top of page

DECEMBER 2021 Issue DISEASE TREATMENT & PREVENTION Month

साप्ताहिक कार्यक्रम

४ ऑक्टोबर - द्वारकानाथ संझगिरी 

प्रत्येक भारतीयाच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे क्रिकेट आणि त्याविषयी प्रख्यात असलेले क्रीडा-पत्रकार श्री द्वारकानाथ संझगिरी आपल्याकडे दिनांक 4 ऑक्टोबरच्या सोमवारी व्हर्च्युअली आले होते. त्यांनी त्यांच्या खुमासदार शैलीतून  'चंदू बोर्डे ते विराट कोहली' हा काळ घेऊन त्या काळातील विविध क्रिकेटपटू आणि त्यांच्या घडलेल्या विविध घटना अतिशय दिलखुलासपणे सांगितल्या. त्यांची मुलाखत त्यांचेच मित्र श्री राजेश आजगावकर यांनी घेतली,ते सुद्धा क्रिकेट प्रेमी आहेत आणि बऱ्याच वेळा क्रिकेट संघाबरोबर ते जात असतात. ही मुलाखत म्हणजे दोन मित्रांच्या दिलखुलास चाललेल्या गप्पाच होत्या.

काळानुसार क्रिकेट आणि खेळाडू कसे बदलत गेले हे चंदू बोर्डे, सिराज ,रोहित शर्मा यांचे उदाहरण घेऊन सांगितले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करून स्वतःच्या मेहनत आणि जिद्दीवर ते कसे वर आले आणि क्रिकेटमुळे आर्थिक परिस्थितीत किती बदल होऊ शकतो हे सांगितले. चंदू बोर्डे आणि त्या काळातील क्रिकेट खेळाडूंना प्रसिद्धी, नाव, मानसन्मान, नोकरी मिळू शकली पण त्यानंतरच्या दहा-पंधरा वर्षात झालेल्या बदलाने खेळाडूंना आर्थिक दृष्ट्या मोठी jump मिळाली हा खूप मोठा बदल आणि दिलासा खेळाडूंना मिळाला.कारण त्या काळातील आई-वडिलांना मुलाने चांगले शिक्षण घेऊन नोकरी करावी असे वाटे. क्रिकेट खेळून मोठे होता येते हा विश्वास त्यावेळी नव्हता.

बॉलर सिराज याला मिळालेली महिंद्राची गाडी किंवा रोहित शर्मा यांनी आयपीएल खेळल्यानंतर  घेतलेली बीएमडब्ल्यू हे क्रिकेट खेळामुळे झालेला मोठा आर्थिक बदल होता आणि क्रिकेटमुळे किती मोठी झेप आपण घेऊ शकतो हे लक्षात आले.

काळानुसार क्रिकेट ह्या खेळातही बदल झाले, पूर्वी फक्त टेस्ट matches खेळल्या जायच्या. टेस्ट क्रिकेट नंतर एक-दिवसीय क्रिकेट आले. त्याची लोकप्रियता खूप वाढली, पाच दिवसाच्या टेस्ट मॅच बघण्यापेक्षा लोकांना वन डे मध्ये जास्त रस वाटू लागला पुढे त्यात अजून बदल होऊन T20, IPL आले.

खेळाडू देखील एका बॅटऐवजी अनेक बॅट्स ठेवू लागले. तसेच विविध प्रकारचे सेफ्टी gloves,हेल्मेट ह्यामुळे ही क्रिकेट खेळात खूप आक्रमकता आली. खूप सोयी सुविधा आल्या.

पूर्वीच्या काळी खेळाडू परदेशातील खेळाडूंसमोर टिकाव धरू शकत नव्हते. त्यांना भिती आणि दबाव वाटे. त्यामुळे त्यांचे बॉल फक्त सरपटी खेळले जायचे. टायगर पतौडी हे ऑक्सफर्डमधून आल्यामुळे त्यांना परदेशातील खेळाडूंची भीती वाटत नसे. तसेच सुनिल गावस्कर यांनीदेखील भारतीय खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण केला कारण त्यांना भाषेचा अडथळा नव्हता आणि स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास असल्याने प्रतिस्पर्धी खेळाडूने जरी काही टीका केली तरी त्याला तिथेच प्रत्युत्तर देऊन इतर खेळाडूंमध्ये 'हम भी किसी से कम नही' हा विश्वास आणला.

पूर्वी क्रिकेट हे फक्त मोठ्या शहरातून खेळले जायचे. पुढे त्यात बदल होऊन अगदी छोट्या छोट्या गावातून देखील क्रिकेट खेळले जाऊ लागले. हा बदल मनमोहन सिंह यांच्या काळात जेव्हा दूरदर्शन घरोघरी पोहोचले त्यावेळी क्रिकेटदेखील घराघरात पोहोचले आणि त्यातूनच आपल्याला सेहवाग, युवराज, धोनी सारखे खेळाडू मिळाले आणि भारत हा उत्तम क्रिकेट खेळणारा देश म्हणून प्रसिद्धीस आला. जेव्हा जगमोहन दालमिया क्रिकेट बोर्डावर आले त्यानंतर या खेळात खूप पैसा आला, टीव्हीचे राईट घेऊन हा खेळ दूरदर्शन व इतर चॅनल वर दाखविला जाऊ लागला. त्यामुळे खेळाडूंना उत्तम पैसे मिळू लागल्याने ते आपले लक्ष पूर्णपणे खेळावर केंद्रीत करू लागले.

आपल्या सर्वांचा लाडका खेळाडू सचिन याची कारकीर्द आणि गमतीजमती याबद्दल श्री संझगिरी भरभरून बोलले.

दादरला राहात असल्याने सचिनची कारकीर्द त्यांनी अगदी जवळून बघितली. त्यावेळी असे म्हंटले जायचे की जो खेळाडू श्री संझगिरी यांच्या घरी जेवायला जायचा तो दुसऱ्या दिवशी शतक काढायचा. हा योगायोग असेल पण ते घडत होते. त्यामुळे बरेच खेळाडू श्री संझगिरी यांच्याकडे जेवायला येत असत. असेच एकदा सचिनने देखील त्यांच्याकडे पोहे खाऊन शतक ठोकले, त्यानंतर कुठलीही मोठी मॅच खेळायच्या आधी सचिन श्री संझगिरी यांच्याकडे जेवायला जात असे. परदेशी जाताना श्री. संझगिरी त्यांना सोबत लाडू बांधून देत असेही त्यांनी सांगितले.अर्थात हा निव्वळ योगायोग असणार आणि खेळाडू त्याच्या कौशल्यावर शतक झळकावतो हे ही त्यांनी स्पष्ट केले

पुण्यातही खूप चांगले टॅलेंट आहे परंतु किलर instinct कमी असल्याने पुण्याचे खेळाडू फारसे पुढे येत नसावेत अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

त्यानंतर प्रश्नोत्तराच्या स्वरूपात अनेक आपल्या मित्रांनी प्रश्न विचारले आणि त्याचे तेवढ्याच मिश्कीलपणे त्यांनी उत्तरे दिली, हा कार्यक्रम इतका रंगला की संपूच नये असे वाटले. शेवटी रो. विकास काकडे यांनी आभार मानले.

हा कार्यक्रम आपल्या सर्वांसाठी मेजवानी होती. हा कार्यक्रम आणल्याबद्दल रो. रविकिरण आणि रो. अश्विनी यांचे मनापासून आभार. 

रो. कल्पना काकडे

११ ऑक्टोबर - रो. संदीप बेलवलकर यांचे कथाकथन

११ ऑक्टोबरला आपल्या क्लबची जॉइंट मिटींग रोटरी क्लब ऑफ पर्वती बरोबर होती.

रो. संदीप बेलवलकर ह्यांचा बटाट्याची चाळ वर आधारीत अत्यंत छान कार्यक्रम झाला. त्यांनी चाळीतली पात्रं समर्थ वाचिक अभिनयाने आपल्या डोळ्यासमोर उभी केली.

अच्युतने त्यांची ओळख करून दिली आणि आभारप्रदर्शन पर्वती क्लबचे सेक्रेटरी अमर कोटबागी यांनी केले.

ॲन निरुपमा गोखले

१८ ऑक्टोबर - ॲन मीना चौधरी श्रद्धांजली सभा  

मित्रांनो,

मीना जाण्याची दुःखद व धक्कादायक बातमी १५ ऑक्टोबर रोजी आपल्याला समजली. तिच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक खास अंक प्रसिद्ध केला. त्यानुसार सर्वांना आवाहन केल्यानंतर अनेकांनी त्यांच्या जवळ असलेले फोटो, व्हिडिओ, ऑडियो क्लिप्स पाठवले. आठवणी लिहून पाठवल्या. त्या सर्व संकलित करून एक स्मरणिकारूपी पुश प्रकाशित करण्यात आला.

 

त्याची लिंक खाली दिलेली आहे.

'२५ ऑक्टोबर - दीपावली संध्या - प्रशांत नासेरी व राधिका अत्रे

Rotary Club of Shivaji Nagar celebrated the 'Diwali' festival entertainingly. 

Famous singers 'Prashant Naseri' and Radhika Atre sang melodious songs from the golden era of 'Hindi Cinema'. All the songs were beautifully presented considering the time limit and audience mindset.

 

All-time hit songs of  Kishore Kumar, Mohammad Rafi, and Mukesh were sung by Prashant and Radhika performed all-time hit songs of 'Asha Bhosale' In addition to that they brought colors in the program by singing famous Marathi serials title songs. The end of the program was done by a mind-blowing performance by Prashant with the song 'Ek Chatur Nar kareke Singar' 

 

President Shobha Rao,  Secretary Ajay Godbole, Push editor Girija Yardi, and their team published 'Push' Magazine. The event was further carried colorfully by announcing prizes for the fancy dress competition.

 

Finally, the program ended with a vote of thanks given by Secretary Ajay Godbole followed by dinner.

Rtn. Balkrishna Damle

RCPS Diwali Party 21

RCPS Diwali Party 21

८ नोव्हेंबर - सायकल आजी - निरुपमा भावे


सोमवार तारीख ८ नोव्हेंबर २०२१ या दिवशी आपल्याकडे निरुपमा भावे आल्या होत्या. त्यांचं वय आहे ७४. पण उत्साह , फिटनेस आणि स्टॅमिना तरुणाईला लाजवेल असा आहे. त्यांची ओळख यशवंत गोखले यांनी करून दिली. 


पन्नाशीनंतर गुढगे कुरकुरतात, शरीर साथ देत नाही, अशा वयात निरुपमा भावे यांनी सायकल प्रवास सुरु केला. प्रभात रोड येथील त्यांच्या निवास स्थानापासून ते सिंहगड हा सायकल  प्रवास त्या लिलया करतात. मात्र तेव्हढ्यावरच न थांबता पुणे ते गोवा , पुणे ते कन्याकुमारी अशा सायकल प्रवासाचा त्यांना छंदच लागला. त्या काश्मीरमध्ये जाऊन तिथल्याही सायकल स्पर्धा जिंकून आल्या. त्यांनीच सांगितल्याप्रमाणे त्या स्पर्धांकांपेक्षा  वयाने जेष्ठ असतात आणि त्यांना बक्षिसंही मिळतात. त्या आता पुणे ते कोलकाता या सायकल स्पर्धेत त्या भाग घेणार आहेत. त्यांचा फिटनेस आणि स्टॅमिना बघता त्या ७४ वर्षाच्या मुळीच वाटत नाहीत. 


त्यांना ट्रेकिंगची पण खूप आवड आहे. त्या लेह , लडाख आणि खारडुंग ला  येथे त्यांनी ट्रेकिंग केलं आहे. गंगासागर ते गोमुख असा १२० किलोमीटर चा दुर्गम प्रवास त्यांनी पायी केला आहे. हा १२० किलोमीटर चा रस्ता ५ राज्यातून जातो हे आणखी विशेष . त्या पायी प्रवासात त्यांना तेथील महिलांच्या समस्या जाणून घेता आल्या. कमालीचं दारिद्रय , प्रत्येक महिलेला किमान ५-६ मुलं आणि वैद्यकीय सेवा आणि औषधोपचाराचा अभाव यामुळे मुलं दगावण्याचे प्रमाण खूप मोठं आहे हे त्यांना जाणवलं. 


प्रसाद पुरंदरे आयोजित करत असलेल्या Enduro 3 ही स्पर्धा त्यांनी ५-६ वेळा पूर्ण केली आहे. चिकाटी , साहसी वृत्ती आणि धोका स्वीकारायची तयारी हे त्यांच्या बोलण्यातून सतत जाणवत होतं. 


आणि त्यांच्या याच गुणांमुळे त्यांनी ७० व्या वर्षी दुर्धर व्याधींमुळे झालेल्या आजारपणातून इतक्या लवकर बऱ्या झाल्या की त्यांचे डॉक्टरही चकित झाले. 


त्यांचं ओघवतं बोलणं, उत्साह आणि आत्मविश्वास ह्यामुळे सर्वजण भारावून गेले आणि आपणही त्यांच्याकडून स्फूर्ती घेतली पाहिजे असं सर्वानाच वाटलं. 


उज्वल मराठे यांनी आभार मानले. 

 

रो. यशवंत गोखले

१५ नोव्हेंबर - माहितीपूर्ण मधुमेह - डॉ. आरती शहाडे

नोव्हेंबर हा महिना World Diabetes month म्हणून ओळखला जातो आणि १४ नोव्हेंबर हा World Diabetes Day म्हणून ओळखला जातो. याचं औचित्य साधून सोमवार तारीख १५ नोव्हेंबरला प्रख्यात मधुमेह तज्ञ 'डॉक्टर आरती शहाडे' यांचे भाषण आपल्या क्लबमध्ये आयोजित केलं होत. मधुमेहाचं वाढतं प्रमाण आणि विषयाची व्याप्ती लक्षात घेऊन त्यांनी केवळ तांत्रिक माहिती देण्यावर भर न देता निरनिराळी उदाहरणे देऊन सोप्या भाषेत त्यांनी अत्यंत उपयुक्त माहिती दिली. मधुमेह झालेला असताना काय करावे आणि काय करू नये ,लोकांच्या समजुती आणि वस्तुस्थिती याचे छान विवेचन केले. त्यांच्या पेशंटचे निरनिराळे अनुभव आणि किस्से सांगून काय करू नये हे समजावून सांगितले. त्यांचा या विषयावरचा प्रचंड अभ्यास अनुभव दिसून येत होता त्यांची बोलण्याची शैली पण छान होती. सहज गप्पा मारल्यासारखे बोलून खूपच उपयुक्त माहिती त्यांनी दिली.  शेवटचा प्रश्नोत्तरांचा भाग सुद्धा छान झाला. प्रत्येकाच्या मनात असलेल्या बारीक सारीक शंकांचं निरसन झालं. प्रत्येकाने विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी अत्यंत समर्पक उत्तरे दिली. सर्वांनाच हा कार्यक्रम खूप आवडला. डॉक्टर स्मिताताई जोग यांनी ओळख करून दिली आणि प्रतिभाने यथोचित आभार मानले

 

ॲन प्रतिभा गोखले

१८ नोव्हेंबर - हेरिटेज वॉक

 

त्रिपुरी पौर्णिमेचा दीपोत्सव

आपल्या क्लबचा हेरिटेज वॉक या १८ नोव्हेंबर रोजी त्रिपुरारी पौर्णिमेला राजगुरूनगर, चास या ठिकाणी दीपोत्सवाने साजरा झाला असेच म्हणावेसे वाटते. प्रतिमाने आणि नितीन नाईकने इतकी सुंदर आखणी केली होती की हा कार्यक्रम छानच पार पडला.

दुपारी गिरीकंदच्या बसने आम्ही ४५ जण निघालो.दुपारी तीन वाजता पुण्यावरून प्रस्थान केले. लॉ कॉलेज रोड, सेनापती बापट रोड, औंध असे करता करता बस नाशिक फाट्याकडे वळली.  काही जण मागून कारने आले. राजगुरुनगरला वडापाव-चहाचा झकास अल्पोपहार घेतला प्रतिमाचा वाढदिवसही तिथे केक कापून साजरा केला तिला सर्वांनी खूप शुभेच्छा दिल्या.

अंधार पडायला सुरुवात झाली होतीच. त्यानंतर वाटेत कार्तिकेय मंदिर दिसले. तेथे दिव्यांची नयनरम्य अशी आरास केली होती. भीमा नदीच्या काठावर कार्तिकेयाच्या मंदिरात फक्त याच दिवशी स्त्रियांना प्रवेश असतो.  प्रथम राजगुरुनगर नजिक सिद्धेश्वर मंदिरात गेलो.श्री सुतार (तिथले गाईड) यांनी या मंदिरा बद्दल सविस्तर माहिती सांगितली होतीच. येथे शिवमंदिर आहे. देवळाच्या मंडपात अनेक स्त्रिया त्रिपुरी वात पेटवून भक्तीने नामस्मरण करीत थांबल्या होत्या. मोठे पवित्र वातावरण होते. आपल्या क्लबमधील अनेकांनी त्रिपुरी वात खरेदी करून आणि लावून पुण्य कमावले. काही जणांनी मोरपीसही अर्पण केले. काहींनी तर घरूनच येताना वात आणि पणत्या आणल्या होत्या . गावकऱ्यांनी छोट्या तळ्याभोवती पायर्‍यांवरही पणत्या लावल्या होत्या. 'ओम'च्या आकारात फुलं आणि पणत्यांची आरास खूपच सुंदर दिसत होती मंदीरही दिव्यांच्या माळांनी लखलखत होते. खूप सुंदर दृश्य दिसत होते.

नंतर राजगुरुनगरला चंडीराम मठ येथील लक्ष्मी-विष्णू मंदिरातील खास आवळ्यांचा दीपोत्सव बघायला निघालो. येथील वैशिष्ट्य असे की येथे आवळा अर्धा कापून त्याच्या बीच्या खळग्यात तूप भरून दिवा लावतात. (आवळा हे फळ विष्णूचे अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे आवळा या फळाचेच दिवे करतात.)  हे पेशवेकालीन खाजगी मंदिर आहे. रंगीत फुलांच्या माळांनी हे मंदिर सजवलेले होते. हे मंदिर पाहताना इतिहासकालीन वास्तूचे दर्शन झाले... गरुडाची रेखीव मूर्ती, कठड्यांवर आवळ्यात लावलेले दिवे खूपच भावदर्शी होते. गाभाऱ्यातील लक्ष्मी- विष्णूची मूर्ती प्रसन्न होती. गाभाऱ्यात आवळ्यांच्या दिव्यांची सुंदर आरास केली होती. समयांवरही आवळ्याचे दिवे तेवत होते, बाजूलाच शंकराचे छोटे मंदिर होते. त्याचे नाव 'ब्रह्मेश्वर'! तिथेही छान पणत्या लावल्या होत्या. या देवळात मूर्तीच्या खाली एक ध्यान मंदिर आहे तिथेही काही जण जाऊन आले... खूप शांत शांत वाटले असे त्यांनी सांगितले. आवळ्यांचा हा आगळावेगळा दीपोत्सव सगळ्यांनाच खूप भावला .

नंतर रात्रीचे जेवण करून चासला गेलो. चास हे गाव राजगुरूनगरपासून दहा किलोमीटरवर आहे. पहिले बाजीराव पेशवे यांची ती सासुरवाडी होय. म्हणजे काशीबाई यांचे माहेर. त्यांचे चासकर-जोशी असे नाव होते. ते पेशव्यांचे सावकार होते. 

वाटेत जाताना पाटणकर यांच्या खाजगी मालकीचे १७४९ साली स्थापन झालेले लक्ष्मी विष्णू मंदिर आहे. ते फारच सुंदर आहे. संगमरवरी मूर्ती फार देखण्या आहेत. तेथेच बाजूला शंकराचे मंदिर सुद्धा आहे. तेथील मुखवटा अतिशय वैशिष्टयपूर्ण आहे. सहसा असा बघायला मिळत नाही. त्यावर गंगा, नाग आणि चंद्र आहेत. मुखवट्याचे नेत्र अर्धध्यानमग्न दाखवले आहेत .

पुढे पुरातन सोमेश्वर मंदिर आहे. चासकर जोशी यांनी इथे स्वतःच्या मालकीचे सोमेश्वराचे खूप मोठे मंदिर उभारले आहे, या मंदिराच्या बाजूच्या भिंतींचे बांधकाम घडीव दगडामध्ये आहे, शंकराच्या मंदिरासमोर आत नंदीचाही मंडप आहे.  आत प्रवेश केल्यावर दगडी दीपमाळ दिसते ही प्रमाणबद्ध आकारात असून ...खालून गोलाकार मोजले तर सोळा हात असे एकूण २५६ हात आहेत, त्यावर पणत्या लावल्या जातात. दर त्रिपुरारी पौर्णिमेला ही दीपमाळ प्रज्वलित केली जाते. आधी गाभाऱ्यात शंकराची पूजा चासकर कुटुंबियांकडून केली जाते, हा  महारुद्राभिषेक झाल्यावर गावातील सर्व जाती-धर्माचे लोक मिळून हजारो पणत्यांनी हे देऊळ आणि दिपमाळ प्रज्वलित करतात.

या दिपमाळेचे वैशिष्ट्य असे आहे की वरच्या बाजूला जो  खंडा आहे त्यात जवळजवळ पंधरा किलो तेल मावते.  यात जी वात लावतात ती नऊवारी धोतराला पिळे देऊन त्याची वात तयार करतात. आधी ती वात लावली जाते मग सर्व कार्यकर्ते मिळून प्रत्येक हातावर तेलाची पेटत्या वातीची पणती ठेवतात. हे काम खूप जोखमीचे असते... देवाच्या कृपेने, स्वयंसेवकांच्या निष्ठेने, एकजुटीने गेली अनेक वर्षे कुठलीही दुर्घटना न होता ही दीपमाळ प्रज्वलित केली जाते.

सेक्रेटरी अजयने ही त्याच निष्ठेने दीपमाळेवर चढून पणत्या ठेवल्या. पूर्ण दीपमाळ प्रज्वलित झाल्यावर मंदिरातील लाईट्स बंद केले त्यावेळेस ते दृश्य अवर्णनीय होते... सर्वांनी टाळ्यांचा गजर केला. झगमगती दीपमाळ बघून आम्हा भिंतीवर चढून बसणाऱ्याना 'अगदी याचसाठी केला होता अट्टाहास' असे वाटले. खूपच मनमोहक दृश्य होते ते!! नंतर  फटाक्यांच्या आतषबाजीचा देवळात एकच धडाका उडाला.


नंतर देवाला चंदन उटी लावतात ते चंदन उगाळायचा एक दगड तेथे आहे ...तो विशिष्ट पद्धतीनेच हलतो...काहींनी तो हलवून बघितला.

नंतर घाटावर गेलो. येथे भीमा नदी दक्षिणवहिनी होते. त्यामुळे हे पुण्यस्थान मानले जाते. तिथे भीमा नदीत किनाऱ्यावरच्या दगडामध्ये रांजणखळगे निर्माण झाले आहेत असे श्री.सुतार यांनी सांगितले, पण ते दिवसा दिसतील असे ते म्हणाले. तेथे खोबणीत दिवे लावले असल्याने ते सुंदर दिसत होते. नदीपात्रातही काही महिला दिवे सोडत होत्या. आता  हुतात्मा राजगुरूंचा वाडा, रांजणखळगे, चासकर वाडा असे बघायला दिवसा जाऊया असे ठरवूनच परतीच्या प्रवाासाठी बस मध्ये बसलो.

इतक्या नेत्रदीपक सोहळ्याचे वर्णन शब्दात करणे नीट जमत नाही असे मला वाटते ...ज्यांनी हे स्वतः पाहिले आहे त्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले असे वाटते.

प्रतिमाला आणि नितीन नाईकला खूप खूप धन्यवाद!! अशाच प्रकारच्या पुढील हेरिटेज वॉकच्या प्रतिक्षेत आहोत.
 

ॲन रोहिणी पालेकर

२२ नोव्हेंबर - स्पिती वॅली सफर

सोमवार दिनांक २२ नोव्हेंबरला क्लब मध्ये नॉमिनेटिंग कमिटी इलेक्शन झाले. त्यानंतर रोटेरियन अनिल दामले यांनी नुकत्याच केलेल्या ट्रिपचा स्लाईड-शोचा कार्यक्रम होता. अनिलने नुकताच दामले सफारीचा ग्रुप घेऊन हिमाचल प्रदेशचा दौरा केला. ऑफ बीट टूर्स हे अनिलचं खास वैशिष्ट्य. स्पिती व्हॅली आणि लाहौल  तसेच आसपासच्या अनेक निसर्गरम्य स्लाईडस आणि अनिलचं ओघवतं वर्णन त्यामुळे आपण स्वतः तिथेच आहोत असं वाटलं. वाटेत भेटलेल्या स्थानिकांशी गप्पागोष्टी करणं हे अनिलच आणखी एक वैशिष्ट्य. त्याने त्या लोकांना दिलेली मिठाई आणि ते खाऊन कोरोना होईल ही त्यांची भीती हा प्रसंग त्याने छान खुलवून सांगितला. दामले सफारी ग्रुप बरोबर प्रवास करणं ही एक पर्वणीच असते. आपल्या क्लब मध्ये नेहमीच उत्तमोत्तम कार्यक्रम होत असतात. त्याच परंपरेतील एक छान कार्यक्रम झाला असं सर्वांनाच वाटलं.


ॲन प्रतिभा गोखले

२९ नोव्हेंबर - भिकाऱ्यांचे डॉक्टर 

सोमवारी 29 तारखेला भिकाऱ्यांचे डॉक्टर म्हणून ओळखले जाणाऱ्या डॉक्टर अभिजीत सोनवणे यांना सर्विस अवॉर्ड देण्यात आले नेहमीचे लॉटरी मॅटर्स संपल्यानंतर रोटेरियन माधुरी हिने डॉक्टर अभिजीत सोनवणे यांची ओळख करून दिली व मानपत्राचे वाचन केले हे मानपत्र रोटेरियन मंजिरी धामणकर यांनी तयार केले आहे यानंतर डॉक्टर अभिजीत सोनवणे यांच्या कार्याची माहिती करून घेण्यासाठी रोटेरियन डॉक्टर स्मिता जोग यांनी त्यांची व त्यांच्या कामात सहभाग घेणाऱ्या त्यांची पत्नी डॉक्टर मनीषा सोनवणे यांची मुलाखत घेतली विचारलेल्या प्रश्नांना दोघांनीही सविस्तर उत्तरे दिली डॉक्टर सोनवणे यांनी 1995 सली ही पदवी घेतल्यानंतर स्वबळावर एका इंटरनॅशनल कंपनीमध्ये महाराष्ट्र प्रमुख या उच्च पदावर जागा मिळवली 15 ऑगस्ट 2015 स* त्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला सुखवस्तू जीवन सोडून रस्त्यावर प्रार्थनास्थळ देऊळ यांच्या बाहेर बसलेल्या भिकाऱ्यांना विनामूल्य वैद्यकीय सेवा देण्याचा निर्णय त्यांनी घेतला सुरुवातीला त्यांनी त्यांच्या हेतूविषयी संशय व्यक्त केला पण डॉक्टर अभिजित यांनी प्रयत्नपूर्वक त्यांचा विश्वास वास संपादन केला आणि आज पर्यंत तरी जवळजवळ अकराशे अधिक शेतकऱ्यांना उपचार दिलेत नुसते उपचार करून ते थांबत नाही त्यांचा पुनर्वसनाचं काम करतात भिक्षेकरी ते कष्टकरी आणि कष्टकरी ते गावकरी हा प्रत्येकाचा प्रवास असावा असं त्यांना वाटतं त्यांच्या ह्या कामात त्यांची पत्नी डॉक्टर मनीषा सोनवणे यांची मोलाची साथ त्यांना मिळते संसाराचा भार ही त्याच उचलतात सोहम ट्रस्ट या माध्यमातून हे सर्व काम चालते यांना व्यावसायिक शिक्षण देण्यासाठी एक संस्था उभी करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे ते सांगतात यानंतर रोटेरियन माधुरी हिने आभार प्रदर्शन केले व कार्यक्रमाचा समारोप झाला सोबत मी त्यांच्या दोन व्हिडीओ क्लिप्स व त्यांना दिलेले मानपत्र ही पाठवत आहे.

रो. स्मिता जोग

WhatsApp Image 2021-12-02 at 9.27.54 PM.jpeg
सामाजिक प्रकल्प
'सार्थक'ला ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचा शिधा पोहोचला
Sarthak.jpg
एकलव्यला ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचा शिधा ७ ऑक्टोबर रोजी पोहोचला
Eklavya.jpg
९ ऑक्टोबर रोजी वृंदा गिरीजा आणि अंजली गोडबोले यांनी एकलव्यच्या मुलांचे वाढदिवस साजरे केले
Eklavya 1.jpg
Eklavya 2.jpg
Diphteria, Tetanus and Rubella vaccination was conducted at Sarthak Seva Sangh

एकलव्य व सार्थक येथे दिवाळी पार्टी

आपला क्लब गेली काही वर्षं एकलव्य व सार्थकच्या मुलांची दिवाळी आनंददायी व्हावी ह्यासाठी प्रयत्न करतो. ह्या वर्षीपण आपण दिवाळीच्या आधीच्या वीकेंडला या दोन्ही ठिकाणी दिवाळी साजरी करण्याचे आयोजन केले. ३० ऑक्टोबर ह्या दिवशी एकलव्यमध्ये दिवाळी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दिवाळीनिमित्त एकलव्यमधील सर्व मुलांसाठी नवीन कपडे शिवून घेतले. त्यादिवशी मुलांनी ते घातले होते. 

दिवाळी कार्यक्रमाआधी एकलव्यमध्ये आपल्या क्लबने नुकत्याच स्थापन केलेल्या ईंटर-ऍक्ट क्लबचा स्थापना सोहळा पार पडला. ह्या कार्यक्रमासाठी प्रांतपाल पंकज शहा आवर्जून उपस्थित होते. त्याांनी सर्व मुलांशी संवाद साधला. आपल्या भाषणात प्रांतपालांनी उल्लेख केला की त्यांच्या प्रांतपाल म्हणून कारकीर्द सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी, म्हणजे १ जुलै २०२१ रोजी ते एकलव्यला आपल्या क्लबच्या प्रकल्पासाठी उपस्थित होते. आणि त्यादिवशीच त्यांच्या मनात आले होते की येथे एक इंटरऍक्ट क्लब स्थापन करावा. तशी त्यांनी डॉ. शोभा राव यांच्याकडे विचारणा केली आणि त्यांनी हे करण्यास संमती दिली. 

ह्या सोहळ्यात अध्यक्ष शोभा राव, रेणुताई गावसकर ह्यांनी पण मुलांशी  संवाद साधला. त्याबरोबरच इंटरऍक्ट क्लबचे अध्यक्ष व सेक्रेटरी ह्यांनीपण आपले मनोगत व्यक्त केले. ह्या कार्यक्रमानंतर  दिवाळीच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुलांनी सुरेख गाणी, नृत्य, नाटुकल्या तसेच कसरतींचे प्रयोग सादर केले. सर्वात शेवटी मुलांनी पपेट शो सादर केला जो अप्रतिम होता. ऑगस्टमध्ये एकलव्यच्या मुलांसाठी पपेट शो व पपेट बनवण्याचे प्रशिक्षण आयोजित केले होते. तेंव्हाच दिवाळी कार्यक्रमात पपेट शो सादर करण्याचे मुलांनी वचन दिले होते. ते त्यांनी पाळले. 

त्यानंतर रुचकर जेवणाचा सर्वांनी आस्वाद घेतला. नवीन कपड्यांसाठी चंदूकाका व हेमाताई, दीपा  साठे व वृंदाने अर्थसहाय्य केले. आपण मुलांना दिवाळीचा फराळ पण दिला. दिवाळीचा फराळ व जेवण मंगेश व मधुमिता यार्दी यांनी पुरस्कृत केले होते. ह्या कार्यक्रमासाठी प्रेसिडेंट शोभा व डॉ राव, सेक्रेटरी अजय व अंजली, डायरेक्टर वृंदा, अप्पा चिपलकट्टी, शेखर व गिरिजा, अश्विनी, कल्पना काकडे , मंगेश व मधुमिता यार्दी  उपस्थित होते. कल्पना मुलांसाठी इंग्लंडहून चॉकलेट घेऊन आली होती. खूप छान कार्यक्रम झाला.  

लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजे ३१ ऑक्टोबरला सार्थक मध्ये दिवाळी कार्यक्रम झाला. सार्थकला मुलांबरोबर सर्वांनी दंगा केला. अजयने मुलांचे धमाल गेम्स घेतले. त्याला नितीन व अलका, तसेच अंजलीने मदत केली. मुलं जास्ती दंगा करत होती का आपली क्लबची मंडळी, हे सांगणं अवघड होतं. सार्थकच्या मुलांसाठी पण दिवाळीसाठी नवे कपडे शिवले, दिवाळीचा फराळ नेला होता. गेम्स व गप्पानंतर जेवणाचा सर्वांनी आस्वाद घेतला. सार्थकच्या मुलांसाठीचे कपडे, दिवाळी फराळ ह्या सर्वासाठी केतकी व रोहन (नितीन अलका अभ्यंकरची मुलगी व जावई) ह्यांनी संपूर्ण अर्थसहाय्य्य केले. चंदूकाका व हेमाताई मुलांसाठी चॉकलेट घेऊन आले होते. ह्या कार्यक्रमाला चंदूकाका, हेमाताई, अप्पा, सी डी, नितीन, अलका, शेखर, गिरिजा, अजय, अंजली, वृंदा उपस्थित होते. 


ह्या दिवाळी कार्यक्रमाच्या जोडीने आवर्जून उल्लेख करावासा वाटतोय तो म्हणजे मीना इनामदारने मागील महिन्यात उत्तम स्थितीतील १०० साड्या दिल्या होत्या, त्यातून सार्थकच्या शिवणकामाच्या टीमने एकलव्य व सार्थक मधील मुलींसाठी अतिशय सुंदर ड्रेसेस शिवले व ते घालून मुलींना बागडताना बघून खूप छान वाटले. तसेच ह्या मुलांची गरज जाणून घेऊन कोणताही गाजावाजा न करता ह्या दोन्ही ठिकाणच्या मुलांसाठी अंतर्वस्त्रांचे प्रत्येकी दोन सेट माधुरी व तिची मुलगी मृण्मयी अनगळ ह्यांनी पुरविले. 

सरतेशेवटी एकच म्हणेन कि आपला क्लब जेंव्हा मनापासून एखादा प्रकल्प हातात घेतो तेंव्हा वर्षांमागून वर्षे निष्ठेने त्यावर काम करत राहतो. ह्या दोन्ही ठिकाणी जी मुलं राहतात त्यांच्या आयुष्यात असे आनंदाचे क्षण निर्माण करत राहणे ह्यासारखं मला नाही वाटत दुसरं काही पुण्याचं काम असेल. 

 

शुभम् भवतु 

रो. वृंदा वाळिंबे


प्रोजेक्ट डायरेक्टर - सर्विस नॉन मेडिकल

Eklavya Diwali.jpg

सार्थक येथे दिवाळी पार्टी

Sarthak 2.jpg

साड्यांपासून ड्रेसेस - सार्थक आणि एकलव्यच्या मुलींसाठी

"एकबार हम कोई चीज ठान लेते है तो अपने आपकी भी नहीं सुनते" हे भारी वाक्य अगदी चपखल बसणारे बरेच जण आपल्या क्लबमधे आहेत. त्यातला मुकूटमणी म्हणता येईल अशी आपली मीना इनामदार. मध्यंतरी आपल्या एन्सनी आपल्याकडच्या छान छान साड्यांमधून सार्थकच्या मुलींसाठी मस्त ड्रेसेस  शिवून घेतले. ते शिवले पण सार्थकच्याच टीमने. ते बघून आमच्या मीनाबाईंनी एक संकल्प केला. मग काय झालं ते वाचा तिच्याच शब्दांत.

 

"मध्यंतरी आपल्या क्लबच्या अॅन्सनी जुन्या साड्या डोनेट केल्या सार्थक या संस्थेला. त्या साड्यांचे संस्थेतल्या मुलींनाच सगळ्या मुलींना छान छान फ्रॉक शिवले. ते फ्रॉक घातलेले फोटो मी माझ्या मैत्रीणींना वगैरे शेअर केले आणि "तुम्ही पण अशा साड्या मला देऊन त्या अनाथ मुलींना दिवाळीत छान छान फ्रॉक मिळू शकतात. पहा जमते का ?" असे सुचवले. तेंव्हा मला कल्पना पण नव्हती किती रिस्पॉन्स मिळेल,हे प्रोजेक्ट कितपत यशस्वी होईल? पण मला इतका भरभरून प्रतिसाद मिळाला. खरं तर घराचे शिफ्टींग,साड्यांच्या व्हीडीओचे प्रोजेक्ट, माझा व्यवसाय आणि घरच्या जबाबदाऱ्या यामुळे फक्त दोन-तीनदाच आठवणी करता सगळ्यांना फोन केले.

 

सगळ्यांकडून छान प्रतिसाद मिळाला. विशेष कौतुक वाटले ते माझ्या व्यवसायात मदत करणाऱ्या मुलींचे. त्यांनी मला ४/४ साड्या आणून दिल्या. माझ्या दोन्हीही विहीणी, मुंबईच्या मैत्रीणी, नातलग, इतर अनेक मैत्रीणी यांनी साड्या डोनेट करून मोलाची साथ दिली. माझ्या एका डॉक्टर मैत्रिणीने तर जुन्या देण्यासारख्या साड्या नाहीत म्हणून ११ ड्रेस साठी फेब्रीक नवीन आणून दिले. बघता बघता आकड्याने शंभरी गाठली. म्हणून सार्थक आणि एकलव्य या २ संस्थांना साड्या डोनेट करायचा निर्णय घेतला...

 

हे सगळे करताना संस्थेतल्या मुलींना नवे कपडे मिळणार याचा आनंद होताच.पण मलाही सगळ्यांनी भरभरून साथ दिल्याचा आनंद होता.

सगळ्यांना मनापासून धन्यवाद."

 

ह्या शंभर साड्यांपैकी एक लाॅट ऑकटोबरच्या पहिल्या आठवड्यात व दुसरा ऑकटोबरच्या दुसऱ्या आठवड्यात सार्थकला रवाना झाला.  ह्या शंभर साड्यांमधून शिवलेले छान छान ड्रेस घातलेल्या मुलींना बघितल्यावर ह्या उद्योगाची पावती मिळेलच. मीनाचे खूप खूप कौतुक.

रो. अश्विनी अंबिके 

Sarthak 1.jpg

सार्थक च्या सर्व मुलांसाठी दिवाळी निमित्ताने T shirt व track pant/ bermuda चे दोन सेट घेतले. दिवाळीच्या धांदलीत फोटो काढणे व ग्रुपवर शेअर करणे राहून गेले होते. नंतर मुले सुट्टीसाठी घरी गेली होती. आता सर्व मुले परत आली आहेत. त्यामुळे सर्वांचा नवीन कपड्यांमधील फोटो शेअर करत आहे. हे सर्व कपडे घेण्यासाठी केतकी व रोहन ह्यांनी अर्थसहाय्य केले. केतकी-रोहन दरवर्षी दिवाळीला सार्थक किंवा एकलव्यच्या मुलांना कपडे, फराळ करतातच. आपल्या पुढच्या पिढीचे हे समाजभान वाखाणण्याजोगे आहे.

रो. वृंदा वाळिंबे

WhatsApp Image 2021-11-28 at 6.22.50 PM.jpeg
WhatsApp Image 2021-11-28 at 6.41.02 PM.jpeg

Suraksha Box handed over to Lajpatrai Hostel

Rtn. Bharati handed over one Suraksha box to chief executive officer of Lajpat Rai Hostel (our club venue) Mr Chandrakant Kulkarni, on 29th October. Suraksha Box is for sanitising the articles put in them. Three more are donated to them subsequently. One box was given in Eklavya and one in Saarthak. Distribution of total 12 boxes are planned.

आरोग्यदर्पण

Handing over of Pulmonary Function test lab to Deenanath Mangeshkar Hospital

Handing over of Pulmonary Function test lab to DMH under global grant was the last project of Rotary year 20-21. The global grant became a reality due to generous donation by Ann Pallavi & meticulous planning by foundation team led by Pratap, PP Nitin Abhyankar & Ravikiran.

Pulmonary Function Test equipment procured under Global Grant of 20-21 was formally handed over to Deenanath Mangeshkar Hospital on 9th Oct 21.

PDG Rashmi did the ceremonial ribbon cutting .

PDG Rashmi , PDG Deepak , Prez Shobhatai, PP Sharad , Global Grant Committee Chairman Nitin & the sole individual major donor Ann Pallavi with Foundation Director Pratap were All felicitated by Dr Dhananjay Kelkar

Rtn. Ravikiran Desai

1.jpg
3.jpg
2.jpg

Tie Up with Arogya Seva Foundation

RCPS has tied up with Aaarogya seva foundation for doing counselling for ca breast as per the discussion in the board meeting on 22nd October. A number of health check camps were organised by them in and around Pune.

Dr Smita Jog participated in a number of ca breast counselling camps and distributed the brochure and represented RCPS.

 

Happy to inform that eZest Solutions Pune has agreed to donate US $ 25000 to TRF as CSR Donation. RCPS is the host club. This is first CSR Donation using Rotary Foundation for RCPS. We will need to raise some club funds. I am sure our club will do the needfull. This is towards Skilling and Employability improvement amongst youth living in Weaker Section. Currently it is need of the hour amdist covid as many have lost jobs. Lighthouse is our execution partner (Donor Defined).

 

Rtn. Dr. Deepak Shikarpur

Donations

Manali daughter of Ravikiran & Rujuta Desai celebrated her 40th birthday by donating Rs 1.5 lacs total (1 lac through KETO & 50 k through RCPS) to SARTHAK SEVA SANGH for the construction of boys hostel and sports equipment.

उपलब्धी
  1. PDG Dr Deepak Shikarpur was appointed to the advisory Board of Qodequay Technologies Pvt Ltd as Chief Mentor

  2. १६,१७ ऑक्टोबर रोजी आग्रा येथे झालेल्या रोटरी डिस्ट्रिक्ट ३११० PRE-AGTS and  PRE-DOTS या डिस्ट्रिक्ट नेतृत्वाला पी डी जी दीपक शिकारपूर यांनी मार्गदर्शन केले.

  3. The following clubs who have won the APF Challange Award in Rotary Year 2020-21 with RID 3131 are also awarded The APF Challange Award given by four RRFCS for Rotary Year 2020-21.

  4. Photo of our club project appeared and writeup about Defeat Diabetes. 

  5. Shobhatai has been appointed as a member of National Nutritional Planning Committee formed by RI president that will work with the govt and UNICEF

  6. Vrinda’s interview on Mental health published in magazine Know-Bel. This issue was published on 10th October on the occasion of World Mental Health Day.

  7. On 18th October 21 PP Anil Damle was invited by FTII to celebrate Golden Jubilee of Indian Arm Forces in 1971 war. Victory flame was brought at FTII. It was proud moment for Anil to attend victory celebration!

  8. Fatal Road Accidents can be avoided/reduced by use of smart technology. PDG Deepak’s article in Pudhari Newsaper on this important issue was published on 17th October.

  9. Mohini and Harsh had the pleasure of welcoming their new-born grand daughter ‘Maya’.

  10. On 20th October Pp Vrinda Walimbe Conducted session on "Managing Post Traumatic incident Stress" for MSW Counselors of Sasoon Hospital.

  11. पी डी जी दीपक शिकारपूर याचा निर्मलाताई पुरंदरे यांच्यावर 'सबलीकरणाचा निर्मल प्रयत्न' हा लेख महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्रात २२ ऑकटोबर रोजी प्रसिद्ध झाला.

  12. The Neel Narishakti Awards given by Neel Multi Events have been announced for  2021-22. This year, music practitioner Gauri Shikharpur is one of the recipients of the award. The interviews of the awardees will be held online.

  13. पी पी उज्वल मराठे याचा 'भरारी आर्थिक स्वातंत्र्याची' हा लेख सकाळ मनी या दिवाळी नियतकालिकात प्रसिद्ध झाला.

  14. U.S. Consul General (CG) David Ranz, U.S.Consulate, Mumbai invited Mr. Balkrishna Damle on their Educational Committee to discuss and learn his views on National Education Policy (NEP), how his institution has moved forward with NEP, education scene in Pune etc.

  15. ३१ ऑक्टोबर रोजी कुबेर दिवाळी अंकाचे प्रकाशन पी डी जी दीपक शिकारपूर यांच्या हस्ते झाले.

  16. PDG Deepak addressed Service and PI Seminar organised by our District held on 31st October 2021. RCPS work for skill development was also appreciated by the District

  17. Congrats PP Anil Damle. The famous “Prabhat Tutari tune” is now Trademarked: Damle Family holds rights to films as well as logo of Prabhat Films. Late V G Damle was the founding partner of Prabhat.

  18. उद्याचे आभासी मेटा विश्व या शीर्षकाखाली 'सायबर विश्व' या विषयावर पी डी जी डॉ दीपक शिकारपूर यांचा लेख मुंबई तरुण भारत या वृत्तपत्रात दि ६ नोव्हेंबर रोजी प्रकाशित झाला.

  19. Ann. Pratima Durugkar conducted a lecture on Tripurasur katha on Heritage Walk Group

  20. PDG Deepak spoke about 'Cyber Ethics' with children and their parents on 30th November.

  21. Dr. Smita Jog was felicitated by Gynaec society.

WhatsApp Image 2021-11-28 at 6.31.00 PM.jpeg

22. PP Rtn. Sharad Dole received APF Challenge Award

WhatsApp Image 2021-11-29 at 10.50_edited.jpg

23. पी डी जी दीपक शिकारपूर यांनी लिहिलेले  ४२ वे पुस्तक 'Smart Life 2021++' उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत याच्या हस्ते प्रसिद्ध झाले.

WhatsApp Image 2021-12-02 at 9.52.45 PM.jpeg

पुढच्या महिन्यातील कार्यक्रम

१) ६ डिसेंबरला आशिष मुजुमदार यांचा मराठी गझल कार्यक्रम नवाथे लाॅन्स वर होणार आहे 


२) १३ डिसेंबर ते १८ डिसेंबर,  एकांकिका आहेत.१३ तारखेला डीजी यांच्या हस्ते Inauguration आहे 


३) २० तारखेला नाॅमिनेशन कमिटीचे अनाउन्समेंट असेल. डाॅ मृणालचे बोर्ड आणि पुढचा प्रेसिडेंट याबद्दल.


४) २७ तारखेला ए.जी.एम. आहे

Projects in December


1) workshop on mathematics for students from 8th to 1oth std from madhyamik school will startfrom Tuesday the 7th Dec.There will be 5 to 6sessions.


2) Jaipur foot will be fitted to 47 individuals on 11th December


3) 10 Navneet questionnaire sets for 10th std students from madyamik school will be donated


4) oxygen concentrators will be donated by Nitin and Shilpa to Jahangir hospital


5) Sanyukta Dani award competition will complete 1st and 2nd round


6) 13th to 18th December we will be organising  inter Rotary Ekankika competition.


7) installation of Rotaract club at Modern college will  be organised.

Anns' Project

शूटिंग चे निमित्त आणि आनंदाचा सोहळा

साधारण ऑगस्ट महिन्यात anns ग्रुपवर एक व्हीडिओ fwd झाला. साड्यांचे विविध प्रकार, दागिने घातलेल्या सुंदर ललना बघून आम्हां सगळ्याच बायकांचं लक्ष त्या व्हीडिओने वेधून घेतलं. त्या व्हीडिओचं मनसोक्त कौतुक झालं आणि अचानक स्नेहा म्हणाली, 'आपण पण असा व्हीडिओ करूयात का?" झालं.. पहिलं तर मीच 'हो' म्हणून टाकलं. कुठलीही creativity करायची असली की मला हुरूप येतो. छान छान साड्या नेसून हौस करायला लगेच अनेक जणी तयार झाल्या. आपली मैत्रीण मीना इनामदार तर साड्यांचाच व्यवसाय करते. तिनेही लगेच आम्हां सर्वांना सांगितलं, तुम्ही अप्रतिमच्या साड्या नेसा आणि मॉडेल्स व्हा. मग स्वतःची साडी आणि अप्रतिमचीही एक साडी नेसून एक सुंदर व्हीडिओ करू या असं ठरलं.


स्नेहा मीना आणि मी कामाला सुरुवात केली साड्यांचे प्रकार, जरीच्या, बिनजरीच्या शिवाय जिला जी साडी नेसावीशी वाटेल ती नेसून व्हीडिओ शूट करायचं ठरलं.

सुंदर साड्यांच्या शूटिंग साठी सुंदर लोकेशन हवंच. सर्वप्रथम माझ्या डोळ्यासमोर आलं पाषाणचं सोमेश्वर मंदिर. मी नुकतच तिथे असंच एक शूट केलेलं असल्यामुळे मला ती जागा शूटिंग साठी योग्य आहे असं वाटत होतं.पण तिथे यायला कोणी तयार होईल का, लांब वाटू शकतं, पाऊस, साड्या मेकप खराब होईल या शक्यतांमुळे आम्ही ते कॅन्सल केलं. आपल्याच मैत्रिणींची घरं आणि त्यांच्या आजूबाजूची छान छान लोकेशन्स आहेत त्यांनाच विचारूया असं ठरलं. मग जयश्री नवाथे, ऋजुता, स्वाती जोशी, गिरीजाचं घर आणि माझी रोहन तपोवन सोसायटी अशी लोकेशन्स ठरली. गणेशोत्सव संपल्यावर शूट करायचं ठरलं आणि अमाया हॉटेल मध्ये सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात मैत्रिणींची एक मीटिंग घेऊन "आपण २७/२८/२९ सप्टेंबर या तारखंना शूट करणार आहोत; तयारीला लागा" असं सांगितलं. दुपारी ३ ते ६ ही वेळ पण ठरवली.

पहिल्याच दिवशी जयश्री नवाथेकडे शूटिंग छान पार पडलं. प्रेसिडेंट शोभाताईंनी दीपप्रज्वलन करून शुभ कार्याची सुरुवात केली. टसर आणि लिनन साड्यांचं शूट त्यादिवशी ठरलं होतं. सगळ्याच मैत्रिणींनी छान सहकार्य केलं. छान छान हसून poses दिल्या आणि तो दिवस यशस्वी केला. गप्पा हास्य विनोद आणि धमाल यांनी जयश्रीचं घर दणानून सोडलं. मटार करंजी, चहा आणि जयश्री ने स्वतः तयार केलेला मँगो केक याने तर अजूनच मजा आली.

दुसऱ्या दिवशी स्वातीकडचं शूटिंग पण असंच संस्मरणीय ठरलं. तिच्या घरी पैठणी, बनारस, इरकल, ब्रोकेड अश्या अनेक साडया ठरल्या होत्या. सगळ्या हौशी मैत्रिणींनी दोन-दोन तीन-तीन वेळा साड्या बदलून सुंदर poses दिल्या. हास्य विनोद तर विचारूच नका. इडली चटणी, ओल्या नारळाची करंजी, चहा ने लज्जत अजूनच वाढवली.

मैत्रिणींच्या शूटबरोबरच आमची कॅमेरा वूमन स्नेहाचं ही कौतुक करायलाच हवं. तिचं योगदान सर्वात मोलाचं आणि महत्वाचं. गोड हसून सगळ्यांना सूचना देत, वेगवेगळ्या सिन्स मधून कधी पदर, कधी दागिने, कधी गॅलरीतली झाडें, फुले यांबरोबर पटपट close ups, long shots टिपत होती.


दोन दिवसांच्या शूटिंगच्या धान्दलीत स्नेहाचं शूट राहून जात होतं. मग आम्ही तिघीच मीना कडे भेटून स्नेहाचेही काही शॉट्स टिपले. मीना ची सून मित्रा आणि तिची सहकारी दिपा या दोघींनी या कामी आम्हांला खूप मदत केली. अश्या तर्हेने शूटिंग ची सांगता झाली.

आम्हां तिघींना श्रमपरिहार म्हणून त्याच दिवशी अंजली गोडबोलेने तिच्या घरी श्रमपरिहाराचा बेत आखला. खरं तर इतक्या गोड अनुभवातून गेल्यावर कसले श्रम आणि कसलं काय, पण तेवढंच भेटायला आणखी एक निमित्त. मग पुन्हा सगळ्या भेटलो. पावभाजी, दहिभात, कुल्फी असा अत्यंत आवडता आणि सुटसुटीत बेत सगळ्या मैत्रिणींनी आमच्यासाठी आखला होता. किती प्रेमाने हा बेत ठरवला सगळ्या जणींनीं..!!!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक दिवस एकमेकींना भेटू न शकलेल्या मैत्रिणी अश्या रीतीने भेटल्या आणि तीन दिवस एक आनंद सोहळा साजरा केला. कायम आठवणीत राहील असा..


एक इच्छापूर्ती झाल्याचा आनंद आम्हां तिघींना आहेच. शिवाय एक कायम स्वरूपी आठवण या फिल्म च्या निमित्ताने. खरंच, साड्या हा पारंपरिक वस्त्र प्रकार म्हणजे एक जादू आहे. तिनेच आमच्यातली नाती अधिकच दृढ केली.


सरते शेवटी आपल्या प्रेसिडेंट शोभा ताइंना खूप खूप धन्यवाद. त्यांनी आमचे हे प्रयत्न बघून या व्हीडिओ ची Anns Project म्हणून घोषणा केली आणि या व्हीडिओ ला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालं. खूप खूप धन्यवाद शोभाताई आणि त्याच बरोबर इतरही सर्व मैत्रिणींना...!


रो. अश्विनी अंबिके

Faral Distribution was conducted at Apte Mook Badhir School on 3rd November

WhatsApp Image 2021-11-28 at 6.19.13 PM.jpeg

१४ नोव्हेंबर - बालदिन

१४ नोव्हेंबरला मीना इनामदार हिच्या घरी आपल्या क्‍लबमध्ये बालमित्रांसाठी बालमेळावा आयोजित केला होता. निमित्त होते बालदिनाचे!!!

सर्व बालचमूचे अगदी उत्साहात स्वागत करण्यात आले. रंगीबेरंगी कागदापासून बनवलेली सजावट, रंगीत फुगे आणि दाराबाहेर सुंदर रंगीत रांगोळी अशी सजावट केली होती. मीनाने मेळाव्यासाठी अगदी उत्तम वातावरण निर्मिती केली होती. सर्व मुले आणि सर्व आयादेखील उत्साहात यासाठी आल्या होत्या.

राही महाजन हिने बालदिन का साजरा करतात याबद्दल माहिती दिली. देशाचे पहिले पंतप्रधान नेहरू यांचा वाढदिवस साजरा करून हा बालदिन साजरा होतो. सर्व दोस्तांना ही माहिती राहीने अगदी सोप्या भाषेत सांगितली. सर्व मुलांनी गाणी, गोष्टी, जोक्स, डान्स अशा वेगवेगळ्या स्वरूपात आपापली कला सादर केली. प्रत्येकाने उत्साहाने आणि आनंदाने गाणी म्हटली. ईशानी (सतीश-अंजली रावेतकरची नात) ने 'मी कोणते फळ आहे? ओळखा पाहू' असा या छोट्या दोस्तांसाठी गेम घेतला. 'पासिंग बॉल'चा खेळही मुले खेळली.

आजच्या या बालदिनाच्या कार्यक्रमास विशेष उपस्थिती होती ती म्हणजे खास इंदूरहून आलेले विभूती पळशीकर(यार्दी) आणि तिची मुले अविराज आणि नयनतारा. विशेष म्हणजे सर्वात छोट्या दोन वर्षांच्या नयनताराने अतिशय सुंदर नाच केला. नील इनामदारने देखील सर्व मुलांमध्ये मिसळून त्यांच्याबरोबर दंगा केला. सर्वच मुलांनी आनंदी वातावरणात बालदिन साजरा केला.

मीनाने सर्व मुलांसाठी त्यांच्या आवडीचा केक, वेफर्स, ढोकळा, ज्यूस असा खास बेत संध्याकाळच्या खाण्यासाठी केला होता. अंजली रावेतकरने कलर क्रेयॉन्स, मीनाने वेफर बिस्कीट आणि अंजली गोडबोलेने मुलांच्या आवडीची चॉकलेट्स सर्वांना दिली.

 सर्व मुले खूष होऊन गिफ्ट घेऊन आनंदात घरी गेली

रो. अंजली रावेतकर

नव्या सदस्यांचे स्वागत

सौ. अलका अशोक कांबळे

सौ. अलका कांबळे दि. २२ नोव्हेंबर रोजी आपल्या क्लबमध्ये सभासद म्हणून आल्या. त्यांना सेक्रेटरी अजय याने निमंत्रित केले आहे.

सौ अलका या आपल्या क्लबला नवीन नाहीत. त्या मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स मध्ये इंग्रजी विषयाच्या विभागप्रमुख आहेत. आपल्याला माहीतच आहे की मॉडर्न कॉलेजमध्ये आपल्या क्लबचे रोटरॅक्टचे काम चालते. त्यामुळे आपल्या क्लबच्या सभासदांचा त्यांच्याशी जवळचा संबंध येत होता. त्यातूनच त्यांना आपल्या क्लबमध्ये यावेसे वाटले.  त्यांचे शिक्षण एम ए (इंग्रजी) झालेले आहे.

त्यांचे पती अशोक हे एम.एस.सी. झालेले आहेत. ते मॉडर्न कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे प्रमुख आहेत. तसेच एन सी सी चे प्रमुख असून ते लेफ्टनंट कर्नल आहेत.

त्यांना अर्णव हा मुलगा असून तो एल एल बी झालेला आहे. तो सध्या कॅनडा येथे लॉ मध्ये पुढील शिक्षण घेत आहे.

त्यांचे आपल्या रोटरी परिवारात स्वागत आहे.

रो. अजय गोडबोले

WhatsApp Image 2021-12-02 at 9.50.11 PM.jpeg
WhatsApp Image 2021-12-02 at 9.50.10 PM.jpeg
खबर बखर

Dear all ,
I am glad to inform you that I attended the Pre-Pets training,from 12th,13th,and14th November at Dukes Resort Lonavla.
The arrangements made by DGE Dr Anil Parmar and team were Excellent.
All the President elects were given glimpses of the work that needs to be done for the next year.
This training was given by experienced Rotarians,PPsand PDGS.
To name a few,Club Trainer PDG Dr.Girish Gune, Dr Palekar,Mohan Palesha,DGN, Manjoo Phadke,DGN Shital Shah,and our very Own PDG Dr. Deepak Shikarpur.His presentation was,as always, very rich in content as well as very eloquent.
PP Vrunda coordinated the culture events and gave vote of thanks in a unique way fir one of the Planery session.
She also conducted a session for Spouses. Vrinda is also having a role of District secretary- DG visits for the year 22-23 Director PP and  current Youth Director Gauri Shikarpur conducted training sessions for the spouses of President elects which were well appreciated.
She was also Judge for the cultural events on 13th November. This time all the clubs  were divided into zones. Our club was in Zone 5 region 27. Our DG is PP Tanuja Marathe of Rotary club of Pune West.
We performed a Powada for cultural events and got 4th prize.
There are a lot of  things which we need to be done  for the next year .
Will require a lot of support from all the members for the planning and execution for next year.
Hoping to make yet another fruitful year ahead.
Regards Yours


Rtn PE Dr.Mrinal Nerlekar

WhatsApp Image 2021-11-28 at 6.35.50 PM.jpeg
Highlights Minutes of BOD Meeting - 22nd October 2021

• RCPS hosted Rangila Dandiya, a program by District cultural committee
• Formation community based Interact club @ Ekalavya was approved.

• 25th October Diwali Party was hosted, program by Prashant Naseri was organised and Diwali PUSH was released

• Video shoot of charming Anns wearing beautiful saris got excellent response.

• Ann Meena Inamdar & her friends donated 100 saris to Sarthak & they stitched dresses for their girl students as well as those from Ekalavya.

• On 1st November, Diwali sweets will be given to children Apte school by the Anns .

• Proposal of New member Prof. Alka Kamble was unanimously approved.

• On the occasion of Diwali, Club will provide new dresses for Eklavya students, sponsored by Vrinda, Chandukaka, and Deepa Sathe. The Diwali sweets will be sponsored by Annet Mangesh & Madhumita Yardi.

• Similarly, at Sarthak Diwali will be celebrated with children and will be sponsored by Annet Ketki & Rohan Karkhanis (Daughter and son-in-law of PP Nitin Abhyankar). Mrinmayi, daughter of Rtn Madhuri & Vijay Gokhale has sponsored undergarments for the students.

• 6 screens manufactured by Sarthak for dispensaries are supplied to Arogya Seva Foundation.

• Health check-up camp for 100 diabetic patients was done on 29th Sept at a cost of Rs. 3000/-.

• Manali, daughter of Rujuta and Ravikiran collected and donated 1.5 lakh for Sarthak.

Birthday Fellowship

२६ नोव्हेंबर रोजी सकाळी ऑक्टोबर - नोव्हेंबर महिन्यातले वाढदिवस साजरे केले, हॉटेल अमाया मध्ये मस्त खाणे, गप्पा आणि निसर्गाच्या सानिध्यात मस्त वेळ घालवला. शोभाताईंनी आणलेला केक कापून आस्वाद घेतला.

नोव्हेंबर

औक्षवंत व्हा, सुखी व्हा  !

०४.   मनोज फुलंब्रीकर

०४.   वृन्दा वाळिंबे

१०.   मानसी ओक

११.   अनिल दामले

११.   मंजिरी धामणकर

१२.   शरद डोळे

१२.   अंजली गाडगीळ

१८.   प्रतिमा दुरुगकर

१९.   राधिका अर्जुनवडकर

२०.   अलका अभ्यंकर

२४.   प्रदीप दुरुगकर

२४.   अजय गोडबोले

२७.   हेमलता गोडसे

बर्थडे फेलोशिप लीडर

ऍन. अलका अभ्यंकर 

रेशीमगाठ वर्धापनाच्या शुभेच्छा

०८.  विजय आणि माधुरी गोखले

१४.  दिलीप आणि मंजिरी धामणकर

२३.  पराग आणि पल्लवी कापरे

३०.  दीपक आणि गौरी शिकरपूर

सपोर्ट ग्रुप 

 

रो. अश्विनी अंबिके (समूह प्रमुख)
रो. विकास काकडे 
रो. कल्पना काकडे
रो. अच्युत गोखले 
एन. निरुपमा गोखले
रो. डॉ. सूर्यप्रकासा राव
एन. अंजली गोडबोले
रो. वृंदा वाळिंबे 
रो. किरण वाळिंबे
रो. विश्वास देशमुख

डिसेंबर

औक्षवंत व्हा, सुखी व्हा  !

०६. मीना इनामदार
०७. प्रकाश गायकवाड
११. स्नेहा भावे
२०. पूनम गायकवाड
२८. सीमा महाजन
३०. डॉ. सूर्यप्रकाश राव

बर्थडे फेलोशिप लीडर

ऍन. अलका अभ्यंकर

रेशीमगाठ वर्धापनाच्या शुभेच्छा

०१. गाडगीळ अशोक - अंजली
०४. जितुरी प्रशांत - अरुणा
०७. पालकर मिलिंद - वंदना
०८. रायगावकर विजय - विनया
१३. दाते श्रीकांत - शोभना
१४. गोडसे चंद्रकांत - हेमाताई
१५. वाईकर राजेंद्र - राजश्री
१६. भाटिया रमेश - सुनिता
२६. यार्दी चंद्रशेखर - गिरिजा
२६. देसाई रविकिरण - ऋजुता
२७. फुलंब्रिकर मनोज - वसुंधरा
२९. डोळे शरद - भारती

सपोर्ट ग्रुप 

 

रो. नितीन नाईक (समूह प्रमुख)

अँन शिल्पा नाईक
रो. संजीव चौधरी
रो. दत्ता इनामदार
अँन मंदाकिनी इनामदार
अँन शिल्पा नाईक
रो. चंद्रशेखर महाजन
अँन सीमा महाजन
रो. स्नेहा भावे
नीलेश भावे

शोक संदेश

विश्वासराव देशमुख - आदरांजली

Last year when I was President of our club I interacted very closely with Vishwasrao. Before the beginning of the year he had called me and explained the concept of spreading literacy and contribution he can make to the project. Subsequently I met him multiple times and we jointly developed the outline of “Pilot” of literacy project. Vishwasrao had invested his own funds to develop few theme videos which need to be viewed by illiterates and simultaneously use the stensils to practice writing numerals (0 to 9) and alphabets. The videos produced by Vishwasrao are professional videos with catchy tunes and can be easily memorised. The videos are multi-lingual (in Marathi, Hindi and Gujrati).


I noticed immense passion in Vishwasrao about literacy and his desire to do something meaningful in the area of literacy using Rotary platform. I also noticed his strong wish to monetize his creativity of literacy videos but that was not feasible in the current times of free material being available to educate the illiterates.


Quite a few times I could not return his calls and respond back to him, and he used to be pretty annoyed with me and used to scold me as a fatherly figure. This used to make me introspect and respond better to his demands. Since Vishwasrao was undergoing dialysis three time a week during last year, I used to tell him that we should meet virtually and discuss so as to protect him from any infections. But he used to insist that I meet him in person and he used to treat me with delicious snacks and tea every time I met him.
He used to tell me that his days are numbered, and he does not have time on hand to execute his vision of making illiterates as literates. This admission by him used to make me numb and somehow encouraged me to overcome all obstacles in project execution.


I will always cherish small token gifts given by him to me for working closely with him and all the stories that he used to tell me about his experiences in dealing with Indian government agencies to promote his literacy work.


Prior to this I had noticed Vishwasrao’s enthusiasm in participating in club day celebrations to sing songs.
I remained in touch with him during this year also. When I did not receive any call from him during Oct 21, I was apprehensive and worried for his health. My fears came true when I was informed that his condition has deteriorated. I wanted to meet him in person one last time before leaving for US. But that was not to be. This regret will always remain with me.


Good Bye Sir. We will always remember you..

Rtn. Sharad Dole

Remembering Vishwasrao.jpg
Remembering Vishwasrao 1.jpg

Vishwas Deshmukh, said goodbye to all of us , on Wed. , 16 Nov 2021.  I met him first in Nov  1963, a long association of more than half a century.  We two happened to join the same company almost in the same week as fresh graduates.  He was a Chartered Accountant and a meticulous one at that.  I was an Engineer.  And the Company was American with their own standards of Audit .  Auditors walk in, generally after the event, and ask you to be accountable.  Occasionally, we would have an argument on an issue, but always resolved by end of the day.  He was a Jolly Good Fellow.

In a couple of years, Vishwas moved to Mumbai seeking greener pastures , and, we lost contact.  Then, after more than twenty years , suddenly one evening, in a crowded outdoors, the two of us hit upon each other face to face .  This was in Bharat Natya Mandir, during the interval.  Both of us with our families.  Vishwas had just returned for good from America.  In those few minutes, over just a cup of tea, we covered the long gap of Two decades.  In those few minutes, I found out that he was an active member of ‘Toast Masters Club’, in the US.  They train people in public speaking.  Vishwas was enthusiastic about connecting with people. 

Our Club was new.  I was active.  I invited him to come to our Club as a Speaker.  He readily agreed.  At the end of his speech, I invited him to be a Member of our Club, which he agreed.  He was inducted on 01 March 1987.

And, we had one excellent Jolly Good Fellow join us and be with us till the last.  I miss him all the more.

 

Rtn. Vinoo Dani

Vishwas joined our club just couple of years after we got our Charter. He was the Director of Community Service venue during my term (1993-94) as the President. One of the project he conducted was a ‘charcha satra’ on the noise pollution. It was well conducted event in MBCC and received good coverage in the press.

 

As a CA he critically analysed an article in the Times comparing performance of municipal corporations of Pune, Hyderabad and Bangalore and discussed at length with us. He also published a book on the potential of our economy and ways to improve it. He was a good badminton player who won prizes in Rotary tournaments  and also a bicycle enthusiast.

 

He had worked for several years in Zambia and later in USA. I recall one very interesting story he told us as a senior employee in Zambia. After Idi Amin in some African countries in those days Indians were leaving and natives were replacing them. An office boy used to watch Vishwas very closely and Vishwas just asked him the reason for such a close watch. The office boy responded that he was trying to learn Vishwas’ job. He said he could write and sign like him but he still does not know how to cut supari (beetle nut) with adakitta; presuming that cutting and eating supari was one of the job requirements.


Most of us will remember him most for his love for music.  Rehearsals for music programme of our club were often held at his residence in Jaykamal Apartments. His 70th birthday celebration was on his terrace where we all sang and that was followed by fellowship and dinner. I don’t recall which song I sang but I do remember the song Veena sang; it was a song ‘kaisi hai paheli jindagani’ from the movie ‘Parinita’. I may add that the song was a hit!

 

For the past few years, due to his health, he rarely came to our weekly meetings but he did show up for a couple of our club annual events.

 

Vishwas was a good soul, very friendly and always a good company. I will sorely miss him.

 

Rtn. Avinash Kulkarni

Remembering Vishwasrao.jpg

श्रद्धांजली 


आपल्या क्लबचे सदस्य विश्वासराव देशमुख यांना 16 रोजी  देवाज्ञा झाली. जरी ते गेले सात-आठ वर्ष प्रकृतीच्या कारणास्तव मीटिंग ला येऊ शकले नाही तरी ते आपल्या रोटरी कुटुंबातील सदस्य होते. व्यवसायाने ते चार्टड अकाऊंट होते आणि त्यांना सायकलिंग आणि बॅडमिंटन खेळण्याचा छंद होता. त्याचप्रमाणे म्युझिक आणि गाणं हे त्यांचं पॅशन होतं. ह्याच छंदाचा उपयोग करून त्यांनी प्रौढ साक्षरतेसाठी एक प्रोजेक्ट तयार केला होता. मागच्या वर्षी पायलट स्केलवर आपण तो खालापूर येथे राबवला होता आणि त्याचा चांगला परिणाम झाला असे त्या संस्थेचे म्हणणे आहे. खरोखरच अप्रतिम नावीन्यपूर्ण कल्पना होती. गेली सात-आठ वर्षे ते क्लबमध्ये येत नव्हते पण त्यापूर्वी मात्र प्रत्येक क्लब डे च्या प्रोग्राम मध्ये त्यांनी भाग घेतलेला मला आठवतोय. आपल्या पैकी अनेक मेंबर्सनी त्यांच्याबरोबर गाणी सुद्धा म्हटलेली आहे. त्यांच्या निधनाने आपण एक चांगला सदस्य गमावला आहे यात शंका नाही. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच सदिच्छा.

रो. शोभा राव

Rotary International

Rotary Peace Award

The ROTARY PEACE AWARD was  given virtually at "International Peace Conference" ,IPC.

RI President Shekhar Mehta had delivered it's Valedictory  Address on 19 Sept. 2021.

IPC was hosted by  RC  Chinchwad with District 3131 .

The award was physically handed over to Vice Chancellor, Dr.Nitin Karmalkar of Pune University at his office on 4 October '21.

The award was given as a representative  recognition of the herculean task fulfilled by academia at large to quickly adapt to the changed scenario of education due to closure of all schools and colleges brought about by   global pandemic of COVID.

The academia did an outstanding job of switching en masse to ONLINE PEDAGOGY.

This ensured a continuity of delivery of education and so  sustained PEACE in an otherwispue likely  pandemic induced distress in  society

PP. Rtn. Pradeep Wagh

Rotary Int.jpg
Rotary and Polio

Swedish physician Ivar Wickman in 1905 found out  that polio is a contagious disease that can spread from person to person, and also recognizes that polio could be present in people who show no symptoms. In 1908 Two physicians in Vienna, Karl Landsteiner and Erwin Popper, discover that polio is caused by a virus. In 1916 A major polio outbreak in New York City kills more than 2,000 people. Across the United States, polio takes the lives of about 6,000 people, and paralyzes thousands more. A vaccine developed by Dr. Jonas Salk in 1955 is declared “safe and effective. In 1979 Rotary International begins its fight against polio with a multi-year project to immunize 6 million children in the Philippines. In 1985 Rotary International launched “PolioPlus”, the first and largest internationally coordinated private-sector support of a public health initiative, with an initial fundraising target of US$120 million.

Rotary has been working to eradicate polio for more than 35 years. Our goal of ridding the world of this disease is closer than ever. Rotary members have contributed more than $2.1 billion and countless volunteer hours to protect nearly 3 billion children in 122 countries from this paralyzing disease. Rotary’s advocacy efforts have played a role in decisions by governments to contribute more than $10 billion to the effort. In 1988 Rotary International and the World Health Organization launched the Global Polio Eradication Initiative. There were around 350,000 cases of polio in 125 countries at that time. In January 2009  the Bill & Melinda Gates Foundation pledges $355 million and issues Rotary a challenge grant of $200 million . They are donating to this cause till Date. Now we have 1 to 2 Gates Challenge  . What this means is every 1 Dollar donated by rotarians will be matched Twice by them.

Today, polio remains endemic only in Afghanistan and Pakistan. But it’s crucial to continue working to keep other countries polio-free. If all eradication efforts stopped today, within 10 years, polio could paralyze as many as 200,000 children each year.

Rukshar from Kolkatta was the last Polio case in India.

PDG. Rtn. Deepak Shikarpur

WhatsApp Image 2021-11-28 at 7.06.24 PM.jpeg
International Peace Conference 2021

International Rotary Peace Conference 2021 was held on 18th and 19th September, 2021 to celebrate the WORLD PEACE DAY and to mobilise the varied aspects of Peace and the major role it plays in resolving conflict. With the support of our dynamic and visionary District Governor Rtn Pankaj Shah and the guidance of the Peace Building Team of RID 3131, Counsellor Rtn Dr. Pradeep Wagh, this conference was hosted by Rotary Club of Chinchwad Pune.
 

Over 700 delegates from world over registered from some 37 countries.


The gracious presence of Rotary International President Rtn Shekhar Mehta and Rotary International Director Rtn Dr. Mahesh Kotbagi made the Conference an enriching experience for the participants.
 

PP Rtn.Pradeep Wagh of Rotary Club of Pune Shivajinagar,RCPS  got the honour of initiating this conference with his OPENING SPEECH. Pradeep spoke of the importance of the focus area of PEACE in Rotary. He traced the resurgence of this Focus in RID 3131 when RCPS staged the esteemed International Understanding  and Peace Symposium in Feb.2017. RCPS also instituted fund donated by Development Education (International) Society,DEIS  to give away ROTARY PEACE AWARDS every year.

PP Rtn. Pradeep Wagh

The full OPENING SPEECH of PP Pradeep may be heard by clicking on following YouTube link.

Rtn. Benjamin List, Germany, wins Nobel Prize for Chemistry

Rotarian Benjamin List, member of the RC Mülheim ad Ruhr-Schloß Broich, Germany wins Nobel Prize for Chemistry.
 

He shares the prize with the US researcher David WC MacMillan. Both have developed methods of accelerating chemical reactions.

PRID Sushil Gupta leaves for heavenly Abode

PRID Sushil Gupta, doyen of Rotary in India left for his heavenly abode this morning after a prolonged illness.

He was nominated to serve as RI President (2019-20).

It is a huge loss for Rotary, especially in India. An excellent human being, outstanding leader of Rotary, a successful industrialist, Padmashri, he leaves behind a rich legacy. We will miss him dearly.

Our heartfelt condolences to Vinitaji and family May the departed soul meet its creator in peace.

WhatsApp Image 2021-11-28 at 6.47.41 PM.jpeg

Rotary International President Shekhar Mehta met Honourable Prime Minister Narendra Modiji, who Expresses a desire in the Meeting that  Rotary should Works on ‘Nutrition’.

Exclusive Meeting took place Between Rtn Dr Shoba Rao, President RCP Shivajinagar & Rotary International President Shekar Mehta to understand her Plans about Nutrition.

Rtn Dr Shoba Rao Specially Selected in National Nutritional Planning Committee by Rotary International Shekhar Mehta.

Heartiest Congratulations to Rtn Dr Shobha Rao!! You have made us proud.

D G Pankaj Shah

डिस्ट्रीक्टच्या घडामोडी

PP Rtn. Sheetal Shah District Governor 21-22, Rotary International District 3131

Happy to Convey that the DGND Election Process was initiated on 2nd September 2021 & Nomination Forms we’re invited from Intrested Clubs.

The deadline was set to 5 pm October 3rd 2021.

I confirm that we received only ONE Application from RC Pune East of Rtn Shital Shah.

I hereby declare :  Rtn Shital Shah as DGND 24-25.

Heartiest Congratulations

Rtn. Pankaj Shah

District Governor 21-22, Rotary International District 3131.

DG.jpg

RCPS contribution to Polio recognised by District

On 24th October 2021, RCPS’s contribution was recognised on the occasion of World Polio Day.

On this day, PDG Deepak Shikarpur and Gauri Shikarpur too were felicitated for Genarous Contribution to Polio fund.

District.jpg

PDG Ghisulalji Solanki passed away on 18th November. May his soul Rest in Peace

WhatsApp Image 2021-11-28 at 6.46.41 PM.jpeg
Rotary Information

November is Rotary Foundation Month


Many people decide to become a member of Rotary because they see in this organization a real opportunity to live out the motto of “service above self.”  They are seeking truly meaningful ways to give back to their community.   Rotary provides many such opportunities, in particular, through five avenues of service: club service, vocational service, community service, international service and youth service.

Through these avenues, Rotarians give of their time and resources in support of efforts from the local level to globally in order to change people’s lives for the better.  The Rotary Foundation (TRF) is the funding mechanism by which Rotarians are able to collectively make a significant impact in the world.

In 2016 the Foundation celebrated 100 years of existence.  Beginning with a donation of $26.50, TRF now has a net worth of just over $1 billion and was named the World’s Outstanding Foundation for 2016 by the Association of Fundraising Professionals.  Your donation to TRF goes to support the many existing programs of Rotary International, improving health and education, and promoting peace and economic development throughout the world.  Some of those dollars also return to us locally to be used as matching grants for our own club’s projects, such as our donation for learning materials this year for the CPS Title I program.  As we recognize the Foundation in the month of November, all Rotarians are encouraged to commit to making a $100 per year donation, or as much as they are able, as another avenue for service above self.

has a net worth of just over $1 billion and was named the World’s Outstanding Foundation for 2016 by the Association of Fundraising Professionals.  Your donation to TRF goes to support the many existing programs of Rotary International, improving health and education, and promoting peace and economic development throughout the world.  Some of those dollars also return to us locally to be used as matching grants for our own club’s projects, such as our donation for learning materials this year for the CPS Title I program.  As we recognize the Foundation in the month of November, all Rotarians are encouraged to commit to making a $100 per year donation, or as much as they are able, as another avenue for service above self.


December is Disease Prevention and Treatment Month

During the month of December, we recognize all that Rotary International and Rotarians are doing to combat diseases through effective treatment and prevention.  The pandemic of 2020 has certainly made those efforts even more challenging.  It was certainly no small task that RI decided to take on in 1985 when we pledged to eradicate polio. 

Only one infectious disease has ever been eradicated before: smallpox in 1979.  That was due to diligent vaccination and surveillance efforts; the same efforts that have bought mankind ever closer to the elimination of another devastating disease.  An amazing partnership between RI, the World Health Organization, the Center for Disease Control and Prevention, the Bill and Melinda Gates Foundation and regional governments is working to make this possible.  The advances made through those partnerships are also being applied to newer challenges such as the response to COVID-19.

Although infectious diseases continue to be a major cause of illness and death across the globe, they are not, or at least were not before 2020, the major health concerns for most developed countries.  Many people are still seeing their lives shortened by chronic diseases such as heart disease, diabetes and cancer.  Many of these conditions are not caused by infectious agents but are rather related to certain health behaviours and social conditions.  Rotary’s continued involvement in Disease Prevention and Treatment will thus need to be directed toward finding solutions to these social and behavioural determinants of health while continuing to fight against existing and emerging disease threats.  You as a Rotarian have been enlisted as being a part of that fight.

Rtn. Yashwant Gokhale

w0262_1s_Watercolor-Floral-Pattern-Wallpaper-for-Walls-Pastel-Flowers_Repeating-Pattern-Sa
Lalit Vibhag.png
Godbole Anjali.jpg

होममेकर्स आणि बरंच काही

अष्टपैलू अंजली गोडबोले

आपल्या परिचयात किंवा आपल्या माहितीत कर्तृत्ववान व्यक्ती असतात. आपोआपच त्यांच्या नावाशी त्यांच्या गुणांची सांगड आपल्या मनात घातली जाते. त्यानंतर त्याच नावाची नवीन व्यक्ती समोर आली की आपसूकच या नव्या व्यक्तीत आपण त्या जुन्यांचे गुण ताडून पाहू लागतो. 

आपल्या क्लबच्या संदर्भात पाहिलं तर २०१३ साली चौथी अंजली-अंजली गोडबोले आपल्या क्लब मध्ये प्रवेश करती झाली आणि आपल्या पहिल्या तीन अंजलींच्या रांगेत जाऊन बसली. पहिल्या अंजली ताई अभ्यंकर, दुसरी अंजली रावेतकर आणि तिसरी अंजली गाडगीळ. तिघींचे गुण वेगवेगळे पण 'कर्तृत्व' ही त्यांच्यातली समानता. या तिघींनी गेल्या पंचवीस-तीस वर्षांच्या सहवासात आपल्या मनात घरं केली. त्याचप्रमाणे कला-क्रीडा व्यवसायात निपुण आणि पेट्स प्रेमी असलेल्या ह्या चौथ्या अंजलीच्या आपल्या मनातल्या घराची उभारणी वेगाने आकार घेत आहे हे खरं !!

गालाला गोड खळ्या असणारी ही हसरी आणि मोकळेपणाने बोलणारी अंजली समोरच्या व्यक्तीच्या मनाशी सहजच धागा जुळवते. अंजली पूर्वाश्रमीची अंजली  खेर. तिचं सात आठ वर्षापर्यंतचं  बालपण पुण्यात गेलं. नंतर मॅट्रीक पर्यंतचं  शिक्षण भुसावळ वरणगाव येथे झालं. तिचे वडील खडकीच्या एच. ई. (हाय एक्सप्लोजिव्ह) फॅक्टरीत कामाला होते. तेथून त्यांची बदली वरणगावला झाली. वरणगाव हे तसं अगदी छोटं  खेडं. फॅक्टरीच्या उभारणीमुळे नावारूपाला आलेलं. इथे  फॅक्टरीतील लोकांसाठी बांधलेले  क्वार्टर  अतिशय छान होते. त्याकाळी आधुनिक पद्धतीने बांधलेल्या या वसाहती होत्या तरी शाळेसाठी मुलांना भुसावळला जावं लागे. वसाहतीतली मुलं रोज बसने भुसावळला जात-येत. आज काल नवीन वस्ती झाली की दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींची पूर्तता अल्पावधीतच तिथे उभी राहते. तशी स्थिती वरणगावची नव्हती. त्यामुळे तिथे चांगली शाळा नव्हती. साहजिकच अंजली स्कूल बसने रोज भुसावळला जाई. अंजली  तशी लहानपणापासूनच धीट होती. शाळेतल्या विविध ऍक्टिव्हिटीज मध्ये ती नेहमी सहभागी असे. सर्व स्पर्धांमध्ये ती भाग  घेई. तिने वक्तृत्व स्पर्धेत अनेक बक्षिसं मिळवली तसेच बॅडमिंटनमध्ये प्रावीण्य मिळवलं. घरी तिच्या आईला भरत काम विणकामाची खूप आवड होती. ते पाहून अंजलीलाही त्यात गोडी निर्माण झाली. तिची ती आवड अजूनपर्यंत तिने उत्तम रीतीने जोपासली आहे. साड्या कुडते यावरचं तिचं भरत काम लक्षवेधी असतं. एवढंच नव्हे तर मोठमोठी बेडशीट्स ही भरत कामाने देखणी करण्याची तिला आवड आहे. वरणगावला असताना अंजलीला घराभोवती बाग करायला छान जागा होती. तिथे तिच्या आईने खूप झाडं लावली होती. आईच्या बरोबरीने झाडा-फुलांशी अंजलीचीही गट्टी झाली होती. तिला काम खूप आवडू लागले. भरतकामाप्रमाणेच बागेची तिची आवड आजतागायत कायम आहे. आजही बंगल्याभोवती बाग करण्यात ती रमून जाते.

मॅट्रिक पर्यंत भुसावळला शिक्षण झाल्यानंतर कॉलेजच्या शिक्षणासाठी तिला पुन्हा पुण्याला यायला मिळालं. तिच्या वडिलांची वरणगाव येथून पुन्हा पुण्याला बदली झाली. त्यावेळी खडकीच्या फॅक्टरीतल्या अधिकाऱ्यांसाठी रेंज हिल्स येथे घरं होती. त्यामुळे अंजली रेंजहिल्स येथे राहू लागली. तेथून ती मॉडर्न कॉलेजमध्ये रोज शिक्षणासाठी येऊ लागली. वरणगाव  येथून  पुण्यात आल्यावर मॉडर्न कॉलेजमध्ये इंग्रजी माध्यमात शिकत असताना तिला नाही म्हटलं तरी सुरुवातीला जरा बुजायला झालं असं तिने प्रांजळपणे सांगितलं. पण तिच्या हसऱ्या बोलक्या स्वभावामुळे तिला कॉलेजमध्ये छान मैत्रिणी मिळाल्या आणि त्यातल्याच एका मैत्रिणीच्या भावाच्या रुपाने आयुष्याचा जोडीदारही मिळाला ! 


अंजलीची कॉलेजची दोन वर्षं झाली असतानाच तिला अजय भेटला. तो तिच्या मैत्रिणीचा भाऊ असल्यामुळे त्यांची सहजच भेट झाली. हसरी गोड खळ्या  असणारी  बोलकी अंजली आणि अजयचं प्रेम जमून गेलं. अजयच्या घरच्यांची इच्छा त्यांनी लगेच लग्न करावं अशी होती पण अंजलीला पदवी पदरात पडल्यानंतरच लग्न करायची इच्छा होती. तसा निश्चय तिने अजयच्या घरच्यांना बोलून दाखवला. त्यांनीही ते मान्य केलं आणि आणखी दोन वर्षानंतर पदवी मिळाल्यानंतरच अंजली बोहल्यावर चढली .


 त्यानंतर आता काय करायचे असा विचार सुरू झाला तेव्हा अजयने नोकरी करण्याला विरोध दर्शवला. त्याच्या मते नोकरीसाठी बाहेर गेलं की घरातल्या मुलाबाळांची आबाळ होऊ शकते. त्यामुळे अंजलीने बाहेर नोकरी करण्याचा विचार मनातच आणला नाही . तिने घरी काही उद्योग व्यवसाय करण्यास घरातल्या सर्वांचा पाठिंबा होता. तेव्हा तिने व तिच्या जावेने मिळून स्क्रीन प्रिंटिंग चा व्यवसाय सुरू केला. त्यामध्ये तिच्या सासू-सासर्‍यांनी त्यांना सर्वतोपरी मदत केली. अंजली सांगते की सासू-सासरे दोघेही अत्यंत प्रेमळ आणि सपोर्ट देणारे. त्यामुळे या घरात रमून जायला आणि व्यवसाय करायला मला व माझ्या जावेला खूप सोपं गेलं. अंजलीने १९८९ मध्ये हा व्यवसाय सुरू केला तेव्हा तिची मुलं लहान होती पण सासूबाईंनी मुलांना सांभाळण्याचं काम खूप छान केलं. त्यामुळे आम्हाला व्यवसायासाठी बाहेर जाणं खूप सुलभ झालं असं सांगून अंजली म्हणाली "काम मिळवून आणणे, नंतर त्या साठी लागणारे मटेरियल आणणे, बँकात जाणे, काम पूर्ण झाल्यावर डिलिव्हरी देणे अशी सर्व कामं आम्ही करत असू. त्यासाठी मी व्हेस्पावरून हिंडत असे. या निमित्ताने बाहेरच्या जगाशी खूप संबंध आला आणि या सर्व कामांची माहितीही झाली". ती पुढे म्हणाली, "या निमित्ताने विविध लोकांना भेटणं झालं. त्यांच्याशी संवाद साधणं, पैशाचा हिशोब करणे, हिशोब नीट लिहून ठेवणे, बँक व्यवहार या साऱ्याची उत्तम माहिती झाली आणि छान अनुभव मिळाला. शिवाय आपणही काही करू शकतो याचा तर आनंद खूपच आत्मविश्वास वाढवणारा!" अर्थात या सगळ्यात सासऱ्यांची खूप मदत होत होती याचा तिने आवर्जून उल्लेख केला. 


साधारण दहा वर्ष त्या दोघींनी हा व्यवसाय केला. दरम्यान अंजलीचा मुलगा दहावी झाला त्यावेळी तिला आणखी एक आवडीचं काम करावं असं वाटू लागलं. तिला कॉलेजच्या परिक्षेला सुपरवायझर म्हणून काम करण्याची खूप इच्छा होती. तेव्हा तिकडे तिने मोर्चा वळवला आणि पुढे सुमारे दहा वर्ष ती सिम्बॉयसिस, बीएमसीसी इत्यादी ठिकाणी होणाऱ्या विविध परीक्षांना सुपरवायझर म्हणून जाऊ लागली. यानिमित्ताने कॉलेजमधल्या आणि कॉलेजभोवतीच्या जीवनाशी तिचा संबंध आला. खूप प्राध्यापकांशी तिच्या ओळखी झाल्या तसेच विविध शैक्षणिक संस्थांमधील कामकाजाशी तिचा संबंध आला आणि हे वेगळं जग पाहायला मिळालं. 


दरम्यान बागेची तिची आवड कायम होती आणि या आवडीची जोपासना ही तिच्या बंगल्याभोवतीच्या बागेद्वारे उत्तम होत होती. या काळात  तिने संगणकाचं शिक्षण घेतलं आणि ती अजयच्या ऑफिसमध्ये शक्य ती मदत करू लागली.


त्यानंतर साधारण २००० सालापासून त्यांच्या घरचे आंबे पुण्यात येऊ लागले. रत्नागिरी जिल्ह्यात 'कडू' या गावी त्यांचे घर आहे, जमीन आहे. आंब्याची बरीच झाडं आहेत. तिथे दहा गाईसुध्दा आहेत. त्यांची सगळी देखभाल करायला दहा-बारा माणसं कामाला आहेत. त्या ठिकाणाहून आंबे पुण्यात आणणं सुरू झालं तेव्हा हा सीझनल व्यवसाय करण्याचं तिच्या मनात आलं. घरच्या सर्वांचा सक्रिय पाठिंबा कायमच  होता तेव्हा आंबे विकायचं काम तिने सुरू केलं. ती म्हणाली "आंबे आधी झाडावरून उतरवून घेणे इथपासून या कामांना सुरवात  होते. मग कच्चे पिकलेले वेगळं करणं, त्यांच्या आढ्या लावणं, मग त्यांच्या पेट्या भरणं, मग त्यांचा ट्रान्सपोर्ट, मग त्यांची विक्री असं बऱ्याच गोष्टी यात अंतर्भूत असतात. पण मला हे आवडत होतं म्हणून मी ते करू लागले. अर्थात या सर्व कामात मदतीला माणसं होतीच हे निश्चित. शिवाय हे काम तसं मर्यादित म्हणजे तीन-चार महिन्यांपुरतं असतं. त्यामुळे छान वाटतं. अर्थात त्या काळात खूप खटपट करावी लागते. खूप कष्ट घ्यावे लागतात. फळांची काळजी खूप घ्यावी लागते हे खरं. पण ते मला आवडतं. " याशिवाय आमसूल, कोकम, आगळ या गोष्टी तिकडून येतात त्यांची विक्रीही अंजली करत असते. पूर्वी ती स्वतः फणसाच्या पोळ्या करूनही विक्री करत होती.


अशा तऱ्हेने आंब्याचा व्यवसाय आकर्षक वाटला तरी त्यात खूप खबरदारी घ्यावी लागते. आंबे फार लवकर खराब होतात. त्यामुळे त्याची काळजी खूप घ्यावी लागते. थोडक्यात, त्या वेळी  हा  व्यवसाय  करणाऱ्यांना अक्षरशः वेळेशी स्पर्धा करावी लागते असं अंजलीने स्पष्ट केलं. ती म्हणाली "आंबे लवकर खराब होतात. त्यामुळे सारखी आंब्यांची निवड करत राहायला  लागतं. खराब होण्याच्या मार्गावर असलेले आंबे बाजूला काढणं हे एक मोठं काम असतं. पण आवडतं मला हे सारं."


अर्थात अंजली हे कष्ट घेत असल्यामुळे आपला मात्र खूप फायदा झालेला आहे ! रत्नागिरीचे आंबे थेट आपल्याला घरबसल्या खायला मिळू शकत आहेत. त्यामुळे अंजलीने हे  कष्ट घ्यावेत असंच मी म्हणेन.

 

रत्नागिरी  जिल्ह्यातीलच ब्रह्मगिरीचा त्यांचा व्याप किती मोठा आहे हे आपल्यापैकी अनेकांनी पाहिले आहे. ती जमीन मु़ळात ताब्यात घेण्यापासून सर्व काम अजयने केले आहे. त्यावेळी त्याचं वास्तव्य खूप वेळा तिकडे असणं अपरिहार्य  होतं. त्यावेळी अंजलीने  पुण्यात आपले व्यवसाय उ़भे करून छान सांभाळले. मात्र ब्रम्हगिरीची आजची सुंदर उभारणी ही सर्वस्वी अजयच्या कष्टातून झाली आहे असं अंजलीने सांगितलं. 

अजय-अंजली २०१३ साली आपल्या क्लबमध्ये आले. त्यानंतर ते दोघेही क्लबच्या विविध उपक्रमात किती हिरीरीने भाग घेतात हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. आत्ता तर काय अजय सेक्रेटरी आहे त्यामुळे क्लबच्या उपक्रमात ते अग्रभागी असणं ओघानंच येतं. क्लबच्या निमित्तानेही पुन्हा अंजलीला खूप मित्र-मैत्रिणी मिळाले, आणि क्लबच्या विविध उपक्रमात भाग घ्यायची संधी मिळाली, याचा तिला आनंद आहे. अशी ही अंजली विविध व्यवसाय यशस्वीपणे केलेली, विविध कलांमध्ये तरबेज असलेली, बागकामात लक्ष घालून सुंदर बाग फुलवणारी. या अंजलीला प्राण्यांचे खूप प्रेम आहे. लग्नाच्या आधी तिच्या घरी तिने कायम कुत्रा पाळलेला होता. इकडे सासरी मात्र इथे तिच्या कडे मांजर आहे. तिला कुत्र्या-मांजराची खूप आवड आहे. आता ती तिचा सिझनल असलेला आंब्याचा व्यवसाय, आपल्या क्लबचे विविध उपक्रम, तिचं भरत काम, तिची बाग आणि मुख्यतः तिची नातवंड यात रमून गेली आहे. अशी  ही माणसांवर,  प्राण्यांवर, झाडा-फुलांवर प्रेम करणारी अंजली. तिच्या प्रेमाचा आपल्यालाही नेहमी आनंद मिळू दे हीच इच्छा.

ॲन. सरिता भावे

मनाचे श्लोक - भाग चौथा

ऍन. डॉ. मृणाल नेर्लेकर

कथा - कथन

रो. भारती डोळे हिचा आपल्या क्लबच्या अनेक प्रकल्पात आणि उपक्रमात सक्रिय सहभाग असतो.  भारती पी.एच.डी आहे. तिचे वक्तव्य उत्तम आहे. Intellectual property rights हा तिचा हातखंडा विषय आहे.  मंजिरीच्या आवाहनाला दाद देऊन अनेकांनी कथाकथन करण्याचा यंदा यशस्वी प्रयत्न केला आहे. या महिन्यात भारतीने कथा कथन केलें आहे. कथेचं नाव आहे 'The Deal.' भारतीने ही गोष्ट स्वतः लिहिली आहे. आणि सांगितली सुद्धा आहे. ऐकू या तर....

खाण्यासाठी जन्म आपुला

सीमाच्या घरी एकदा जाण्याचा योग आला. तिने अगदी मस्त आणि वेगळे दडपे पोहे केले होते. खाल्यानंतर बराच वेळ त्याची चव जिभेवर रेंगाळत होती. तिला 'त्याची रेसिपी शूट करून पुशसाठी देशील का' असं विचारल्यानंतर तिनं पटकन होकार दिला आणि शूट करून पाठवलं सुद्धा. चला तर पाहू या..सीमाचे चविष्ट 'दडपे पोहे'

Seema Mahajan Cooking

Seema Mahajan Cooking

Watch Now

हस्त सामुद्रिक शास्त्र

मस्तक रेषा


या रेशेची सुरुवात आयुष्य रेषेच्या जवळून थोडीशी लांबून किंवा आयुष्य रेषेच्या आतल्या बाजूने, आयुष्य रेषा जिथून सुरु होते तिथूनच होते. व्यक्तीची बौद्धिक हुशारी व्यावहारिक दृष्टिकोन, स्वतःविषयीच्या समजुती यावरून पाहता येतात. ही रेषा सुरू होऊन तिचा शेवट तळहाताच्या डाव्या बाजूस होतो. ही रेषा स्पष्ट व कोणत्याही प्रकारचे अडथळे नसणारी व स्वच्छ व अखंड असावी.


मेंदू विषयीचे आरोग्य या रेषेवरून पाहिले जातात. रेषा जेवढी उठावदार तेवढी ती व्यक्ती हुशार, तल्लख बुद्धीची व त्वरित काम करणारी असते.


रेषा जेवढी अस्पष्ट व वेगवेगळ्या अडथळ्याचे असते तेव्हा व्यक्ती थोडी हळुवार कामे करणारी व निर्णय घेता न येणारी असते. तिला ज्ञान बेताचेच असते. पण आपल्याला खूप ज्ञान आहे असे इतरांना भासवते. आता मस्तक रेषेच्या सुरुवातीची लक्षणे पाहूया.                                        

१: मस्तक रेषा आयुष्य रेषेला चिकटून सुरुवातीला प्रवास करत असेल तर ती व्यक्ती अतिशय भावनावश विचार करून निर्णय घेणारी असतात कुटुंबावर त्यांचं खूप प्रेम असते.
 

२: आयुष्य रेषेपासून थोडी लांबून सुरू होणारी मस्तक रेषा स्वतंत्र विचार करणारी व कोणावरही अवलंबून नसणारी असतात. त्यांच्यात आत्मविश्वास खूप असतो व त्याच्या जिवावर ते यशस्वी होतात. परंतु हे अंतर खूप जास्त असेल तर त्या व्यक्तीला स्वतःविषयी एक प्रकारचा गर्व असतो व थोडी घमेंडी वृत्ती असते.
 

३: गुरूच्या उंचवट्यापासून सुरू होणारी मस्तक रेषा असणारी व्यक्ती योग्य निर्णय घेणारी, महत्वाकांक्षी, निश्चयी, अधिकार गाजवणारी असते.


४: आयुष्य रेषेच्या आतल्या बाजूने सुरू होणारी मस्तकरेषा कमी आत्मविश्वास असणारी व थोडी भित्र्या स्वभावाची असते. हिला दुसऱ्याच्या मनाने गोष्टी करायची सवय असते.


आखूड, सरळ मस्तक रेषा असेल तर व्यक्ती आपली कामे झटपट करतात. मस्तकरेषा जेवढी लांब व बिना अडथळा असेल तर व्यक्ती बुद्धिमान, दूरदृष्टी, जिद्दी व खूप परिश्रम करायची तयारी असते व ते आपल्या  क्षेत्रात यशस्वी होतात.


मस्तकरेषा व आयुष्यरेषा जिथे एकमेकापासून ज्या ठिकाणी दूर जातात तिथे एखादी रेषा एकमेकांना छेदत असेल तर तरुणपणी चुकीच्या व्यक्तीवर प्रेम करून ती व्यक्ती स्वतःचे नुकसान करून घेते व त्यामुळे कदाचित आयुष्य थोड्या वेळा करता का होईना उदासीन होते.  मस्तक रेषेवर ज्या ज्या ठिकाणी ठिपके, फुल्या, आडव्या रेषा किंवा यवचिन्हे असतात त्या त्या वयात व्यक्तीला अडचणींना सामोरे जावे लागते व मानसिक त्रास सहन करावा लागतो. मस्तक रेषा जिथे संपते तिथे जर का रेषेचे विभाजन होत असेल तर ती व्यक्ती उत्तम कवी, लेखक कलांची आवड असलेली असते.            

मस्तक रेषा चंद्र उंचवट्या कडे वळत असेल तर ती व्यक्ती ध्येयवादी, प्रणयी, कल्पनाशक्ती जास्त असणारी असतात. या ठिकाणी मात्र काही अशुभ चिन्हे असतील तर मग व्यक्ती थोडी वेडसर व टोकाची भूमिका घेणारी असते.                        

 

मस्तक रेषा हृदय रेषा (हार्ट लाईन) कडे वळत असेल तर अशी व्यक्ती चैनी जीवन जगण्याकडे बेफिकीर वृत्तीची दुसऱ्याच्या आहारी जाऊन स्वतःचे नुकसान करून घेणारी असते. मस्तकरेषा वेडीवाकडी व धुरकट असेल तर व्यक्ती अस्वस्थ व अस्थिर वृत्तीची असते.

 

कधी कधी दुहेरी मस्तक रेषा पाहायला मिळते. अशी व्यक्ती दुहेरी वृत्तीची, स्प्लिट पर्सनॅलिटीची पाहायला मिळते. आज एका तऱ्हेने वागेल तर उद्या त्याची तऱ्हा बदललेली असते. मस्तक रेषेवरून इतर बऱ्याच गोष्टी हाताची एकंदर ठेवण, तिचा रंग व इतर उंचवटे या वरून रेषांशी असलेला संबंध यावरून त्याचा बोध होतो. आता पुढील प्रकरणात हृदय रेषा (हार्ट लाईन) व भाग्यरेषा (फेट लाईन) याविषयी विचार करू या.

रो. अशोक गाडगीळ

आरोग्यवर्धिनी

पोटॅशियम (k)

पोटॅशियम हा आणखी एक महत्त्वाचा क्षार असून तो कितीतरी महत्वाच्या क्रियांमध्ये गरजेचा असतो. प्रौढव्यक्तिंच्या शरीरात ह्याचा साठा 140 ग्रॅम इतका असतो व तो मुख्यत: म्हणजे सुमारे 70 टक्के इतका द्रवांमध्ये (blood, water) असतो तर 30 टक्के इतका हाडांमध्ये असतो. तो मज्जातंतू मध्ये पण असल्याने मेंदूच्या सक्षम कार्यासाठी गरजेचा आहे. हा इलेक्ट्रिकली चार्जड असल्याने पेशींच्या एकमेकांतील संदेश वाहनासाठी महत्त्वाचा असतो. ह्याचे काम सोडियम ह्या दुसर्‍या महत्त्वाच्या क्षाराशी निगडीत असल्याने सोडियम – पोटॅशियम पंप असे त्याच्या कार्याला संबोधले जाते. सोडियम हा पेशीच्या बाहेरील द्रव्यात असतो तर पोटॅशियम हा पेशीच्या आतील द्रव्यात असतो त्यामुळे त्यांच्या क्रिया एकमेकांच्या विरुद्ध असून ते पेशींचे संतुलन सांभाळण्याचे काम करतात. तसेच शरीरातील आम्लीक आणि अल्कलीक संतुलन राखण्याचे पण काम हा क्षार करत असतो.

ह्या क्षाराचे शोषण देखील लहान आतड्याच्या सुरवातीच्या भागात होते आणि ज्यादा क्षार लघवी वाटे बाहेर टाकला जातो. पोटॅशियम क्लोराईड ह्या रूपातल्या क्षारांचे सर्वात चांगले शोषण होते. म्हणजे किडनी ही अनेक क्षारांच्या बाबतीत उत्सर्जनाचे संतुलन करत असते. रोज सरासरी 195 mg इतका क्षार हा बाहेर टाकला जातो आणि हे भरून काढण्यासाठी कमीत कमी 800 mg इतके पोटॅशियम रोज सेवन केलेच पाहिजे. ह्या क्षरासाठी रोजसाठी सुचवलेली दैनंदिन गरज खरे म्हणजे 2.6 ग्रॅम महिलांसाठी व 3.5 ग्रॅम पुरुषांसाठी इतकी आहे. आपल्या शरीराला सोडियम पेक्षा पोटॅशियमची गरज जास्त आहे परंतु प्रत्यक्षात मात्र परिस्थिती उलटीच असते. अनेक अभ्यासांमधून हे दाखवले गेले आहे की पोटॅशियमची कमतरता ही उच्च रक्तदाबाशी निगडीत आहे. अमेरिकेतील आहारांमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असून तीन मधील एका व्यक्तीला उच्च रक्तदाब हा ह्यामुळे आहे असे संशोधनातून दिसून आले.

ह्या क्षराच्या अभावाने अर्थातच गंभीर अशा अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. ह्याची कमतरता होण्याची तीन मुख्य कारणे म्हणजे सेवनातील कमतरता अथवा शोषनातील अडथळे किंवा जास्त प्रमाणात उत्सर्जन. विशेषत: जेव्हा शरीरातील द्रव्य जास्त प्रमाणात बाहेर टाकले जाते तेव्हा उदाहरणार्थ, उलट्या व जुलाब होणे किंवा ज्यांना लघवी साफ होण्यासाठी औषधे (diuretics) चालू असतात त्यांना किंवा जास्त घाम येणार्‍या व्यक्तींना ह्या क्षाराची कमतरता होण्याची शक्यता असते. तसेच चहा किंवा कॉफीचे अतिसेवन अथवा तंबाखू वा मद्यपान अशा सवयींमुळे शोषणात अडथळा येऊन कमतरता होऊ शकते.

रक्तातील ह्याची सर्वसाधारण पातळी 3.6 – 5.2 मिलीमोलस प्रति लिटर एवढी असून हा क्षार खूप नियंत्रित आहे. जेव्हा ही पातळी 7 च्या वर जाते तेव्हा अत्यंत धोकादायक समजली जाते. पोटॅशियमची जास्त पातळी हि हृदयविकारांशी निगडीत असून मृत्युससुद्धा करणीभूत ठरू शकते. म्हणूनच कॅल्शियमसारखा ह्याचे पूरक सेवन (supplements) करू नये. किडणीचे विकार असलेल्यांमध्ये ह्या क्षाराची पातळी वाढण्याचा धोका असतो. अशा लोकांनी पोटॅशियम जास्त असलेल्या पदार्थाचे सेवन करू नये. ह्या क्षारांच्या अभावाने हृदयाचे ठोके जलद होतात, अशक्तपणा व थकवा, स्नायूंमध्ये कळा येऊन दुखणे, बधीरता व श्र्वासोश्र्वासास त्रास होणे अशी लक्षणे दिसून येतात. कोणत्या पदार्थांमधून हा क्षार किती मिळवता येईल हे खालील तक्त्यात दाखवले आहे.

PUSH - K1.png

धान्ये व डाळी आणि कडधान्ये ह्या मुख्य अन्नांमधून जरी पोटॅशियम जास्त मिळत असले तरी त्याची बायोअॅव्हेबिलीटी कमी असते. शिवाय पोटॅशियमच्या मानाने आपण सोडियमचे सेवन जास्त करत असल्याने आपल्याला पोटॅशियमचे सेवन वाढवण्यासाठी फळांचा उपयोग करायला पाहिजे. नेहमीच्या फळांपैकी म्हणजे केळी , चिकू, लिंबू, पिकलेला टोमॅटो हे जरी पोटॅशियमचे स्रोत असले तरी मोसंबी, शहाळे, अवाकाडो, पीच अशी फळे मुद्दाम खाल्ली पाहिजेत.  

  • गहू, तांदूळ ह्यासारख्या मुख्य अन्ना व्यतिरिक्त नाचणी, राजगीरा, भगर ह्यांचे पुन्हा एकदा महत्व दिसून येते. राजगिर्‍याच्या लाहया दुधातून किंवा लाडू किंवा त्याच्या पिठाच्या भाकर्‍या हे चांगले पर्याय आहेत. नाचणीबद्दल मागे सांगितले आहेच.

  • डाळी आणि कडधान्ये ह्यात पण पोटॅशियम भरपूर आहे परंतु त्याची बायोअॅव्हेबिलीटी वाढवण्यासाठी भिजवून किंवा मोड आणूनखाणे चांगले.

  • गाजर, अळकुडया, बाटाटा (सालासकट), रताळे, मुळा, कार्ले वगैरे भाज्यांना पसंती द्यावी.

  • त्याचप्रमाणे वेगवेगळ्या फळांचे सेवन करूनही ह्या क्षारांचा फायदा मिळवता येईल.

  • मसाल्याच्या पदार्थांत हा क्षार खूप असला तरी स्वयंपाकात ते खूप कमी प्रमाणात वापरले जातात. म्हणून त्यांच्या मिश्रणाचा चाय मसाला करून रोजचे सेवन केल्याने फायद्याचे होईल.

  • तसेच भोपळ्याच्या बिया, चारोळी वगैरे सारखे पदार्थ बडीशेप बरोबर मिसळून मुखवास करता येईल.

रो. शोभा राव

गुड समॅरिटन कायदा

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 2016 मध्ये 1.5 लाख लोकांचा मृत्यू झाला होता. अहवाल दर्शवितो की रस्ते वाहतूक अपघात (आरटीए) मधील मृत्यूची संख्या 2007 ते 2017 पर्यंत 31% वाढली आहे. भारताच्या 201 व्या कायदा आयोगाने एका अहवालात नमूद केले आहे की RTA मृत्यूंपैकी 50% पेक्षा जास्त वेळेवर वैद्यकीय सेवेने टाळता येऊ शकतात.

"गोल्डन अवर" म्हणजे एखाद्या आघातजन्य दुखापतीनंतर तात्काळ एक तासाचा कालावधी, ज्या दरम्यान, त्वरित वैद्यकीय उपचाराने मृत्यू टाळण्याची शक्यता सर्वाधिक असते.

 

भूतकाळात, रस्त्यांवरील अपघातांमध्ये त्यांच्या सहभागाच्या परिणामाची भीती पाहणाऱ्यांना वाटत असे - कायदेशीर अडचणी, पोलिस चौकशी आणि हॉस्पिटलमध्ये दीर्घ प्रतीक्षा याच्या भानगडीत अडकायला तयार नसायचे. हे टाळण्यासाठी, सर्वोच्च न्यायालयाने 2016 मध्ये गुड समरिटन कायदा आणला, जो रस्ता अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना कायदेशीर संरक्षण देतो, पोलिस आणि रुग्णालयांना आपत्कालीन मदत पुरवणाऱ्या लोकांना त्रास देऊ नये असे निर्देश देतो. तुम्ही एक जबाबदार नागरिक कसे बनू शकता आणि रुग्णवाहिका येण्यापूर्वी एक मौल्यवान जीव वाचवण्यासाठी या कालावधीचा पुरेपूर उपयोग कसा करू शकता?

  1. अपघात स्थळाचे मूल्यांकन करा आणि शांत रहा

  2. आपत्कालीन सेवांना कॉल करा – रुग्णवाहिकेसाठी 102 आणि पोलिसांसाठी 100 डायल करा मदत करा.अपघाताचे नेमके ठिकाण सांगा, जेणेकरून अपघातस्थळी पोहोचण्यात त्यांचा वेळ वाया जाणार नाही. तुम्ही अधिकारी येण्याची वाट पाहत असताना, पीडितेच्या मोबाईलवरून शेवटचा डायल केलेला नंबर तपासा आणि/किंवा कुटुंबातील सदस्यांची संख्या तपासा आणि त्यांना कळवा.

  3. वाहतूक चालू ठेवण्यास मदत करा इतर ड्रायव्हर्सना हे कळवणे महत्त्वाचे आहे की त्यांना टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे रुग्णवाहिकाही अपघातस्थळी वेळेवर पोहोचू शकेल.

  4. नाडी तपासा आणि प्रथमोपचार करा - पुढील नुकसान टाळण्यासाठी आवश्यक नसल्यास पीडिताला हलवू नका. प्रयत्न करा आणि पीडितेच्या स्थितीचे मूल्यांकन करा. जर पीडित बेशुद्ध असेल आणि प्रतिसाद देत नसेल, तर तुम्ही तसे करण्यास प्रशिक्षित असल्यास त्यांना CPR द्या. नसल्यास, जवळच्या लोकांमध्ये कोणीतरी शोधा.

  5. पीडिताला सांत्वन द्या आणि सोबत द्या. पीडित व्यक्ती जागृत असल्यास, त्याच्याशी बोला आणि त्यांना कळवा की मदत सुरू आहे. एक चांगला समॅरिटन म्हणून, तुम्ही पीडित व्यक्तीला त्याच्या/तिच्या कुटुंबातील सदस्य येईपर्यंत त्याच्यासोबत हॉस्पिटलमध्ये जात असल्याची खात्री करून घ्या आणि त्यांना गुन्हा नोंदवण्यात मदत करण्यासाठी पोलिसांना सर्व सहकार्य केले पाहिजे.

रस्ता सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे आणि त्यात अनेक आव्हाने आणि अडचणी आहेत. विचलित ड्रायव्हिंग ही तांत्रिक प्रगतीसह एक उदयोन्मुख समस्या आहे. त्यामुळे रस्ता सुरक्षा ही एक समस्या आहे ज्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.

गुड शोमरिटन कायदा हे योग्य दिशेने एक पाऊल आहे. तथापि, या विषयाभोवती अधिक जागरूकता असणे आवश्यक आहे.

आव्हान हे आहे की लोकांशी संवाद साधणे. गुड समरिटन कायदा, एक नवीन अधिकार आहे ,तो वापरण्याचा आत्मविश्वास वाटला पाहिजे. तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना त्यांच्या हक्कांबद्दल कळू द्या. अपघातग्रस्तांना जाणीवपूर्वक मदत करा.

रो. बाळकृष्ण दामले

कौतुक

अनिरुद्ध आणि मीना इनामदार यांचा नातू ध्रुव याने कराटे मध्ये yellow belt मिळवला

WhatsApp Image 2021-11-29 at 10.23.12 PM.jpeg
WhatsApp Image 2021-11-29 at 10.23.44 PM.jpeg

अभिनंदन सिद्धार्थ !!

WhatsApp Image 2021-12-02 at 10.19.40 PM.jpeg
bottom of page