march 2022 Issue:
water and sanitation month

साप्ताहिक कार्यक्रम

7 फेब्रुवारी - प्रांतपालांची वार्षिक भेट

७ फेब्रुवारी रोजी डी जी पंकज शहा यांनी आपल्या क्लबला वार्षिक भेट दिली. आपल्या क्लबचे यंदाचे ए. जी.संदीप  वेळेकर व ए. जी. ए. प्रदीप डांगे यावेळी उपस्थित होते.

सर्वप्रथम डी. जी. पंकज यांनी शोभाताई, मृणाल व स्मिताताई यांच्यासह  स्ट्रेटेजिक कमिटीची आढावा  मीटिंग झाली. त्यांनी सर्व आजी व भावी अध्यक्षांना अनेक मौलिक सूचना केल्या.

 नंतर संचालक मंडळाबरोबर त्यांचे विचारांचे आदान प्रदान झाले. प्रत्येक एव्हेन्युचे काम त्यांनी जाणून घेतले आणि तत्काळ छान नावीन्यपूर्ण सूचना सुद्धा केल्या. त्यांची प्रत्येकाशी संवाद साधण्याची पद्धत अगदी खेळीमेळीची होती. अगदी गप्पा मारल्याप्रमाणे ते हसत बोलत माहिती घेत होते, सूचना देत होते.

नंतर क्लब मीटिंग सुरू झाली. स्व. दीदी 'लता मंगेशकर' व रो. मनोजच्या मातोश्री 'कुंदा फुलंब्रिकर' यांना श्रद्धांजली वाहून मीटिंगची सुरुवात झाली.  प्रथम शोभाताईंनी थोडक्यात क्लबच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा थोडक्यात आढावा घेतला. ए जी संदीप वेळेकर यांनी आपल्या क्लबच्या कामाचे आणि अध्यक्ष व संचालक मंडळाचे कौतुक केले. डी जी पंकज यांनी पुशच्या फेब्रुवारी अंकाचे प्रकाशन केले.

भाषणाच्या सुरुवातीसच सर्वांना या वर्षीच्या डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स  व रोटरी इंटरनॅशनल कन्व्हेन्शनला येण्याबद्दल डी जी पंकज यांनी आग्रह केला.  

शिवाजीनगर क्लबच्या कार्याचे त्यांनी मनापासून कौतुक केले.  CSR चे अधिक प्रकल्प करण्यास त्यांनी संगितले. मोठे नजरेत भरण्यासारखे प्रकल्प राबविण्याच्या त्यांनी सूचना दिल्या. एकलव्य आणि सार्थक यांच्या प्रकल्पाचे त्यांनी कौतुक केले. 'बेबी वॉर्मर' तसेच 'जयपूर फूट' या आपल्या प्रकल्पांचे त्यांनी कौतुक केले. 

'मेट्रो ट्रेन' वर प्रसिद्धी करण्याच्या प्रकल्पाबद्दल त्यांनी माहिती दिली. या प्रकल्पाला मान्यता दिल्याबद्दल त्यांनी शोभाताइंचे आभार मानले.

'श्वास' या डिस्ट्रिक्टच्या प्रकल्पाबद्दल त्यांनी माहिती दिली. सियाचीन मध्ये जवानांसाठी प्राणवायू तयार करण्याची सोय करण्याची व्यवस्था करण्याबाबत हा प्रकल्प आहे. अडीच कोटी चे बजेट असणारा हा प्रकल्प सीमेवर अत्यंत कठीण परिस्थितीत काम करणाऱ्या जवानांसाठी ही रोटरीने केलेली खारीची मदत आहे. आणि हा प्रकल्प केवळ भारतीय वित्त उभारणी करूनच करावयाचा आहे. जागतिक अनुदान या प्रकल्पासाठी न वापरण्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.

रोटरी मध्ये २५ वर्षे पूर्ण झालेल्या रोटेरियन्सचा गौरव करण्याच्या डिस्ट्रिक्ट च्या योजनेबद्दल त्यांनी माहिती दिली.

अखेरीस 'Act local and think global' हा कानमंत्र देऊन त्यांनी आपले छोटेखानी भाषण संपवले.

शरद ने सूत्र संचालन केले आणि मृणालने आभार मानले. 

रथसप्तमी निमित्त ऋजुताने मीटिंगच्या आधी सर्व उपस्थित सभासदांना तीळवड्या दिल्या. नितीन, शिल्पा नाईक व त्याच्या इव्हेंट टीम च्या सहकाऱ्यांनी चोख व्यवस्था ठेवली होती. 

मीटिंग नंतर सर्वांनी सहभोजनाचा आस्वाद घेतला.

रो. शेखर यार्दी

WhatsApp Image 2022-02-14 at 5.50.49 PM (1)
WhatsApp Image 2022-02-14 at 5.50.49 PM (1)

press to zoom
WhatsApp Image 2022-02-14 at 5.50.48 PM
WhatsApp Image 2022-02-14 at 5.50.48 PM

press to zoom
WhatsApp Image 2022-02-14 at 5.50.49 PM
WhatsApp Image 2022-02-14 at 5.50.49 PM

press to zoom
WhatsApp Image 2022-02-14 at 5.50.49 PM (1)
WhatsApp Image 2022-02-14 at 5.50.49 PM (1)

press to zoom
1/5

14 फेब्रुवारी - नाडी तरंगिणी

14 फेब्रुवारी च्या सोमवारी आपल्या क्लबमध्ये डॉ. अनिरुद्ध जोशी यांनी 'आधुनिक आयुर्वेदाचा जागतिक प्रसार' या विषयावर भाषण दिले. त्यांना २०२१ या वर्षाचे नॅशनल स्टार्टअप अवॉर्ड मिळालेले आहे. PhD(computer science IIT Bombay with specialisation in data analysis and machine learning) असलेल्या डॉ. अनिरुद्ध जोशी यांनी पुण्यात 'अत्रेय इनोव्हेशन प्रा लि' ही कंपनी स्थापन केली आहे.
          आर्टिफिशिअल इंटेलिजन्स च्या सहाय्याने मनगटावरील नाडी तपासून, शरीरातील रोगाचे निदान करून, उपाय सुचविणाऱ्या "नाडी तरंगिणी" या उपकरणाची त्यांनी निर्मिती केली आहे त्याबद्दल त्यांनी माहिती दिली. आयुर्वेदातील नाडी परीक्षेला त्यांनी टेक्नॉलॉजीची जोड देऊन ग्लोबल प्लॅटफॉर्म मिळवून दिला आहे. 'तुरिय' हे पेशंटला घरी वापरता येण्याजोगे उपकरणही तयार केले आहे. ते वेअरेबल व पोर्टेबल पण केले आहे.
     एक लाख व्यक्तींची आरोग्य तपासणी त्यांनी केली असून बारा देशात त्यांचे प्रॉडक्ट पोहोचले आहे. याचे पेटंट देखील त्यांच्या नावावर आहे.
         वडिलांच्या आजारपणात पुण्यातील वैद्य अशोक भट यांच्या नाडी परीक्षेमुळे आलेला गुण त्यांना प्रेरणादायी ठरला. स्वप्नांना लोकल न ठेवता ग्लोबल करण्यासाठी त्यांनी मशीन लर्निंग व संख्याशास्त्राची जोड दिली. खरेतर मानवाच्या उत्क्रांती बरोबर उत्क्रांत झालेले आयुर्वेद हे आपल्या संस्कृतीचा एक मोठा ठेवा आहे. त्यात कालानुसार रिसर्च व टेक्नॉलॉजी ची जोड देणे गरजेचे आहे. ते काम डॉ. जोशीनी सुरू केले आहे असे वाटते.
        कार्यक्रमात त्यांनी वापरलेली टेक्नॉलॉजी पी.पी.टी. च्या सहाय्याने सांगितली आयुर्वेदातील वात-पित्त-कफ या संकल्पना सोप्या शब्दात सांगून मशीनवर ग्राफ कसा येतो ते दाखविले. मराठी महिने व तिथी नुसार काढलेल्या ग्राफ मध्ये पौर्णिमा, अमावस्या व एकादशी यावेळी डायजेशन कसे आढळते, पावसाळ्यात ते कमी कसे होते हे सर्व ऐकून आपल्या धार्मिक उपवासाचा याच्याशी संबंध असावा असेही वाटले 
       अतिशय सोप्या भाषेत  त्यांनी माहिती दिली. रो. रविकिरण यांनी त्यांची यथोचित ओळख करून दिली व
ॲन प्रतिमाने आभार मानले.

ॲन प्रतिमा दुरुगकर

21 February - Peace Awards

Peace and Conflict Resolution is one of the focus areas of Rotary. RCPS has been giving Peace awards under this focus area to people or institutions engaged in humanitarian work or work contributing to social harmony. RCPS Peace Awards ceremony was conducted on 21st Feb. 2022. This year the awardees were Nari Samata Manch – Since 1982, NSM has been contributing to social harmony through long and dedicated service for promoting Gender Equality, Empowerment of Women, and prevention of domestic violence and other crimes against women. The “Speak Out Centre” initially established for victims and survivors of domestic violence has gradually turned into Crisis Intervention Centre. NSM is also actively involved with marginalized and deprived communities for their development issues and realization of rights. NSM is working with tribal communities like the Katkaris (in Mushi and Maval blocks of Pune district) who are one of the most vulnerable tribes and marginalized. Dr. Pratibha Athvale- is a Dentist from Ahmedabad. She is extending Dental care in border areas and remote places in association with Vivekananda Kendra, Seva Bharti & Kalyan Ashram. rural & tribal areas. She has developed a simple, user-friendly & affordable unique Sanitary Pad Making Machine through visionary use of technology & creativity for promoting women's hygiene in remote places and tribal areas. She is also working towards refining the perception of people in Kashmir and northeast areas through authentic dialogue, groundwork & promoting National Integration, Individual Development, Health Care, Cleanliness & Deaddiction.

 

President Dr. Shobha Rao welcomed all the guests and awardees. PP Pradeep Wagh briefed the audience about Rotary’s key focus area Peace and Conflict Resolution. Rtn. Dr. Bharati Dole introduced the awardees and read out citations for NSM. Pravin Walvekar, spouse of Rtn Shubhangi Walvekar read out the citation for Dr. Pratibha Athvale. Preeti Karmarkar Chief Executive of NSM accepted the award on behalf of NSM. In her acceptance speech, she thanked RCPS for recognizing their work. She threw light on different shades of violence against women and hoped to associate with organizations like Rotary for the cause of women. NSM representatives including founder member Mrs. Dadhich were present for the ceremony. Dr. Pratibha Athvale joined online and thanked RCPS for the award. She narrated her experiences of working in remote areas. It was a great experience to listen to her. Dr. Pratibha Athvale’s award was collected by her relatives.

 

Rtn. Bharati, Chairperson of International Service and Peace, and Pravin Walvekar, a member of the committee had taken a lot of efforts to select the awardees and make the program successful. In the end, IPP Sharad Dole proposed a vote of thanks. Rtn. Ashwini Ambike had compered the program beautifully.

 

IPP Sharad Dole

WhatsApp Image 2022-02-22 at 8.13.28 PM.jpeg
WhatsApp Image 2022-02-22 at 8.13.28 PM (1).jpeg

28 February - Best scientist award is given to scientists from ARI

On the occasion of National Science Day, RCPS honored Dr. Sumit Singh Dagar of Agharkar Research Institute, with the “Best Scientist Award”. The felicitation ceremony was held at ARI on 28th Feb 2022.

 

Dr. Sumit Singh Dagar is a scientist in the Bioenergy group at the Agharkar Research Institute Pune, India. His research group focuses on three linked research areas:

 

 Developing strategies for energy recovery from lignocellulosic biomass, primarily using agricultural residues to produce various biofuels like biohydrogen, bioethanol, and biomethane. The novel strategies utilize lignocellulolytic, fermentative, and methanogenic anaerobes instead of expensive and polluting chemicals.

 

 Exploring the taxonomic and ecological diversity and metabolic interactions of diverse microbial groups from anaerobic environments using both cultivation and ‘omics-based approaches.

 

 Anaerobic fungal cultivation, characterization, and taxonomy, and to date his research include the discovery of nine anaerobic fungal genera.

 

Dr. Sumit Singh Dagar is also an expert in the microscopy of anaerobic fungi and their morphology.

 

Dr. Sumit Singh Dagar explained the difficult subject of the usage of fungi to process agriculture waste to produce energy in a very lucid manner.

 

PP Dr. Suryaprakasa Rao introduced Dr. Sumit Singh Dagar and read the citation of honor. The “Best Scientist Award” was presented by Senior Rotarians PP Vinoobhau Dani and PP R T Kulkarni. Rtn Dr. Bharati Dole proposed a vote of thanks. PE Dr. Mrinal Nerlekar presided over the weekly meeting. Dr. P K Dhakephalkar Director of ARI and many team members of Dr. Sumit Singh Dagar graced the award function.

 

IPP Sharad Dole

WhatsApp Image 2022-03-01 at 2.51.09 PM
WhatsApp Image 2022-03-01 at 2.51.09 PM

press to zoom
WhatsApp Image 2022-03-01 at 2.51.10 PM (1)
WhatsApp Image 2022-03-01 at 2.51.10 PM (1)

press to zoom
WhatsApp Image 2022-03-01 at 2.51.09 PM (1)
WhatsApp Image 2022-03-01 at 2.51.09 PM (1)

press to zoom
WhatsApp Image 2022-03-01 at 2.51.09 PM
WhatsApp Image 2022-03-01 at 2.51.09 PM

press to zoom
1/4

सामाजिक प्रकल्प

दिनांक २८ फेब्रुवारी रोजी विज्ञान दिनानिमित्त शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.  माध्यमिक विद्यालय एरंडवणा आणि रोटरी क्लब ऑफ शिवाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने हे विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांनी या विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग  घेतला.

विज्ञान प्रदर्शनाचे विषय पुढीलप्रमाणे होते....

१) सौर ऊर्जा काळाची गरज
२) स्मार्ट सिटी आणि आपण
३) शेती
४) टाकाऊ पासून टिकाऊ
५) कचरा व्यवस्थापन
६) इतर

विद्यार्थ्यांनी प्रकल्प गटामध्ये किंवा एकट्याने बनवणे अपेक्षित होते. प्रकल्प बनवत असताना आपल्या प्रकल्पाविषयीची सर्व माहिती एकत्रित संकलित करावयाची  होती. 

ॲन अंजली रावेतकर

WhatsApp Image 2022-02-28 at 3.14.31 PM (1)
WhatsApp Image 2022-02-28 at 3.14.31 PM (1)

press to zoom
WhatsApp Image 2022-02-28 at 3.14.28 PM
WhatsApp Image 2022-02-28 at 3.14.28 PM

press to zoom
WhatsApp Image 2022-02-28 at 3.14.31 PM
WhatsApp Image 2022-02-28 at 3.14.31 PM

press to zoom
WhatsApp Image 2022-02-28 at 3.14.31 PM (1)
WhatsApp Image 2022-02-28 at 3.14.31 PM (1)

press to zoom
1/5

आपटे मूकबधिर स्कुल

7th  February  RCPS  donated  to Apate  Muk  Badhir  School    
10th  St.  students  21 Important  questions  series .

WhatsApp Image 2022-02-21 at 10.01.09 AM.jpeg

सार्थकला फेब्रुवारी महिन्याचे धान्य पोचले

WhatsApp Image 2022-03-01 at 10.10.33 PM.jpeg

एकलव्यला फेब्रुवारी महिन्याचे धान्य पोचले

WhatsApp Image 2022-03-01 at 10.11.11 PM.jpeg

आरोग्यदर्पण

NID Polio Project

NID for polio was held on 27 February 2022. As usual, we have supported the Bhabha hospital in Pandavnagar with cold chain, transport arrangements to volunteers to go to booth and lunch packets. Nearly 4000 vaccinations were done during the day. Rotarians Dr. Rao, Ajay Godbole, Sachin Joglekar, Milind Palkar, Ujwal Marathe, CD Mahajan, Ann Seema Mahajan participated in this project.

Rtn. Dr. Suryaprakasa Rao

WhatsApp Image 2022-02-27 at 3.51.48 PM (1)
WhatsApp Image 2022-02-27 at 3.51.48 PM (1)

press to zoom
WhatsApp Image 2022-02-27 at 3.51.48 PM
WhatsApp Image 2022-02-27 at 3.51.48 PM

press to zoom
WhatsApp Image 2022-02-27 at 3.51.47 PM
WhatsApp Image 2022-02-27 at 3.51.47 PM

press to zoom
WhatsApp Image 2022-02-27 at 3.51.48 PM (1)
WhatsApp Image 2022-02-27 at 3.51.48 PM (1)

press to zoom
1/4

खबर - बखर

1. Birthday fellowship of januarians and februarians at Amaayaa on 27th feb

WhatsApp Image 2022-02-27 at 3.49.49 PM (1).jpeg
WhatsApp Image 2022-02-27 at 3.49.49 PM.jpeg

उपलब्धि...अभिनंदन

1. आपल्या ह्या रोटरी वर्षाच्या  पहिल्या कार्यक्रमाचे वक्ते डॉ. प्रकाश अत्रे यांच्या "शब्द रंगी रंगले" या पुस्तकाचे प्रकाशन श्री. सदानंद महाजन व श्री.डाॅ. प्रदिप वाघ ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रमुख पाहुणे डॉक्टर सुनील भंडगे यांच्या शुभहस्ते २७-२-२०२२ ला संपन्न झाले.फोटोत डावीकडून डाॅ. अत्रे, श्री.भंडगे, डाॅ.प्रदिप वाघ व सदानंद महाजन दिसत आहेत.
ह्या कार्यक्रमास रो.नितीन  व शिल्पा नाईक,रो.मनोज व वसुंधरा फुलंब्रिकर,रो.राजाभाऊ वाईकर व रो.आनंद नवाथे उपस्थित होते.

WhatsApp Image 2022-02-27 at 9.19.10 PM.jpeg

2. मराठी भाषा दिनाच्या औचित्याने रोटरी प्रांत ३१३१ तर्फे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ मिलिंद जोशी ह्यांच्या हस्ते संगणक तज्ञ् ,४४ पुस्तकाचे लेखक डॉ दीपक शिकारपूर ह्यांचा साहित्य भूषण पुरस्काराने सन्मान केला गेला . ह्याप्रसंगी प्रांतपाल पंकज शहा , अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे , ज्येष्ठ लेखक उद्योजक व जीवन गौरव पुरस्कार विजेते डॉ सुधीर राशिंगकर उपस्थित होते. या प्रसंगी ॲन सरिता भावे, रो. मंजिरी धामणकर, ॲन प्रतिमा दुरूगकर, डॉ. शोभा राव यांनाही साहित्यिक पुरस्कार देण्यात आले.

WhatsApp Image 2022-02-26 at 12.22.51 PM (1)
WhatsApp Image 2022-02-26 at 12.22.51 PM (1)

press to zoom
WhatsApp Image 2022-02-26 at 12.21.10 PM
WhatsApp Image 2022-02-26 at 12.21.10 PM

press to zoom
WhatsApp Image 2022-02-26 at 12.21.11 PM
WhatsApp Image 2022-02-26 at 12.21.11 PM

press to zoom
WhatsApp Image 2022-02-26 at 12.22.51 PM (1)
WhatsApp Image 2022-02-26 at 12.22.51 PM (1)

press to zoom
1/5

3. Article of PDG Deepak in Loksatta

WhatsApp Image 2022-02-26 at 8.23_edited.jpg

4. दि ३ फेब्रुवारी रोजी लोकमत मधे ' एक हटके career' या विषयावर पी डी जी दीपकचा लेख आला होता

5. लोकमतमधे 'digital gaming as a career' या विषयावर पी डी जी दीपकचा लेख आला होता.

6. १५ फेब्रुवारी रोजी रोटरी क्लब पुणे स्पोर्ट्स सिटीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रदीप वाघ याने अध्यक्षपद भूषवले.

7. श्वेता (उज्वल आणि सविता मराठे यांची मुलगी) हिला दि. २२.०२.२०२२ रोजी पुत्ररत्नाची प्राप्ती झाली.

8. पी डी जी दीपकचा लेख "डिजिटल रुपया - नवे आभासी चलन" दै. तरुण भारत मध्ये प्रसिद्ध झाला.

9. राहुल पेंढारकर याचा "बॉलीवूड सफर" हा गाण्याचा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पार पडला.

10. तळेगावला झालेल्या कलापिनी सांस्कृतिक जिल्हा बालनाट्य स्पर्धेत अश्विनी आणि तिच्या संघाला ५ बक्षिसे मिळाली....
(उत्कृष्ट - लेखन, दिग्दर्शन, तालवाद्य साथ संगत, उत्कृष्ट रंगमंच व्यवस्था आणि सांघिक उत्तेजनार्थ.)

WhatsApp Image 2022-02-21 at 9.59.41 AM
WhatsApp Image 2022-02-21 at 9.59.41 AM

press to zoom
WhatsApp Image 2022-02-21 at 9.59.41 AM (1)
WhatsApp Image 2022-02-21 at 9.59.41 AM (1)

press to zoom
WhatsApp Image 2022-02-21 at 9.59.42 AM
WhatsApp Image 2022-02-21 at 9.59.42 AM

press to zoom
WhatsApp Image 2022-02-21 at 9.59.41 AM
WhatsApp Image 2022-02-21 at 9.59.41 AM

press to zoom
1/5

11. Dr. Bharati Dole's article on Elkay Chemicals, a company founded by Dr. Ravi Kulkarni, brother of  RTN Dr. Avinash Kulkarni was published in February Issue of magazine 'Sampada'. Rtn. Dr. Avinash is also a Director of the company. Recently Dr. Ravi has received a rare honor. He is nominated for Fellow of National Academy of Engineers” USA. Twenty-two foreign nationals have received this distinction and include great achievers like Mr. Chandrashekharan, Chairman Tata Sons;  Satya Nadella.

12. Vrinda conducted a session on Stress Management for faculty in Modern college for BBA, MBA

WhatsApp Image 2022-02-21 at 4.16.39 PM
WhatsApp Image 2022-02-21 at 4.16.39 PM

press to zoom
WhatsApp Image 2022-02-21 at 4.16.58 PM
WhatsApp Image 2022-02-21 at 4.16.58 PM

press to zoom
WhatsApp Image 2022-02-21 at 4.16.39 PM
WhatsApp Image 2022-02-21 at 4.16.39 PM

press to zoom
1/2

13. Reshma was the speaker at RCPS Lokmanya Nagar. She gave a talk on "Women empowerment - RYLA Japan calling" on 16th February 2022.

14.दि १६ फेब्रुवारी रोजी "परिवर्तन" या ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये दीपकचे व्याख्यान झाले

15. Rtn. Shobha Rao was invited to RCP South on February 28th in their weekly meeting.

16. PDG Rtn. Dr. Deepak Shikarpur was felicitated by MIT Founder - Dr. Karad

17. Rtn. Dr. Deepak Shikarpur is appointed as co-chairman - program committee of Rotary International Presidential Conference to be held in Hyderabad on April 29th to May 1st.

18. Dr. Deepak Shikarpur has been appointed as Co - Chairman – Program Committee  of Rotary International Presidential Conference to be held in Hyderabad on April 29 - May 1.   

19. १९ फेब्रुवारी सकाळ मधील बातमी - "भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील विज्ञानाचे योगदान" या विषयावरील कार्यशाळेत डॉ. बाळकृष्ण दामले यांचा सहभाग

20. A special issue of GML was released on the occasion of Baghban on 27th February. PDG Deepak and PP Guru have shared their views about what motivates one to remain in Rotary for many years. Vrinda's editorial is on the last page.

Highlights of Minutes of Board Meeting held on 25.2.2022

 •  - 26 members of our club, who have completed 25 years in rotary were felicitated by the District on 27th Feb 2022

 •  - Club Day will be celebrated on 26th March & Bavarchi Night will be held in April 2022.

 •  - One-day Health Expo will be held on 3rd April 2022 from at Harshad Hall.

 •  - 28th Feb 2022 scientist award was given to a scientist from ARI

 •  - 8th March Women's day will be celebrated on 6th March to 14th March.

 •  - Vocational excellence award will be given  to 'Pandurang Mukhade' on 14th March

 •  - DG Visit was successful on 7th Feb. 65 Rotarians attended physically.

 •  - Planning is going on for 26th March club day & April 3rd week Bavarchi Night.

 •  - Forming a new Interact club in Muktangan English Medium school.

 •  - Science exhibition will be held @ Madhyamik School.

 • - Modalities are being worked out for the Graphic design course for Apte Mukhabhadhir school students.

 •  - For the CSR project MOU is signed & all paperwork is completed. Till receipt of Vikrant’s donation, the project cannot proceed further. Therefore, Board-approved  Rs. 31000 from the club trust.

 •  - On 13th March @ 10 AM in the office of Bharat Vikas Sanstha near Padhalkar palace, 17 Jaipur foot will be given to beneficiaries.

मार्च महिन्यातील प्रकल्प​

1. मार्च महिन्याचा धान्यपुरवठा एकलव्य न्यायासाठी
2. धान्यपुरवठा सार्थक सेवा संघ साठी 
3. मुक्तांगण इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये इंटरॅक्ट क्लब चालू करायचे ठरले
4. मार्च महिन्यात क्लब डे करायचं ठरले आहे
5. 'वूमन्स डे' चे औचित्य साधून पूनावाला फाउंडेशनने मदत केलेल्या पुढील तीन मुलींचा सत्कार करणार आहोत

प्रियांका खोपकर काळे - एड्स संस्थेत कार्यरत 
प्राची दिवेकर - आय टी मॅनेजमेन्ट ट्रेनर       
अनिता गोसावी - रुग्णवाहिका चालिका  

न्स् पिकनिक

चार फेब्रुवारी रोजी न्सची पिकनिक  अंजली गाडगीळच्या आनंदवन फार्महाऊसवर आयोजित केली होती. सकाळी ठरल्या प्रमाणे साडेआठ वाजता सगळ्याजणी खडकवासला जवळ पोचलो. नंतर तिथून सरळ अंजलीच्या फार्म हाऊस कडे सगळे निघालो. प्रथम कॅन्टीन मध्ये जाऊन सकाळचा साबुदाणा वडा आणि चहाचा आस्वाद सगळ्यांनी घेतला, नंतर जवळपास असलेले स्विमिंग पूल, फुलं, तिकडचं आजुबाजूचं सौंदर्य बघत बरेच जणींनी फोटो काढले. तिथे काही जणींनी झोपाळ्यावर, घसरगुंडीवर खेळून मजा लुटली. जवळजवळ दोन वर्षानंतर हा अनुभव सगळ्यांना घेता आला. कोविडमुळे घरात बसून कंटाळा आला होता. आजूबाजूच्या जागेत फिरून आम्ही सगळ्या जणी अंजलीच्या फार्महाऊसवर आलो. अतिशय सुंदर फार्महाउस. अंजलीने  वेगळे प्रकारच्या भाज्या, फळे, फुले यांची लागवड केली आहे. बंगल्याचे नाव 'बहर' ठेवले आहे, त्याप्रमाणेच सगळ्या फुलापानांचा बहर दिसत होता. पूर्ण बंगल्याची सहल घडल्यानंतर हळदीकुंकू समारंभ पार पडला. त्याच दिवशी शोभाताईंचा वाढदिवस होता. न अंजली गोडबोलेनी अतिशय छान व्यवस्था केली होती. 'बर्थडेगर्ल'साठी केक आणला होता. काहीजणींनी शोभाताई यांचे औक्षण केले व केक कापला गेला. नंतर शोभाताईंनी सगळ्यांना हळदी कुंकू दिले. सगळ्याजणीनी अंजलीच्या लॉनवर बसून खूप गप्पा मारल्या. अनेक दिवसांनी सगळे एकत्र भेटल्याचा आनंद पुरेपूर होता. दीड वाजायच्या सुमारास  कॅन्टीन मध्ये जेवणाची सोय केली होती. अंजली गाडगीळने अतिशय कष्ट घेऊन स्वतःच्या घरी उंधियु आणि गुलाबजाम केले होते. सुग्रास जेवणाचा आस्वाद घेऊन साधारण चारच्या सुमारास सगळ्याजणी निघाल्या. अशी ही अविस्मरणीय सहल घडली.

न गिरीजा यार्दी

WhatsApp Image 2022-02-25 at 7.07.34 PM
WhatsApp Image 2022-02-25 at 7.07.34 PM

press to zoom
WhatsApp Image 2022-02-25 at 7.07.34 PM (3)
WhatsApp Image 2022-02-25 at 7.07.34 PM (3)

press to zoom
WhatsApp Image 2022-02-25 at 7.07.35 PM (2)
WhatsApp Image 2022-02-25 at 7.07.35 PM (2)

press to zoom
WhatsApp Image 2022-02-25 at 7.07.34 PM
WhatsApp Image 2022-02-25 at 7.07.34 PM

press to zoom
1/33

साप्ताहिकी

7th March - Program for women’s day - 1. Anita Gosavi - woman ambulance driver  2. Dr. Priyanka khopkar-kale - post-doctoral fellow at NARI. 3. Prachi Divekar - IT management trainer

14th March - पांडुरंग मुखडे (Tabla Player) भरत नाट्य मंदिर Vocational Excellence

मार्च सपोर्ट ग्रूप

 

Leader- Mrinal Nerlekar
Spouse Ashish Nerlekar
Rtn. Gurunath Palekar
Ann Rohini Palekar
Rtn. Deepak Shikarpur
Rtn.Gauri Shikarpur
Rtn. Shriprakash Joshi
Ann. Shripriya Joshi
Rtn. Uday Chipalkatty 

मार्च

औक्षवंत व्हा, सुखी व्हा !

१ मार्च - स्वाती जोशी
२ मार्च - असलेश करंदीकर
६ मार्च - सविता मराठे
१२ मार्च - अंजलीताई अभ्यंकर
२५ मार्च - भारती डोळे

रेशीमगाठी वर्धापनाच्या हार्दिक शुभेच्छा !

 

५ मार्च - स्वाती आणि रवी जोशी
६ मार्च - वृंदा आणि किरण वाळिंबे
८ मार्च - सरिता आणि श्रीकांत भावे
१२ मार्च - शोभाताई आणि सूर्यप्रकासा राव
१७ मार्च - मीना आणि अनिरुद्ध इनामदार

बर्थडे फेलोशिप लीडर - मार्च / एप्रिल
  ऍन. रोहिणी पालेकर

डिस्ट्रिक्टच्या घडामोडी

1. Felicitation of rotarians who have been in rotary since 25 years

WhatsApp Image 2022-02-27 at 6.54.53 PM.jpeg

2. District youth committee organised a guidance lecture by SSC practitioners to SSC students

3. AGAC TRAINING and Director training for RY 22-23 was attended by me, PP Sharad and PP Gauri. PDG Deepak and PP Vrinda were resource  persons.

- Rtn. Shobha Rao

WhatsApp Image 2022-02-21 at 4.25.52 PM (1)
WhatsApp Image 2022-02-21 at 4.25.52 PM (1)

press to zoom
WhatsApp Image 2022-02-21 at 4.25.52 PM
WhatsApp Image 2022-02-21 at 4.25.52 PM

press to zoom
WhatsApp Image 2022-02-21 at 4.25.53 PM
WhatsApp Image 2022-02-21 at 4.25.53 PM

press to zoom
WhatsApp Image 2022-02-21 at 4.25.52 PM (1)
WhatsApp Image 2022-02-21 at 4.25.52 PM (1)

press to zoom
1/3

एकलव्य न्यास

 

This 11000 sft hostel and recreation center is build at kudal for the students of Ekalavya Nyasa charitable Trust . This is aLand Mark project of RCPLR 

WhatsApp Image 2022-02-21 at 9.58.36 AM (2)
WhatsApp Image 2022-02-21 at 9.58.36 AM (2)

press to zoom
WhatsApp Image 2022-02-21 at 9.58.36 AM (1)
WhatsApp Image 2022-02-21 at 9.58.36 AM (1)

press to zoom
WhatsApp Image 2022-02-21 at 9.58.36 AM
WhatsApp Image 2022-02-21 at 9.58.36 AM

press to zoom
WhatsApp Image 2022-02-21 at 9.58.36 AM (2)
WhatsApp Image 2022-02-21 at 9.58.36 AM (2)

press to zoom
1/4

Rotary Information

March is Water and Sanitation Month

Providing clean water is one of Rotary’s six areas of focus and so the theme of the month of March is Water and Sanitation.

Rotary supports local solutions to bring clean water, sanitation and hygiene to more people every day. We don’t just build wells and walk away. We share our expertise with community leaders and educators to make sure our projects succeed long term.

Clean water is a basic human right that many are often denied. There are over 200 crores people in the world that lack access to improved sanitation and 75 Lakhs people don’t have clean drinking water. Nearly 1400 children die each day from diseases caused by lack of sanitation and unsafe water. When people have access to clean water, they live healthier and more productive lives.

During March, Rotary Water and Sanitation Month, Rotarians are celebrating our commitment to creating healthier communities by supplying clean water and sanitation facilities to prevent the spread of infectious diseases.

Rotary International is focussing its efforts on six areas to enhance our local and global impact, Rotary’s most successful and sustainable projects and activities tend to fall with the following areas.

·       Promoting peace
·       Fighting disease
·       Providing clean water
·       Savings mothers and children
·       Supporting education

Rtn. Yashwant Gokhale

Rotary International

Rotary hires Chief Investment Officer.

Please click the following link to read the article:

DEI (Diversity Equity Inclusion) new Policy of Rotary international

At Rotary, we're expected to treating everyone with dignity and respect, allowing everyone's voice to be heard, and providing equitable opportunities for fellowship, service, and leadership.

Our members want and expect Rotary to be a diverse, equitable, and inclusive organization. We're committed to creating supportive environments that foster open communication and shared learning. And although the Rotary experience may differ from country to country, the dynamics, histories, and structures that create inequality and bias can be found all over the world. Issues of diversity, equity, and inclusion are globally relevant.

The Rotary International Board of Directors and The Rotary Foundation Board of Trustees embrace the principles of diversity, equity, and inclusion, and Rotary is taking action to follow these principles in everything we do. We recognize that being a diverse, equitable, and inclusive organization will enhance the experience that members have in Rotary, allow us to carry out more meaningful and effective service efforts, and create open, welcoming environments that appeal to people who want to connect with us.

The Rotary International Board convened the Diversity, Equity, and Inclusion Task Force to assess the state of DEI within Rotary and develop a comprehensive plan to establish these values even more firmly in our culture. To develop the plan, the task force used the responses from 31,000 members around the world who reported their experiences with DEI in Rotary through our first diversity, equity, and inclusion survey.

Rotary's commitment statement

In 2021, the Rotary International Board, with guidance from the DEI Task Force, strengthened our commitment statement on diversity, equity, and inclusion, which had been adopted in 2019.

DEI code of conduct

Rotary International's Board approved a new DEI code of conduct that reflects our core values. It provides a supportive framework for how Rotary members can create and maintain an environment that is collaborative, positive, and healthy for everyone.

The DEI code of conduct asks Rotary members to:

·         Use respectful language

·         Be supportive

·         Foster a welcoming and inclusive environment

·         Celebrate diversity

Although free expression is important, what we say and how we behave matter. Rotary does not tolerate speech or behaviour that promotes bias, discrimination, prejudice, or hatred because of age, ethnicity, race, colour, disabilities, religion, socioeconomic status, culture, sex, sexual orientation, or gender identity.

All Rotary leaders, from club presidents and district governors to directors and trustees, are expected to apply the DEI code of conduct uniformly by taking responsibility for how their words and actions may affect others.

Support DEI in your club and community

·         Expand your knowledge and increase your ability to facilitate positive discussions about DEI issues with courses available in the Learning Center:

·         DEI Basics

·         DEI Intermediate

·         DEI Webinar Series

·         Talk about the benefits of a diverse and inclusive club with your fellow club members and use the Diversifying Your Club assessment to create a member diversity and inclusion plan.

·         Join a Rotary discussion group about a DEI-related topic:

·         LGBT Diversity and Inclusion Affinity Rotary Group

·         Gender Equity in Rotary 

·         DEI — Diversity, Equity, and Inclusion 

·         Celebrating Indigenous and Various Cultures, Peoples, and Places 

·         Rotarians Against Racism 

·         Agrupación Feminista de Rotary (Spanish)

You can take action to promote diversity, equity, and inclusion in your club:

·         Invite local diversity, equity, and inclusion experts to speak to your club.

Connect with organizations that support DEI efforts, and work with them on projects or events.

·         Seek out new voices when you're making appointments and encourage people who have been underrepresented in these roles to take on leadership positions.

·         Hold conversations about diversity, equity, and inclusion. Acknowledge that this can be uncomfortable and very personal. Establish the expectation that these conversations will allow everyone opportunities to learn and to be heard and will remain respectful.

·         Create a club DEI committee that reflects the demographics of your community and works with residents to identify collaborative learning, sharing, and service opportunities.

 

 PDG Dr Deepak Shikarpur

w0262_1s_Watercolor-Floral-Pattern-Wallpaper-for-Walls-Pastel-Flowers_Repeating-Pattern-Sa
Lalit Vibhag.png
Sathe Deepashre.jpg

होममेकर्स आणि बरंच काही​

संतुलित  वृत्तीची  दीपश्री 

कोणत्याही अनोळखी व्यक्तीचा परिचय ऐकताना जर  'तो/ती  बारा गावचं पाणी प्यायलेला / प्यायलेली आहे  ' असं वाक्य कानावर पडलं तर काय होतं ? 

 

आपल्या मनात त्या व्यक्तीची एक धूर्त कावेबाज व्यक्ती अशीच प्रतिमा निर्माण होते नाही का ? कारण आपल्याकडे हा अलिखित नियमच आहे जणू की बारा गावचं पाणी प्यायलेली व्यक्ती म्हणजे अशीच  असणार  !  

 

पण या अलिखित असलेल्या नियमाला सुद्धा अपवाद असणारच ना ! शिवाय हातात आलेल्या  बारा गावांच्या पाण्याचा उपयोग कसा करायचा हे सुद्धा त्या संबंधित व्यक्तीच्या बुद्धी आणि वृत्ती वरच अवलंबून !  

तर अशीच बारा गावचं पाणी प्यायलेली पण त्या पाण्याचा उपयोग आपलं व्यक्तिमत्व सदैव संतुलित आणि चौफेर विकसित करण्यासाठी केलेली एक व्यक्ती आपल्यात आहे ,ती म्हणजे   दीपा ----डॉक्टर दीपश्री  साठे.  

वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने बारावीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंतच दीपा सातारा, पुणे, इचलकरंजी, धुळे, जळगाव, सांगली आणि बारावीनंतर मुंबई एवढ्या गावांना राहिली. साहजिकच  दर वर्ष-दोन वर्षांनी नवीन गाव नवी शाळा नवा शेजार नव्या मित्र-मैत्रिणी म्हणजे एकूणच सगळं नवीन वातावरण याला दीपाला सामोरं जावं लागलं. प्रत्येक नवीन ठिकाणी गेल्यावर पहिले काही दिवस बुजण्यात मग काही दिवस नवीन ओळखी करून घेण्यात मग ओळख झालेली माणसं जाणून घेण्यात मग त्यातून मित्र-मैत्रिणींची निवड करण्यात मग मैत्री वाढवण्यात मग तिथल्या एकूणच नवीन वातावरणात जुळवून घेण्यात मग तिथे असलेल्या सर्व सोयीसुविधा आणि असुविधा व गैरसोयी स्वीकारण्यात दीपाचे दिवस व्यतीत होत. हे सगळं पार पडल्यावर शाळेत ती नेहमीच पहिला नंबर पटकावत असे त्यामुळे 'ही बाहेरून नवीन आलेली मुलगी !  पहिली येते ?' या  धक्क्याने  बदलणाऱ्या वातावरणाला दीपाला सामोरे जावे लागे !  


पण जात्याच बुद्धिमान आणि त्या त्या वयाला योग्य तेवढी मॅच्युरिटी असलेली दीपा या प्रत्येक वेळी बदलणाऱ्या परिस्थितीमुळे कधीच बावचळली नाही, विचलित झाली नाही ! उलट यामुळे माणसं ओळखायचं आणि त्यांच्याशी जुळवून घ्यायचं कसब आपसूकच वाढीला लागलं तसच नवी परिस्थिती नवीन वातावरण नवी माणसं या सार्‍यात सहजतेनं मिसळून जाण्याचं  कौशल्य आत्मसात झालं . या साऱ्यांचा फायदा डेंटिस्ट होण्यासाठी दीपा मुंबईला गेली तेव्हा तिला खूप झाला असं तिला वाटतं. ती म्हणाली, "मी राहिले त्या सर्व गावांपेक्षा अर्थातच मुंबईचं वातावरण खूपच वेगळं होतं.  ति़थलं कॉस्मॉपॉलिटन वातावरण, तिथली गर्दी, होस्टेलवर राहिल्याने तिथे मिळणारे स्वातंत्र्य, मेडिकलची नवी टरमिनोलॉजी, इंग्रजी बोलण्याची येणारी वेळ, काही फार मॉडर्न तर काही अगदी काकूबाई असलेल्या मुली, आपले पैसे आपला खर्च आपला अभ्यास सगळं आपणच मॅनेज करण्याची जबाबदारी, असं सगळंच वेगळं आयुष्य होतं. पण या सर्व बदलांचा मला खूप फायदा झाला असं निश्चित वाटतं."

 

दीपश्री पूर्वाश्रमीची दीपश्री भट. तिचे वडील टेक्स्टाईल इंजिनिअर होते. खूप हुशार आणि शिस्तप्रिय. ते मूळचे  कुरूंदवाडचे आणि तिची आई सांगलीची. दोघांच्याही घरात सर्व जण उच्चशिक्षित. यामुळे दीपाच्या आई-वडिलांचं नेहमीच शिक्षणाला प्राधान्य राहिलं. दीपाला दोन मोठे भाऊ आहेत. या तिघांनीही शिष्यवृत्त्या मिळवणं त्यांचे वर्गात पहिला नंबर असणं विविध स्पर्धात तयांनी बक्षीसं मिळवणं हे सारं त्यांच्या घरात अपेक्षित आणि नित्याचं होतं. दीपाने डॉक्टर व्हावं अशी तिची आणि घरच्या साऱ्यांचीच इच्छा होती. पण तिची एमबीबीएसची ऍडमिशन केवळ तीन मार्कांनी हुकली तेव्हा तिला अतीव दुःख झालं पण काही झालं तरी डोनेशन देऊन ॲडमिशन घ्यायची नाही हे तिचं ठरलेलं होतं. त्यामुळे तिने डेंटिस्ट व्हायचं ठरवलं आणि ती मुंबईला गेली. तेव्हाही आईवडिलांनी तिला पूर्ण पाठिंबा दिला. मुंबईत हॉस्टेलवरच्या वास्तव्याने दीपाचा आत्मविश्वास वाढला आणि  स्वावलंबी जीवन जगण्याचा अनुभव तिला मिळाला. तिथे तिला मैत्रिणी छान मिळाल्या. त्यांच्या साथीने तिला त्यावेळी मुंबईत मनसोक्त भटकंतीची संधी मिळाली.

डेन्टल कॉलेजच्या होस्टेलवर असतानाच दीपाची तिच्या भावामुळे विनयची  भेट झाली. तसा तो तिच्या भावाचा जळगावातल्या शाळेत असतानाचा मित्र. त्यामुळे तो माहिती होता पण शाळेनंतर खूप वर्षांनी नोकरीच्या निमित्ताने विनय आणि दीपाचा भाऊ दोघेही मुंबईत आले तेव्हा पुन्हा त्यांची भेट झाली. त्या वेळी दीपा हॉस्टेलवर राहत होती. सुट्टीला भावाकडे डोंबिवलीला गेली की विनयची तिची भेट होई. या भेटीदरम्यान त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला आणि दीपाचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी लग्न केलं. लग्नानंतर दीपा पुण्यात आली. ती म्हणाली "विनयचे वडील गेल्यावर ते जळगाव सोडून पुण्यास स्थायिक झाले होते. विनय शिक्षण झाल्यावर नोकरीच्या निमित्ताने मुंबईला गेला त्यानंतर वर्ष-दीड वर्ष अल्जीरियाला गेला पण त्याची आई व भाऊ पुण्यातच होते म्हणून विनयने पुण्यातच परत यायचं ठरवलं. मग इथेच तो नोकरी करू लागला. 


दीपाने शिक्षण घेतानाच स्वतःचा दवाखाना काढायचा हा निर्णय पक्का केला होता. एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये लग्नानंतर ती पुण्यात आली तेव्हा वर्षभर तिने दुसऱ्या दवाखान्यात काम केलं. नंतर राधिकाचा जन्म झाला. त्यानंतर  ती संजीवन हॉस्पिटलमध्ये अर्धवेळ काम करू लागली पण स्वतःचा दवाखाना काढायचा विचार तिच्या मनात पक्का होता आणि तेही कोणाची मदत न घेता ! त्यामुळे आवश्यक तेवढे कर्ज घेऊन तिने १९८९मध्ये दवाखाना सुरू केला. पण हॉस्पिटलमध्ये मिळणारा अनुभव जसा मोठा होता तसंच तिथे डॉक्टरांचा उत्तम ग्रुप झाल्याने खूप काही कामं हातून घडत गेली. तिथे खूप मेहनत घेऊन त्यांनी तिथे दंत-विभाग नव्याने विकसित केला. तिथे दीपाने २०१० पर्यंत  म्हणजे बावीस वर्ष काम केलं.  दरम्यान संजीवन मधले डॉक्टर धनंजय केळकर मंगेशकर हॉस्पिटल मध्ये गेले. पुढे दीपाही  तिथे आली.  दीनानाथ मधल्या डॉक्टरांच्या ग्रुप तर्फे त्यांनी सिंबायोसिस मध्ये हेल्थ सेंटर सुरू केलं. तिथे दीपाने   २०१५ पर्यंत काम केलं. 

इतकी वर्ष स्वतःचा दवाखाना आणि हॉस्पिटलचा काम दोन्ही सातत्याने करायला मिळालं. यामागे  दीपाची चिकाटी आणि जिद्द जशी कारणीभूत होती तसंच तिच्या सासूबाईंचा पाठिंबा कारणीभूत असल्याचं दीपा सांगते. ती म्हणाली, "माझे सासरे डॉक्टर होते तसेच सासुबाईंचे वडील डॉक्टर होते. त्या मुळे या पेशाची सासूबाईंना सवय आणि जाण होती. त्यांनी कायमच मला दवाखान्याच्या कामासाठी पाठींबा दिला एवढंच नव्हे तर घरच्या पारंपारिक सण समारंभाला उपस्थित राहण्यासाठी दवाखान्याचे काम बंद ठेव असं कधीच सांगितलं नाही. याशिवाय राधिकाच्या संगोपनात त्यांनी नेहमीच हातभार लावला. त्यामुळे मी माझ्या दवाखान्यात आणि हॉस्पिटल मधल्या कामातही नेहमीच निर्धास्तपणे काम करू शकले "असं दीपा सांगते.

 

बारा गावचं पाणी  प्यायलेली  दीपा  कोणाशीही उत्तम संवाद साधू शकते याचा फायदा तिला दवाखाना चालवताना झाला. ती म्हणाली "वैद्यकीय व्यवसायात डॉक्टर पेशंट नात्याला फार महत्त्व आहे .त्यामध्ये जेवढा विश्वास जास्त असेल तेवढं काम उत्तम होतं. असा विश्वास अशी जवळीक निर्माण होण्यासाठी अनौपचारिक  संभाषण उपयुक्त ठरतं आणि असं संभाषण करण्याचा माझा स्वभावच आहे. त्यामुळे माझ्या पेशंट बरोबर माझे घरगुती नातं प्रस्थापित होत असे, मला त्यांच्या खूप गोष्टी माहिती असत आणि याचं माझ्या सासूबाईंना खूप अप्रूप वाटे."

दीपाच्या सासुबाईंनी जसं तिला नेहमीच सहाय्य केलं तसंच दीपाने ही त्यांची उत्तम सेवा केल्याचं आपल्या सर्वांनाच माहिती आहे. सासुबाईंचीच नव्हे तर आई-वडिलांचीही दीपाने किती सेवा केली ते आपण पाहिलं आहे. गेली पाच वर्ष तर या तिघांची नव्हे तर विनायचही आजारपण सांभाळताना दीपाची जणू तारेवरची कसरतच चालली होती. पण कायमच बॅलन्स्ड -- संतुलित --राहणाऱ्या दीपाने ही पाच वर्ष ही तेवढ्याच धीरोदात्तपणे व्यतीत केली. तिच्या स्वभावातला हा धीर किंवा  मनाचं  संतुलन कायम राखण्याचा कटाक्ष तिच्या शालेय जीवनातच विकसित झाला. वर सांगितल्याप्रमाणे विद्यार्थीदशेतच सातत्याने बदलांना सामोरं जाताना तिचा  हा स्वभावच बनला एवढेच नव्हे तर ज्या गावात जे मिळालं त्याचा मी उपयोग करून घेतला असंही ती सांगते .इचलकरंजीला बॅडमिंटनची सोय होती तेथे मी ते शिकून खेळून घेतलं. धुळ्याला टेबल टेनिस मिळालं  तिथे मी ते शिकून खेळून घेतलं असं दीपा सांगते . 

दीपाची आई स्वतः शिवणकाम, भरतकाम, विणकाम यामध्ये अत्यंत तरबेज होती. तसंच तिच्या मुलांनी सर्व प्रकारच्या अभ्यासाच्या खेळांच्या आणि वक्तृत्व व इतरही सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेतलाच पाहिजे असा तिचा कटाक्ष असे. त्यासाठी मुलांना हवी ती मदत करत असे आणि त्यांची तयारीही करून घेत असे . ती  ब्रिज उत्तम खेळत असे. त्यामुळे पुण्यात स्थायिक झाल्यावर ती लक्ष्मी क्रीडा मंदिरात खेळायला जात असे ,असं  दीपाने  सांगितलं .

ती  म्हणाली,  "आईला दम्याचा त्रास होता त्यामुळे ती माझ्या भावाकडे मुंबईला राहू शकत नसे  शिवाय मी डॉक्टर असल्याने  तिला माझा आधार वाटे. त्यामुळे आई-वडील दोघेही माझ्याकडे आले. विनयने त्या दोघांचेही इतके केले की ते  नि:संकोच माझ्याकडेही राहू शकले. तसंच मलाही सर्वांचं करणे जमू शकलं अन्यथा घरात तीन वृद्धांचा करणं सोपं नाही ." 

या काळात   दीपा   विनय  दोघेही रोटरीच्या विविध उपक्रमात जमेल तेवढं सहभागी होत असत. 


त्या दोघांचे नाटकात काम करणं नृत्यात सहभागी होणं सर्वांच्यात मिसळणं आपल्या सर्वांच्याच मनात ठसलेला आहे. दीपाच्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग तर आपल्या क्लबला नेहमीच आपल्या वैद्यकीय उपक्रमांसाठी झाला आहे. दर वर्शी क्लबचे वैद्यकीय उपक्रम असतात त्या त दीपा असणारच हे ठरलेलंच आहे. दीपा म्हणाली "रोटरी म्धे आम्हाला खूप मित्र-मैत्रिणी मिळाले तसेच सोशल वर्क करणं शक्य झालं, ते सारं पुढे चालू ठेवावं असं मला वाटतं. "या शिवाय तिला प्रवासाची खूप आवड आहे भरत कामाची आवड आहे . दवाखान्याच्या कामाबरोबरच या सर्व गोष्टी आणि सोशल वर्कही कराव असा तिचा मानस आहे. राधिका  आता  आयर्लंडला आहे. तिच्याकडे दीपाला जायचं आहे. आता तिच्या मनातले सर्व बेत छान पद्धतीने तडीस जावोत  हीच आपल्या सर्वांतर्फे मी ईश्वरचरणी प्रार्थना करते .

 

न. सरिता भावे

कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी

ह्या भागात शिल्पाने सेंद्रिय(ऑरगॅनिक) एन्झाइम्स बनवण्याची प्रक्रिया दाखवली आहे

हस्त सामुद्रिक शास्त्र

धनरेषा भाग्यरेषा

या रेषेच्या नावातच सर्व आले. प्रत्येकाला भाग्य, धन रेषेत विशेष रस असतो. शेवटी बऱ्याच गोष्टींची गाठ ही पैशाशीच असते.


बऱ्याचदा असा समज असतो की जेवढी ही रेषा लांब असेल तेवढे धन जास्त. पण हा समज चुकीचा आहे. या रेषेचा रंग व त्यावरील इतर चिन्हे अडथळे यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. धनरेषा हाताच्या पंजाच्या खालून सुरू होऊन शनीच्या म्हणजे मधल्या बोटाकडे जाते.


धनरेषेची सुरुवात आयुष्य रेषेपासून सुरू होत असेल तर स्वकर्तृत्वावर ती व्यक्ती धनसंचय करते. ही रेषा मनगटापासून सुरू होत असेल व सरळ शनि बोटाकडे जात असेल तर ती व्यक्ती यशस्वी होते. चंद्राच्या उंचवट्यावरुन सुरू होणारी रेषा असणारे लोक लोकांच्या सेवा करण्यासाठी कामे करण्यात प्रवीण असतात. व्यवसाय दर्शविते. धन रेषेला चंद्र उंचवट्यावरुन येणारी रेषा मिळत असेल तर व्यक्तीचा विवाह श्रीमंत कुटुंबात होतो व लग्नानंतर भाग्योदय होतो.


हाताच्या मध्यभागातून सुरुवात होत असेल तर धन प्राप्ति होण्यास विलंब होतो. सुरुवातीचे आयुष्य शिक्षणात किंवा इतर गोष्टीत जाते व ज्यावेळेला धन रेषा सुरू होते तेव्हापासून आर्थिक प्राप्ती सुरू होते.
 

धनरेषा जर नेपच्यून उंचवटा म्हणजे मनगटाच्या उंचवट्या पासून सुरू होत असेल तर अध्यात्मिक प्रगती दर्शविते. शुक्र उंचवट्यावरुन म्हणजे आयुष्य रेषेच्या आतल्या बाजूने सुरू होत असेल तर कौटुंबिक आकर्षण दर्शविते. कलेची आवड असते. अनेक प्रेम प्रकरणे दर्शवितात. या रेषेवरून बुद्धिमत्ता, मॅनेजमेंट स्किल, आयुष्यातील सुखदुःखाचे योग, प्रगती, तुरुंगवास इत्यादी गोष्टींचे आकलन होते.
 

भाग्य रेषेच्या सुरुवातीस द्विविभाजन असेल तर अशी व्यक्ती दत्तक गेलेली असते. सुरवातीस दोन फाटे असतील तर अशा व्यक्तींवर परलिंगी व्यक्तीचा प्रभाव जास्त असतो. सुरुवातीस नक्षत्र चिन्ह असेल तर आई-वडिलांना त्रास व आर्थिक नुकसान दर्शविते. यव चिन्हा पासून सुरुवात असेल तर जन्माबद्दल गूढ दर्शविते.

भाग्यरेषा आयुष्य रेषेला सुरुवातीला चिकटून व पुढे दूर जात असेल तर अशी व्यक्ती कौटुंबिक जबाबदाऱ्या सोडून देते.
 

भाग्य रेषेचा शेवट गुरु उंचवट्याकडे जात असेल तर उत्तम गृहसौख्य लाभते. या रेषेचा शेवट जर रवी उंचवट्याकडे असेल तर कलेत प्रगती दर्शवते. बुध उंचवटाकडे शेवट होत असेल तर आर्थिक प्रगती दर्शविते. भाग्य रेषेचा शेवट जर मस्तक रेषेवर होत असेल तर चुकीच्या निर्णयामुळे कर्तृत्वाचे नुकसान होते.

नेहमीप्रमाणे भाग्य रेषेत कुठलेही दोष नसावेत म्हणजे नागमोडी रेषा ,साखळी रेषा ,आडव्या रेषा, ठिपके व चिन्ह, खाली जाणाऱ्या रेषा नसाव्यात.
 

पुढील लेखात रवि व बुध आरोग्य रेषेचा विचार करूया.

पी पी अशोक गाडगीळ

अध्यात्म जिज्ञासा

पूजा विधान भाग - २

रो. चंद्रशेखर यार्दी

आरोग्यवर्धिनी

पोटॅशियम (k) – पोटॅशियम हा आणखी एक महत्त्वाचा क्षार असून तो कितीतरी महत्वाच्या क्रियांमध्ये गरजेचा असतो. प्रौढव्यक्तिंच्या शरीरात ह्याचा साठा 140 ग्रॅम इतका असतो व तो मुख्यत: म्हणजे सुमारे 70 टक्के इतका द्रवांमध्ये (blood, water) असतो तर 30 टक्के इतका हाडांमध्ये असतो. तो मज्जातंतू मध्ये पण असल्याने मेंदूच्या सक्षम कार्यासाठी गरजेचा आहे. हा इलेक्ट्रिकली चार्जड असल्याने पेशींच्या एकमेकांतील संदेश वाहनासाठी महत्त्वाचा असतो. ह्याचे काम सोडियम ह्या दुसर्‍या महत्त्वाच्या क्षाराशी निगडीत असल्याने सोडियम – पोटॅशियम पंप असे त्याच्या कार्याला संबोधले जाते. सोडियम हा पेशीच्या बाहेरील द्रव्यात असतो तर पोटॅशियम हा पेशीच्या आतील द्रव्यात असतो त्यामुळे त्यांच्या क्रिया एकमेकांच्या विरुद्ध असून ते पेशींचे संतुलन सांभाळण्याचे काम करतात.

सोडियम व पोटॅशियम मध्ये जणू सिसाॅ चाललेला असतो असे म्हटले तरी चालेल. यांच्यामधील संतुलनची गरज अनेक महत्त्वाच्या क्रियांमध्ये आहे.जसे हृदयाच्या ठोक्यांचे नियंत्रण, मेंदूचे कार्य, रक्तदाब व श्वसन कार्य अशा कार्यावर ताबा ठेवण्यात या इलेक्ट्रोलाईट चा महत्त्वाचा भाग असतो.
 

 तसेच शरीरातील आम्लीक आणि अल्कलीक संतुलन राखण्याचे पण काम हा क्षार करत असतो.

ह्या क्षाराचे शोषण देखील लहान आतड्याच्या सुरवातीच्या भागात होते आणि ज्यादा क्षार लघवी वाटे बाहेर टाकला जातो. पोटॅशियम क्लोराईड ह्या रूपातल्या क्षारांचे सर्वात चांगले शोषण होते. म्हणजे किडनी ही अनेक क्षारांच्या बाबतीत उत्सर्जनाचे संतुलन करत असते. रोज सरासरी 195 mg इतका क्षार हा बाहेर टाकला जातो आणि हे भरून काढण्यासाठी कमीत कमी 800 mg इतके पोटॅशियम रोज सेवन केलेच पाहिजे. ह्या क्षरासाठी रोजसाठी सुचवलेली दैनंदिन गरज खरे म्हणजे 2.6 ग्रॅम महिलांसाठी व 3.5 ग्रॅम पुरुषांसाठी इतकी आहे. आपल्या शरीराला सोडियम पेक्षा पोटॅशियमची गरज जास्त आहे परंतु प्रत्यक्षात मात्र परिस्थिती उलटीच असते. अनेक अभ्यासांमधून हे दाखवले गेले आहे की पोटॅशियमची कमतरता ही उच्च रक्तदाबाशी निगडीत आहे. अमेरिकेतील आहारांमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असून तीन मधील एका व्यक्तीला उच्च रक्तदाब हा ह्यामुळे आहे असे संशोधनातून दिसून आले.

ह्या क्षराच्या अभावाने अर्थातच गंभीर अशा अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. ह्याची कमतरता होण्याची तीन मुख्य कारणे म्हणजे सेवनातील कमतरता अथवा शोषनातील अडथळे किंवा जास्त प्रमाणात उत्सर्जन. विशेषत: जेव्हा शरीरातील द्रव्य जास्त प्रमाणात बाहेर टाकले जाते तेव्हा उदाहरणार्थ, उलट्या व जुलाब होणे किंवा ज्यांना लघवी साफ होण्यासाठी औषधे (diuretics) चालू असतात त्यांना किंवा जास्त घाम येणार्‍या व्यक्तींना ह्या क्षाराची कमतरता होण्याची शक्यता असते. तसेच चहा किंवा कॉफीचे अतिसेवन अथवा तंबाखू वा मद्यपान अशा सवयींमुळे शोषणात अडथळा येऊन कमतरता होऊ शकते.

सोडियम व पोटॅशियमचे संतुलन बिघडणे हे लहान मुलांमधील डायरीयाचे महत्त्वाचे कारण आहे. अशा वेळी आपण शहाळ्याचे पाणी किंवा मोसंबीचा रस देतो. कारण त्यात पोटॅशियम भरपूर असते. आहारात भरपूर पोटॅशियम असण्याचे अनेक फायदे शास्त्रज्ञांनी त्यांच्या अभ्यासातून दाखवले आहेत. नेहमीच्या वापरातील एक किलो मिठात 150 ते 250 ग्रॅम सैंधव मीठ मिसळल्यास त्याचा जरूर फायदा होतो.

रक्तातील ह्याची सर्वसाधारण पातळी 3.6 – 5.2 मिलीमोलस प्रति लिटर एवढी असून हा क्षार खूप नियंत्रित आहे. जेव्हा ही पातळी 7 च्या वर जाते तेव्हा अत्यंत धोकादायक समजली जाते. पोटॅशियमची जास्त पातळी हि हृदयविकारांशी निगडीत असून मृत्युससुद्धा करणीभूत ठरू शकते. म्हणूनच कॅल्शियमसारखा ह्याचे पूरक सेवन (supplements) करू नये. किडणीचे विकार असलेल्यांमध्ये ह्या क्षाराची पातळी वाढण्याचा धोका असतो. अशा लोकांनी पोटॅशियम जास्त असलेल्या पदार्थाचे सेवन करू नये. ह्या क्षारांच्या अभावाने हृदयाचे ठोके जलद होतात, अशक्तपणा व थकवा, स्नायूंमध्ये कळा येऊन दुखणे, बधीरता व श्र्वासोश्र्वासास त्रास होणे अशी लक्षणे दिसून येतात. कोणत्या पदार्थांमधून हा क्षार किती मिळवता येईल हे खालील तक्त्यात दाखवले आहे.

Potassium_Page_3.jpg

धान्ये व डाळी आणि कडधान्ये ह्या मुख्य अन्नांमधून जरी पोटॅशियम जास्त मिळत असले तरी त्याची बायोअॅव्हेबिलीटी कमी असते. शिवाय पोटॅशियमच्या मानाने आपण सोडियमचे सेवन जास्त करत असल्याने आपल्याला पोटॅशियमचे सेवन वाढवण्यासाठी फळांचा उपयोग करायला पाहिजे. नेहमीच्या फळांपैकी म्हणजे केळी , चिकू, लिंबू, पिकलेला टोमॅटो हे जरी पोटॅशियमचे स्रोत असले तरी मोसंबी, शहाळे, अवाकाडो, पीच अशी फळे मुद्दाम खाल्ली पाहिजेत.  

 • गहू, तांदूळ ह्यासारख्या मुख्य अन्ना व्यतिरिक्त नाचणी, राजगीरा, भगर ह्यांचे पुन्हा एकदा महत्व दिसून येते. राजगिर्‍याच्या लाहया दुधातून किंवा लाडू किंवा त्याच्या पिठाच्या भाकर्‍या हे चांगले पर्याय आहेत. नाचणीबद्दल मागे सांगितले आहेच.

 • डाळी आणि कडधान्ये ह्यात पण पोटॅशियम भरपूर आहे परंतु त्याची बायोअॅव्हेबिलीटी वाढवण्यासाठी भिजवून किंवा मोड आणूनखाणे चांगले.

 • गाजर, अळकुडया, बाटाटा (सालासकट), रताळे, मुळा, कार्ले वगैरे भाज्यांना पसंती द्यावी.

 • त्याचप्रमाणे वेगवेगळ्या फळांचे सेवन करूनही ह्या क्षारांचा फायदा मिळवता येईल.

 • मसाल्याच्या पदार्थांत हा क्षार खूप असला तरी स्वयंपाकात ते खूप कमी प्रमाणात वापरले जातात. म्हणून त्यांच्या मिश्रणाचा चाय मसाला करून रोजचे सेवन केल्याने फायद्याचे होईल.

 • तसेच भोपळ्याच्या बिया, चारोळी वगैरे सारखे पदार्थ बडीशेप बरोबर मिसळून मुखवास करता येईल.

आहारातून पोटॅशियम मिळवणे नेहमीच फायद्याचे आहे. कॅल्शियम सारखे त्याचे पूरक सेवन तर अजिबात करू नये. पोट्याशियम च्या अतिसेवनाचे विघातक परिणाम नमूद केलेले आहेत. जेव्हा बौद्धिक काम करून थकवा येतो तेव्हा मेंदूतील पोटॅशियम वापरले जाते. अशावेळी केळे खाऊन पहा. तसेच रक्तदाबाचा त्रास असेल तर सैंधव मिठाचा वापर केल्यास त्यावर ताबा मिळवू शकतो.

रो. शोभा राव

मनाचे श्लोक - ११ वा श्लोक

|| आठवणींच्या सप्तसूरांतुनी ||

आठवणींच्या सप्तसूरांतुनी,
झगमगती काजवे |
कुणी दु:खांची कुणी सुखांची,
बहू दिली आसवे ||१||


जीवनसिंधू महासागरी,
लाट क्षणी तुटती |
अनंत आरव असता उदरी,
पुन: पुन: स्फुरती ||२||

प्रदीप वाघ विरचित

स्थान भूवनेश्वर

खाण्यासाठी जन्म अपुला

अंजलीने मेथी व बाजरीच्या पिठाचे पॅन - केक करून दाखवले आहेत

कौतुक

प्रतिमा आणि प्रदीप दुरूगकर यांचा नातू - कबीर मॅरेथॉन मध्ये ३ कि.मी. पूर्ण केले

WhatsApp Image 2022-02-27 at 2.33.40 PM.jpeg

गिरीजा आणि शेखर यार्दी यांचा नातू - अविराज याने कराटे मध्ये ग्रीन बेल्ट मिळवला

WhatsApp Image 2022-02-27 at 11.58.04 AM.jpeg

मीना आणि शिरीष इनामदार यांचा नातू ध्रुव याने कराटेमध्ये ऑरेंज बेल्ट मिळवला

WhatsApp Image 2022-02-27 at 11.57.35 AM.jpeg

मीना आणि शिरीष इनामदार यांची नातं - इरा हिने लहान मुलांच्या मॅरेथॉन मध्ये १.५ कि.मी. पूर्ण केले

WhatsApp Image 2022-02-27 at 11.57.36 AM.jpeg

सगळ्या बच्चे कंपनीचे खूप खूप कौतुक

कथाकथन

शिरीष व.पु.काळे लिखित "बँक" या विनोदी कथेचं वाचन करीत आहे