top of page

SEPTEMBER 2021 Issue
basic education and literacy MONTH

साप्ताहिक कार्यक्रम

Club meeting on August 1, 2021


Shri Ramchandra Ekbote and Shri Jayant Jeste of “Bharat Vikas Parishad (BVP)” gave us a very interesting presentation on various activities of the NGO. However, they gave us detailed information about “Vikalang Sahayyata Yojana (VSY)”.
 

VSY manufactures artificial limbs in 29 different facilities in India. One of the facilities is in Pune. They provide these artificial limbs free of charge to needy individuals. They identify a rural location where the need for artificial limbs is high. They organize a camp at that location to create awareness about the artificial limbs and to identify needy people at that location. Then they organize another camp to actually fit the artificial limbs. The manufacturing cost of BVP is only a fraction of the comparable costs in the market. They offer these limbs free of cost to the needy. They get substantial donations from corporates and individuals to achieve this.
 

Getting an artificial limb is a life-changing event for the recipients. They showed very interesting videos of some of the recipients. Interestingly, they give a lot of importance to innovation. Improving the quality and usefulness of the limbs is an ongoing process.
 

The entire presentation was an eye opener for me. Truly a very noble work by BVP.

 

Rtn. Harsh Barve

९ ऑगस्ट - मंगलाताई गोडबोले

 

ऑगस्टच्या दुसऱ्या सोमवारी प्रसिद्ध लेखिका मंगला गोडबोले आपल्याकडे आल्या होत्या. त्यांचं खुमासदार शैलीतलं अभ्यासपूर्ण भाषण  ऐकायला  सगळेच  उत्सुक  होते. आणि  श्रोत्यांची ही  अपेक्षा  शंभर  टक्के  पूर्ण  झाली.

 

गेली पन्नास वर्ष सातत्याने लिहिणाऱ्या मंगलाताईंची साठ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यामध्ये कथा, कादंबरी, नाटक, एकांकिका, बालसाहित्य, ललित लेख, चरित्रलेखन असे सर्व प्रकार त्यांनी यशस्वीपणे सादर केले. त्यांच्या  एकूण  लेखनात  विनोदी  करमणूकप्रधान  या बरोबरच  गंभीर  स्वरूपाचे  लेखनही  असून  त्याला  वाचकांची  भरघोस   पसंतीही  मिळालेली  आहे.

 

ह्या  लेखनप्रवासातले  आनंदाचे  क्षण  सांगताना  त्या  म्हणाल्या, "आपलं  आयुष्य  सीमित  असतं. त्यातही  पुढे  किती  काळ  हातात  आहे  हे  माहिती  नसतं. अशातही  जे वाचक  वेळ  देऊन  माझं  लेखन  आवडीने वाचतात आणि  ते  वाचताना  वेळ  कसा  गेला  हे समजलही  नाही  असं  आनंदाने  सांगतात, तेव्हा  मला  खूप  सुखाचं, आनंदाचं  वाटतं."

 

लेखकांची  सुखदु:खे  या विषयी  त्या  बोलत  होत्या. त्या म्हणाल्या, "लेखन  ही एक  फार मोठी  प्रक्रिया  आहे. लेखकाच्या  मनात  तो विषय  खूप  काळ  घोळत असतो. त्यातील  प्रसंगांमधे, पात्रांमधे, पात्रांच्या वागण्यामधे  बदल  होत असतात. अशा  अनेक  खळबळींनंतर  लेखन  पूर्ण  होतं. मग  ते  प्रकाशक  कशा पध्दतीने  लोकांसमोर  आणतो  ते  महत्वाचं  ठरतं. त्याची  मांडणी त्याला  दिलेली  जागा वगैरे  गोष्टी  लेखकाला सुखदु:खी   ठरू  शकतात. त्यानंतर वाचक ते  वाचणार  व प्रतिक्रिया  देणार. याप्रमाणे  लेखकाच्या  मनापासून  ते  वाचकाच्या मनापर्यंतचा  हा  प्रवास  असतो. त्यानंतर  वाचकाची  प्रतिक्रिया.  तर  लेखकाचं  अस्तित्व, लेखकाचा  आनंद, लेखकाची   प्रेरणा  ठरवत  असते. त्यामुळे  मला  वाचकांची  प्रतिक्रिया  अतिशय  महत्वाची  वाटते  आणि  मी  त्यांची  आवर्जून  दखल  घेते. "

त्यानंतर   मंगलाताईंनी  आजकालच्या  साहित्यवर्तुळात, प्रकाशन  व्यवसायात   पुरस्कार  ठरविण्यात कधीकधी आ़ढळून  येणारं  राजकारण,  पक्षपात  यांचा  उल्लेख  केला.

मंगलाताईंना  आतापर्यंत  २५  पुरस्कार  मिळाले  आहेत. पुरस्कार  काय  आहे  यापेक्षा  तो  कोणी  दिला  आहे  हे मला महत्वाचं  वाटतं, असंही  त्यांनी  यावेळी  नमूद  केलं. पुरस्कारांची  संख्या  किंवा  रक्कम  वाढवून  साहित्यनिर्मिती  वाढेल  पण  दर्जा  वाढेल  असं  मात्र  नाही,  असं त्यांनी  बोलून  दाखवलं. यापुढे  जमेल  तितके  दिवस  लेखन  करण्याचीच  इच्छा  त्यांनी  व्यक्त  केली.

 

कार्यक्रमाच्या  प्रारंभी  सरिता  भावे  यांनी  मंगलाताईंचा  परिचय  करून दिला. शेवटी  रो. श्रीकांत  भावे  यांनी  आभार  मानले.  तसेच  मंगलाताईंनी  लिहिलेल्या  रोटरी  गीताचे गायन सुरवातीला  गिरीजा  यार्दी यांनी  केले.

 

ऍन. सरिता  भावे

१६ ऑगस्ट २०२१ - ज्येष्ठ कलाकार मोहन आगाशे यांना रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगर चे मानद सदस्यत्व  प्रदान

पद्मश्री मोहन आगाशे यांनी क्लबचे मानद सदस्यत्व स्वीकारल्यामुळे १६ ऑगस्ट २०२१  ही तारीख आमच्या क्लबसाठी खूप खास होती. व्यवसायाने डॉक्टर, आणि मनाने कलावंत काय सुरेख संयोजन आहे! त्यांचे विचार खूप प्रेरणादायी होते. एखाद्याने स्वतःची क्षमता आणि देवाने दिलेल्या सर्जनशीलतेचे उत्तम संयोजन केले पाहिजे.

 

संगीत, गायन, लेखन आणि इतर परफॉर्मिंग आर्ट्स यासारख्या कमीतकमी एका कला प्रकारात मन वळवण्यासाठी एखाद्याने दिवसाचा थोडा वेळ द्यावा. हे त्याला चांगले मनुष्य बनण्यास मदत करेल, जे इतर कोणत्याही कौशल्य किंवा व्यावसायिक तज्ञांपेक्षा सर्वात महत्वाचे आहे.

 

सिनेमाची शक्तिशाली कला अधिक विचार, शिक्षणासाठी वापरली पाहिजे. मनोरंजन हा त्याचा भाग असू शकतो पण अंतिम नाही. मानसिक आरोग्याविषयी जागरूकता पसरवण्यासाठी काही चित्रपटांची निर्मिती केली.

रो. बाळकृष्ण दामले

३० ऑगस्ट - सामर्थ्य आहे अनुवादाचे जो जो करील तयाचे

बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या मंजिरी धामणकरची मुलाखत अश्विनीने अतिशय उत्तम घेतली. अतिशय नामांकित व अध्यात्मिक असलेल्या डॉक्टरच्या कन्येला उपजतच दैवी गुण प्राप्त झालेले. घरात अनेक वैद्यकीय डॉक्टर्स व सांस्कृतिक वातावरण. त्यामुळे भाषेची लहानपणापासून आवड निर्माण झाली होती. मराठी शाळेत असताना मंजिरीचा निबंध सगळ्या शाळेत वाचून दाखविला जायचा.


            तिला लहानपणापासून रेडिओ ऐकण्याची आवड होती. हिंदी गाणी ऐकत असताना शब्दांकडे तिचे लक्ष असायचे व ती गाणी लिहून घ्यायची. त्यामुळे तिचे हिंदीचे उच्चार व उर्दूचे उच्चार स्पष्ट होत गेले. याची पावती म्हणजे ओ. पी. नय्यर यांनी मंजिरीच्या उर्दूला दिलेली दाद. इंग्लिश भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी तिने कॉलेजमध्ये इंग्लिश माध्यम घेतले व मैत्रिणींशी इंग्रजीमध्ये बोलत राहिली, वाचन करत राहिली. त्यातही तिला यश मिळाले. उर्दू लिपी येत नव्हती पण साहित्य देवनागरीत असल्यामुळे त्यातही प्रभुत्व मिळवले.

              रवींद्रनाथ टागोरांचे अनुवादित साहित्य वाचले. ते तिला खूप आवडले. भाषांतरात थोडा बदल होतो म्हणून बंगाली साहित्य वाचनासाठी ती बंगाली भाषा शिकली व भारतात बंगालीत तिसरी आली. मराठी, हिंदी, संस्कृत, उर्दू, बंगाली व इंग्रजी बहुभाषिकत्वाचा उपयोग तिला सूत्रसंचालनाकरिता झाला. पुणे फेस्टिवलला सूत्रसंचालन करताना व हरिप्रसाद यांची हिंदीतून मुलाखत घेतल्यामुळे ते खूप खूष झाले. अमरीश पुरी यांनी खास मंजिरीसाठी एक शेर म्हटला. अशा नामांकित व्यक्तींकडून तिला दाद मिळत गेली.

              मंजिरीला भाषांशी खेळायला आवडते. त्यामुळे भाषांतर करायचे तिने ठरविले नव्हते तरी भाषांतराचे काम येत गेले. तसलीमा नसरीन यांचे बंगाली भाषेच्या पुस्तकाचे "लज्जा" मराठीत रूपांतर केले.

              मंजिरीच्या सूत्रसंचालनाची किर्ती अमेरिकेत गेली व २००९ साली डॉक्टर सुभाष व अंजली जोशी यांच्या मुलीच्या संपूर्ण लग्नाचे सूत्रसंचालन करण्यासाठी अमेरिकेत बोलावले. मुलगा गुजराथी असल्यामुळे मंजिरीने खास गुजराथी व मराठीचे वैशिष्ट्य असलेली कव्वाली लिहिली. अत्यंत दिमाखदार व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा केलेल्या लग्नाचे सूत्रसंचालन मंजिरीने तेवढ्याच ताकदीने केले. तिथेच मंजिरीची व माझी ओळख झाली.

              अभिनय. गायन वक्तृत्व, बहुभाषी असलेली मंजिरी आपल्या क्लबची मेंबर व आपली मैत्रीण आहे याचा खूप अभिमान आहे.
             

पी. पी. रोटेरियन प्रदीप वाघने समर्पक भाषेत आभार मानले.

ऍन. नेत्रा वाघ

नवीन सभासदांचे स्वागत

ऑगस्ट महिना हा रोटरी जगतात 'मेम्बरशिप मंथ' म्हणून ओळखला जातो. या महिन्याचे औचित्य साधून आपल्या क्लबमध्ये दोन नवीन सभासदांचे आगमन झालं आहे.

pradeep godbole.jpg

१. प्रदीप गोडबोले

 

प्रदीपचे शिक्षण बी.कॉम, एल.एल.बी., सी.ए.आय.आय.बी. झालेले असून तो आय.डी.बी.आय बँकेतून डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून निवृत्त झालेला आहे. आपल्या क्लब मध्ये डॉ. सूर्यप्रकाश आणि शोभा राव यांच्या तो चांगल्या परिचयाचा असून त्यांच्या रेफेरंसने आलेला आहे. तो पूर्वाश्रमीचा रोटेरिअन असून जुहू क्लबचा २००६ पासून सभासद होता. आता तो मुंबई सोडून पुण्यात स्थायिक होत असल्यामुळे तो आपल्या क्लबमध्ये येत आहे. तो PHF+२ पातळीचा देणगीदार आहे. तो जुहू रोटरी क्लबमध्ये खूप कार्यरत असे. त्याने रोटरी इंटरनॅशनल क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले होते. त्याने जुहू क्लबसाठी CSR च्या मार्गाने वित्त उभारणी करण्यात त्याचा मोठा सहभाग राहिलेला आहे. त्याची मुलगी अंकिता हिने एल.एल.बी आणि आंतरराष्ट्रीय लवाद (internatinal Arbitration) मध्ये शिक्षण पूर्ण केले असून ती सध्या जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे असते.

२. बाळकृष्ण दामले

 

बाळकृष्णला अश्विनी अंबिकेने सूचित केले आहे. बाळकृष्ण हा 'देवीप्रसाद गोएंका मॅनेजमेंट कॉलेज ऑफ मीडिया स्टडीज' या मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या कॉलेजचा 'संस्थापक मुख्याध्यापक' होता. व्यवसायाने तो विविध कार्यक्रम(प्रोग्रॅम्स)  निर्माता असून शैक्षणिक चित्रपटसुद्धा निर्माण करतो. त्याने वाणिज्य शाखेची पदवी पुणे विद्यापीठातून घेतली असून न्यूयॉर्क, अमेरिकेतून टेलिव्हिजन, रेडिओ आणि चित्रपट या शाखेत एम.एस. केले आहे. तो नाटकात सुद्धा कामे करतो. बाळकृष्णची पत्नी मोहिनी ही ऑल इंडिया रेडिओ मध्ये अनौन्सर असून ती सुद्धा नाटकात कामे करते. त्यामुळे या दोघांच्या रूपाने आपल्या क्लबच्या एकांकिकेसाठी कलाकार मिळालेले आहेत हे विशेष.

 

या दाम्पत्याची मुलगी सुखदा १२वीत शिकते. मुलगा सिद्धार्थ मेकॅनिकल इंजिनीरिंगच्या पदविकेच्या प्रथम वर्षात आहे. 

Balkrishna Damle.jpg
balkrishna damle.png

सामाजिक प्रकल्प 

स्वातंत्र्य दिनानिमित्त चे प्रोजेक्ट

  • ऑगस्ट २०२१ रोजी ७५ व्या वर्षात पदार्पण केलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने 'भैरवनाथ विद्यालय ' खुटबाव या शाळेत ग्लोबल ग्रांटच्या अंतर्गत मुलींच्या शिक्षणाकरता भरारी ठरलेला 'सायकल भरारी' उपक्रम संपन्न झाला. नवीन कोऱ्या ४८ सायकली इयत्ता पाचवी ते नववी मधील ४८ गरजू आणि शाळेपासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या मुलींना प्रदान केल्या. त्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे उशीर झालेले सायकलींचे पार्टस 'जागतिक महिला दिनाच्या' दिवशी हरियाणाहून निंबाळकरांच्या दुकानात पोचले. हा एक दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. प्रथम एका सायकलीची पूजा केली आणि मग त्या मुलींना देऊ करण्यात आल्या. शाळेत येताना चालत आलेल्या मुली घरी जाताना मात्र चेहऱ्यावर हास्य घेऊन आनंदात सायकल चालवत गेल्या. तिथेच घेतलेल्या 'स्लो सायकलिंग' स्पर्धेत पहिल्या तीन मुलींना प्रदीप गोडबोलेने बक्षीसं दिली.

  • परिषदेच्या त्रिंबक दिनकर विद्यालयाच्या मुख्याध्यापकांना शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी थर्मल गन, 300 मास्क व सॅनिटीझर प्रेसिडेंट शोभा राव यांच्या हस्ते देण्यात आले. त्यानंतर शाळेपासून अगदी जवळच असलेल्या छोट्या देवळाच्या परिसरात कदंब, वड, पिंपळ, चिंच, कांचन इत्यादी स्थानिक झाडांचे वृक्षारोपण केले .

  • सर्व कार्यक्रम पूर्ण केल्यानंतर सार्थक सेवा संघ आंबळे इथे गेलो. अश्विनी अंबिके ने तेथील मुलांकडून छोटी नाटुकली बसवून घेतली होती. त्याचे आणि त्याबरोबर देशभक्तीपर गीते आणि इतर कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. मग अंजली रावेतकरने तेथील मुलींना फॉल पिको ची मशीन भेट म्हणून दिली. त्याचे अंजलीच्या हस्ते हस्तांतरण केले. जिल्हा परिषदेच्या शाळेत दिलेले मास्क सार्थक मधील मोठ्यात मुलींनी व मुलांनी शिवले होते व ते त्यांच्याकडून क्लब ने विकत घेऊन शाळेला भेट दिले.

  • कार्यक्रमानंतर सार्थक सेवेच्या अग्रहाच्या भोजनाचा आणि वृंदा ने आणलेल्या जिलबीचा आस्वाद घेऊन सर्व मंडळी घरी परतली.

  • दिवसभराच्या भरगच्च कार्यक्रमाला प्रेसिडेंट शोभा राव ,डॉक्टर राव, अजय- अंजली, वृंदा, नितीन -अलका, अंजली रावेतकर, अश्विनी, आप्पा, आरटी, शिरिष, प्रदीप गोडबोले, स्मिताताई, अच्युत- निरुपमा, मानसी व तारा या सर्वांची उपस्थिती उल्लेखनिय होती.

ऍन. अलका अभ्यंकर

एकलव्य संस्थेतील मुलांना शैक्षणिक सहाय्य

एकलव्य संस्थेमधील दोन मुले गणेश भोई आणि लक्ष्मी यादव यांना पाबळ येथील विज्ञानाश्रम येथे एक वर्षाचा रहिवासी व्यवसायाभिमुख शैक्षणिक कोर्स पूर्ण करण्यास निवडले आहे. त्यांना वेल्डिंग, बेकिंग, पाककला, डेअरी मॅनेजमेंट वगैरे बाबतीत वर्षभर शिक्षण दिले जाईल. पुढील वर्षी ते इंटर्न म्हणून काम करतील. यामुळे त्यांना आपल्या आवडीच्या क्षेत्रात व्यवसाय करून स्वतःच्या पायांवर उभे राहण्यास मदत होईल. पी पी शिरीष क्षीरसागर व रो. माधुरी गोखले यांनी या मुलांचा शैक्षणिक खर्च उचलण्याची तयारी दर्शविली आहे. हा वार्षिक खर्च प्रत्येकी रु. ४०,००० आहे.

आपल्या सर्वांना माहितच आहे की एकलव्य संस्थेतील मुले ही प्रामुख्याने माता-पित्याचे योग्य छत्र नसलेली असतात. त्यामुळे अशी मुले गुन्हेगारी जगताकडे वळण्याचा मोठा संभव असतो. त्यांना समाजात आत्मनिर्भर बनून सन्माननीय मार्गाने उपजीविका करता यावी असा आपला प्रयत्न असतो. 

WhatsApp Image 2021-09-03 at 10.40.00 PM.jpeg
WhatsApp Image 2021-09-03 at 10.40.00 PM (1).jpeg

नवीन रोटेरिअन बाळकृष्ण दामले पाबळ येथील विज्ञानाश्रमावर एक चित्रपट करीत आहे. त्याने विज्ञानाश्रमास भेट दिली आणि गणेश व लक्ष्मी यांची आवर्जून भेट घेतली हे विशेष कौतुकाचे आहे.

WhatsApp Image 2021-08-31 at 1.41.01 PM.jpeg

ऑगस्ट महिन्यातील प्रकल्प

सार्थक व एकलव्य या संस्थांना आपण दर महिना शिधा दान करतो.या ऑगस्ट महिन्यात सुद्धा हा उपक्रम संपन्न झाला

 

महिन्यासाठी धान्यासाठीचे अर्थ सहाय्य:

१) हर्ष मोहिनी २) कल्याणी ३) श्री काणे (अजयचे मित्र) ४) निखील (विकास कल्पनाचा जावई)

५) सौ अनिता राजहंस ( वृंदाची विहीण)

रो. वृंदा वाळिंबे

WhatsApp Image 2021-09-05 at 9.42.29 PM.jpeg

GLOBAL GRANT UPDATE

Happy to inform you that Pulmonary function Test System with all std accessories, spares & consumables has arrived from Frankfurt, Germany to Deenanath Mangeshkar Hospital, Pune.

This is under Global grant no.2122237 (RY 2020-21).

Project cost is Rs.27,53,414/-.

 

Thanks to Pratap & Pallavi Gokhale, Rtn. Vandana Naik of RC Florida, RCP Shivajinagar, RC Orange Park Sunset, Dist.3131, Dist.6970 and of course The Rotary Foundation (TRF) for thier valuable contribution.

We will have handing over function @DMH after installation and demo procedure gets over.

 

Will keep you updated for the same.

Regards,
Rtn Nitin Abhyankar
(Chairman-Grants)

आरोग्यदर्पण

1. Nutrition in pregnant women and Importance of Breast Feeding

रोटरी क्लब पुणे शिवाजीनगरच्या प्रेसिडेंट  डॉ. शोभा राव आणि  डॉ. स्मिता जोग , डॉ. ह्यांच्या सोबत रेडिओ पुणे ७९२ AM वर आरोग्यदर्पण ह्या कार्यक्रमात "Nutrition in pregnant women and Importance of breast feeding".


विषयावर गौरी लागू  ह्यांनी घेतलेली मुलाखत ऐकण्यासाठी क्लिक करा ही लिंक:

Arogyadarpan-3-AugArtist Name
00:00 / 54:48

2. Nutrition for Well - Being

दि. ११ ऑगस्ट रोजी डॉ. शोभा राव यांनी मॉडर्न कॉलेजच्या विद्यार्थ्यांना पोषणमूल्यांबाबत मार्गदर्शन केले

कथा इको ब्रिक्सची

 

ह्या वर्षी आपल्या क्लबने हा प्रोजेक्ट हातात घ्यायचं ठरवलं. मागील वर्षी मी मेट्रो क्लबने हा प्रोजेक्ट केलेला पाहिला होता आणि मला खूप भावला पण. कल्पना अशी आहे कि, आपल्याकडे वेगवेगळी सरबतं, सोडा, फिझी पेयं अशा प्लॅस्टिकच्या बाटल्या घरात येतात. तसेच बिस्किटे, वेफर्स, इत्यादी प्लॅस्टिकची वेष्टणं पण जमतात. हे सगळं प्लॅस्टिक आपण सुक्या कचऱ्यात टाकतो. कचरा गोळा करण्याची यंत्रणा आणि निर्माण होणारा कचरा ह्यांचा मेळ न बसल्याने बरंच प्लॅस्टिक लॅंड फिल्स मधे जातं आणि पर्यावरणाला धोका पोचवतं. बरेच जणं बऱ्याच गोष्टी ह्यासाठी करत आहेत. त्यातलीच एक कल्पना आहे एको ब्रिक्स.

प्लॅस्टिक च्या बाटलीत हे सगळे प्लॅस्टिक वेष्टणं ठासून भरायची. अगदी छोटा वेष्टणाचा तुकडा पण आत जाऊ शकणार नाही इतकं ठासून. अशा भरलेल्या बाटलीला एखाद्या विटेसारखी मजबूती येते. ह्या विटा वापरून आपण बागेतील झाडांभोवती कुंपण, बसायला बेंच, पार, कंपाऊंड वॉल अशा कितीतरी गोष्टी बनवू शकतो. सिंहगड रोडला तर एकांनी ह्या विटा वापरून अख्खं घर बांधलं आहे. हे करायचं नसल्यास रूद्र नावाची एक संस्था हे प्लॅस्टिक आपल्याकडून घेऊन पण जाते आणि रिसायकल करून त्यातून एक प्रकारचं फ्युएल तयार करते. अर्थातच त्यासाठी त्याच्या काही गरजा आहेत. आपला क्लब काय करणार आहे तर आपल्या सदस्यांनी अशा ब्रिक्स तयार करून द्यायच्या. त्यातून आपण म्युरल तयार करणार आणि काही सार्वजनिक ठिकाणी ते म्युरल व त्या जोडीला इको ब्रिक्स ची माहिती, रुद्र किंवा अन्य अशा संस्थांची माहिती असलेला व आपल्या क्लबचं नाव असलेला फलक लावणार. मला डिसेंबरपर्यंत जास्तीत जास्त अशा ब्रिक्स तयार करुन द्या.

आता एक मजेदार अनुभव सांगते. मी आपल्या क्लबच्या मैत्रिणींसाठी ह्या संकल्पनेचा एक व्हिडिओ तयार करून ऍन्स ग्रूपवर टाकला. तो सगळ्यांनी कुठेकुठे पुढे पाठवला आणि हा व्हिडिओ इतका व्हायरल झाला कि अगदी विदेशात रहाणाऱ्या माझ्या नातेवाईकांना, आमच्या मित्रमंडळी, परिचित ह्यांच्याकडे पोचला आणि मला विचारणा करणारे खूप फोन आले. हा एक वेगळाच अनुभव होता. हे पाहिल्यावर मला वाटलं की व्हिडिओ च्या सुरवातीला मी माझं आणि आपल्या क्लबचं नाव बोलले असते तर विनासायास क्लबचा PR झाला असता. असो. तर चला, सगळ्यांनी कामाला लागा आणि इको ब्रिक्स तयार करायला घ्या.

 

रो. वृंदा वाळिंबे

अथर्वशीर्ष पठण - २५ ऑगस्ट  

दि. २५ ऑगस्ट रोजी आपल्या क्लबने झूम वर श्री गणेश अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. अतिशय उतसाहाने आपल्या सभासदांनी या कार्यक्रमात  भाग घेतला. नितीन आणि शिल्पा नाईक, दीपक आणि गौरी शिकारपूर, शिरीष क्षीरसागर, आनंद व जयश्री नवाथे,  संजीव आणि मीना चौधरी, अजय व अंजली गोडबोले, डॉ. सूर्यप्रकाश व डॉ शोभा राव यांनी या कार्यक्रमाचे आयोजन सुरेख केले होते. रो. नितीन आणि ऍन. शिल्पा नाईक यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे यजमानपण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने त्यांच्या घरी केले होते.

WhatsApp Image 2021-09-04 at 8.26.02 PM.jpeg

SCIENCE BEHIND MUSIC

विकास मंडळ, मॉडर्न कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय शिवाजीनगर, पुणे कॉलेज  आणि रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी  'Science Behind Music' या कार्यक्रमाचे दि. ४ ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम यु ट्युब वरून थेट प्रसारित झाला.

उपलब्धी...अभिनंदन

1. PDG Deepak Shikarpur has been appointed as Industry Expert member in Board of Studies in Computer Applications in New Arts Commerce and Science College Ahmednagar which has recently received Academic Autonomy by University Grants Commission.

2. रो. माधुरी आणि विजय गोखले हे पुनः एकदा आज्जी-आजोबा झाले. त्यांची मुलगी मृण्मयी आणि जावई सोहन यांना १३ ऑगस्ट रोजी पुत्ररत्नाची प्राप्ती झाली.

3. आपल्या क्लबमध्ये नवीन आलेले रोटेरिअन बाळकृष्ण दामले यास विज्ञान प्रसार आयोजित 'नॅशनल सायन्स फिल्म फेस्टिवल' मध्ये दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळालेले आहे. या पुरस्काराचे स्वरूप एक लक्ष रुपये, सर्टिफिकेट आणि ट्रॉफी असे आहे. ही स्पर्धा स्वातंत्र्यदिनाच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित केलेली होती.

4. पी डी जी दीपक याचा 'डिजिटल अर्थव्यवस्थेचे विकसित पाऊल' या शीर्षकाचा लेख दै. पुढारी या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला . या लेखात दिपकने यापुढे आभासी चलन हे आता कागदी चलनाला कसे मागे टाकणार आहे ते विशद करून इ-रुपी बद्दल स्पष्टीकरण दिले आहे.

 

5. पी डी जी दीपक याचा 'बहु आयामी शिक्षण घ्या' या शीर्षकाचा लेख दै. पुढारी या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला. या लेखात दिपकने यापुढे विद्यार्थ्यांना नवनवीन क्षेत्रात शिक्षण घेऊन स्वतःला आधुनिक जगात सिद्ध करण्याचे मार्गदर्शन केले आहे.

 

6. पी डी जी दीपक याचा 'भारतातील कुशल युवाशक्ती' या शीर्षकाचा लेख दै. पुढारी या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला. १२ ऑगस्ट  हा दिवस आंतरराष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा होतो. यानिमित्त दीपकने पुढील काळात तरुणांनी स्वतःचा विकास कसा करून घ्यावा याबद्दल मार्गदर्शन केले आहे.

 

7. पी डी जी दीपक याचा 'कृत्रिम बुद्धीचे विस्मरण' या शीर्षकाचा लेख दै. पुढारी या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला. या लेखात दिपकने यापुढे आभासी जगात घडून येणाऱ्या रोबो प्रगतीबद्दल लिहिले आहे. याच्या अंतर्गत प्रभावी विस्मरण प्रणाली वापरकर्त्यांना माहिती नष्ट करण्याचे एक नवीन वैशिष्ट्य देऊ शकेल असे प्रतिपादित केले आहे.

 

8. पी डी जी दीपक याचा 'न्यू नॉर्मल जगात पासवर्ड फुटणार, पैसे लुटले जाणार' या शीर्षकाचा लेख दै. लोकमत या वृत्तपत्रात ८ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाला. डार्क वेब हे अनेक फ्रॉड करण्यास कसे वापरले जाते ते यात विशद केले गेले आहे.

 

9. ऍन शिल्पा नाईक हिचे डिस्ट्रिक्टमधील सर्व फर्स्ट लेडीज/पती यांच्यासाठी दि. १९ ऑगस्ट रोजी ऑनलाईन  व्याख्यान झाले. त्यामध्ये शिल्पाने बागकाम आणि तत्सम गोष्टींबद्दल माहिती दिली.

 

10. रो. संजीव चौधरी याने ' डिजिटल लिटरसी' या विषयावर इनरव्हील क्लबच्या सभासदांसाठी दोन दिवसांचे प्रशिक्षण शिबीर ऑनलाइन घेतले.

 

11. पी डी जी दीपक याचे दै . पुढारी व संजय घोडावत युनिव्हर्सीटी यांच्या विद्यमाने ७ ऑगस्ट रोजी 'आय टी मधील संधी, आर्टीफिशिअल इंटेलिजन्स, डेटा अनालिसिस' या विषयावर विद्यार्थ्यांसाठी वेबिनार झाले.

 

12. पी डी जी  दीपकने उडुपी येथे रोटरी डिस्ट्रिक्ट ३१८२  'पब्लिक इमेज सेमिनार' या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थितांना संबोधित केले. याप्रसंगी ५०० होऊन अधिक लोक  उपस्थित होते.

13. रो. ऋजुता देसाई हिने १ ऑगस्ट ला DRM च्या मीटिंगमध्ये उपस्थितांना संबोधित केले

14. रो. ऋजुता देसाई हिला डिस्ट्रिक्टकडून गेल्या वर्षी A.G. असताना तिच्याकडे असणाऱ्या पाच क्लब मध्ये सभासद संख्येमध्ये भरघोस वाढ केल्याबद्दल पंचतारांकित पारितोषिक देण्यात आले. 

Minutes of Board Meeting

Second BOD of the year and BOD Meeting for the month of August was held in Hotel Raviraj on Saturday 28th August. The following business was transacted and discussions/decisions made :

 

Major points discussed

  • The BOD will be held on 4th Friday of every month henceforth.

  • We will be co-host for District Youth Seminar scheduled on 26th September with RCP Pride as host club.

  • Training of 10 teachers from our interact schools was organized by participating in District’s program.

  • Resignation of two members namely Mr. Vilas Bahulekar inducted on 4th Jan 21 & Mr. Manohar Paralkar inducted in June 2021 was presented before the Board and were approved. 

  • Average attendance in August month is about 70%.

  • Dates for Ekankika are finalized as 13th to 18th December and the invitee is sent on all district groups. Ashutosh Nerlekar will be directing our Ekankika.

  • Club picnic is planned on 19th & 20th September.

  • Board approved the proposal for the new member Mr. Sagar Tilak

  • Rtn Sanjeev appealed that members are required to download district mobile app and should register on RI website.

  • A puppet show will be organized for children in Ekalawya Nyas which is sponsored by Rtn Madhuri.

  •  PP Vrinda’s sister Mrs. Varsha Baijwal donated 1200 $ for projects at Ekalawya.

  • Teacher’s felicitation is planned on 6th September

  • Immunisation drive for TD & Rubella is scheduled at Sarthak. Seva Arogya Foundation clinics will be provided screens for securing privacy, especially while checking ladies.

  • Breast cancer awareness program is scheduled & the leaflets are printed.

  • Supply of Mask & Sanitisers for Rural police unit is planned.

  • It was decided to sponsor 200 subjects at Sanjeevani Hospital which is currently vaccinating construction workers and PP Anjali has agreed to coordinate. However, the aim is to do vaccination for at least 1000 subjects.

  • Dr. Ashish Jog, son of Dr. Smita, donated $1000.00 for medical

It was decided to provide Jaipur foot to at least 10 subjects, especially young girls /boys, from the list of BVP for this purpose and cost involved would be Rs.35000.

Projects of September

1) Covid vaccination to 200 individuals from lower strata

2) Donation of Jaipur foot to young females and males

3) Club picnic to Palmwood resort

4) Donation of screen partitions for OPDs run on wasri by Arogya Seva Foundation

5) Puppet show for children of Ekalawya

6) Food grain supply to Ekalawya

7) Foodgrain supply to Sarthak

8) Skill development activity at Apte School

Rtn. Dr. Shobha Rao

ऍन्स् प्रोजेक्ट - १२ ऑगस्ट - मेंदी

 

  • पूर्वीच्या काळी स्त्रियांचे घराबाहेर पडणे योग्य मानले जात नसे. फक्त ‘रांधा वाढा उष्टी काढा‘ हाच दिनक्रम असायचा. म्हणूनच त्या सणावारांच्या निमित्ताने बाहेर पडत. श्रावणाची तर त्या वाटच पहात असतील ना !

 

  • यंदा आम्हा बायकांची अवस्था कोरोनामुळे काहीशी अशीच झाली होता. कुठेही येणे जाणे नाही, गप्पा टप्पा नाही. म्हणूनच मेंदीला भरभरून प्रतिसाद मिळाला.

 

  • २८ जणींची हजेरी.खूपच धम्माल आली. हिरव्या रंगांच्या वेगवेगळ्या छटा प्रत्येकीच्या अंगावर पाहून मनाला तर प्रसन्न वाटलेच पण वातावरण पण बदलून गेले.

 

  • अंजली गोडबोलेने १ सुंदर गेम घेतला. अगदी सोप्पा पण बुध्दीला चालना देणारा. त्याची तयारी अंजलीने छानच करून आणली. ३ बक्शीसे पण दिली. प्रतिभाच्या घरी तिने सगळी व्यवस्था अगदी चोख केली होती. मेंदी काढून झाल्यानंतर प्रत्येक जण मेंदी काढलेला हात आनंदाने लहान मुलीसारखा एकमेकांसमोर मोरासारखा नाचवत होत्या.

 

  • मोदक, मटार-करंजी, मुगडाळ - साबुदाणा - पोहे याची पचडी, ओल्या खोबऱ्याची चटणी आणि वाफाळलेली कॉफी याने तृप्त झालेल्या सख्या पाहून कोरोनामुळे झालेला मैत्रीचा विरह किती सहन केला हे जाणवत होते.

 

  • प्रत्येकजण निरोप घेताना 'ए...खूप ‘मज्ज्ज्ज्ज्ज्जा आली’ असे एकमेकींना सांगत नवचैतन्य घेऊन गेल्या. पुढील कार्यक्रमाची वाट पहातो सांगत.

 

 ऍन. मीना इनामदार

साप्ताहिकी

1. 6th September - Teachers Day Felicitations.. We will be felicitating 3 teachers on 6th September

2. 13th September - Rtn President Sandeep Belwalkar - विनोदी कथाकथन - पुलंचं डायट आणि दीक्षित दिवेकर

3. 20th September - Picnic to Palmwoods Resort

4. 27th September - In-House talent from our Club. Artists - Rtn. Rahul Pendharkar, Ashish Nerlekar, Ann. Seema Mahajan

Rtn. Ashwini Ambike

औक्षवंत व्हा, सुखी व्हा  !

सप्टेंबर

०७ - नेहा पाठक

०९ - निरुपमा गोखले 

०९ - जयश्री नवाथे

१० - मीना चौधरी

१७ - दीपश्री साठे

२१ - भाग्यश्री पत्रीकर

२८ - प्रशांत जितुरी

२९ - रमेश भाटिया

२९ - अरुणा जितुरी

बर्थडे फेलोशिप लीडर सप्टेंबर २०२१

ऍन. निरुपमा गोखले 

सप्टेंबर सपोर्ट ग्रुप 

 

रो. पराग कापरे (लीडर)

ऍन. पल्लवी कापरे

रो. डॉ. अविनाश कुलकर्णी

रो. प्रताप गोखले

ऍन पल्लवी गोखले

रो. मानसी ओक

रो. प्रशांत जितुरी

ऍन. अरुणा जितुरी

शोक संदेश

 

पी. पी. उज्वल मराठे याचे श्वशुर आणि ऍन. सविता हिचे वडील डॉ. शिवदेव बापट यांचे २७ ऑगस्ट रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ईश्वर त्यांना सद्गती देवो

डिस्ट्रिक्टमधील घडामोडी

 

1. District Interact Assembly 2021

 

The success of the assembly is due to the team work and proper coordination between Interact Team, Host Clubs and their teams.

 

A competition was conducted on ‘Restoration of Ecosystem’. The team received overwhelming response for this competition. Rtn. Rajendrakumar Saraf took lot of effort to conduct this competition. Thanks to the Judges (Rtn. Anil Damle, Rtn.Manoj Phulambrikar, Rtn. Seema Deshpande, Rtn. Manjiri Shahane, Rtn. Sameer Shastri & Rtn. Rajendrakumar Saraf).

 

Technical team avenue secretary Rtn. Sameer Mohire Rtn Rajendra Erande and Rtn. Anand Mahurkar was at their best.

 

Host clubs (RC Baramati, RC Daund, RC Khopoli, RCP Metro and RCP Karvenagar worked very hard along with District Interact Committee and could mobilise good Registrations. The team needed to work on, how to get maximum viewership.

 

Interact team ( Rtn. Jayashree Deshpande, Rtn. Rajendrakumar Saraf, Rtn. Shreekant Joshi, Rtn. Pradnya Rajopadhye worked very well till the last minute.

 

Divakaran Pillai has always mentored and guided the team and till the last moment and boosted the morale of the team.

 

The backbone of the youth team Director Gauri Shikarpur was always available in all situations.

2. The District Cultural Committee has organised two competitive programs in September-

 

Savan ka Mahina – a music and dance competitions for ladies only

Rotary sahitya Gaurav – a story and Poetry competition

 

The pamplets are enclosed fro more information.

WhatsApp Image 2021-09-05 at 7.50.11 PM.jpeg
WhatsApp Image 2021-09-05 at 7.50.12 PM.jpeg
Women in Rotary.jpg

रोटरी जगताचा कानोसा

Women in Rotary -  PDG Dr Deepak Shikarpur

 

Dr Sylvia Whitlock  (1st woman Rotarian) with Jennifer Jones (1st woman RI President)

Our Global membership of 1.2 Million has 22% lady members. This also means that had they not joined, RI membership figure would be under 1 Million. Many don’t know that women had to struggle a lot to join Rotary (even though they had classification or profession). Until 1989, the Constitution and Bylaws of Rotary International stated that Rotary club membership was for males only.

In 1978, the Rotary Club of Duarte, California, USA, invited three women to become members. The RI Board withdrew the charter of that club for violation of the RI constitution. The club brought suit against RI claiming a violation of a state civil rights law that prevents discrimination of any form in business establishments or public accommodations. The appeals court and the California Supreme Court supported the Duarte position that Rotary could not remove the club's charter merely for inducting women into the club. The United States Supreme Court upheld the California court indicating that Rotary clubs do have a "business purpose" and are in some ways public-type organizations.

This action in 1987 allowed women to become Rotarians in any jurisdiction having similar "public accommodation" statutes. In October of 1987, the Rotary Club of Angels-Murphys D5220 inducted three women and in spite of threats to quit Rotary by some of the older male members - none did. Two of these three women went on to lead the A-M Rotary Club as president and one those has just completed over two years as charter president of the Angels Camp Centennial Rotary Club (a club which which is very proud of its 50% female membership). The RI constitutional change was made at the 1989 Council on Legislation, with a vote to eliminate the "male only" provision for all of Rotary. Since that time, women have become members and leaders of clubs and districts throughout the world. Sylvia Whitlock was the first woman officially admitted in Rotary. Rotary provides ordinary women the opportunity to do extraordinary things.  Working together with like-minded women and men they expand and build on existing strengths with the benefits of diversity to improve the lives of individuals and communities in a way consistent with the RI Strategic Plan.

 Women have always had an influence in Rotary right from the contribution of Jean Thompson, Rotary's Founder Paul Harris's wife, who is often stated as being "the power behind the Rotary 'throne' .Our club has many lady members and some have become Club Presidents as well.   IPDG Rashmi Kulkarni was first lady District Governor of RID 3131 and now DGN Manju Phadke will lead RID 3131 in 2022-23 .

Rtn. Dr. Deepak Shikarpur

Rotary International President Shekhar Mehta had a great meeting with the Prime Minister Hon'ble Narendra Modi. Discussed development issues where Rotary can work with the Govt.

WhatsApp Image 2021-09-03 at 10.16.54 PM.jpeg
Gordon R. McInally nominated as R.I. President 23-24
Gordon-McInally-AUG-2021.jpg

Gordon R. McInally, a member of the Rotary Club of South Queensferry, Lothian, Scotland, is the selection of the Nominating Committee for President of Rotary International for 2023-24. He will be declared the president-nominee on 1 October if no challenging candidates have been suggested.

McInally lauded Rotary’s ability to adapt technologically during the COVID-19 pandemic, saying the approach should continue and be combined with the best of our past practices as Rotary seeks to grow and increase engagement.

 

“We have learned there is a willingness within communities to care for one another,” he says, “and we must ensure that we encourage people who have recently embraced the concept of volunteering to join us to allow them to continue giving service.”

McInally says that senior leaders’ ability to communicate directly with club members online will be one positive legacy of the changes Rotary has had to make. But, he adds, “face-to-face meetings remain important, as they encourage greater interaction.”

The best way to increase membership is engagement, according to McInally. To better support clubs, he says, Rotary International, regional leaders, and district teams all need to engage with them. Engagement through social media will reinforce Rotary’s brand and showcase the opportunities that come with it. And, he says, engagement with governments, corporations, and other organizations will lead to meaningful partnerships.

 

With better engagement, McInally says, “We will grow Rotary both by way of membership and in our ability to provide meaningful service.”

 

He adds, “Membership is the lifeblood of our organization. I would encourage the use of the flexibility now available to establish new-style clubs that would appeal to a different demographic.”

 

McInally, a graduate of dental surgery at the University of Dundee, owned and operated his own dental practice in Edinburgh. He was the chair of the East of Scotland branch of the British Paedodontic Society and has held various academic positions. He has also served as a Presbytery elder, chair of Queensferry Parish Congregational Board, and commissioner to the church’s general assembly.

 

A Rotary member since 1984, McInally has been president and vice president of Rotary International in Great Britain and Ireland. He has also served Rotary International as a director and as member or chair of several committees. He is currently an adviser to the 2022 Houston Convention Committee and chair of the Operations Review Committee.

 

McInally and his wife, Heather, are Major Donors and Benefactors of The Rotary Foundation. They are also members of the Bequest Society.

Rtn. Dr. Deepak Shikarpur

Rotary Information

 

September is Basic Education and Literacy Month

 

Rotary’s goal is to strengthen the capacity of communities to support basic education and literacy, reduce gender disparity in education, and increase adult literacy. Rotary supports education for all children and literacy for children and adults.

 

More than 100 crores people over the age of 15 are illiterate. That is around 17% of the world’s adult population.

 

There are many ways to carry out a project that will improve education and literacy including Teacher Training, curricular development, adult literacy, water and sanitation in schools and girls education.

 

Kofi Annan, Former Secretary-General of the United Nations says Literacy is a bridge from misery to hope. It is a tool for daily life in modern society. Literacy is a platform for democratisation and a vehicle for the promotion of cultural and national identity. Especially for girls and women. It is a agent of family health and nutrition. For everyone, everywhere, literacy is, along with education in general, a basic human right.

 

Rtn. Yashwant Gokhale

आवाहन

एकांकिका स्पर्धा

मित्र मैत्रिणींनो,

डिसेंबर ते १८ डिसेंबर एकांकिका स्पर्धेची तारीख जाहीर झालेली आहे .त्यामध्ये आपला क्लब भाग घेणार आहे. एकांकिकेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी माझ्या व्यक्तिगत नंबर वर संपर्क साधावा. या वर्षीचे आपले दिग्दर्शक आशुतोष नेर्लेकर आहेत. ते कलाकारांची निवड करतील. धन्यवाद.

 

ऍन. सीमा महाजन

w0262_1s_Watercolor-Floral-Pattern-Wallpaper-for-Walls-Pastel-Flowers_Repeating-Pattern-Sa
Lalit Vibhag.png
image.jpg

हस्त सामुद्रिक शास्त्र

 

  •  हातावरील रेषा एक सारख्या सरळ स्वच्छ व नितळ असाव्यात. हाताच्या मानाने त्यांची रुंदी असावी. रेषे मध्ये कुठेही खंड , तुटकपणा, साखळी नसावी .तांबूस व उठावदार रेषा व्यक्ती उत्साही व आनंदी असते, अस्पष्ट व काळसर रेषा नसाव्यात.

  • व्यक्तीचा डावा हात तो जन्मजात काय घेऊन आला आहे ते दर्शवतो व उजवा हात तो काय कर्म करून मिळवणार हे दर्शवतो. दोन्ही तळहातावरील रेषा मधील फरक नीट तपासावा.

  • स्त्री किंवा पुरुष यांचे दोन्ही हात पहावे. स्त्रियांचा डावा हात पहावा असे पूर्वी होते पण आता स्त्रिया स्वतंत्रपणे पुरुषांच्या बरोबरीने किंवा कधीच कधी त्यांच्या पेक्षा जास्त कर्तबगार असतात त्यांचा सुद्धा उजवा हात महत्त्वाचा ठरतो.

  • जुळ्या मुलांच्या बाबतीत डावखुरे पणा बऱ्याच वेळेला अनुभवास येतो .    

  • तळहातावर अनेक रेषांचे जाळे नसावे.  उगाचच काळजी करणाऱ्यांच्या हातावर अशा रेषा दिसून येतात .

  • कोणीही भविष्य सर्वांसमोर विचारू नये व कोणीही ते सांगू नये सांगणाऱ्याची पंचाईत होते.

  • मरण कधी येईल ते कदापि कोणी विचारू नये व ते कोणी सांगू नये. परमेश्वराने काही नाड्या आपल्या हातात ठेवले आहेत.

  • भविष्यावर पूर्णपणे अवलंबून राहू नये. त्याला कर्तुत्वाची पण जोड असावी तरच यश प्राप्त होते. भविष्य हे एक गाईडलाइन म्हणूनच पाहावे. आयुष्यातील मोठे निर्णय घेण्याआधी सध्याची वेळ अनुकूल आहे की प्रतिकूल ते पहावे नोकरीधंदा ,विवाह, आजारपण शिक्षण, प्रॉपर्टी ,परदेश गमन इत्यादी विषयी महत्त्वाचे निर्णय घेताना ज्योतिषाचा आधार घ्यायला काही हरकत नसावी .

  • हातावरील नखे सुद्धा प्रकृतीच्या विषयी तक्रारी दर्शवतात. नखांवर आलेले पांढरे ठिपके अशक्तपणा दर्शवतात. जसजशी प्रकृती सुधारते तसे पांढरे ठिपके नाहीसे होतात.

  • हातावरील बोटे सुद्धा महत्त्वाची ठरतात. बोटांची लांबी, त्यातील पेरांची वाढ, त्यातील अंतर इ. गोष्टी सुद्धा बऱ्याच गोष्टी दर्शवतात.

  • भागात रेषांविषयी अधिक सविस्तर माहिती जाणून घेऊ या 

 

रो. अशोक गाडगीळ

साज शृंगार

हस्ताभूषणे

कंकण आणि बांगडी खरं म्हणजे एकच वस्तू. परंतु कंकण बांधणे आणि बांगड्या भरणे यांच्या अर्थात खूपच भिन्नता आहे, विरोधाभास आहे. 'कंकण बांधणे' हे पराक्रमाचे लक्षण समजले जाते आणि भ्याडपणा सूचित करण्यासाठी 'बांगड्या भरणे' हा शब्दप्रयोग वापरला जातो.कंकणाचा जन्म जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी झालेला आहे.

 

कंकण म्हणजे मंडण, करभूषण सूत्र होय.हातातील वलयाच्या खाली कंकण घालीत. कंकण हे करभूषण असून ते सोने, चांदी, पितळ इत्यादी धातू आणि काच, शंख, प्लास्टिक वगैरेचेही करतात.व्युत्पत्ती कोशात कंकणाचा अर्थ 'हातात बांधावयाचे सूत्र, वलय, काकण असा आहे. धार्मिक विधी समाप्त करण्याआधी जबाबदारी पत्करल्याचे चिन्ह म्हणून सुद्धा सुताचे कंकण बांधीत. एखाद्या विक्रमाची सुरुवात हातात मनगटात सुताचे कंकण बांधून करण्याची पूर्वी प्रथा होती.विवाहात कंकण भरण्याला दोन अर्थ आहेत. एक म्हणजे विवाहाच्या बंधनाची खूण. दुसरा अर्थ म्हणजे विवाहाच्या जबाबदारीची जाणीव. यावरून सुरुवातीचे कंकण सुताचे होते हे स्पष्ट होते. धाग्याचे कंकण लवकर खराब होत असल्याने अधिक दिवस टिकणारे निरनिराळ्या वस्तूची कंकणे अस्तित्वात आली असावीत.धाग्याचे कंकण विशिष्ट कार्यपूर्तीसाठी पुरुषही वापरीत.

 

भारतीय स्त्रिया फार प्राचीन काळापासून कंकणे वापरीत आल्या आहेत. मोहेंजोदारो येथील उत्खननात मिळालेल्या एका स्त्रीच्या हातात कोपरापर्यंत कंकणे घातलेली आहेत.शुभ कालातील चुलकोला, सुदर्शना, चंदा इत्यादी यक्षिणी मूर्तींच्या हातात कंकणे आढळतात. सांची येथील स्त्री चित्रात गांधार मूर्ती कलेत तसेच अजंठा गुंफेतील मूर्तीच्या हातात कंकणे दिसतात. बाणाच्या कादंबरीत सरस्वतीने शंखाची कंकणे धारण केल्याचा उल्लेख आहे. मध्ययुगातील संस्कृत साहित्यात कंकण हा वारंवार उल्लेख येतो. सीता परिणय प्रसंगी श्रीरामचंद्र कंकण-मोचनार्थ अंतःपुरात गेले असे एका संस्कृत कवीने तत्कालीन रीतीचा परिचय करून देताना म्हटलेले आहे. मात्र हे कंकणधाग्याचे की सोन्याचे हे मात्र या ठिकाणी स्पष्ट होत नाही.

                

जबाबदारीचे द्योतक म्हणून जरी कंकणाची सुरुवात झाली असली तरी कालांतराने सौंदर्य वर्णन अलंकार म्हणून कंकणाकडे पाहण्यात येऊ लागले. आदिवासी स्त्रिया कोपरापर्यंत कंकणे घालतात. बंगाली स्त्रिया पहिल्यांदा पतीगृही जाताना वडिलांनी दिलेल्या शंखाची कंकणे घालतात. सौभाग्य-अलंकार म्हणून लग्नात एक लोहाचे कंकण वधूला दिले जाते. काही ठिकाणी त्यावर चांदीचे पाणी (प्लेटिंग) दिले जाते. हे लोहकंकण विवाहित स्त्री डाव्या हातात घालते त्यामुळे पतीवर कसलाही वाईट प्रसंग येत नाही असा समज आहे. फार प्राचीन काळापासून ही प्रथा चालत आली आहे.

   

गुजरातेत विवाहित स्त्रिया 'खरक' म्हणजे रंगवलेल्या बांगड्या वापरतात. लग्नप्रसंगी त्या त्यांना पित्याकडून भेट मिळालेल्या असतात. राजस्थानात लाखेचे चुडे वापरण्याची प्रथा आहे. लाखेवर सोनेरी कागद लावून कंकण नक्षीच्या दाबात घालून त्यावर कलाकुसर केलेले असते. लग्नापूर्वी वधूला भरण्यात येणाऱ्या काकणांना महाराष्ट्रात लग्नचुडा असे म्हणण्यात येते. आपला चुडा वज्राचा असावा त्यामुळे आपले सौभाग्य अभंग राहावे अशी सुवासिनींची इच्छा असते. त्यासाठीयासंबंधी अनेक प्रांतात लोकगीते गायली जातात. हे मराठी लोकगीत महाराष्ट्रात पूर्वी गात असत.

 

देई देवा मज । देशील तितुके पुरे ।

अक्षय माझे चुडे।जन्मबेरी।।

देवाच्या देऊळी। उभी मीजागते ।

आयुष्य मागते। चुडे यांना ।।

 

कंकणाला सौभाग्यचिन्हात महत्त्वाचे स्थान आहे. ते सर्व प्रांतात वापरले जातात. आता तर परदेशातील स्त्रिया पण घालू लागल्या आहेत. विवाहात ते आवश्यक असते तरी कुमारिकाही त्याचा वापर करतात. दक्षिण भारतात सोन्याच्या बांगडयांवर रंगीत खडे, हिरे व मीना काम करतात. मुसलमानात लग्न नक्की झाल्यावर नवरा मुलगा वधूच्या हातात बांगड्या भरतो.

 

प्राचीन बंगाली साहित्यात शंखाच्या चुड्याची बरीच वर्णने आहेत. चुडे काढण्या-घालण्याच्या सोयीसाठी त्यांना खिळा असल्याचाही उल्लेख सापडतो. महाराष्ट्रातील जुनी बांगडी उत्तर भारतातील अनेक जातीच्या बांगड्या प्रमाणे काशाची असावी असे ज्ञानकोशकारांचे मत आहे. बांगड्यांचाधंदा करणाऱ्या वर्गास मराठीत 'कासार' म्हणतात. कास्यकार म्हणजेचकासार हा शब्द बांगडीच्या व भांड्यांच्या धंद्यांना चिकटला असावा.

         

सोन्याच्या बांगड्या हातात घालण्यात बायकांना मोठेपणा वाटतो. अली'कडे सोन्याच्या बांगडयांचे कितीतरी डिझाइन्स निघाले आहेत. मध्यंतरी मनगटी घड्याळ्याच्या आगमनापासून स्त्रियांत बांगड्यांचा वापर कमी झाला होता. परंतु आता पुन्हा बांगड्याची आवड निर्माण झाली आहे. आता तर पोकळ बांगड्या कमी वजनात करतात.निरनिराळी फॅन्सी डिजाइन्स, उत्तम कलाकुसर, रुंद व अरुंद तसेच जाळीदार व मीनाकाम खडे, मोती, पोवळे याचा योग्य वापर करून त्यांचेस्वरूप आकर्षक केले गेले आहे. तसेच हिऱ्याच्या बांगड्या, ब्रेसलेट, पेंडेंट, टॉप हे सर्व मॅचिंग पाचू, माणिक घालून करण्याची प्रचंड आवडस्त्रियांमध्ये निर्माण झाली आहे.

                                         

रो. राजाभाऊ वाईकर

WhatsApp Image 2021-09-04 at 4.45.15 PM.jpeg
WhatsApp Image 2021-09-04 at 4.45.14 PM.jpeg
Gokhale Pratibha Yashwant.jpg

होम मेकर्स आणि बरंच काही

 

'अस्सल पुणेकर' - प्रतिभा

 

पुणेकरांना नावं ठेवणारे लोक पैशाला पासरी आहेत! पुणेकर म्हणजे शिष्ट, पुणेकर म्हणजे स्वतःला शहाणे समजणारे, पुणेकर म्हणजे दुसऱ्यांचा अपमान सहजरित्या करणारे वगैरे वगैरे. पण खरी गोष्ट अशी आहे की अस्सल पुणेकरांमध्ये हे (अव)गु़ण औषधाला सुद्धा सापडत नाहीत! उदाहरणार्थ आपली प्रतिभा गोखले.

 

प्रतिभा चा जन्म पुण्यात, प्रतिभावाढली पुण्यात, तिचं लग्न झालं पुण्यात, तिचं माहेर पुण्यात, तिचं आजोळ पुण्यात, तिचं सासर पुण्यात आणि तिचं स्वतःचं वास्तव्यही उणीपुरी ६५ वर्ष पुण्यातच. म्हणजे प्रतिभा अस्सल पुणेकर ना! पण तिच्यात तर वर सांगितलेले (अव)गुण आपल्याला कधी दिसले का? नाही. कधीच नाही. असो!

तर प्रतिभा पुण्यातली. पुण्याच्या अगदी मध्यवर्ती अशा टिळक स्मारक मंदिरासमोरच तिचं माहेर. आजी-आजोबा, काका-काकू, आई-वडील आणि सख्खे चुलत मिळून सहा भावंडं अशा एकत्र कुटुंबात वाढलेली सर्व भावंडात थोरली. त्यामुळे समजुतदारपणाने आणि धाकट्यांच्या कलाकलाने घेत सगळ्यांशी जुळवून घेत त्यांना हवी ती मदत करत अशी प्रतिभा लहानाची मोठी झाली. तिचं माहेर सधन आणि सुधारक. आजी-आजोबा तर आयुष्याची बरीच वर्ष आफ्रिकेत राहिलेले. आजोबा खूप हौशी पण तेवढेच शिस्तीचे. त्यामुळे प्रतिभाचे लहानपण अगदी सर्व बाबतीत मजेत जात असतानाच आजोबा आणि तिची आई यांच्या कडक शिस्तीत ही भावंडं लहानाची मोठी झाली.

प्रतिभाने बीएमसीसीतून बी कॉमची पदवी घेतली. तेही दोन विषयात - अकाउंटन्सी आणि कॉस्टिंग. पदवी हातात आल्यावर तिला आपण छान नोकरी करावी असं वाटू लागलं. तिने बँकेच्या परीक्षा दिल्या आणि तिला बँक ऑफ इंडियाने नोकरीही देऊ केली. प्रतिभाला नोकरी करायला घरातून विरोध होण्याची शक्यता तिच्या स्वप्नातही नव्हती. कारण प्रतिभाच्या आईने तिच्या लग्नानंतर एम.ए.एम.एड. आणि पी.एच.डी. केलं. तेही शाळेतली आणि मग कॉलेजची नोकरी सांभाळून. त्यामुळे प्रतिभाला नोकरी करायला परवानगी मिळेल याची खात्री होती. पण तिच्या वडिलांनीच तिला नोकरी करायला नकार दिला आणि प्रतिभाने तो शांतपणाने स्वीकारला. पण ती स्वस्थ बसली नाही. तिने कर्वे इन्स्टिट्यूटचा एक वर्षाचा सोशल वर्क संबंधीचा कोर्स पूर्ण केला. तसंच या काळात ती शिवणही शिकली. जर्मन भाषेचाही कोर्स तिने केला. पण योगायोग असा की सोशल सर्विस कोर्सच्या परीक्षेच्या आधीच तिचं लग्न ठरलं आणि परीक्षेच्या तारखा पुढे ढकलत ढकलत जाऊन नेमक्या तिच्या लग्नाच्या दिवशीच परीक्षेची तारीख ठरली. पण त्या काळात तिच्या माहेरी आणि सासरी कोणीच तिला परीक्षेला पाठवायचा विचारही केला नाही आणि प्रतिभा परिक्षेला जाण्याऐवजी लग्न करून गोखल्यांच्या घरी दाखल झाली. गोखल्यांच्या घरी सासू सासरे, दोन जावा, दोन दीर असे एकत्र कुटुंब. इकडे मात्र प्रतिभा सर्वात धाकटी सून होती. इथेही तिचे सासरे खूपच कडक होते. लग्नानंतर प्रतिभाने शिकायला जाणे, परीक्षा देणे त्यांना मान्यच नव्हतं. त्यामुळे प्रतिभा लग्नानंतर घरातल्या कामात आणि तिच्या सणवारात बुडून गेली. दरम्यान तिची मोठी मुलगी मेघना हिचा जन्म झाला .दीर जावा वेगळे राहू लागले. सासू-सासरे ही खालच्या मजल्यावर राहू लागले. तेव्हा प्रतिभाने घरचं सांभाळून एक्स्टर्नल एम कॉम पूर्ण केलं. तिच्या मनात यशवंतरावांच्या व्यवसायात मदत करावी अशी कल्पना आली. त्यांनीही ते मान्य केलं आणि प्रतिभा त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊ लागली. पण दिरांचे घर वेगळे झाले असले तरी त्यांचा घरातल्या सर्वांवरच मोठा भाऊ म्हणून खूपच दरारा होता. प्रतिभाने त्यांच्या ऑफिसात येण्याविषयी त्यांनी खूप नापसंती दर्शवली. किंबहुना रोज त्यांची नापसंती बघून त्या वातावरणात तिला काम करणं नकोसे वाटे. पर्यायाने तिचं यशवंतरावांच्या ऑफिसात जाणं बंद झालं .बँकेची नोकरी काय आणि घरच्या व्यवसायात लक्ष घालणं काय दोन्ही वेळेला घरातल्या वडीलधाऱ्यांचं ऐकण्याच्या स्वभावामुळे प्रतिभाला दोन्ही संधी गमवाव्या लागल्या. त्यानंतर नंदिताचा जन्म झाला. घरात सासूबाई आजारी झाल्या आणि त्यांचं करण्यात प्रतिभा बुडून गेली .

वास्तविक प्रतिभाने लग्नापूर्वी आईकडे गाण्याचं शिक्षण घेतलं होतं. गोडसे व्हायोलिन क्लासमध्ये पाच वर्ष व्हायोलीन वादनात शिक्षण घेतलं होतं. शाळेत वक्तृत्व स्पर्धेत प्रत्येक वेळी बक्षिसं मिळवली होती. शिवण तर ती खूपच शिकली होती. भरत काम शिकली होती.

पुढे तिच्या मुलींच्या शाळेतल्या शिक्षकांनी प्रतिभाचे गुण, तिची हुशारी जाणली होती. त्यांनी तिला त्यांच्या शाळेतल्या कच्च्या मुलींना शिकवाल का म्हणून प्रतिभाला गळ घातली आणि प्रतिभा फावल्या वेळी त्या मुलींना गणित इंग्रजी शिकवू लागली. तसंही प्रतिभाला अध्यापनाची मनापासून आवड होती. अभ्यासातल्या शिस्तीचं तर तिला आईकडून बाळकडूच मिळालेलं होतं. त्यामुळे मुलींना शिकवण्याचं काम ती मनापासून करू लागली. यातूनच पुढे परिचितांनी वेळोवेळी गळ घातल्याने त्यांच्या मुलांसाठी प्रतिभा दुपारी घरी ट्युशन्स घेऊ लागली आणि हा सिलसिला चक्क थोडीथोडकी नव्हे तर तब्बल १७ वर्ष चालू राहिला. मुलांना अभ्यासाचं टाईम टेबल करून देण्यापासून ते कोणता अभ्यास कोणत्या वेळी करायचा इथपर्यंत ती मार्गदर्शन करत असे. तिच्या अध्यापनातील हातोटीचा आणि शिस्तीचा तिच्याकडे येणाऱ्या साऱ्या मुलांना खूप फायदा झाला. याविषयी त्यांचे पालक अजूनही तिला वेळोवेळी सांगतात. या ट्युशन्समुळे नोकरी करायला मिळाली नाही याची खंत थोडीतरी कमी झाली हे नक्की, असं प्रतिभा बोलून दाखवते. या १७ वर्षात तिला मुलांचे आणि पालकांचे अनेक नमुने बघायला मिळाले. तसं तर प्रतिभा म्हणते, "माहेरी आणि सासरी एकत्र मोठ्या कुटुंबामुळे आधीच मला माणसांचे काही नमुने बघायला मिळाले होते आणि अशा माणसांबरोबर निभावून नेण्याची मला सवय झाली होती". असं असलं तरी प्रतिभाला माणसांची खूप आवड आहे. तिला लहानपणापासून अनेक मैत्रिणी आहेत आणि त्या वेगवेगळ्या टप्प्यातल्या मैत्रिणींची तिची मैत्री आजतागायत टिकून आहे. प्रतिभाला खाण्यापिण्याची आवड आहे, फिरण्याची आवड आहे. त्यामुळे मैत्रिणींबरोबर तिचे सतत काही कार्यक्रम चालू असतात. शिवाय सासर आणि माहेर, तिकडचे गोतावळे ही खूप मोठे. त्यामुळे दोन्हीकडचे घरगुती कार्यक्रम चालू असतातच. प्रतिभाचा शांत आणि सौम्य स्वभाव, समोरच्याला विरोध न करण्याची वृत्ती, तसेच दुसऱ्याचं ऐकून घेण्याची सवय त्यामुळे अनेक जणींबरोबर तिची मैत्री राहते. अनेक जणी तिच्याकडे आपलं मन मोकळं करत असतात. कारण बोलणारीची पाठ वळली की तिला नावं ठेवण्याचा किंवा तिची गुपितं इतरां जवळ बोलण्याचा प्रतिभाचा स्वभावच नाही.​

अशा प्रकारे प्रतिभाला लोकांमध्ये वावरणं खूप आवडत असलं तरी ती 'प्रायव्हेट पर्सन' प्रकारातच मोडते असं मला वाटतं. मैत्रिणी तिच्याशी मन मोकळं करत असल्या तरी ती कोणत्या मैत्रिणींबरोबर स्वत:चं हितगुज करते ते तिलाच माहित! शिवाय कोणाविषयी तिच्या मनात कधी विरोध नसतो असं नाही. तिला राग येत नाही असंही नाही. पण यातलं काहीच ती सहसा दाखवत नाही. समोरच्याचं पटलं नाही तरी ती प्रखरपणे विरोध करत नाही. पण प्रसंगी ती पुरेशी कणखर बनू शकते असा तिचा स्वानुभव आहे. तिची वृत्ती  सदैव सकारात्मकतेची आहे. कोणाच्याही चांगल्या गोष्टींचं कौतुक करायला तिला आवडतं. पण तेव्हाच ती खूप चोखंदळही आहे. मग गोष्ट कपड्यांची असेल, खाद्यपदार्थांची असेल नाहीतर राहत्या घराच्या जागेबद्दल असेल. तिला गोष्टी पसंत पडेपर्यंत तिची थांबायची तयारी असते. प्रतिभाला दुसऱ्याकडून काम करवून घेणं जमत नाही. तिच्यावर सोपवलेलं काम मात्र प्रसंगी तिला कितीही त्रास झाला तरी ते पूर्णत्वाला न्यायचच असा तिचा खाक्या आहे.

तर अशीही आपली अस्सल पुणेरी प्रतिभा !

पुण्याच्या लोकांना सर्वसाधारणपणे पुण्याबाहेर राहायला फारसा आवडत नाही पण प्रवासाची आवड असलेल्या प्रतिभाला आज-काल अमेरिकेत राहायला आवडू लागलंआहे. अर्थात ते तिच्या मुली तिथे आहेत म्हणून. पण आपण आशा करूया की ही अस्सल पुणेकर पुण्यातच राहील आणि आपल्याला तिच्या मैत्रीचा लाभ देत राहील.

ऍन. सरिता  भावे

iron.png

वरील वर्णनावरून आपल्या हे लक्षात येईल की लोहाचे सेवन वाढवण्यासाठी खालील गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

  • बाजरीमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्याने ज्वारी + बाजारी अशा मिश्र पिठाची भाकरी करावी. तसेच पारंपारीक भाजणी करतो त्यात सुद्धा मुख्य बाजारीच असते. त्यामुळे भाजणीच्या पिठाची थालीपीठे विशेषकरून त्यात कोथिंबीर, मेथी, पालक अशा पालेभाज्या घातल्यास लोहाची पातळी वाढवता येते. ह्याशिवाय पोहे, चुरमुरे, राजगीरा ह्यामध्ये लोह जास्त असल्याने न्याहारीसाठी अनेक पदार्थ करता येतील.

  • पुन्हा एकदा असे दिसे की गडद चॉकलेटी रंगाच्या कडधान्यांत लोहाचे प्रमाण जास्त असल्याने त्यांच्या उसळी कराव्यात व करताना त्यात टोमॅटो वापरला तर लोहाचे शोषणसुद्धा वाढवता येईल.

  • पाल्येभाज्या ह्या स्वस्त आणि मस्त असा लोहाचा स्त्रोत असल्याने रोजच्या आहारात त्याचा समावेश हवाच.

  • पालेभाजीचे सूप, सुकी पीठ पेरून भाजी, वरणात घालून आमटी, कणकेत घालून पराठे अशा अनेक रूपात त्याचे सेवन करू शकतो. परत पराठ्यांबरोबर दहीच हवे म्हणजे शोषण तर वाढतेच शिवाय कॅल्शियम आणि B12 मिळण्यासारखे जास्तीचे फायदे होतात. पालेभाजीची लिंबू पिळून केलेली पचडी (म्हणजे कोशिंबीर) हा तर सर्वात चांगला लोह मिळवण्याचा राजमार्ग आहे. विशेषत: कांदापात, मेथी, शेपू, पालक, नवलकोल, फ्लॉवर, बीट, मुळा वगैरे कंदमुळांची पाने, शेवग्याची पाने, कोवळा हरभर्‍याची पाने ह्यांचा विचार करावा.

  • शक्य तिथे साखरे ऐवजी गूळाचा वापर करावा. कोणत्याहि लाडवात जाड पोहे भाजून पूड करून, सुके खोबरे भाजून चुरुन असे वापरल्यास लोहाचे प्रमाण वाढते.

  • हिरव्या चटण्यांमध्ये लिंबू जरूर पिळावा. कडीपत्त्यातील लोहाचा वापर होण्यासाठी त्याची चटणी -करावी. काराळ्याची चटणी सुद्धा खूप लोह देते.

  • फळांमध्ये स्ट्रॉबेरी, अननस, डाळींब, पीच, पेरु, सिताफळ, कलींगड ह्यात लोहाचे प्रमाण जारी  कमी असले तरी ‘क’ जीवनसत्व भरपूर असल्याने त्या लोहाचे चांगले शोषण होते.

  • सुक्या मेव्यापैकी खजूर, खारीक, मनुका ह्यांना प्राधान्य द्यावे.

 

रो. डॉ. शोभा राव

आरोग्यवर्धिनी

 

लोहाचे (Iron) ‘महत्व’

लोह हा शरीरातील दूसरा महत्वाचा क्षार आहे परंतु त्याचा शरीरातील साठा कॅल्शियमच्या मानाने खूपच कमी म्हणजे फक्त 300 mg स्त्रियांमध्ये तर 1000 mg पुरुषांमध्ये एवढाच असतो. हयापैकी 30 टक्के भाग हा यकृत, अस्थिमज्जा, प्लीहा व मेंदू ह्या इंद्रियांमध्ये साठवलेला असतो. तांबड्या रक्तपेशींमधील हिमोग्लोबीन नावाच्या घटकात हा मुख्यत्वे करून असतो आणि फेरीटीन च्या रूपात साठवलेला असतो. त्यामुळे सिरम फेरेटीन हा शरीरातील लोहाच्या साठयाचा दर्शक समजला जातो. याला आपण 'लोहाची गरज' असे नाव देऊया.

रक्तातील Hb हे स्त्रियांमध्ये 12 च्या वर असावे तर पुरुषांमध्ये ते 14 च्या वर असले पाहिजे. लोहाच्या कमतरतेने हिमोग्लोबिन कमी होते आणि त्याला ॲनिमिया किंवा रक्तक्षय असे म्हणतात.  ॲनिमिया हा सर्व वयोगटात, स्त्री व पुरुष यांच्यात, श्रीमंत व गरीब वर्गात किंवा जाड अथवा हडकुळ्या व्यक्तीत सुद्धा दिसतो. म्हणजेच इतर गोष्टींपेक्षा आहाराशी याचा जास्त जवळचा संबंध आहे. थंडी तापासारखी लक्षणे ॲनिमियाची दिसत नाहीत. त्यामुळे बऱ्याच स्त्रिया तो अंगावर काढून कामे करत राहतात.  ॲनिमियामुळे लहान मुलांच्या वाढीवर परिणाम तर होतोच पण स्मरणशक्तीवर होणाऱ्या परिणामामुळे अभ्यासावरही परिणाम होतो. ॲनिमियामुळे येणाऱ्या थकव्याने मुलांचा खेळात पण सहभाग कमी होतो. गरोदरपणातील अॅनिमिया ने कमी वजनाचे बाळ जन्माला येते. पुरुषांमध्ये क्रिया शक्ती कमी होते व त्याचा उत्पादकतेवर परिणाम होतो. असे असंख्य परिणाम ॲनिमियामुळे होऊ शकतात. म्हणूनच लोहाचे महत्व जाणून घेणे गरजेचे आहे.

शरीराला प्राणवायूचा पुरवठा करणे हे ह्याचे महत्वाचे काम असून रोगप्रतिकारक शक्तिसाठी पण अत्यंत उपयोगी आहे. त्याचप्रमाणे स्मरणशक्ति, त्वचा, केस व नखे हयांना सशक्त ठेवणे इत्यादि अनेक कामात त्याचा सहभाग असतो.

 

कॅल्शियम प्रमाणेच हयाचे शोषण लहान आतड्याच्या सुरवातीच्या भागात होते परंतु त्याचे प्रमाण, विशेषत: वनस्पतिजन्य पदार्थांमधून मिळणार्‍या लोहाचे, अत्यल्प म्हणजे 7 ते 10 टक्के इतकेच असते. हे शोषणाचे प्रमाण आम्लीक वातावरणात जास्त वाढते. त्यामुळे जेवताना लिंबूची फोड खाणे महत्वाचे आहे. मांसाहारी पदार्थांपासून मिळणार्‍या लोहाचा दर्जा चांगला असून त्याचे शोषणहि जास्त प्रमाणात होते (30 ते 35 टक्के). त्याला हिम आर्यन असे म्हणतात. तर वनस्पतीजन्य पदार्थातून मिळणार्‍या लोहाला नॉनहिम आर्यन असे म्हणतात.

लोहाचे अतिसेवन झाल्यास ते दाहक ठरते. कारण इतर क्षारांप्रमाणे ते किडणीमार्फत बाहेर टाकले जात नाही. त्यामुळे पोटात दुखणे, मळमळ, उलट्या किंवा यकृत अथवा मेंदूला धोका उदभवू शकतो. ह्या उलट लोहाच्या कमतरतेने अत्यंत थकवा, पांढुरकेपणा, डोकेदुखणे, केस गळणे, पायावर सूज येणे आणि श्वास कमी पडणे अशी लक्षणे दिसतात. हया क्षारांची कमतरता हि सर्वात मोठी समस्या असून स्त्रीयांमध्ये तिचा प्रादुर्भाव खूप जास्त आहे (50 टक्के पर्यंत). शरीरात होणारे जंत किंवा कृमी, मलेरीया, आतड्यांचे विकार (ulcers), किडणीचे विकार, स्थूलता, मद्यपान, स्त्रियांमध्ये मासिक पाळीवाटे होणारा जास्त रक्तस्त्राव अशी अनेक कारणे लोहाच्या कमतरतेला करणीभूत ठरतात. ह्या शिवाय थॅंलेसीमिया किंवा सिकल सेल सारखे जेनेटीक रोगांमुळे सुदधा लोहाची कमतरता होते हे नमूद केले पाहिजे.

आहारातून लोह मिळवण्यासाठी त्याचे स्रोत खालील तक्त्यात दिले आहेत.

खाण्यासाठी जन्म आपुला

सुगरण असणारी ऍन. अंजली गाडगीळ  वेगवेगळे पदार्थ बनवून ऍन्स्च्या ग्रुपवर शेअर करत असते. या अंकात ती फोकाशीया ब्रेड करून दाखवीत आहे.

साहित्य:

2 cup मैदा

1टी स्पून बकिंग पावडर

1 1/2 टी स्पून ऍक्टिव्ह ड्राय yeast

1/2टी स्पून मीठ

2टी स्पून  milk powder

1 कप दूध

1कप पाणी कोमट

3 टी स्पून साखर

1 टी स्पून चिली फ्लेक्स

2 टी स्पून मिक्स हर्बस

decoration साठी भाज्या

ऍन. अंजली गाडगीळ 

कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी

सध्या जागेच्या मर्यादेमुळे प्रत्येकाला बाग फुलवण्याची संधी मिळत नाही. तरी अशी मंडळी आपली हौस बालकनी, खिडक्या, व्हरांडा अशा ठिकाणी बागकाम करण्यात आपली हौस भागवून घेतात. ऍन. शिल्पा नाईक या indoor gardening बद्दल मार्गदर्शन करीत आहे.

मनाचे श्लोक - भाग दुसरा

रो. मृणाल नेर्लेकर या भागात चौथ्या आणि पाचव्या श्लोकाबद्दल विवेचन करीत आहे.

कथा - कथन

ऍन. प्रतिमा दुरुगकर ही आपल्या क्लबमधली प्रथितयश लेखिका आहे. अनेक वृत्तपत्रात आणि नियतकालिकात तिचे लेख, प्रवासवर्णने प्रसिद्ध होत असतात. तिचा इंडोलॉजीचा अभ्यास चांगला आहे. ती आपल्या मित्र-मैत्रिणींना ऐतिहासिक स्थळांवर नेऊन त्या स्थळाची माहिती सांगते. याचा अनुभव आपण वेळोवेळी घेतला आहेच. या कथा-कथनात तिने गुलज़ारांची मायकलअँजेलो ही कथा निवडली आहे.

bottom of page