rotarians developed their service projects by visiting club and district project booths. You can also partner with other Rotarians in an international project or exchange.

  • The Rotary Foundation. Learn more about Foundation programs during plenary sessions and workshops that show how Rotarians take humanitarian action and promote peace and understanding throughout the world.

  • Development of future club leaders. Expand your network of international contacts by getting to know Rotary leaders and members from your own district, and become more involved in district plans.

  • Club administration. Attend a special workshop for incoming presidents and the Presidents-Elect Luncheon, where you can meet and exchange ideas with fellow leaders.

  • Family fun. With so much to do around the event, you and your family can plan a memorable vacation around the convention.

PDG Dr Deepak Shikarpur

w0262_1s_Watercolor-Floral-Pattern-Wallpaper-for-Walls-Pastel-Flowers_Repeating-Pattern-Sa
Lalit Vibhag.png
Tapaswi Vaishali.jpg

होममेकर्स  आणि बरंच काही

शांत सकारात्मक वैशाली

पाठीवरचं ओझं माणसाच्या शरीराला निःसंशयपणे थकवतं पण त्याच्या मनाची उभारी त्याला ते ओझं पाठीवर घेऊनही  त्याच्या मुक्कामापर्यंत नेऊन पोचवते उलट मनावरचं ओझं मात्र माणसाच्या शरीराला आणि मनाला दोन्हीलाही थकवतं आणि त्याला मुक्काम गाठणं अवघड होऊन बसतं ! म्हणूनच तज्ञ सांगतात की मनावर कसलंही ओझं बाळगू नका! वेळीच ते मनावरून उतरवून टाका !!पण ही गोष्ट माणसाला कळली मनापासून पटली तरी ती वळायला हवी ना !

आपल्या एका मैत्रिणीला मात्र ही गोष्ट छान कळली आणि वळलीही आहे असं मला वाटतं. ही  मैत्रीण म्हणजे आपली वैशाली ----वैशाली तपस्वी. वैशालीला कोणत्याही गोष्टीचं टेन्शन नसतं म्हणजे  ती टेन्शन घेत नाही. ती नेहमीच शांत असते. 


कोणत्याही गोष्टीचं मनावर ओझं नाही, टेन्शन नाही ही अवस्थाच किती सुंदर !! 


अन्यथा प्रत्येक माणूस कशाच्या ना कशा्च्या मानसिक ओझ्याला घेऊनच वावरताना आढळतो ! कोणाला पैशाचे टेंशन, कोणाला आजारपणाचं, कोणाला राहत्या जागेचं, तर कोणाला परीक्षेचं, कोणाला वैयक्तिक नातेसंबंधांचं तर कोणाला स्वतःच्या व्यवसायाचं टेंशन!  पण यासारख्या कोणत्याच गोष्टीचं टेन्शन न घेण्याची कुवत असणं हे केवळ दुर्लभ आहे असं मला वाटतं. म्हणूनच वैशालीचं कौतुक वाटतं. तिच्यात ही क्षमता कशी निर्माण झाली याचा मागोवा घेतला तर त्याची मुळं तिच्या लहानपणीच्या संस्कार वर्गात आढळतात . 


वैशाली मूळची पुण्याची "वैशाली कुलकर्णी". आई-वडील आणि दोन बहिणी अशा चौकोनी कुटुंबातली. तिच्या वडिलांचा स्वतःचा छापखाना होता. त्या काळात मुलांना संस्कार वर्गात पाठवण्याची पद्धत लोकप्रिय होत होती .वैशाली ही शारदाश्रमातल्या संस्कार वर्गात जात होती. शारदाश्रम म्हणजे स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या पत्नी शारदादेवी यांच्या नावाने चालविण्यात येणारा आश्रम. तिथे रामकृष्ण, शारदादेवी आणि स्वामी विवेकानंद यांच्या तत्त्वानुसार वागणारी मंडळी असणं स्वाभाविकच. त्यामध्ये त्यांच्या कार्याला वाहून घेतलेले आणि वाहून घेऊ इच्छिणारे असे दोन्ही प्रकारचे कार्यकर्ते कार्यरत होते. या दोन कार्यकर्त्यांमधला फरक जसा वैशालीच्या मनाने टिपला होता तसंच किती अल्पावधीत माणूस स्वतःला आमूलाग्र बदलू शकतो आणि आयुष्यभरासाठी वाहून घेतलेला कार्यकर्ता होऊ शकतो हे पण वैशालीच्या तल्लख बुद्धी ने हेरलं होतं. तिने ते केवळ मनाने हेरलं होतं असं नव्हे तर किंबहुना तिला त्याचं आकर्षण वाटत होतं. तिला वाटणाऱ्या या आकर्षणाची काहीशी भीती आजही तिच्या मोठ्या बहिणीच्या मनात सदैव जागी असते असं वैशालीने गमतीने बोलून दाखवलं . 

तर अशा शारदाश्रमातल्या संस्कार वर्गात पाच-सहा वर्षे वैशाली जात होती तिथे संस्कार विषयक कथाकथन, स्तोत्रपठण, प्रार्थना,  आरोग्यविषयक मार्गदर्शन, थोडा व्यायाम असं सगळं मुलांच्या वयाला योग्य तेवढं दिलं जात होतं. या साऱ्याचा परिणाम असेल, शिवाय वैशालीच्या वडिलांकडून आलेले गुणही असतील पण मनात कसलीही भीती नाही, मनावर कसलंही दडपण नाही, मनात सदैव सकारात्मक  विचार....अशी वैशालीच्या मनाची घडण झाली. 


 मनाची ही अशी अवस्था असणं  किती सुंदर !


तर अशा वैशालीने हुजूरपागेत आणि गरवारे महाविद्यालयात  शिकून बी सी एस  ची पदवी प्राप्त केली. शाळा कॉलेजच्या वयात खो-खो कबड्डी अशा मैदानी खेळात ती रमली. तसेच तीन वर्ष ती एनसीसीतही होती. मैदानावरच्या खेळांनी माणसाच्या स्वभावावर परिणाम होतो असे म्हणतातच. त्याचाही परिणाम तिच्या मोकळ्या ढाकळ्या स्वभावात झाला असणार! सांघिक खेळ, एनसीसी या गोष्टींमुळे जनरल अवेअरनेस वाढायला खूप मदत होते असं वैशालीला वाटतं. एनसीसीमध्ये सिग्नल कम्युनिकेशनमध्ये तिला वैयक्तिक रौप्य पदकही मिळालं होतं. त्याच काळात होमगार्ड तर्फे नागरी प्रशिक्षण केंद्र चालवली जात. तिथे सर्वांना प्रथमोपचाराचे प्रशिक्षण देत. तेही तिने   शिकून घेतलं होतं.

 

वैशालीच्या वडिलांचा स्वतःचा छापखाना होता. त्यावेळी तो खिळे जुळवून काम करायचा होता. त्यात वैशालीला रस नव्हता .पण डीटीपीचं तंत्र अस्तित्वात आलं तेव्हा तिने ते शिकून घेतलं आणि वडिलांच्या डीटीपीच्या युनिटमध्ये काम केलं. अकरावी, बारावी बायलॉजीपेक्षा इलेक्‍ट्रिकल मेन्टेनन्सनं खूप भुरळ घातली तेव्हा तेही तिनं शिकून घेतलं. एक पदवी पदरात पडल्यानंतर पुढे आणखी जे काही शिकायचं ते आपण स्वतः कमावलेल्या पैशानेच हे तिनं पूर्वीच पक्कं ठरवलं होतं .ती म्हणाली, "वडिलांनी आपल्याला पदवीपर्यंत शिकवलं आता पुढचा भार त्यांच्यावर का टाकायचा? त्यामुळे मी पदवी मिळाल्यानंतर लगेच नोकरी करण्यास सुरवात केली."

तिची ही नोकरी संदीप तपस्वीच्या ऑफिस मध्ये होती हा  केवढा  योगायोग ! 


तिथे नोकरी करताना तिची कामावरची निष्ठा, मुलगी असूनही कोणत्याही कामात मागे नसणं, तिचा शांत समजूतदार आणि सरळ स्वभाव, टेन्शन न घेता धडाडीने पुढे येउन काम करणं हे संदीपला भुरळ घालणारं न ठरतं तरच नवल ! वैशालीला संदीपचं प्रत्येक गोष्टीतलं काटेकोर प्लॅनिंग, त्याचे नेहमीच तयार असणारे प्लान ए, प्लान बी, त्याची धडाडी, प्रत्येक कामात परफेक्शन असण्याचा आग्रह या गोष्टी मनापासून भावल्या आणि त्यांचं "लव्ह-मॅरेज"  झालं. 


लग्न होताना अनेक मुलींच्या मनात आणि सासरच्या लोकांच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी याविषयीच्या प्रश्नांनी गर्दी केलेली असते. वैशाली तर लग्न होईपर्यंत जवळ जवळ स्वयंपाक स्वयंपाक घरात न फिरकलेली मुलगी होती. पण तिच्या सवयीनुसार तिच्या स्वभावानुसार ती एकदम शांत होती. "उलट कुलकर्णीकडचे स्वयंपाकाचे संस्कार माझ्या हातावर नव्हते त्यामुळे सासुबाईं कडून तपस्वींच्या घरच्या आवडीनिवडीनुसार सगळं करायला मी शिकले."असं वैशालीने सांगितलं. वैशालीच्या साध्या-सरळ मोकळ्या स्वभावावर तिच्या सासूबाई खूप खुश होत्या. एवढेच नव्हे तर यथावकाश या सासू-सुनेची उत्तम गट्टी जमली आणि त्या शब्दशः : एकमेकींच्या उत्तम मैत्रिणी झाल्या. या पार्श्वभूमीवर वैशाली च्या घरात तिच्या स्वतःच्या शांत स्वभाव याप्रमाणेच कशी रमणीय शांतता नेहमीं नांदली असेल याची कल्पना येते.

वैशालीने ठरविल्यानुसार स्वत:च्या पैशातून एम सी एम पूर्ण केलं आणि संदीपच्या बरोबरीने ती काम करू लागली. त्या दोघांनी त्यांच्या व्यवसायात उत्तम यश संपादन केलं.  वैशालीच्या स्वभावाचेी खरी परीक्षा दोन हजार साली 'डॉट कॉम'चा बुडबुडा फुटला तेव्हा झाली. तोपर्यंत त्या दोघांनी उत्तम व्यवसाय केला होता पण या अनपेक्षित परिस्थितीने संदीपच्या पायाखालची वाळूच जणू  निसटू लागली. त्याला होत्याचं नव्हतं झाल्याची जाणीव झाली पण त्याही परिस्थितीत वैशाली शांत राहिली. तिने प्राप्त परिस्थितीत काय काय करता येईल याचाच फक्त आणि फक्त विचार केला आणि त्यानुसार पावले टाकली. तिच्या या कृतिशीलतेनच संदीपला कमालीचा आधार मिळाला त्याला सावरायला सवड सापडली. पुन्हा व्यवसायात जम बसू लागला आणि गाडी रुळावर आली. या साऱ्याचं श्रेय संदीप फक्त वैशालीलाच देतो. तिच्यामुळेच त्या संकटातून बाहेर पडणे  शक्य झाल्याचं त्याचं मत आहे. त्या संकटकाळात वैशाली नेहमीप्रमाणे शांत राहून किती धीरोदात्तपणे परिस्थितीला सामोरी गेली हे संदीप आणि तिच्या मुली विसरू शकत नाहीत. वैशालीची धाकटी मुलगी सलोनी तर म्हणतेच की आई नेहमी शांत असते. मात्र तिच्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जर काही गडबडीची शक्यता तिला दिसू लागली तर मात्र ती वेगळीच वैशाली बनते. तिच्या जगात त्यावेळी इतर कशालाही अस्तित्व नसतं. तर अशी वैशाली, संदीपला केवळ त्याच्या व्यवसायातच सहाय्यभूत ठरली आहे असं नाही तर त्याचे सगळे मित्रमंडळ, त्याचे सगळे छंद तिने आपलेसे केले आहेत. तशी वैशालीची  मानसिकता ग्रुपमध्ये रमण्याची नाही असं मुळीच नाही, पण ती स्वतःच्या वाचनाचा छंद यातच जास्त रमून जाते. तिला शब्दांची, कवितांची खूप आवड आहे. आवडतं पुस्तक हातात आलं की ते वाचून संपेपर्यंत ती खाली ठेवू शकत नाही. याप्रमाणेच लहान मुलांच्यात ती खूप रमते त्यांना रमवण्यात तिला खूप आनंद मिळतो. तिचा स्वभाव दुसऱ्याला मदत करण्याचा आहे. ज्याला ज्या मदतीची गरज आहे ती मदत आपल्या क्षमतेनुसार करण्यात तिला खूप आनंद मिळतो. संदीपच्या प्रवास, ट्रेकिंग या आवडीनिवडी तिने आपल्याशा केल्याआहेत.  तसंच त्याचं मित्रमंडळ हे तिचंही  मित्रमंडळ आहे. एवढच नव्हे तर संदीप म्हणतो तसं सगळ्या मित्रमंडळींना ती घरच्यांप्रमाणेच प्रेम आणि माया देते .

यापुढे भविष्यात तिला काय करायची इच्छा आहे असं विचारता त्या दोघांनाही सोशल वर्क करायची इच्छा आहे असं तिने सांगितलं. ती म्हणाली "आम्हा दोघांनाही भौतिक गरजा मर्यादीत राखणं आवडतं. त्यामुळे मुली मार्गाला लागल्या की आम्ही काम करायला मोकळे"!

वैशालीला तिच्या आवडीच्या समाजकार्यात भरघोस यश मिळो हीच सदिच्छा. 

ॲन सरिता भावे.

Bhave Sarita.jpg

जिवाभावाची आपली सरिता

नमस्कार....


               जिवाला जे भावते म्हणजेच आवडते, पटते ते आपण लगेच स्वीकारतो. काही दिवसातच ते आपल्या जिवाभावाचे होते. श्रीकांतने १९९६ला रोटरी जॉईन केली तेव्हा ते दोघे आमच्याकडे आले होते आणि आम्ही दोघींनी गॅलरीत बसून खूप गप्पा मारल्या होत्या. माहिती, नोकरी असे अनेक विषय होते. सरिताने ''पुश'' मधले हे सदर आधी आपल्या ॲनेट्सपासून सुरू केले, आता गेली चार वर्ष ते अनेक सुप्त कलागुण यामुळेच सर्वांपर्यंत पोहोचत आहेत. सरिता व्यवसायाने पत्रकार आहे. सरिता बीएस्सी (physics+maths). एम. एस. सी करण्याची इच्छा होती पण युनिवर्सिटीत इतक्या लांब जाऊन उशिरा येण्याची तयारी नव्हती. पेपर वाचन, बातम्या खूप आवडायचे म्हणून  पत्रकारिता(जर्नालिझम) करायचे ठरवले. तो इतका वेगळा कोर्स ! त्याकाळी इंटरव्यूमध्ये सिलेक्ट होऊन तिने उत्तम रीतीने पूर्ण केला. आधी डिप्लोमा मग डिग्री असे १९७३ ला पूर्ण केले. नावाजलेल्या रानडे इन्स्टिट्यूट मधून लगेच सकाळमध्ये जॉब मिळाला. तिने हौसेने रिपोर्टरच्या जॉबला पसंती दिली आणि मग काय खुला आसमान ! घेतली भरारी ! चारी दिशांना तिच्या पंखांना ताकद दिली तिच्या वडिलांनी. ते म्हणाले, "जेव्हा आपण होऊन लोक तुला विचारतात तेव्हा 'होच' म्हणायचे." त्या काळी मुलगी रिपोर्टर असणे अवघड. 'सकाळ' मध्ये सरिता एकटीच मुलगी रिपोर्टर होती. सरिताला पेपर वाचनाची लहानपणापासूनच खूप आवड होती. तिला सकाळ मध्ये रोज तीन बातम्यांचे रिपोर्टिंग आणि लोकल बातम्या असे भरपूर काम असायचे. पण कधीच दमली नाही, कंटाळली नाही. १९७३  ते १९९६ असे भरपूर विविध प्रकारचे काम तिने 'सकाळ'मध्ये केले. अनेक वेगवेगळ्या प्रकारची पण लेखनाची कामे हौसेने केली. तिचे कौशल्य पाहून यदुनाथ थत्तेंनी तिला बोलावून घेतले व पर्सनल हायजिन वर छोट्या छोट्या पुस्तिका लिहायला सांगितल्या. येथूनच तिची पुस्तक लेखनाला सुरुवात झाली.


            तिने मुलांसाठी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यातले 'कुतुहलाच्या जगात' चे चार भाग सरकारच्या 'पुस्तक पेटी' योजनेतून खेड्यापाड्यात महाराष्ट्रभर पोहोचले. इंग्लिश मध्ये त्याचे भाषांतर पण झाले. दुसरा वेगळा अनुभव....कमल पाध्ये यांच्या मासिकात beyond friendship असे सदर होते. त्यासाठी तिने अनेक नामवंत लोकांच्या मुलाखती घेतल्या. खूप जवळून अनुभवले. अनेक लोकांना प्रसिद्ध चित्रकार जी डी गोंधळेकर यांच्या अप्रतिम चित्रांची माहिती ते सांगायचे व सरिता तिच्या भाषेत संकलित करायची. सर्व पेंटिंग्ज वेगवेगळ्या शैलीत चितारलेली होती. आकाशात सोडलेल्या हबल नावाच्या जगातील सर्वात मोठ्या दुर्बिणीविषयीची सर्व माहिती १९९० मध्ये सकाळच्या खास पुरवणीत तिने लिहिलेली होती. वसंत व्याख्यानमालेचे सर्व वार्तांकन अनेक वर्ष सरिताने केले. पुणे मुन्सिपल कॉर्पोरेशन च्या मासिकाचे संपादनही सहा वर्ष केले. टी व्ही नवीन होता तेव्हा त्यांच्यासाठी सोशिओ-इकॉनोमिक सर्वे सर्व झोपडपट्ट्या फिरून तिने केला होता. त्यासाठी आठ दिवस घराबाहेर राहून तिने हे काम पूर्ण केले. लेखन तर खूपच केले. गृहिणी, बालोद्यान, युवावाणी या रेडिओवरील लोकप्रिय कार्यक्रमासाठी अनेक वर्ष लेखन केले. तिची अकरा पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यातली चार पुस्तके प्रसिद्ध डॉ 'ह. वि. सरदेसाई' बरोबर - 'निद्रा व भय", "वार्धक्य", "मानसिक ताण", "डॉक्टर भेटेपर्यंत" व डॉ लुकतुके बरोबर 'मन करा रे प्रसन्न'. 

तीन वर्ष "इंद्रधनू" हा कॉलम लिहिला. सरिता "सायंसकाळ" मध्ये रोज एका महिला उद्योजिकेची मुलाखत देत होती. १९९० च्या निवडणुकीत सर्व झोपडपट्ट्या पालथ्या घालून झाल्या. सात देशांच्या जर्नलिस्ट कॉन्फरन्समध्येही सरिता जाऊन आली.

शनिवार पेठेतल्या गोडबोले यांची "शरयू" अतिशय हुशार, स्वबळावर पुढे जाऊ पाहणाऱ्या श्रीकांतची पत्नी झाली. तेव्हा श्रीकांत स्वतःचा व्यवसाय सुरु करू पहात होता. हातात काहीच नाही. पैशाचे पाठबळ नाही. सरिताची नोकरी हेच कायम  पैशाचे बळ. पण दिवस पालटायला वेळ लागला नाही. दोऱ्यात वाटी-मणी ओवलेले मंगळसूत्र घालून बोहल्यावर चढलेली सरिता आता यशाच्या शिखरावर आहे. पण त्या वाटी-मण्यांचा मान आणि स्थान अजूनही तेच आहे. माहेरी जसा वडिलांचा सपोर्ट, असाच सपोर्ट श्रीकांतचा. रात्री अकरा वाजता तिला आणायला जायचा. आवडीचे क्षेत्र म्हणून खूप काम झाले, पण स्वतःचे असे आयुष्यच उरले नाही. वेळेचे बंधन नाही. सतत आणि सर्वकाळ पत्रकारिता. मनाशी पक्के ठरवून १९९६ ला "सकाळ"ला रामराम ठोकला. मनासारख्या गोष्टी करायला वेळ मिळू लागला. भरतकाम, विणकाम, वाचन, लिखाण...... सगळ्यात आवडते म्हणजे माणसे गोळा करून गप्पा मारणे, त्यांना खाऊपिऊ घालणे. हॉटेल वैशाली तर खूपच प्रिय आहे. रात्री पर्यंत गप्पाटप्पा. मग सरिता सगळ्यांसाठी छानशी फिल्ट र्कॉफी करते आणि कधीही निघाले तरी, "बस गं, काय घाई आहे?" असे प्रेमाने थांबवायला चुकत नाही.

 

तर अशी आहे मला भावलेली सरिता.
                 

शुभम भवतु
 

ॲन अंजली गाडगीळ

सरिता बद्दल मैत्रिणींनी लिहिलेले मनोगत

सरिताने जेव्हा मुलाखतीला बोलावलं तेव्हा मी तिला म्हटलं, "यावेळी उलटं करूया, मीच तुझी मुलाखत घेते." नंतर तिने प्रश्न विचारायला सुरवात केली तेव्हा समजलं की मुलाखत घेणं हे खूपच अवघड  काम आहे. पण विचार तर डोक्यात आला होता, मग दुसऱ्या दिवशी आधी गिरिजाला विचारलं कि असे काही उद्योग केले तर तुला चालेल का? तिचा "हो" ऐकल्या क्षणी मी आधी ज्या मैत्रिणींवर लेख आले होते, त्यांना व्हाट्सऍप केला आणि  सरिताबद्दल किंवा मुलाखतीच्या अनुभवाबद्दल एक दोन वाक्यात लिहून द्याल का? आपल्या उत्साही  ॲन्स एका पायावर तयार आणि दोन दिवसात माझ्याकडे उत्तर लिहून सुद्धा आली.

इतके वर्ष नेमाने एखादे सदर चालवणं किती मोठ शिवधनुष्य सरितानी पेलवलंय याचा अंदाज आला.

 

खरंतर तिला एवढी पुस्तकं लिहिण्याचा आणि मोठ्या मोठ्या (वय, कर्तबगारी , मानाने) लोकांच्या  मुलाखती घेण्याची सवय असूनही ती माझ्यासारखीला अगदी बरोबरीचं समजून बोलते आणि  बोलते करते ह्याचं एक वेगळंच श्रेय तिला दिलं पाहिजे. सगळ्यात गमंत  म्हणजे मस्त वेगवेगळे प्रश्न विचारून ती आपल्याला विचार करायला प्रवृत्त करते.

  

त्यामुळे सरिताच्या मुलाखतीबद्दल आपल्या मैत्रिणी काय म्हणतात ते त्यांच्या कडूनच ऐकू या.

ॲन. वैशाली  तपस्वी

सरिता - म्हणजे नदीच - नावाप्रमाणेच शांत , सतत वहाणारी , वहात आलेला कचरा शांतपणे अलगद किनार्यावर सोडून निर्मळ असणारी .

अतिशय प्रतिकूल परिस्थितीत श्रीकांतला जे स्वकष्टाने यश मिळाले आहे त्यात सरिताचा वाटा मोठा आहे ती खंबीरपणाने त्याच्यामागे उभी आहे. कोठेही श्रीमंतीचा गर्व नाही. सुगरण व जणू उपजतच पत्रकार असल्यामुळे अतिशय कौशल्याने ती आपली मुलाखत घेत सगळी माहिती काढून घेते. माझी मुलाखत घेतांना मला खरंच प्रश्न पडला होता कि माझ्यासारखीची मुलाखत? पण ज्या कौशल्याने गप्पांमधून तिने मला बोलते केले तेव्हा मी अगदी थक्क झाले.

कां कोण जाणे मला वाटले कि हिची काहीतरी अध्यात्मिक बैठक असेल, तसेच आहे . १ तासाची मुलाखत पण दोन अडीच तास कसे गेले कळलेच नाही. का कोण जाणे पण तिला माझ्याबद्दल कौतुक आहे, गुरूतत्व एकच असल्यामुळे असेल.

शांत , सुस्वभावी , निर्मळ मनाची सरिता म्हणजे आपल्या क्लबची शान आहे.

ॲन. नेत्रा वाघ

आत्तापर्यंत पुशमध्ये आपण सरीताने आपल्या मैत्रिणींबद्दल लिहीलेलं वाचतोय. सगळ्यांना बोलतं करून प्रत्येकीबद्दल इतकं नेमकं, अचूक लिहायची सरीताची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. ती सहज बोलता बोलता अलगद माहिती घेते आणि इतकं सुंदर लिहीते की प्रत्येकीला वाटतं, अरे वा!

शिवाय तिचं आदरातिथ्य,  भेटायचं तर नुसतं नाही, जेवायलाच ये, हा आग्रह!

 

तिने स्वतः इतकी वर्षे सकाळसाठी केलेलं काम आणि विविध विषयांवर लिहीलेली पुस्तके यातून तिच्यातील लेखिका आपल्या ओळखीची आहेच.

इतकं सुंदर सदर लिहून आपल्याच मैत्रिणींची नव्याने ओळख करून दिल्याबद्दल सरिताला धन्यवाद!

ॲन. दीपा साठे

सरिताचा मला जेव्हा हा लेख लिहाण्यासाठी फोन आला तेव्हा मी तिला म्हटल 'माझ्यावर लेख लिहिण्यासारखं काम मी खरच केलं नाहीये'. त्यावर ती म्हणाली, 'ह्या वेळी मला फारसं काम न करणाऱ्या मुलींवरच लेख लिहायचा आहे'.

ती माझ्याकडे आली आणि तिने गप्पा मारायला सुरुवात केली. त्या गप्पांच्या ओघात ती बोलायची कधी थांबली आणि मीच आपणहून तिला माझी गोष्ट कधी सांगायला लागले हे मलाच कळलं नाही आणि ह्या सगळ्यात ती खूपच कमी टिपण करत होती. जबरदस्त स्मरणशक्ती आहे तिला. माझ्याबद्दल इतकं काही लिहिण्यासारखं आहे ह्याच्यावर माझाच विश्वास बसत नव्हता. त्या दिवशी एक सुंदर गप्पाची महफील तिने माझ्या ओंजळीत टाकली.

रो. माधुरी गोखले

 

 

सरिता, नावाजलेली लेखिका, प्रसिद्ध पत्रकार, मुलाखतकार. तिने गेली दोन वर्ष रोटरी ॲन्सच्या मुलाखती घेतल्या. ॲन्सना बोलतं केलं, अनेकींच्या सुप्तगुणांची माहिती करून घेतली. 'पुश' मधून प्रत्येक ॲनची एक वेगळी ओळख अतिशय साध्या सोप्या भाषेत सादर केली, व्यक्तिमत्व सादरीकरणाचा सरिताने केलेला हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे.

ॲन. रंजना दामले

खाण्यासाठी जन्म अपुला

बेळगावी कडबोळी

 

रो. शोभाताई राव 

प्रेसिडेंट शोभाताई या नावाजलेल्या पोषणआहार-तज्ज्ञ. "तुमची एक तरी पाकक्रिया पुशमध्ये दिली पाहिजे" असा त्यांच्याकडे आग्रह बरेच दिवस धरला होता. वेळात वेळ काढून त्यांनी 'बेळगावी कडबोळी' हि पाकक्रिया पाठवली आहे.

     

कडबोळी हा महाराष्ट्रीय जनतेचा आवडता पदार्थ. सर्वसाधारणपणे, आपल्याकडे तो दिवाळीला करतात. पण काही ठिकाणी  तो नित्याचे खाणे म्हणूनसुद्धा करतात. बेळगाव हे असेच एक ठिकाण. या ठिकाणची कडबोळी फार प्रसिद्ध आहेत. येथील कडबोळी करण्याची पद्धत वैशिष्ट्यपूर्ण आहे. 

कांदा मुळा भाजी

Recycling in Garden

ॲन शिल्पा नाईक 

ॲन शिल्पा नाईकने सुद्धा संपूर्ण वर्षभर या सदराची जबाबदारी यथार्थपणे सांभाळली. घरातल्या बागेविषयी आणि त्याच्या विविध छोट्या छोट्या अंगांविषयी तिने आपल्याला उपयुक्त कानमंत्र दिले. आपल्यापैकी अनेकांनी त्याचा योग्य तो उपयोग करून घेतला. 

या सत्रात शिल्पा आपल्याला "Recycling in Garden"  याबद्दल माहिती सांगत आहे.    
 

आरोग्यवर्धिनी

ॲसिडिक किंवा अल्कलाईन पदार्थ 

ॲसिडिटी हे अनेक रोगांचे मूळ आहे. डोकेदुखी, मायग्रेन पासून ते हृदयविकरापर्यंत ॲसिडिटीचा संबंध आहे. बर्‍याच वेळा ॲसिडिटीकडे दुर्लक्ष केले जाते कारण त्यामुळे दैनंदिन कामात काहीच बाधा येत नाही. परंतु अगदी संधिवाताचे मूळ सुद्धा ॲसिडिटीत सापडते. तसेच ॲसिडिटीमुळे गर्भधारणा होत नाही. अशा अनेक समस्यांना सामोरे जायचे नसेल तर कोणत्या पदार्थांनी ॲसिडिटी वाढू शकते हे माहीत हवे. सर्वसाधारणपणे आपल्या शरीरात रक्ताचे PH हे 7.4 इतके असावे. जेव्हा ॲसिड आणि अल्कली ह्यांचे संतुलन बिघडते तेव्हा आपले आरोग्य निश्चीत बिघडते. पदार्थाचे वर्गीकरण हे Potential Renal Acid Load ह्या इंडिकेटर ने ठरवले जाते आणि पदार्थाच्या PH वर नाही.  जेव्हा हा शून्य किंवा त्याच्या खाली असतो तेव्हा तो पदार्थ अल्कली समजला जातो व जेव्हा तो शून्याच्या वर असतो तेव्हा तो ॲसिडिक समजला जातो. काही पदार्थांची वर्गवारी खालील तक्त्यात दिले आहे.

 Table 25 : ॲसिडिक किंवा अल्कली पदार्थाचे वर्गीकरण

acidity.png

लिंबू हे जरी आम्लिक असले तरी त्याच्या पचनानंतर व शोषणानंतर ते जे पदार्थ निर्माण करते ते अल्कलाइन असतात. त्याच्या उलट मांसाहारी पदार्थ खाण्यापूर्वी अल्कलाइन असले तरी त्याच्या पचनानंतर ते जे अवशेष ठेवतात ते ॲसिडिक असतात.  म्हणूनच जवळ जवळ सर्व प्राणीजन्य पदार्थ आम्लिक आहेत अशी वर्गवारी केली जाते. वरील तक्त्यावरून हे लक्षात घ्यायला हवे की आपले प्रमुख पदार्थ म्हणजेच धान्ये,डाळी वगैरे आम्लिक आहेत. म्हणून आपण भाज्या, कोशिंबिरी व फळे यांचे सेवन करून आम्लिक व अल्कलाइन पदार्थांचा समतोल राखला पाहिजे. या सर्व  चर्चेमध्ये लिंबाचे महत्त्व जवळ जवळ अधोरेखित झाले आहे. आहाराच्या दृष्टीने प्रथिने, स्निग्धांश मिळवणे त्यामानाने सोपे आहे परंतु सूक्ष्म पोषणमूल्ये मिळवण्याचा आपण विचारच करत नाही. यातील 'ब' आणि 'क' जीवनसत्वे ही पाण्यात विरघळतात तर आणि 'ड' आणि 'ई' ही मेदात विरघळतात.  शिवाय भाज्या शिजवताना त्यातील 40 ते 50 टक्के जीवनसत्त्वांचा ऱ्हास होतो. म्हणून ते मिळविण्यासाठी विशेष लक्ष देणे जरुरीचे आहे.


होमिओपथीची शाखा असलेली बाराक्षार उपचार पद्धती ही आपल्या आरोग्याच्या संदर्भात क्षारांचे महत्त्व सांगते. क्षार हे तर अत्यंत महत्त्वाचे असून शरीरातील अनेक व्याधी या क्षारांच्या अभावाने निर्माण होतात असे दाखवून दिले गेले आहे. आणि बाराक्षार पद्धती अशी स्वतंत्र उपचार पद्धती पण अस्तित्वात आहे. क्षार हे आपल्या शरीरात इलेक्ट्रोड सारखं काम करतात आणि चार्ज वाहक असतात. त्यामुळे शरीरात असंख्य रासायनिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांची अत्यंत गरज असते.
 

म्हणूनच या वर्षी पुशच्या निरनिराळ्या अंकांमधून मी क्षारांचे महत्व सांगायचे ठरवले. कारण कॅलरीज, प्रथिने व फॅट याबद्दल सर्वांना माहिती तशी असते. परंतु जीवनसत्त्वे आणि क्षार जरी कमी प्रमाणात लागत असली तरी ती प्रचंड महत्वाची आहेत. त्यामुळे ही माहिती तुम्हा सर्वांना उपयोगी ठरली असेल याची आशा वाटते. धन्यवाद.

रो शोभा राव

हस्त सामुद्रिक शास्त्र

दुय्यम पण महत्वाच्या रेषा

मंगळ रेषा (Line of Mars)


ही रेषा आयुष्यरेषेच्या आतल्या बाजूने सुरू होते व आयुष्यरेषेच्या बरोबरीने समांतर प्रवास करते. डबल लाईफ लाईन म्हणाना. ही रेषा आयुष्य रेषेच्या बऱ्याच उणिवांची तीव्रता कमी करते. ही रेषा जितकी लांब तेवढी चांगली. बऱ्याच वेळेला आयुष्याची नव्वदी, शंभरी गाठणाऱ्यांच्या हातावर ही रेषा स्पष्ट असते. आर्मी, पोलीस दल, लढाऊ बाणा असणाऱ्या क्षेत्रात हे लोक चांगली कामगिरी करताना आढळतात. चांगली प्रकृती, मानसिक क्षमता, त्वरित निर्णय घेणारी अशी ही व्यक्ती असते. मंगळ रेषा आयुष्य रेषेपासून सुरू होत असेल तर लहान वयात प्रेम करणे दर्शवते व प्रेम केलेली व्यक्ती मंगळ प्रधान असते. मंगळ रेषा व आयुष्य रेषेतील अंतर कमी नसेल तर व्यक्तीचा स्वभाव तापट व चिडचिडा असतो. मंगळ रेषा आयुष्य रेषेच्या सुरुवातीला व शेवटी स्पर्श करत असेल तर अशी व्यक्ती घर जावई होते. मंगळ रेषेचा शेवट द्विभाजनाने होत असेल तर व्यक्ती व्यसनी व मनावर ताबा नसणारी असते.


अंतःप्रेरणा रेखा ( Line of intuition)
 

बुधाच्या उंचवट्या पासून चंद्राच्या उंचवट्या पर्यंत ही रेषा जाते. हिचा प्रवास वक्राकार असा असतो. ही रेषा स्पष्ट व लांब असावी. अशा व्यक्तींना पुढील होणाऱ्या गोष्टींची कल्पना येते. अशा व्यक्तींच्या अंगात निरीक्षणशक्ती व analytical mind असते. अशा व्यक्तींची दुसऱ्यावर छाप लगेच पडते. यांना कधीकधी पुढे होणाऱ्या घटनांची स्वप्ने सुद्धा पडतात. मस्तक रेषा व अंतर्ज्ञान रेषा एकमेकाला छेद देत असतील तर बुद्धीच्या चुकीच्या समजुतीमुळे प्रगतीत अडथळा येतो. अंतर्ज्ञान रेषा, मस्तकरेषा व भाग्यरेषा त्रिकोण करत असतील तर खूपच गूढ शक्ती दर्शवते. या रेषेच्या शेवटी नक्षत्र चिन्ह असेल तर गूढ शक्तीच्या जोरावर व्यवसाय दर्शवते. अंतर्ज्ञान नागमोडी असेल तर अस्वस्थ व नैराश्य वृत्ती दर्शवते. अंतर्ज्ञान रेषा खंडित असेल तर किंवा यव चिन्ह असेल तर या गूढविद्येत कमी यश दर्शवते. या रेषेवर फुली असले तर ती व्यक्ती बनवाबनवी व बुवाबाजी करणारी व फसवणूक करणारी असते.

विवाह रेषा ( Line of marriage)


ही रेषा हाताच्या कडेच्या बाजूने बुध उंचवट्या जवळ हृदयरेषा व करंगळी यांच्यामध्ये असते. विवाहरेषा सरळ व स्पष्ट असावी व त्यावर ठिपके, तुटक जाळी वगैरे अशुभ चिन्हे नसावीत. एकापेक्षा जास्त असतील याचा अर्थ अनेक विवाह होतील असे नाही. जी स्पष्ट रेषा असेल तीच महत्त्वाची धरावी. हृदयरेषा व करंगळी यातले अंतर साधारण पन्नास वर्ष धरावे. विवाह रेषा जेवढी हृदय रेषेच्या जवळ तेव्हढा विवाह लवकर होतो. मध्यभागी असेल तर २५ वर्षांपर्यंत विवाह होतो. ही रेषा सरळ व स्पष्ट असावी अडथळे नकोत. या रेषेचा शेवट कसा होतो ते फार महत्त्वाचे असते. ही रेषा हृदय दिशेकडे वळलेली असेल तर त्या व्यक्तीची (spouse) चा मृत्यू त्यांच्या आधी व्हायची शक्यता अधिक असते. अंतकरण रेषेला समांतर अशी विवाह रेषा सरळ व स्पष्ट असेल तर यशस्वी वैवाहिक जीवन दर्शवते. हातावर दोन किंवा अधिक विवाह रेषा असतील तर त्या रेषांच्या खोलीवरून प्रेमसंबंध किती तीव्र असतील याची कल्पना येते. अस्पष्ट व आखूड विवाहरेषा साधारण व सातत्य नसलेली प्रेमप्रकरणे दर्शवतात. दोन विवाह रेषा व भाग्यरेषा व अंतकरण रेषा यांच्यातील एक फाटा या देशांना मिळत असेल तर दुसरा विवाह होण्याची चिन्हे असतात. जेव्हा विवाह रेषा हृदयरेषेच्या बाजूला झुकून तिला स्पर्श करते किंवा पुढे जाते तेव्हा अशी शक्यता असते की पती-पत्नी एकमेकांपासून दूर राहत असतात. या रेषेचे जर का खंड पडत असेल तर पती-पत्नी एकमेकांपासून दूर राहतात पण घटस्फोट होतीलच असे नाही.
               

संतती रेषा
 

या रेषांचा संबंध विवाहरेषेशी निगडित आहे. विवाहरेषा व बुध उंचवट्यावर विवाहरेषेला जोडून या रेषा असतात. या रेषा स्पष्ट व उठावदार असाव्यात. स्पष्ट, सरळ व उठावदार रेषा पुरुष संतती दाखवतात व अस्पष्ट रेषा स्त्री संतती दाखवतात. संतती रेषा जर विवाहरेषेला छेदून पुढे जात असेल तर जास्त प्रसवक्षमता असते. किती मुलांचा योग आहे हे सांगणे उंचवट्यावर सुद्धा हे अवलंबून असते. शुक्र उंचवटा लहान दबलेला असेल तर संतती होण्याचा योग कमी असतो. शुक्र उंचवटा उठावदार असेल तर संतती जास्त होण्याचा योग असतो. संतती रेषेवर डाग ठिपका नसावा. एकाच ठिकाणावरून दोन रेषा निघत असतील तर जुळी मुले दर्शवतात. या रेषा बहिर्गोल भिंगानेच स्पष्ट दिसतात. संतती दर्शविणारे इतर चिन्हे पण आहेत. कमळ ,कलश ,त्रिशूळ, मत्स्य चिन्ह, अंगठ्यावर यव चिन्ह, मणीबंध  रेषेवरून वरच्या बाजूला जाणाऱ्या रेषा संतती दर्शवतात. साधुसंतांच्या हातावरील संतती रेषा त्यांच्या भक्तगणांची संख्या दर्शवतात.
                 

प्रवास रेषा
 

या रेषा चंद्र उंचवट्यावरुन तळहातावर वेगवेगळ्या दिशेने जातात. आयुष्यरेषा व मणिबंधरेषा यातून निघणाऱ्या रेषा चंद्र उंचावट्याकडे जाणाऱ्या रेषा सुद्धा प्रवास दाखवतात. चंद्र उंचवट्यावरुन निघणाऱ्या आडव्या रेषा परदेश प्रवास व जलप्रवास दर्शवतात. या प्रवास रेषा हाताच्या वरील भागांकडे जात असतील तर प्रवासापासून फायदा दर्शवतात व खालील भागात जात असतील तर प्रवासात तोटा दर्शवतात. प्रवास रेषेवरील यव चिन्ह पाण्यापासून धोका दर्शवतो. चौकोन चिन्ह सुरक्षा दर्शवते. दोन्ही हातावर यव चिन्ह, फुली नसाव्यात. एकाच हातावर असतील तर धोका कमी असतो. प्रवास रेषा जर का हृदय रेषेला जाऊन मिळत असेल तर प्रवासात प्रेम प्रकरण सुरू होते.
           

मणिबंध रेषा ( Bracelets)
 

साधारण प्रत्येक व्यक्तीच्या हातावर पंजाच्या सुरुवातीला या मणिबंध रेषा असतात. या रेषांवरून सुद्धा आयुष्य व नशीब या गोष्टी पाहिल्या जातात. कधी एक तर कधी तीन रेषा सुद्धा पाहायला मिळतात. या तीन रेषा समान अंतरावर स्पष्ट असतील तर तो एक भाग्यकारक योग समजला जातो. चार रेषा असतील तर मग तो एक प्रकारचा राजयोग म्हटला जातो. स्पष्ट व गुलाबी रंगाच्या रेषा चांगल विचारसरणी,प्रकृती, दीर्घायुष्य, ऐश्वर्य दर्शवते. तर जर का त्रिकोण चिन्ह, नक्षत्र चिन्ह, फुली असतील तर वारसा हक्काने मिळालेली संपत्ती दर्शवते. मणिबंध रेषा स्पष्ट असतील तर नाजूक प्रकृती दर्शवते. मणीबंध रेषेवर यव चिन्ह असतील तर कष्टाळू जीवन दर्शवते. परंतु शेवटी यश व चांगले नशीब दर्शवते. तिसरी मणिबंध रेषा तुटक असेल तर आतड्यांचा रोग दर्शवते.
         

मित्रहो, हातावरून बऱ्याच गोष्टींचे आकलन होते पण वेळेअभावी व जागेअभावी हातावरील रेषा काय दर्शवतात ते दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. बऱ्याच गोष्टी लिहिण्यासारख्या आहेत व त्याच्यासाठी वेगळे पुस्तकच लिहिले तरी अपूर्ण पडेल. अशा या शास्त्राला प्रणाम करून लेखमाला संपवतो.

पीपी अशोक गाडगीळ

fig 1.jpg

कथाकथन

रो. मंजिरी धामणकर

रो. मंजिरीने संपूर्ण वर्ष 'कथाकथन' या सदराची जबाबदारी घेतली आणि छान निभावलीसुद्धा. वास्तविक ती स्वतःच लेखिका आणि कलाकार असल्याने वाचनाची सर्व अंगे तिला छान वठवता येतात. तिच्याकडून कथाकथनाची प्रतीक्षा होतीच. पण वर्ष संपत आले तरी तिने पुशसाठी स्वतः कथाकथन केले नव्हते. त्यासाठी थोडा पाठपुरावा करावा लागला. पण मग ती तयार झाली आणि तिने ह्या कथाकथनाची दृश्यफीत करून पाठवली. 

लेखक चेतन जोशी यांच्या "कॉकटेल कार्निवल" या इंग्रजी पुस्तकाचे तिने मराठी रूपांतर केले आहे. या कथासंग्रहातील "होते निरूपवेडे" या कथेचे  कथन मंजिरीने केले आहे. 

कौतुक

Annet Rucha (daughter of Kalyani and Rahul Pendharkar)secured  admission  in North Eastern University  at Boston campus  for MS robotics

She has been awarded a college of engineering Dean scholarship for her program

bottom of page