top of page

JANUARY 2022 Issue VOCATIONAL SERVICE

साप्ताहिक कार्यक्रम

६ डिसेंबर - एक शाम ग़ज़ल के नाम

६ डिसेंबर, सोमवार. पावसाची कृपा झाली आणि नवाथेंच्या सुबक, हिरवीगार , रोषणाईने सजलेल्या हिरवळीवर RCPS members नी अनुभवली ‘एक शाम ग़ज़ल के नाम’. आणि ग़ज़ल च रूप, स्वरूप, सौंदर्य उलगडून दाखवलं ते प्रतिभावान संगीतकार 'आशिष मुजुमदार' यांनी.

‘आशियाना ग़ज़ल’ करण्याची कल्पना श्रीकांत भावेंची व 'आनंद व जयश्री नवाथे' लगेच तयार झाले त्यांच्या लॉनवर करायला. Past Presidents आणि Secretary या जोड्या म्हणजे PP अविनाश कुलकर्णी - सेक्रेटरी यशवंत गोखले, PP यशवंत गोखले - सेक्रेटरी श्रीकांत भावे, PP श्रीकांत भावे- सेक्रेटरी आनंद नवाथे , PP आनंद नवाथे - सेक्रेटरी रवि जोशी. तर अशा प्रकारे ५ जणांनी म्हणजे अविनाश कुलकर्णी, यशवंतराव, श्रीकांत, आनंद आणि रवी यांनी हा कार्यक्रम ठरवला. ग़ज़लसाठी झक्कास माहौल तयार होता. lighting, screen and stage setup, hot coffee, lovely moon and moonlight आणि गुलाबी थंडी. खूप मेहनत घेतली होती आनंद आणि सर्वांनी. ८० च्या वर सभासदांच्या उपस्थितीत कार्यक्रम सुरू झाला. श्रीकांतने 'आशिष मुजुमदार' यांची ओळख करून दिली.

श्री. आशिष मुजुमदार गेली ३० वर्षांपेक्षा अधिक काळ संगीत क्षेत्रात संगीतकार आहेत व आत्तापर्यंत ६० पेक्षा अधिक albums  T- series , Times music, Sagarika, Fountain अशा कंपन्यांकडून प्रकाशित झाले आहेत. सुरेश वाडकर, देवकी पंडित, आरती अंकलीकर टिकेकर, रघुनंदन पणशीकर, आनंद भाटे, महेश काळे अशा दिग्गज गायकांपासून ते अगदी नव्या दमाचे बेला शेंडे, ह्रषीकेश रानडे अशा गायकांनी त्यांच्याबरोबर काम केले आहे. प्रसिध्द गायक शंकर महादेवन यांचा प्रथम हिंदी उर्दू ग़ज़ल अल्बम त्यांनी केला आहे. तसेच कौशिकी चक्रवर्ती यांनी त्यांचा सुगम संगीताचा भजन अल्बम श्री आशिष मुजुमदार यांच्याच सोबत केला आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेलया ‘भैरव ते भैरवी’ या कार्यक्रमाचे आजपर्यंत देशविदेशात २०० हून अधिक सादरीकरण झाले आहे. सध्या प्रसिध्द कवी वैभव जोशी यांच्याबरोबर ते ‘सोबतीचा करार’ हा प्रसिध्द कार्यक्रम करत आहेत. अनेक पुरस्कारांनीपण त्यांना सन्मानित केले गेले आहे व ‘A Divine Relationship with a Musical Note’ या विषयावर सादर केलेल्या त्यांच्या प्रबंधाला California Public University ची Honorary PhD in Performing Arts ( Music) जाहीर केली आहे. पुण्याच्या VIT Engineering college मधे Mechanical engineering चे ते प्राध्यापक आहेत. 

श्री. आशिष मुजुमदार यांनी ग़ज़ल बद्दलचे समज व गैरसमज सुरवातीला सांगीतले. ग़ज़ल म्हणजे फक्त इश्क, प्रेमभंग, दुःख असेच आपल्याला वाटते कारण तशाच प्रकारची ग़ज़ल आपल्यपर्यंत पोहोचते, कानावर पडते. पण मग ग़ज़ल म्हणजे काय? या साठी माहीती पाहिजे ते grammar of ghazal, गीत आणि ग़ज़ल मधला फरक, काफिया , रदीफ, मतला, मक्ता , ग़ज़ल कशी गातात ( style of singing ghazal) किंवा वाचतात, शब्दांचे उच्चार आणि महत्व, रूपक व त्याचे अर्थ. हे सर्व खूप सुंदर उदाहरण देऊन त्यांनी प्रस्तुत केले. अहमद फराज अहमद, निदा फाजली, मकदूम यांच्या ग़ज़लमधले शेर व त्यांचे रूपकात्मक सौंदर्य, गुलाम अलींची भूपकली रागातील गायकी (and also crossing boundaries of a raag in ghazal singing) व शेवटी भाऊसाहेब पाटणकरांची शायरी अशा सर्वच मंतरलेल्या शब्दांच्या जादूची अनुभूती घेत ‘व्वा’ ‘ क्या बात है’ची दाद देत कार्यक्रम संपला. आनंद नवाथेंनी भाऊसाहेब पाटणकरांच्या शायरीनेच आभार मानले. जयश्री, सविता, प्रतिभा या hostsनी सर्व तयारी केलीच होती व सर्वांनी मस्त जेवणाचा आस्वाद घेतला.

ॲन शिल्पा नाईक

एकांकिका 2021  आणि भरत मधील स्टेकेशन

एप्रिल महिन्याच्या शेवटाकडे मला शिरीषने विचारलं की “मी यावर्षी एकांकिकेचा डिस्ट्रिक्ट convener आहे. तू co-convener म्हणून  काम करशील का?? तुला ह्यातील काही माहिती नाही; पण काहीच अडचण नाही, मी तुला सगळे समजावून सांगेन” असं सांगूनही टाकलं…

 “महत्त्वाचं म्हणजे ज्या आठवड्यात आपल्या एकांकिका 'भरत'मध्ये लागतील तो अख्खा एक आठवडा तिथे हजर असावं लागणार हे सगळ्यात मोठं काम आहे आणि जे काम त्या वेळेला पडेल ते करायचं!!”  - हे मात्र तो म्हणाला. “घरी जरा बोलून,परीक्षा  आणि इतर काय काय आहे बघून मी ठरवते.” असं सांगून मी त्याला बरोबर 'एक मे' ला सांगितलं की मी ह्या  प्रोजेक्टवर काम करायला तयार आहे.

 

मग साधारण ऑगस्टमध्ये  शिरीषने आमची - शोभाताई , डॉ राव, अजय, अंजली अशी मीटिंग घेतली - त्याच्या मनात कामाची काय काय आखणी आणि विभागणी आहे हे सांगायला !!  त्यात आपले , इतर क्लबना एकांकिकेचे  ऑडिओ-visual आमंत्रण गेले पाहिजे हे सर्वानुमते ठरले. अक्षरशः २ तासात त्याचे स्क्रिप्ट अश्विनीने लिहून दिले आणि कसे बोलले पहिजे, हातवारे कसे पाहिजे अशी प्रॅक्टिस घेऊन ते आमंत्रणाचे  आमच्या घरी शूट झाले  देखील !!

 

बरोबर १४  सप्टेंबरला मला  शिरीषकडून एक WA मेसेज आला - त्याच्याच भाषेत सांगायचं तर "त्याच्या घरगुती एक्सेल file"चा फोटो !! त्यात क्लबचे नाव, अध्यक्षाचे  नाव, नंबर असे होते ... आणि त्या दिवसापासून एकांकिकेच्या कामाने खरी उचल खाल्ली !! गम्मत म्हणजे त्याच सुमारास  आमच्या भाचीचे लग्न जे २०२२ ला ठरले होते ते  व्हिसाच्या काही बंधनांमुळे २०२१  डिसेंबर शेवटाकडे करायचे ठरले!!

 

शिरीषने - भरतच्या लोकांना कॉन्टॅक्ट करणे ,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे काय प्रोटोकॉल्स आहेत, पालिकेकडून काय नियम आहेत, सभागृह  ५०% मिळणार का , स्लॉट्स कुठले घ्यावे म्हणजे शक्यतो शेवटच्या क्षणी बदल होणार नाहीत, भरतकडे फोन करणे, मॅनेजर साहेबाना फोनवर गाठणे,  खेपा घालणे ... ही कामे घेतली  !! मला त्याने असे काम दिले कि मी इतर कामे सांभाळून करू शकेन. त्यात साधारणपणे अशा क्लब्सना कॉन्टॅक्ट करणे की ज्यांनी पूर्वी एकांकिका स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे, त्यांचा फीडबॅक घेणे, त्यांना जर काही मदत हवी असेल तर ते सांगणे, नियमावली त्यांना शेअर करणं अशा प्रकारची कामं होते. कोणत्या क्लब कडून एन्ट्री येणे अपेक्षित आहे, तिथे कोणाशी बोलावे ह्याचा शिरीषचा अनुभव इतका दांडगा होता की मी त्याला म्हटलं – "Your effort to successful entries ratio is phenomenal !!"

 

सगळ्यात प्रथम आम्हाला गांधीभवन ह्यांच्याकडून फोनवर होकार आला !  हळूहळू काही क्लब्सनी आम्हाला फोनवर होकार द्यायला सुरुवात केली आणि नंतर पैसे पाठवतो, परत आम्हाला एकदा नियमावली सांगा ,ह्या वेळेला तुम्ही यूट्यूब करणार आहात का नाही, सात हजाराचे रु. ८५०० का झाले, अशा काही शंका येत होत्या आणि आम्ही त्यांचे समाधान करत होतो.

 

साधारण दहा-बारा entries झाल्यानंतर आम्हाला आणखीन हुरूप लागला आणि त्यातच एका क्लबने आम्हाला सांगितलं की त्यांच्याकडे काम करणाऱ्या महत्वाच्या दोन लोकांना भारताबाहेर जावे लागण्याचा चान्स आहे, आम्ही एकांकिका करू शकणार नाही तर आमचे नाव काढून घ्या !!  पुढे काही दिवसांनी फोन आला की गांधीभवन म्हणाले की आम्ही देखील आमची एंट्री काढून घेत आहोत … पण त्याचा सेटबॅक न घेता आम्ही आमची तयारी त्याच उत्साहाने चालू ठेवली .

 

शिरीषच्या डोक्यात अशी कल्पना आली की आपले डिसेंबर सपोर्ट ग्रुप, इव्हेंट कमिटी, फेलोशिप कमिटी, एकांकिका क्लब convener आणि त्याचबरोबर नाट्यक्षेत्रात थोडीफार ओळख असलेले आपल्या क्लब मधले काही सभासद यांची एकत्रित एक मीटिंग घ्यावी; आपल्या डोक्यात काय काय आहे ते सांगून त्यांच्याकडून आपण त्यांच्या जर काही चांगल्या सजेशन्स असतील तर त्या घ्याव्यात.  तसेच पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी जे आपले समारंभ आहेत त्या कामांची विभागणी करावी. त्याप्रमाणे एक  मीटिंग घेतली. त्यात बर्‍याच कल्पना देखील बाहेर आल्या. उदाहरणार्थ, 'भरत'च्या बाहेर या वेळेला आपण जो एकांकिकेच्या जुन्या फोटोंचा डिजिटल डिस्प्ले लावावा ही कल्पना नितीनला त्या वेळेला आली. त्याचप्रमाणे पहिल्या दिवशी उद्घाटन सोहळ्याला लोकांची खूप कमी हजेरी असते ती आपल्याला वाढवता येईल त्यासाठी आम्हाला काही सूचना CD महाजन  आणि अजय यांच्याकडून आल्या. ट्रॉफिजची जबाबदारी डॉ. राव यांनी आमच्याकडून घेतली, शेवटच्या दिवशीचा  venue, परीक्षकांचे चहा पान… बऱ्याच गोष्टी ठरल्या!!

 

आणखी महत्त्वाचे काम म्हणजे आपल्याला परीक्षक आणि प्रमुख पाहुणे कोण हे दोन्ही शिरीषने आणि मी आपापले काही कॉन्टॅक्ट वापरून निश्चित केले, त्यांना रीतसर आमंत्रण करणं, त्यांच्याकडूनच तारखा पक्क्या करून कमिटमेंट घेणं हेदेखील सुदैवाने काही अडथळे न येता पार पडलं.

 

एकदाचे सगळे क्लब्स निश्चित झाले. त्यानंतर आम्ही एक त्यांचा व्हाट्सअप ग्रुप केला आणि पुन्हा एकदा कार्यक्रमाचा आखणी, नियमावली ,त्याचप्रमाणे इतर काही शंका असतील तर तिथे आम्ही त्यांच्याशी संवाद साधायला सुरुवात केली.  त्याचा आम्हाला एक प्रकारचा रॅपो एस्टॅब्लिश करायला खूप उपयोग झाला. नोव्हेंबर महिन्यामध्ये स्लॉट बुकिंग झालं, प्रमुख पाहुणे, परीक्षक, त्याच्या भेटवस्तू, ट्रॉफ़ीज सगळे निश्चित झाले.

 

साधारण डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आम्ही परत एक मोठी  झूम मीटिंग घेतली त्याच्या मध्ये आपली इव्हेंट्स कमिटी कमिटी डिसेंबर सपोर्ट ग्रुप हे सगळे जण होते. आपल्याला त्या दिवसात म्हणजे १३ डिसेंबर पासून १८ पर्यंत कोणी काय काम करायचं, काय काय वस्तू आपल्या लागतील, अशी यादीच तयार झाली .

ते सहा दिवस क्लब मधील सगळ्यांनी जशी कामे दिली तशी होत गेली.. बॅनर बनवून आणणे, तो लावणे, परीक्षांकांचे  चहा पान ... अगदी दीपप्रज्वलनाच्या तेल-वातींपासून बक्षिस-समारंभाच्या trophies पर्यंत !! पुढे आपले कार्यक्रम कसे यथासांग पार पडले हे सांगणे नलगे ! डॉ राव , शोभाताई - शिरीष ह्यांच्या बरोबर - नितीन- शिल्पा, अजय-अन्जली, CD  महाजन, सीमा, आनंद आणि जयश्री नवाथे, ऋजुता, पल्लवी, मृणाल, अश्विनी, रेश्मा, स्नेहा, कपिल, संजीव, नितीन-अलका अभ्यंकर, प्रदीप-नेत्रा, प्रमोद – नेहा, वृंदा, ही यादी खूपच मोठी होईल…सर्व सभासदानी  प्रचंड मदत केली. अत्यंत दिमाखात आपला हा पूर्ण सोहळा पार पडला.

वैयक्तिक माझ्या अनुभवाबद्दल सांगायचं झालं तर काही गोष्टी अगदी प्रकर्षाने नमूद करायला आवडतील. एक म्हणजे शोभाताई आणि शिरीषने माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि दिलेला फ्री हॅन्ड !! ह्यामुळे डिस्ट्रिक्ट पातळीवर या लोकांशी संपर्क साधणे, सगळ्या गोष्टीची आखणी करणे, या कामाचा मला चांगला अनुभव आला.

इव्हेंट जसजशी जवळ येऊ लागली तसतसे - माझं ऑफिसचं काम सांभाळून , घरातील लग्न, खरेद्या  सांभाळून हे कसं काय करायचं ह्या मनस्थिती मध्ये असताना मात्र मी स्वतःच्या विचाराना एक वेगळच वळण दिले. गेली दोन वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठेही विशेष फिरायला जाता आलं नव्हतं, ऑफिसच्या कामात झालेली प्रचंड वाढ, घरातील जेष्ठाची आजारपणे ह्याने बराच ताणही होता. relaxation नव्हतं!! ह्या प्रोजेक्टकडे एका स्टेकेशन म्हणून बघायचं निर्णय मी स्वतःकडे घेतला. म्हणजे काय तर  आपल्याच घरी राहून जणू कुठेतरी मस्त  फिरत आहोत, रिलॅक्स होत आहोत, बाकी काही चिंता जबाबदाऱ्यांचा पुढील ६ दिवस विचारच करायचा नाही असे ठरवले.

 

डिस्ट्रिक्ट आणि क्लबसाठी तर हा मोठा इव्हेंट होताच पण वैयक्तिक पातळी वर मलासुद्धा याचा पुरेपूर आनंद आणि अनुभव घ्यायचा होता. एकांकिका भरतमध्ये उभी राहिल्यावरचे दिवस आत्यंतिक महत्वाचे !! हे सहा दिवस केवळ आणि केवळ एकांकिका  एवढाच focus ठेवायचा आणि पूर्णतः मानसिक दृष्ट्या रिलॅक्स व्हायचं अशी खूणगाठ मी मनाशी बांधली. त्यामुळे १३ ते १८ डिसेंबर या सहा दिवसांत कमिट केल्याप्रमाणे भरतमध्ये तर मी होतेच पण एका उत्साहाने, सकारात्मक एनर्जीने मी तिथे काम करू शकले आणि त्याचा पुरेपूर आनंद घेतला. Meticulous प्लॅनिंग, हंड्रेड पर्सेंट डेडिकेशन आणि कष्ट करून मी जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे केल्या. जे काही चुकलं, कमी पडलं, राहिलं  ते क्लब मधल्या सर्व लोकांनी सांभाळून घेतलं .

 

हा सोहळा सर्वार्थाने  यशस्वी करण्यात माझा सहभाग होता ह्याचे खूप छान समाधान मला मिळाले आणि एका आठवड्याच्या ह्या आगळ्या वेगळ्या 'स्टेकेशन'ने मी पुन्हा  रिफ्रेश झाले!   धन्यवाद!

ही यादी खूपच मोठी होईल. नजरचुकीने कोणाचे नाव राहिले असल्यास राग मानू नये. सर्व सभासदांनी प्रचंड मदत केली

 

ॲन कल्याणी पेंढारकर (एकांकिका डिस्ट्रिक्ट सहनिमन्त्रक)

१३ डिसेंबर - एकांकिका स्पर्धा

नमस्कार. शोभाताईंनी यावर्षीच्या क्लब एकांकिकेच्या निमंत्रक म्हणून जबाबदारी माझ्यावर सोपवली. त्या दिवसापासून डोक्यात  त्याचेच विचार सुरु झाले. दिग्दर्शक म्हणून मला आशुतोष नेरलेकर आणि प्रिया नेरलेकर हवे होते. सुदैवाने त्यांनी लगेचच होकार दिला. बऱ्याच वर्षांनी त्यांनी आपल्या क्‍लबची दिग्दर्शकाची जबाबदारी घेतली. मागच्या वर्षीच्या अनुभवावरून वृंदाला वारंवार विचारणा केली. तिच्याकडून काही चांगलं लिहिले गेले का हे विचारलं. तिच्याकडून होकार मिळाला. नाटक करण्याचा आणि मग काय एक काम खूप हलकं झालं. तिने एक उत्तम संहिता हाती दिली. त्याच्यानंतर नाटकाचं वाचन झालं. भूमिका कोणी करायचा यावर विचार झाला. क्लब मध्ये कोण इच्छुक आहे का याबद्दलची विचारणा मी ग्रुप  मध्ये केली. नेहमीच्याच यशस्वी कलाकारांचा होकार मिळाला आणि नाटक चांगलं होईल याची खात्री पटली. आता नाटकाच्या तालमी कुठे करायच्या? रवी जोशी यांना विचारलं तर ते बाहेर देशी जाणार होते. पण  ते म्हणाले की त्यांच्याकडे काम करणारा दिलीप आणि त्याची मुलगी ज्योती हे तुम्हाला दार उघडून देतील. चालेल म्हटलं आणि त्यांनी दार उघडून देण्याची जबाबदारी घेतली आणि दररोज रात्री नऊ ते अकरा अशी तालमीची वेळ ठरवली,. त्यानंतर जवळजवळ दीड महिना कलाकारांच्या व्यस्त शेड्युलमुळे सगळे एकत्र काम करणं साधारण प्रयोगाआधी पंधरा दिवस करू शकलो. योगायोगाने मंजिरीच्या ओळखीत निळू फुले कला अकादमी पाच रविवारी तालमीसाठी मिळाली. छान मोठा हॉल आणि दुपारची प्रॅक्टिस. त्यामुळे मोकळ्या आवाजाने तालीम मस्त होत होती.  क्लब एकांकिकेत काम करण्याची रेशमाची ही पहिलीच वेळ होती पण तिने ती भूमिका उत्तम वठवली आणि तिला त्याचे योग्य पारितोषिकही मिळाले. स्नेहाच्या अभिनयाने प्रयोगात रंगत आणली आणि तिलाही अभिनयाचे बक्षीस मिळाले. अश्विनी आणि नितीननी आपल्या दमदार अभिनयाने नाटक खूप वेगळ्या उंचीवर नेले आणि दादांच्या अभिनयात तर आपला प्रमोद पाठक तर यावर्षी खूपच फुलला. पोलिस पाटलाच्या दमदार भूमिकेत अजयला एंट्रीलाच टाळ्या पडल्या. नाटक हळूहळू घडत होतं. प्रसंगांची काटछाट. नंतर त्यात भर घालणे. पुन्हा पुन्हा काही प्रसंगांची प्रॅक्टिस करणे असा जोरदार सराव सुरू झाला. नंतर काही दिवसांनी शिरीषची संगीताची सुरेल भर पडली. परीक्षकांनी त्याला उत्तम संगीताचं बक्षीसही दिले. नाटक हळूहळू आकार घेऊ लागलं. कलाकारांची मेहनत, दिग्दर्शकाची बारीक घारीची नजर, प्रेक्षकांच्या सूचना अशा सर्वांमुळे योग्य दिशेने नाटक घडत होतं. दिग्दर्शकांचा सतत सकारात्मक सहयोग आम्हाला मिळत गेला. नेपथ्यासाठी काय लागणार याची बेरीज वजाबाकी सुरू झाली. शोभाताईकडचे टेबलक्लॉथ, दीपाचे गार्डन टेबल, रेशमाच्या किचन मधल्या खुर्च्या, वृंदाकडची बेडशीट्स ,या सगळ्यांमुळे स्टेज छानच सजले. नाटक रंगत गेलं. कधी याचा आवाज बसतोय तर कधी तिला ताप आला तर कोणाकडे पाहुणे आलेत या सगळ्यांच्या तऱ्हा सांभाळत अखेरीस १३ तारखेला प्रयोग झाला. उत्तम झाला. सगळ्यांनी खूप कौतुक केलं. पडद्यावरच्या कलाकारांनी आणि पडद्यामागच्या कलाकारांनी अतिशय मेहनतीने सर्व प्रयोग कसून सुंदर पार पाडला. या सगळ्यात सर्वांच्या ताना बाना सांभाळत नाटक नेटाने पुढे नेणाऱ्या दिग्दर्शक जोडीला माझा कडकडून सलाम. आणखीन एक टांगती तलवार डोक्यावर होती ती म्हणजे दिलेल्या बजेट मध्ये नाटक बसवायचं ! दिग्दर्शकाने पहिल्याच भेटीत याबद्दल अतिशय खात्री दिल्यामुळे माझ्या डोक्यावरच एक मोठं ओझं कमी झाल होत आणि सांगायची आनंदाची गोष्ट म्हणजे सर्व नाटक बजेटच्या आतच बसलं आहे. दिग्दर्शकांनी एकही दिवस सुट्टी घेतली नाही. पूर्ण तीन महिने ते आमच्या पाठीमागे होते आणि हो एक सांगायचे राहिलेच. इन्स्पेक्टर विशालचे इन्स्पेक्टर वैशालीत रुपांतर झाले. आता ते कधीतरी पुढे सांगू. धन्यवाद.

ॲन सीमा महाजन (एकांकिका क्लब निमंत्रक)

एकलव्य न्यास मुलांचे सादरीकरण

रोटरी क्लब पुणे शिवाजीनगर - बावरी