top of page

OCTOBER 2021 Issue Economic and Community Development Month

पामवुड गडाची मोहीम

आपल्या राज्यात अनंतचतुर्दशीच्या पावन दिवशी विशेष मोहीम काढण्याचा प्रघात आहे. हा नेहमी सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो आणि त्याचबरोबर भरपूर 'दंगा' करायला मिळतो म्हणून सर्व चातक पक्षासारखी आतुरतेने वाट पाहतात.

गेले दीड वर्ष करोना नावाच्या मुघल बादशहाने सर्व नागरिकांना आपल्या कारागृहात कोंडून ठेवलं होतं. या जुलमी बादशहाचा भर आणि जोर जरा ओसरल्यावर सर्व सरदार, फर्जंद आशेने कारागृहातून मुक्तता मिळण्यासाठी कारण शोधत होते. राज्याच्या शोभाराणीसाहेबांनी "ही मोहीम कोण फत्ते करणार" अशी विचारणा करून सर्व बिनीच्या सरदारांमध्ये विड्याचे तबक फिरवले असता सरदार नितीनजी नाईक यांनी या मोहिमेचा विडा उचलला.

सर्व सरदार व प्रजाजन सरदार नितीनजी नाईक यांच्याकडे आशेने बघू लागले. स्वतःच्या एका परगण्याची जबाबदारी सांभाळून हा सरदार मोठ्या उत्साहाने मोहिमेवर जाण्यास तयार होता आणि पाहता पाहता त्याने कुठे मोहिम काढायची हे ठरवूनही टाकलं- 'पामवुड' गड. आपापल्या गढीमध्ये आतापर्यंत बंदी असलेल्या इतर अनेक सरदारांनी १९सप्टेंबरला मोहिमेवर जायचं हे कळल्यावर आवेशाने शस्त्रसज्ज होऊन तयार असल्याचे कळवले. मोहिमेस येणाऱ्यांची संख्या वाढली. त्यामुळे मोहीमेवर जाण्याच्या स्थळावर छावण्या उभारण्याकरता जागा कमी पडू लागली. मग काय, मुक्कामाकरता अजून एका नजीकच्या 'देहम' नामक प्रेक्षणीय गढीची निवड करण्यात आली. या मोहिमेवर २६ सरदार कुटुंबासह सामील झाले. मात्र राज्य सांभाळण्यासाठी काही सरदार राज्यात ठेवणे क्रमप्राप्त होते. तरी एकूण ५१ जण या मोहिमेवर आले होते. 

या मोहिमेस रसद पुरवण्याचे काम सरदार सतीशजी रावेतकर यांनी पदरमोड करीत स्वतः हून अंगिकारले व संपूर्ण मोहिमेस "दारू" गोळा कमी पडणार नाही याची चोख तजवीज केली. सरदार नितीनजी यांनी मोहिमेसाठी लागणारा हा सर्व "दारू"गोळा वाहून नेण्याची व्यवस्था स्वतः लक्ष घालून इतर सरदारांच्या मदतीने केली. 

मोहीम सर्वार्थाने यशस्वी होण्यासाठी राणीसाहेब स्वतः राजेसाहेबांसह जातीने एक दिवस आधी स्थळ-पाहणी करण्याकरता त्यांचे सचिव व एक वरिष्ठ सरदार यांच्या कुटुंबियांसह रवाना झाल्या. सर्व नियोजन योग्य केले आहे हे बघून राणीसाहेबांनी सरदार नितीनजी यांच्या कौशल्याबद्दल अत्यंत समाधान व्यक्त केले. 

"पामवुड" आणि "देहम" हे दोन गड छावण्या उभारण्याकरता निश्चित झाले आणि त्याप्रमाणे प्रत्येकाच्या छावणीचे स्थान निश्चित करण्यात आले. मोहिमेचे अत्यंत सुसूत्र नियोजन हा सरदार नितीनजी यांचा हातखंडा. छावण्यांमध्ये जाण्याच्या आधी सर्व सरदारांचे यथायोग्य स्वागत करण्यात आले. काही उत्साही सरदारांनी वेळेचा अपव्यय ना करता गेल्या गेल्या बरोबर नेलेला "दारू"गोळा बाहेर काढून कसून सराव करण्यास सुरुवात केली. 


नंतरची सामिष व निरामिष भोजनाची व्यवस्था, दुपारच्या वामकुक्षीची व्यवस्था, नंतर अश्वारोहण, धनुर्विद्या, नेमबाजी इ. शस्त्रविद्या सराव, संध्याकाळी सर्व सरदार कुटुंबीयांचे एकत्र येऊन साजरे करण्याचे मनोरंजनाचे कार्यक्रम,  नंतर विविध सरदार कुटुंबियांनी  संगीताच्या तालावर सादर केलेली नृत्यकला व त्यानंतर संगीताच्या "सुरां"चा व  "सुरे"चा अनुपम संगम घडवून आस्वाद घेता घेता जमवलेली  "spirit"ual बैठक यामुळे ही संध्या अनेकांना एका वेगळ्याच "उंची"वर घेऊन गेली.

या प्रत्येक ठिकाणी सरदार नितिनजी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेली मेहनत क्षणोक्षणी दिसत होती.

सरदार नितीनजी व त्यांचे अन्य सहकारी "देहम" येथील छावण्यांमध्ये "पामवुड" या प्रमुख स्थळावरून १९ तारखेचा प्रमुख कार्यक्रम संपल्यानंतर मुक्कामाकरता रात्री रवाना झाले. तिथे नंतर मध्यरात्री बारानंतर सुमारे दोन तास आढावा बैठक झाली व त्यामध्ये सरदार नितीनजी यांनी सर्व सहकाऱ्यांना त्यांचे श्रम घालवण्याकरता आयुर्वेदिक अभ्यंगस्नान व त्यांचे अनुभव याचे महत्व सांगितले. हे दोन तास म्हणजे "वेगवेगळ्या प्रकारे कसे हसावे" याचा एक छोटासा अभ्यासवर्ग होता. या छावणीमध्ये एका परराज्यातल्या हेराचे अचानक आगमन झाले. राज्याचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री यांच्याकडून या परदेशी हेरास राज्याची गुपिते जाणून घेण्याची फार इच्छा होती. मात्र त्या हेरास ओळखून तातडीने छावणी परिसरातून बाहेर काढण्यात आले. मंत्रिजीनी त्यांच्या अनुभवाच्या जोरावर हा हल्ला परतवून लावला.

दुसऱ्या दिवशी सकाळी काही जणांनी निसर्गभ्रमंती करावयाचा आनंद घेतला. नंतर सर्वांनी एकत्र न्याहारीचा कार्यक्रम करून आपापल्या परिवारांसह अत्यंत आनंदाने  परत राज्याकडे कूच केले. 

थोडक्यात जवळपास दीड वर्षानंतर राज्यातील बहुतांश सरदार व प्रजाजन यांनी एकत्र येण्याचा आनंद घेतला व लवकरच नवीन मोहिमेवर जाण्याचा संकल्प सोडला. ही नवीन मोहीम विदेशी मुलुखात काढावी असे काही सरदारांनी सुचविले. शोभाराणीसाहेब यांनी यावर सखोल विचार करण्याचे आश्वासन दिले.

सरदार नितीनजी यांनी ही मोहीम प्रमाणाबाहेर फत्ते केली आणि आपली ख्याती परत एकदा सिद्ध केली.

सरदार(जी) अजयजी

रिसॉर्ट

धनुर्विद्या

नेमबाजी

संगीतमय संध्या

धमाल

नाश्ता

भावमुद्रा

पुढचा विडिओ पाहण्यासाठी उजवीकडॆ स्वाईप करा

RCPS Club Trip Sep 2021

RCPS Club Trip Sep 2021

साप्ताहिक कार्यक्रम

Felicitation of teachers on the occasion of Teachers’ Day

September 5, the birth anniversary of Dr. Sarvepalli Radhakrishnan, first Indian Vice-President and 2nd President of Republic India, is celebrated in India as Teachers’ Day, Tecahers’ Day is observed in our club by greeting all the teachers in the club and also by felicitating teachers from various walks of life. On 5th September, 2021, an e-greeting card was sent to all the teachers in the club to thank them for their contribution in shaping the future of students. On 6th September 2021, during the weekly meeting, teachers from the club were felicitated. In addition, the club also honoured three teachers, viz., Shri Ashok Rupner from Science Activity Centre, IISER Pune, Ms. Mrunal Gunjal, primary teacher from Z.P. primary school, Pimpalgaon Tarfe Mahalunge, Tal. Ambegaon, Dist Pune and Ms. Reshmi Pardeshi, teacher of special children.

 

Ashok Rupner is M.Sc. Physics and B.Ed. and is involved in science popularization among students and teacher. He travelled all over Maharashtra and conducted over 3000 hands-on workshops in various schools. For four years in a row, he won the science activities award at Sci-fest Africa in South Africa during 2008-2012. While working at IUCAA up to 2017, he designed hundreds of science and mathematics teaching experiments and models. He and his team made about 1100 short videos on low cost models, science activities and toys. These have been translated in many Indian languages. Since 2017 he is working  at IISER Pune and is setting up a science activity centre and conducted over 400 in-person and reached to over 70,000 people. During the situation created by COVID-19 pandemic he conducted over 50 online sessions on YouTube Live and reached to over 1.6 million students.

 

Ms. Reshmi Pardeshi obtained her B.Com degree in 1995. Very early in her life, she decided to work for special children and obtained Diploma in Secondary Education (Hearing Impaired) (D.S.E. (H.I) and B.Ed for hearling impaired.  From 2006 to 2017 she worked as special teacher under Sarva Shiksha Abhiyan in the remote areas of Velhe  Panchayat. In 2017 she joined PMC’s Education office at Aundh and is associated with 80 schools in teaching special children.  In addition, she also helped several hearing impaired children to regain hearing ability by arranging their treatment through donations from various agencies.      

 

Ms. Mrunal Ganjale

 

Mrunal Ganjale is working as primary school teacher at Z.P primary school at Pimpalgaon Tarfe Mahalunge, Tal. Ambegaon, Dist. Pune for the last 12 years. She is extensively using ICT tools for engaging both teachers and students in teaching activities. These include on-line teaching, interacting with students from other countries, use of website and mobile applications. During the COVID 19 pandemic, she has employed online teaching tools. Many of her students qualified for scholarships and got admission in Navodaya Vidyalaya. She believes in tuning the teaching methods to changing times. She was recognised for her efforts  through NCERT, New Delhi, for the MoE 2019 national award for use of ICT tools in teaching. In 2019, she was selected for the Under World Education Exchange Program of Microsoft at Sydney, Australia. She received third prize in NCERT and DIAT sponsored New Initiatives competition. She has also been selected as a member of the State Education Officers Think Tank

 

Our club is proud to have recognized and honoured these teachers.

Rtn. Suryaprakasa Rao

Teacher card (3).jpg

१३ सप्टेंबर - विनय साठे श्रद्धांजली सभा

WhatsApp Image 2021-09-23 at 10.55.17 AM.jpeg

मित्रांनो,

विनय जाण्याची दुःखद व धक्कादायक बातमी १३ सप्टेंबर रोजी आपल्याला समजली. त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक खास अंक प्रसिद्ध करण्याबद्दल प्रेसिडेंट शोभाताई यांनी सूचना केली. त्यानुसार सर्वांना आवाहन केल्यानंतर अनेकांनी त्यांच्या जवळ असलेले फोटो, व्हिडिओ, ऑडियो क्लिप्स पाठवले. आठवणी लिहून पाठवल्या. त्या सर्व संकलित करून एक स्मरणिकारूपी पुश दिनांक २२ सप्टेंबर रोजी प्रकाशित करण्यात आला.

 

त्याची लिंक खाली दिलेली आहे.

२७ सप्टेंबर - जीवनगाणे

गेल्या सोमवारी म्हणजे २७ सप्टेंबर रोजी "जीवनगाणे" हा कार्यक्रम आपल्या क्लबमध्ये सादर झाला. आपल्या क्‍लबच्याच सभासदांनी हा सुरेल गाण्यांचा कार्यक्रम खूप सुंदर रीतीने सादर केला. सीमाताई महाजन, राहुल पेंढारकर आणि आशिष नेर्लेकर यांनी प्रस्तुत केलेल्या बहारदार गाड्यांमुळे संपूर्ण हॉल भारावून गेला. जीवनावर आधारित गाणी - ए जिंदगी गले लगा ले, जिंदगी कैसी है पहेली, माझे जीवन गाणे अशा अनेक बहारदार गाण्यांमुळे सारे श्रोतेगण मंत्रमुग्ध झाले. मृणाल ताई व कल्याणी ताईंच्या साभिनय आणि खुसखुशीत निवेदनाने या कार्यक्रमाची रंगत वाढवली. त्याबरोबरच उपाध्ये सरांची सिंथेसायझरवरची सुरेल साथ. एकूणच संपूर्ण कार्यक्रम अतिशय छान प्रकारे संपन्न झाला.
 
ऍन. पल्लवी कापरे

पुढचा विडिओ पाहण्यासाठी उजवीकडॆ स्वाईप करा

Weeekly Program 27-Sep-2021

Weeekly Program 27-Sep-2021

नवीन सभासदांचे स्वागत 

या महिन्यात २७ सप्टेंबर रोजी आपल्या क्लबमध्ये सागर आणि विनिता टिळक यांचे आगमन झाले. पी पी अंजली रावेतकर हिने या दोघांना रोटरीची दीक्षा दिली. पी पी अविनाश कुलकर्णी यांनी क्लबच्या वतीने त्यांचे स्वागत केले. रो. अनिरुद्ध इनामदार याने त्याची शिफारस केली आहे.

सागर हा एम कॉम एल एल बी असून तो सनदी लेखापाल (सी ए) सुद्धा आहे. परंतु व्यवसायाने तो वकील आहे. विनिता सुद्धा सनदी लेखापाल (सी ए) आहे. त्यांना दोन मुले आहेत. मोठा मुलगा आदित हा अभिनव विद्यालयात तिसरीत शिकत व धाकटी मुलगी अनिका ही सुद्धा अभिनव विद्यालयात प्री प्रायमरी शाळेत शिकते.

WhatsApp Image 2021-10-04 at 10.55.05 AM.jpeg

सामाजिक प्रकल्प 

एकलव्य न्यास येथील पपेट शो

२ सप्टेंबर रोजी एकलव्य न्यास येथे चैताली माजगांवकर यांनी मुलांसाठी पपेट शो केला आणि साधे साधे पपेट बनवायला शिकवले. मुलांना खूप मज्जा आली. हा कार्यक्रम अश्विनी च्या मदतीने आखला. संजीवने तो झूमवर live दाखवायला खूप मदत केली. ह्या कार्यक्रमासाठी अर्थ सहाय्य माधुरी व विजयने केले. पपेट शो नंतर गिरीजाने ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात वाढदिवस असलेल्या मुलांचे औक्षण करून त्यांना केक कापायला लावला. प्रोजेक्टला प्रेसिडेंट शोभा, वृंदा, अंजली गोडबोले, संजीव, अश्विनी व गिरीजा प्रत्यक्ष उपस्थित होते व काहीजणं झूमवरून सामील झाले.

एकलव्यच्या मुलांबरोबर गणेशोत्सव

१६ सप्टेंबर रोजी प्रे. शोभा आणि वृंदाने एकलव्यच्या मुलांबरोबर गणपतीची आरती केली. नंतर गणपती उत्सवाशी संबंधित बऱ्याच गोष्टी एकमेकांना सांगितल्या.

Aarti.jpeg

रो. वृंदा वाळिंबे

सार्थक ला सप्टेंबर चे धान्य ६ सेप्टेंबरला पोचले.

WhatsApp Image 2021-10-01 at 10.43.35 PM.jpeg

JAIPUR FOOT


We had meeting with Bharat Vikas parishad chairman ShreeRanade ,Trustee  Khatawkar, President Ekbote ,CEO Jeste at their office at Tharkade hospital and handed over cheque for 10 J Foot.


They will invite us during fitment to beneficiaries.A variety of artificial limbs developed by them were displayed.
 

Further cheques will be given when we collect funds from donors of our club.
The meeting was attended by President Dr. Shobhatai, P.P. Dr. Rao, P.P. Appa and P.P. Yashwant Gokhale

Ann. Vandana Palkar

WhatsApp Image 2021-10-01 at 10.49.22 PM.jpeg

वैद्यकीय प्रकल्प

1. सेवा आरोग्य फाऊंडेशन


संजीवन हाॅस्पिटल, सीरम ईन्स्टीट्युट, पीपीसीआर, बाळासाहेब देवरस पाॅलीक्लीनिक यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित वज्रनिर्धार २०२१ लसीकरण महाअभियान अंतर्गत लसीकरण कार्यक्रम क्र : ६ शुक्रवार दि ३ सप्टेंबर  २०२१ सकाळी १०.०० ते ३.०० या वेळेत राहुल पार्क सोसायटीमध्ये कामाला येणाऱ्या नागरिकांसाठी, राहुल पार्क, वारजे येथे रोटरी क्लबच्या सहाय्याने संपन्न झाला.
 

उपस्थित:

सेवा आरोग्य फाऊंडेशन : प्रदीपजी कुंटे, सतीशजी जोशी, मनोजजी देशमुख
रोटरी क्लब : प्रेसिडेंट शोभा राव, श्री राव, डाँ. स्मिता जोग
राहुल पार्क सोसायटी पदाधिकारी: डाॅ आदिती पेन्नुरकर, डाॅ मुकुंद पेन्नुरकर, शैलेश कुलकर्णी, स्वानंद सराफ, उमाकांत देशमुख
संजीवन हाॅस्पिटल : सचिन भागवत, सागर अतुगडे, नर्स विमल कुडले, रोहिणी ढवळे


Total doses : 220 (Male :  108, Female : 112)
First dose : 140 (Male : 80, Female : 60)
Second dose : 80 (Male : 28, Female : 52)
18 to 45 - 187
45+ - 33
Lactating Mother - 0
Handicapped : 1

या कार्यक्रमात आपल्या क्लबने आर्थिक मदत केली.

2. Health Check Up with Seva Aarogya Foundation

On 29th September, a health check up camp was organised with the help of Seva Arogya Foundation. We are happy we could reach out to needy people and contribute to the world record of doing 1 million BSL tests in a day as per the appeal made by Rtn. Ajay did a great job by making available within a record time of 3 hrs. Dr. Mrinal involved 5 interns from DSHMC. President Shobha Rao, PP Dr. Rao and Chairman - Medical Activity Shilpa attended the camp.

खबर - बखर

1. Happy school  inauguration at the hands of PDG Deepak Shikarpur at Ambawade village by RC Baner.

WhatsApp Image 2021-10-03 at 7.00.30 PM.jpeg

2. Rtn. Reshma Kulkarni was invited as a speaker on foreign languages in AJMVP'S New Arts, Commerce and Science College, Ahmednagar

WhatsApp Image 2021-10-03 at 7.02.17 PM.jpeg

3. On 2nd September, Birthday Fellowship of July - August month was celebrated at Hotel Amaya

WhatsApp Image 2021-10-03 at 7.08.11 PM.jpeg

उपलब्धी...अभिनंदन

1. Rtn. Vrinda is now a Certified Trainer for conducting Foundation Course for Transactional Analysis. Participants of the courses conducted by her will get Certificate of Attending Foundation course of Transactional Analysis, issued by Institute of Counseling and Transactional Analysis (ICTA). This institute was the first one started in India by George Kandathil who was associated with USA based International Transactional Analysis Association started by Dr Eric Berne, father of TA.

This is one step ahead for her in her TA journey. After completing her degree in TA in Nov 2019, she was training to be a certified trainer and she got her certification

2. Rotary club of Pune Hillside ने कथा - कथन स्पर्धा आयोजित केली होती. 1st round online होता.  त्यातुन 12 finalist निवडले, ज्यांनी आपला कलाविष्कार परिक्षकांसमोर live सादर केला . गायन, काव्यवाचन, कथा सादरीकरण इ. स्नेहाने माझी "श्रावण झुला" ही कथा सादर केली आणि तिला प्रथम पारितोषिक मिळाले. 

3. An author who has delved in varied subjects from nature, cinema, sustainable living to even publishing books and being a co-producer for documentaries, Anil Damle is a well known travel enthusiast. He has also been on the jury panel of the prestigious National Film Festival. Two documentaries, co-produced by him have won the Best Documentary award at the National Film Festival.

Earlier this week his 11th book was self-published, ‘Prabhat Che Prabhat Nagar’ and this week next one has come on the shelves. This book, ‘Across Latin America’ takes you with him on the first ever car trip by a group of three Indians across the continent. This is his second car trip getting recognized in India Book of Records. The reader will travel all 15000 km, across varied topographies, landscapes, cultures, each unique and interesting.

4. On 27th August there was a webinar on the CII platform on water recycling in which Dr Avinash made a 20 minute presentation on UV technology. On the same evening on ISHRAE platform there was a panel discussion on UV & Indoor Air Quality.

PP Dr Avinash Kulkarni was honored by MIT University on 17th September with Eminent Enginner award on the occassion of Engineers Day. PDG Deepak recommended his name and his superb work in UV Lamp sector for last 30 years.

Please click on the following link to watch the video:

5. Rtn. Nitin Naik was conferred with Suryadatta Engineering excellence award on 14th September. Kudos to his highly charismatic, successful, entreprenship journey

WhatsApp Image 2021-10-03 at 3.08.33 PM.jpeg

6. Rtn. Nitin Naik giving interview on Doordarshan

WhatsApp Image 2021-10-03 at 3.13.03 PM.jpeg

7. Rtn. Deepak's article in Pudhari newspaper (All India Edition) on superb performance of Indian paralympic team in Tokyo. It is now a fact that given support, differently abled can perform better than normal people. Technology can also help them in all aspects of lives.

WhatsApp Image 2021-10-03 at 3.25.25 PM.jpeg

8. Isha Pathare was given Prof D B Deodhar award in January 2019. The only lady cricketer yet to be given the award by our club.

WhatsApp Image 2021-10-03 at 6.36.43 PM.jpeg

9. Anjali Ravetkar major donar level 2

WhatsApp Image 2021-10-03 at 6.54.31 PM.jpeg

10. Rtn. Pradeep Wagh gave opening remarks as well as concluding remarks on the second day on Literacy Day.

WhatsApp Image 2021-10-03 at 6.38.00 PM.jpeg

11. रो. गुरु आणि रोहिणी पालेकर हे पुनः एकदा आज्जी-आजोबा झाले. त्यांचा मुलगा अनिकेत आणि सून राधिका यांना ८ सप्टेंबर रोजी कन्यारत्नाची प्राप्ती झाली

12. RI Director Venky invited Rtn. Deepak Shikarpur as faculty for  District Governor Elect Training (GETS 2021) to be held in Mahabalipuram. Honor for RID 3131

13. रो. राजाभाऊ वाईकर हे गेले १५ वर्ष पुणे सराफ असोसिएशनमध्ये कार्यरत आहेत. यंदा ते जॉईंट सेक्रेटरी म्हणून दुसऱ्यांदा बिनविरोध निवडून आले.

कौतुक

आरिव (गुरु आणि रोहिणी पालेकरचा नातू), क्रियेशा (अजय आणि अंजली गोडबोलेची नात) आणि इरा (शिरीष आणि मीना इनामदारची नात) यांनी गणेशोत्सवात स्वतः गणपतीची मूर्ती बनवल्याबद्दल कौतुक

WhatsApp Image 2021-10-03 at 1.25.47 PM (1).jpeg
WhatsApp Image 2021-10-03 at 1.27.03 PM.jpeg
WhatsApp Image 2021-10-03 at 1.25.47 PM.jpeg

कबीर खडसे (प्रदीप आणि प्रतिमा दुरूगकर यांचा नातू) याने हिंदी दिनानिमित्त केलेली प्रस्तुती याबद्दल कौतुक

​Highlights of 3 rd BOD held on 23 rd September 2021


1. Nice programs are organised in October – 4 th Dwarkanath Sanzgiri, 11 th – Sandeep Belwalkar, 19 th Kojagiri and 25 th Diwali Party


2. 29 th September under Defeat Diabetes project checkup for 100 persons will be done
 

3. PDG Dr. Deepak Shikarpur and President Dr. Shobha Rao have contributed $ 500 each in Cow donation project of Pashan Club that makes our club a partner club in the global grant project.
 

4. Board appreciated the effort taken by Ann Girija and entire PUSH team for Vinayanjali Push
 

5. Diwali celebration for students of Eklavya and Sarthak planned in October.
 

6. Installation of Interact @ Blind School is planned on 2 nd October.
 

7. On 7 th Sept Jaipur foot were provided to 10 beneficiaries costing 35,000. Additionally, donation for 47 Jaipur foot from club member amounting Rs.1,64,500 are received and project will be done in next month.
 

8. Chief Trustee informed that 5% of the donation received during every Rotary Year shall be kept aside as administrative expenses of the trust and the balance 95% of the donation amount will be made available for the club project expenses.

Projects planned in October

1) Food  grain supply to  Ekalawya


2) Food grain supply to Sarthak Seva Sangh


3) Donation of plants medicinal and flower to Ekalawya


4) Donation of 47 Jaipur Foot to needy in a shibir at Uruli Kanchan


5) Release of Beautiful Sarees video

Rtn. Shobha Rao

Anns' Project

शूटिंगचे निमित्त व आनंद सोहळा

साधारण ऑगस्ट महिन्यात anns ग्रुप वर एक व्हीडिओ fwd झाला. साड्यांचे विविध प्रकार, दागिने घातलेल्या सुंदर ललना बघून आम्हां सगळ्याच बायकांचं लक्ष त्या व्हीडिओने वेधून घेतलं. त्या व्हीडिओचं मनसोक्त कौतुक झालं आणि अचानक स्नेहा म्हणाली, 'आपण पण असा व्हीडिओ करूयात का? " झालं.. पहिलं तर मीच "हो" म्हणून टाकलं. कुठलीही creative activity करायची असली की मला हुरूप येतो. छान छान साड्या नेसून हौस करायला लगेच अनेक जणी तयार झाल्या. आपली मैत्रीण मीना इनामदार तर साड्यांचाच व्यवसाय करते. तिनेही लगेच आम्हां सर्वांना सांगितलं, तुम्ही "अप्रतिम" च्या साड्या नेसा आणि मॉडेल्स व्हा. मग स्वतःची साडी आणि अप्रतिमची ही एक साडी नेसून एक सुंदर व्हीडिओ करूया असं ठरलं.


स्नेहा, मीना आणि मी कामाला सुरुवात केली. साड्यांचे प्रकार, जरीच्या, बिन जरीच्या शिवाय जिला जी साडी नेसावीशी वाटेल ती नेसून व्हीडिओ शूट करायचं ठरलं.

सुंदर साड्यांच्या शूटिंग साठी सुंदर लोकेशन हवंच. सर्वप्रथम माझ्या डोळ्यासमोर आलं पाषाणचं सोमेश्वर मंदिर. मी नुकतच तिथे असंच एक शूट केलेलं असल्यामुळे मला ती जागा शूटिंग साठी योग्य आहे असं वाटत होतं. पण तिथे यायला कोणी तयार होईल का, लांब वाटू शकतं, पाऊस, साड्या मेकप खराब होईल या शक्यतांमुळे आम्ही ते कॅन्सल केलं. आपल्याच मैत्रिणींची घरं आणि त्यांच्या आजूबाजूची छान छान लोकेशन्स आहेत त्यांनाच विचारूया असं ठरलं. मग जयश्री नवाथे, ऋजुता, स्वाती जोशी, गिरीजाचं घर आणि माझी रोहन तपोवन सोसायटी अशी लोकेशन्स ठरली. गणेशोत्सव संपल्यावर शूट करायचं ठरलं आणि अमाया हॉटेलमध्ये सप्टेंबर च्या पहिल्याच आठवड्यात मैत्रिणींची एक मीटिंग घेऊन आपण 27/28/29 सप्टेंबर या तारखंना शूट करणार आहोत तयारीला लागा असं सांगितलं. दुपारी 3 ते 6 ही वेळ पण ठरवली.

पहिल्याच दिवशी जयश्री नवाथेकडे शूटिंग छान पार पडलं. प्रेसिडेंट शोभाताईंनी दीप प्रज्वलन करून शुभ कार्याची सुरुवात केली. टसर आणि लिनन साड्यांचं शूट त्यादिवशी ठरलं होतं. सगळ्याच मैत्रिणींनी छान सहकार्य केलं. छान छान हसून poses दिल्या आणि तो दिवस यशस्वी केला. गप्पा हास्य विनोद आणि धमाल यांनी जयश्रीचं घर दणानून सोडलं. मटार करंजी, चहा आणि जयश्रीने स्वतः तयार केलेला मँगो केक याने तर अजूनच मजा आली.

दुसऱ्या दिवशी स्वातीकडचं शूटिंग पण असंच संस्मरणीय ठरलं. तिच्या घरी पैठणी, बनारस, इरकल, ब्रोकेड अश्या अनेक साडया ठरल्या होत्या. सगळ्या हौशी मैत्रिणींनी 2/2 3/3 वेळा साड्या बदलून सुंदर poses दिल्या. हास्य विनोद तर विचारूच नका. इडली चटणी, ओल्या नारळाची करंजी, चहा ने लज्जत अजूनच वाढवली.

मैत्रिणींच्या शूट बरोबरच आमची कॅमेरा वूमन स्नेहाचंही कौतुक करायलाच हवं. तिचं योगदान सर्वात मोलाचं आणि महत्वाचं. गोड हसून सगळ्यांना सूचना देत, वेगवेगळ्या सिन्स मधून कधी पदर, कधी दागिने, कधी गॅलरीतली झाडें, फुले यांबरोबर पटपट close ups, long shots टिपत होती.


दोन दिवसांच्या शूटिंग च्या धान्दलीत स्नेहाचं शूट राहून जात होतं. मग आम्ही तिघीच मीनाकडे भेटून स्नेहाचेही काही शॉट्स टिपले. मीनाची सून मित्रा आणि तिची सहकारी दिपा या दोघींनी या कामी आम्हांला खूप मदत केली. अश्या तर्हेने शूटिंगची सांगता झाली.

आम्हां तिघींना श्रम परिहार म्हणून त्याच दिवशी अंजली गोडबोलेने तिच्या घरी श्रम परिहाराचा बेत आखला. खरं तर इतक्या गोड अनुभवातून गेल्यावर कसले श्रम आणि कसलं काय, पण तेवढंच भेटायला आणखी एक निमित्त. मग पुन्हा सगळ्या भेटलो. पावभाजी, दहिभात, कुल्फी असा अत्यंत आवडता आणि सुटसुटीत बेत सगळ्या मैत्रिणींनी आमच्या साठी आखला होता. किती प्रेमाने हा बेत ठरवला सगळ्या जणींनीं..!!!

कोरोना च्या पार्श्वभूमी वर अनेक दिवस एकमेकींना भेटू न शकलेल्या मैत्रिणी अश्या रीतीने भेटल्या आणि 3 दिवस एक आनंद सोहळा साजरा केला. कायम आठवणीत राहील असा..


आपली ही फिल्म लवकरच तयार होईल आणि तुम्हां सर्वांना ती बघायला मिळेल. एक इच्छापूर्ती झाल्याचा आनंद आम्हां तिघींना आहेच. शिवाय एक कायम स्वरूपी आठवण या फिल्म च्या निमित्ताने. खरंच, साड्या हा पारंपरिक वस्त्र प्रकार म्हणजे एक जादू आहे. तिनेच आमच्यातली नाती अधिकच दृढ केली.


सरते शेवटी आपल्या प्रेसिडेंट शोभाताईंना खूप खूप धन्यवाद. त्यांनी आमचे हे प्रयत्न बघून या व्हीडिओ ची Anns Project म्हणून घोषणा केली आणि या व्हीडिओला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालं. खूप खूप धन्यवाद शोभाताई आणि त्याच बरोबर इतरही सर्व मैत्रिणींना...!


रो. अश्विनी अंबिके

साप्ताहिकी

4th October : द्वारकानाथ संझगिरी (Zoom Meeting)
विषय : चंदू बोर्डे ते विराट कोहली

11th October : रो. संदीप बेलवलकर

विषय : पु लं चं डाएट, दीक्षित आणि दिवेकर (विनोदी कथाकथन)

19th October : कोजागिरी संध्या
 

25th October : दिवाळी पार्टी यानिमित्त गायक प्रशांत नासेरी यांचा रंगारंग कार्यक्रम
 

Plz Note :

4th October & 11th October meetings will be on Zoom

19th & 25th October programmes will be held Offline

सप्टेंबर सपोर्ट ग्रुप 

 

रो. अश्विनी अंबिके (समूह प्रमुख)
रो. विकास काकडे 
रो. कल्पना काकडे
रो. अच्युत गोखले 
एन निरुपमा गोखले
रो. डॉ. सूर्यप्रकासा राव
एन अंजली गोडबोले
रो. वृंदा वाळिंबे 
रो. किरण वाळिंबे
रो. विश्वास देशमुख

औक्षवंत व्हा, सुखी व्हा  !

ऑक्टोबर

१ - श्रीप्रिया जोशी
५ - डॉ. दत्ता इनामदार
१४ - शिरीष क्षीरसागर
१५ - सुनिता भाटिया
१८ - मीनल वाघ
१८ - आशिष नेर्लेकर
२२ - पल्लवी गोखले
२३ - संदीप तपस्वी
२६ - श्रीप्रकाश जोशी (भाई)

बर्थडे फेलोशिप लीडर सप्टेंबर - ऑक्टोबर २०२१

ऍन. निरुपमा गोखले 

रेशीमगाठ वर्धापनाच्या शुभेच्छा

१५ - नितीन व अलका अभ्यंकर

शोकसंदेश

७ सप्टेंबर रोजी विनय साठे यांच्या मातोश्री श्रीमती सुलोचना साठे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले

Rotary Information

 

October is Economic and Community Development Month

Rotary supports investments in people to create measurable and enduring economic improvement in their lives and communities.


The Rotary Foundation enables Rotarians to invest in people by creating sustainable, measurable and long term economic improvements in their communities and likelihoods by:
 

1. Building the capacity of entrepreneurs, community leaders, local organisations, and community networks to support economic development in impoverished communities.
2. Developing opportunities for productive work;
3. Reducing poverty in underserved communities;
4. Supporting studies for career-minded professionals related to economic and community development.

 

Rtn. Yashwant Gokhale

डिस्ट्रिक्टमधील घडामोडी

District Award Ceremony FY 20-21

In the District Award function the RI President’s Citation our club received was handed over to us.  Last year was very challenging.  This feat is result of our teamwork. I am grateful to our members and Anns for their whole hearted cooperation and encouragement. And also to Secretary and BOD for their rock solid support.

We bagged first prize for Cultural and second for Economic and Community Development. DG specially mentioned successful conduct of Ekankika Competition. These prizes reflect the hard work put in by Gauri, Rujuta, volunteers team of Ekankika and Nitindada in Non Medical avenue. 

 

This year there was no category of award for club bulletin. 

Other avenues of our club had also performed extremely well but in competition somebody wins and somebody doesn’t.

 

The club was recognized for record all time high contribution to TRF, execution of Global Grant Projects & participation in all 5 projects of Pancham. 

 

Pratap and Pallavi, Nitin and Shilpa were recognized for attaining Major Donor level one status. 

 

Stellar Performances of Gauri as best District Director, Vrinda as best AG and Ashok Gadgil as District Finance Secretary were also recognized. This was icing on the cake. 

Really proud to be part of such dynamic club.

Rtn. Sharad Dole

District team celebrated Literacy day and our club got certificate for participation in literacy project. We sponsored 10 teachers for MeriTrain teacher training program. Hearty congratulations to President Dr. Shobhatai, Parag and team Literacy

WhatsApp Image 2021-10-03 at 2.07.09 PM.jpeg

युथ सेमिनार

दिनांक 26 सप्टेंबर रोजी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे युथ सेमिनार संपन्न झाले. आपला क्लब त्यात को-होस्ट होता व रोटेरियन नितीन नाईक याने को कन्व्हेनरचे काम पाहिले.

या सेमिनारच्या पहिल्या सत्रात प्रवीण मसाल्याचे डायरेक्टर आनंद चोरडिया यांनी "यशस्वी व्हायचे असेल तर अपयशाची भीती काढून टाका" असे आग्रहाचे आवाहन केले व पर्यावरण संवर्धनासाठी कसे प्रयत्न करता येतील ते सांगितले. त्यांचे भाषण खूप प्रेरणादायी होते.

प्रमुख पाहुणे वर्ल्ड रोटरॅक्ट चेअर पी डी जी रवी वडलामनी यांनी रोटरॅक्टची सविस्तर माहिती सांगितली व रोटरी आणि रोटरॅक्ट यांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे असे नमूद केले. दुसऱ्या सत्रात डिस्ट्रिक्ट युथ डायरेक्टर गौरी शिकारपूर हिने सध्या सुरू असलेल्या व पुढे होणाऱ्या प्रकल्पांबद्दल व तसेच युथ अवेन्यू च्या बदलत्या सीमे बद्दल माहिती दिली.

काही रोटरॅक्ट क्लब्जनी कथन केलेल्या सक्सेस स्टोरीज तर खूप स्फूर्तिदायी होत्या.

उत्कृष्ट काम करणारा क्लब्जना आणि एजींना या वेळी गौरविण्यात आले. ए जी ऋजुताला प्रशस्तीपत्रक मिळाले.

या सेमिनारसाठी क्लबतर्फे पीपी गौरी, प्रेसिडेंट शोभाताई, सेक्रेटरी अजय, आयपीपी शरद, पी ई डॉ. मृणाल,पीपी डॉ. राव, पी पी ऋजूता, पी पी मानस, पीपी शिरीष, रो. नितीन नाईक व रेश्मा, अँन्स जयश्री आणि अंजली गोडबोले उपस्थित होते.

पी. पी. ऋजूता देसाई

आवाहन

 

दिवाळी पुश

मित्रांनो आणि मैत्रिणींनो,

दीपावलीच्या आगमनाची चाहूल लागली म्हणजे आपल्याला पुशच्या दिवाळी अंकाची उत्कंठा वाढलेली असणार.

दरवर्षीच आपला पुशचा दिवाळी अंक संस्मरणीय होतो ते आपल्या सर्वांच्या सहभागाने. आपला दिवाळी पुश हा अन्य प्रथितयश दिवाळी अंकाच्या तोडीचा होतो यात शंका नाही. विविध विचारप्रवर्तक लेख, प्रवासवर्णने, वेगवेगळ्या विषयांवरील कथा, किस्से, कविता, चारोळ्या,  व्यंगचित्रे यांनी आपला पुश दीपावली अंक समृद्ध होतो ते आपल्या सर्वांच्या उत्साहाने पाठवलेल्या लेखांनी.

चला तर मग. या वर्षीही आपण असाच आणखी एक मस्त समृद्ध पुश काढू या.

यंदा आपल्याला २५ ऑक्टोबर ला हा अंक छापील स्वरूपात प्रसिद्ध करावयाचा आहे. तेंव्हा १५ ऑक्टोबरपर्यंत आपले लेख आमच्याकडे पोहोचले पाहिजेत. कारण नंतर त्याचे टंकलेखन, तपासणी, दुरुस्ती, छपाई वगैरेसाठी किमान १० दिवसांचा अवधी लागेल.

तेंव्हा आपणास नम्र विनंती की आपण लवकरात लवकर जसे लिहून होतील तसे लेख, कविता गिरिजाच्या ईमेल वर (girija.yardi@gmail.com) पाठवाव्यात.  त्या शक्यतो टाईप करून पाठवल्यास आमचे काम जरा सोपे होईल. (काही दिवसांपूर्वी voice typing  च्या सूचना या ग्रुपवर टाकल्या होत्या. अनेकांनी हे टायपिंग खूप सोपे जाते असे सांगितले.) अगदी शक्य नसल्यास लिहून पाठवले तरी चालेल.

आता मुख्य सांगायचं म्हणजे कोणत्या विषयावर लिहायचं? खरं सांगू का? आतापर्यंत बरेच विषय घेऊन झाले आहेत. त्यामुळे एखाद्या विशिष्ट विषयाचं बंधन नाही. तुम्हाला आवडेल आणि सर्वांना वाचायला मजा येईल किंवा रस वाटेल अश्या कोणत्याही विषयावर तुम्ही लिहू शकता.

 

तरीसुद्धा मेंदूला खाद्य म्हणून काही विषय सुचवत आहोत. 

१. Turning point ( नात्यातला असो किंवा व्यवसायतला)
२.माझी झालेली फजिती.
३.पाकवैफल्य (फसलेला पदार्थ)- हा विषय फक्त पुरुषांसाठी आहे
४.कथा- गूढ, विनोदी, गंभीर, सामाजिक किंवा अन्य कोणत्याही विषयावर.
५.कविता- शक्यतो पूर्वी प्रसिद्ध झालेली नसावी.
६.चारोळ्या
७.विनोदी किस्से

मजकूर हा साधारण दीड ते दोन फुलस्केप असावा. 

तेंव्हा मंडळी, चला, लागू या कामाला. काही शंका असल्यास आम्हाला विचारायला हरकत नाही.

 - गिरिजा, मंजिरी, सरिता, संजीव, चंद्रशेखर

ROTARY INTERNATIONAL

Why the Rotary year begins on 1 July?

Ever wonder why 1 July is the beginning of the Rotary year? Initially, our conventions played a key role in determining the start date of our fiscal and administrative year.

Rotary’s first fiscal year began the day after the first convention ended, on 18 August 1910. The 1911-12 fiscal year also related to the convention, beginning with the first day of the 1911 convention on 21 August.

Attendees at Rotary’s first convention in Chicago in 1910. Rotary’s first fiscal year began the day after the convention ended. 

 

The next August, the Board of Directors ordered an audit of the International Association of Rotary Clubs’ finances. The auditors recommended that the organization end its fiscal year on 30 June to give the secretary and treasurer time to prepare a financial statement for the convention and board, and to determine the proper number of club delegates to the convention.

The executive committee agreed and, in April 1913, designated 30 June as the end of the fiscal year. This also allowed for changes to the schedule for reporting club membership and payments. Even The Rotarian changed its volume numbering system to correspond to the fiscal year (beginning with Volume 5, No. 1, in July 1914).

 

Rotary continued to hold its annual conventions in July or August until 1917. Delegates to the 1916 event in Cincinnati, Ohio, USA, approved a resolution to hold future conventions in June, mainly because of the heat in cities where most of them occurred. The next one was held 17-21 June in Atlanta, Georgia.

The term “Rotary year” has been used to signify Rotary's annual administrative period since at least 1913. An article in The Rotarian that July noted, “The Rotary year that is rapidly drawing to a close has been signalized by several highly successful joint meetings of Clubs that are so situated as to assemble together easily and conveniently.”

 

Since the executive committee’s decision in 1913, the end of the Rotary year has remained 30 June.

PDG. Dr. Deepak Shikarpur

RI president Shekhar Mehta at the Ugandan Parliament where a motion was adopted commending the work of Rotary Service in the country

The Vice President of the Republic of Uganda has just been inducted into Rotary by DG Young

WhatsApp Image 2021-10-03 at 2.25.03 PM.jpeg
w0262_1s_Watercolor-Floral-Pattern-Wallpaper-for-Walls-Pastel-Flowers_Repeating-Pattern-Sa
Lalit Vibhag.png

होम मेकर्स आणि बरंच काही

Gadgil Anjali.jpg

हरहुन्नरी उद्योगिनी अंजली 

लहानपणी मी शाळेत होते तेव्हा ची गोष्ट इयत्ता दुसरी च्या क्लास टीचर हेलवाडे बाई आम्हाला धावणाऱ्या मुंग्यांची एक गोष्ट. नेहमी रंगवून रंगवून सांगत. गोष्टीचा बोध होता की माणसाने मुंग्यां प्रमाणेच सदैव उद्योगात मग्न असावे. आज हे आठवायचं कारण आपली मैत्रीण अंजली गाडगीळ.

ती सदैव काही ना काही उद्योगात मग्न असते. मग तिची तब्येत काहीशी  नरम  असू दे, घरात  पाहुणे असू देत, नाहीतर नातू सांभाळायचा असू दे. अंजलीचे स्वयंपाक घरापासून ते फार्म हाऊसच्या बागेपर्यंत काही ना काही उद्योग चालूच असतात. अंजलीला उद्योगाचं हे बाळकडू तिच्या आईकडूनच मिळालं आहे. नगरला असलेली तिची  ८८ वर्षांची आई आजही जमेल त्या वेगाने भरत काम सुद्धा उत्तम करत असते! अंजली मूळची नगरची 'सुनीती रानडे'. सहा वर्षाची असतानाच एका अपघातात तिच्या वडिलांचं निधन झालं पण सधन अशा एकत्र कुटुंबात असल्याने तिचं तसच त्यावेळी अडीच वर्षाचा असलेला लहान भाऊ आणि आई यांचे जीवन सुरळीत राहू शकलं. अंजलीचे काका प्रख्यात सर्जन होते. घरातच हॉस्पिटल होतं. शिवाय त्या काळच्या प्रथेप्रमाणे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्या जेवणाखाण्याची व्यवस्था डॉक्टरांच्या घरातूनच होत असे. त्यामुळे अंजलीची आई व काकू त्या सर्वांची सर्व प्रकारची व्यवस्था बघण्यात गुंतलेल्या असत. तरीही तिच्या मॅट्रिक असलेल्या आईने पतिनिधनानंतर एम. ए. बी. एड. पर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि शाळेत नोकरी केली. त्यामुळे आईचं उद्योगात मग्न असणं जसं अंजलीच्या मनावर कोरलं गेलं होतं तसंच गरीब, मध्यम, श्रीमंत असे सर्व थरातले रुग्ण, त्यांच्या समस्या त्यांची मानसिकता या साऱ्याचे दर्शन तिला लहानपणापासून घडत गेलं. होत. त्या सर्वांशी आई कशी वागते हे पण तिला दिसत होतं.

अंजली सांगते "आईला मी कधी रागावलेली, चिडलेली, वादावादी करणारी अशी पाहिलीच नाही." याबाबत तिच्या आईचं म्हणणं अस की लोक कसेही वागोत. त्यांचं वागणं आपल्या हातात नाही. पण आपण कसं वागायचं हे ठरवणं आणि तसं वागणं हे पूर्णतः आपल्याच हातात असतं. याला अनुसरून तिची आई सदैव शांत, संयमी असलेलीच अंजलीने पाहिली. याचा खूप परिणाम तिच्या मनावर झाल्याचं तिला जाणवतं. अंजलीची शाळा सकाळची असे तेव्हा दुपारी मोकळ्या वेळेत तिने अनेक गोष्टी केल्या. या गोष्टी कधी आईच्या सांगण्याने तर कधी स्वतःच्या मनाने. यामध्ये तिने कथ्थक शिकण्यापासून ते टि. म. वि. च्या संस्कृत, हिंदी, इंग्रजी, गणित यांच्या विविध परीक्षा देण्यापर्यंत  गोष्टींचा  समावेश होता. अंजली सांगते "माझ्या आईला फॅशनचा खूप सेन्स होता आणि ती फार सुंदर सुंदर फ्रॉक शिवत असे. सहाजिकच अंजलीलाही त्याची गोडी वाटे. तिने आईकडून शिवणकाम, विणकाम, भरतकाम याचे छान धडे घेतले. अर्थात मोठेपणी तिने या सर्वांचे रितसर कोर्सही पूर्ण केले. मात्र त्याची गोडी आईच्या सहवासात लहानपणी च तिच्या मनात निर्माण झाली होती. 


नगरला बी.एस्सी. पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यावर अंजली मुंबईला गेली आणि तिने दीड वर्षाचा हाफकिन इन्स्टिट्यूट चा लॅब टेक्निशियनचा कोर्स पूर्ण केला. त्यावेळी मुंबईतल्या होस्टेलवरच्या वास्तव्याने अंजलीला खूप काही मिळालं असं ती आनंदाने सांगते. ती म्हणाली,  मुंबईत राहिल्याने आणि एकटीने इकडे-तिकडे फिरल्यामुळे माझा आत्मविश्वास खूप वाढला. तसच माझ्या धीटपणात  खूप वाढ झाली.  हापकिन मध्ये खूप हुशार माणसांना जवळून पाहता आलं. त्यांची संशोधन करण्याची पद्धत, अभ्यासाची पद्धत पाहायला मिळाली, वाचनही खूप झालं. इन्स्टिट्यूटच्या जवळच जे जे हॉस्पिटल होतं. त्यामुळे लॅब मध्ये हजारो  सॅंपल्सच्या  टेस्ट करायचा अनुभव मिळाला. त्यामुळे खूप काही शिकता आलं. 

कोर्स संपल्यानंतर स्वतःची लॅब सुरू करावी असं तिच्या मनात होतं पण तिकडे अशोक गाडगीळ यांनी एक वर्ष अगोदर पासूनच अंजलीच्या जीवनाचं गणित मांडायला सुरुवात केली होती!! अंजलीच्या कोणा नातेवाईकांच्या लग्नात अशोकनी तिला पाहिली आणि त्यांच्या मनाशी पक्की गाठ बांधली की लग्न करायचं तर हिच्याशीच! त्यांनी लगेच अंजलीच्या आईची भेटही घेतली पण तिने अंजली हापकिन चा कोर्स पूर्ण करणारच असल्याचं सांगितलं. तेव्हा अशोकनी अंजलीसाठी दीड वर्ष थांबायचं ठरवलं! त्यामुळे अंजली मुंबईहून शिक्षण पूर्ण करून नगरला गेली तेव्हा अशोक लगेच नगरला हजर झाले आणि लग्न पक्क ठरवूनच पुण्याला परतले. त्यामुळे अंजली चा नगरला जाताच साखरपुडाही झाला आणि डिसेंबर मध्ये लग्न करून ती पुण्यात आली. 

गाडगीळ यांच्या घरी अंजलीच्या सासूबाई ही खूप उत्साही आणि स्वतः वीस वर्ष एसटी मध्ये नोकरी केलेल्या, अत्यंत प्रॅक्टिकल विचारांच्या सुधारक वृत्तीच्या अशा होत्या. सासरेही खूप प्रेमळ होते. त्यामुळे अंजलीला सासुबाईंकडूनही खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. तसच दोघांचेही खूप प्रेम आणि कौतुक सदैव लाभलं. तिच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीला सासूबाई आणि सासर्‍यांनी सदैव पाठिंबा दिला. तेव्हा अंजलीने १९७८ आणि ७९ या दोन वर्ष संगमनेरकर हॉस्पिटलच्या लॅब मध्ये नोकरी केली. मात्र पार्टटाइम नोकरी केलीस तर घरातही कोणाची आबाळ होणार नाही आणि तुझही काम चालू राहील असा सल्ला सासूबाईंनी दिला. तिलाही तो मनापासून भावला आणि पटला. एवढच नव्हे तर तोच तिने आयुष्यभर अमलातही आणला. १९७८-७९ हे दोन वर्ष नोकरी केल्यानंतर मात्र अंजलीने  १९८६ पर्यंत पुन्हा नोकरी केली नाही. दरम्यान अक्षरा ,अपूर्वा आणि ओजस चा  जन्म झाला. १९८६ पासून मात्र अंजलीने  २०१६ पर्यंत तीस वर्ष प्रयाग हॉस्पिटलमध्ये नोकरी केली. पण ही नोकरीही तिने ठरवल्याप्रमाणे पार्ट टाईमच केली. त्यामुळे तिला  मुलांचं संगोपन उत्तमपणे करणं शक्य झालं. तसंच स्वतःच्या सर्व हॉबीजही तिला चालू ठेवता आल्या. 

तिने लॅब मध्ये खूप मन लावून काम केलं. तिथे विविध प्रकारच्या टेस्टची सुविधा नव्याने निर्माण केली तसेच नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या कामासाठी तिने तयार केलं. त्यामुळे प्रयाग पती-पत्नींचा तिच्यावर फार विश्वास बसला. तिने कधीच नोकरी सोडू नये असं त्या दोघांनाही वाटे. त्यांनी  तिला  उत्तम  सहकार्य  दिलं. त्यामुळे तिच्या  सोयीने तिला नोकरी मध्ये काम करणं शक्य झालं तसंच हव्या त्या सुधारणा तिथे करता आल्या. 

इकडे घरात अक्षरा डेंटिस्ट झाली .अपूर्वा इंजिनियर झाली तर ओजस  कॉमर्ससह  विविध क्षेत्रात पारंगत झाला. तिघांचे विवाह झाले. घरात नातवंड खेळू लागली. 

या सर्व वेळी एकीकडे अंजलीचे मात्र काही ना काही उद्योग सातत्याने चालू होते. त्यामध्ये भरत काम, विणकाम, शिवणकाम ,फार्महाऊसवर केवळ फुलांची बागच नव्हे तर फळं, भाजीपाला आणि धान्य यांचं सुद्धा उत्पादन घेण्यापर्यंत काम अंजलीने केलं! हे सारं तिच्या दृष्टीने कमीच असल्याने मैत्रिणींना जमवून दीड दोन वर्ष संपूर्ण गीतेचं पठण आणिअध्ययन या गोष्टीही तिने केल्या. स्वयंपाक घरात म्हणजे पाककलेत तर ती दर दिवशी नवनवीन प्रयोग करत असते हे आपल्या सर्वांना उत्तम पणे माहितीच आहे. याशिवाय तिने मैत्रिणींना जमवून केवळ आपल्यासाठीच भरत काम विणकाम करू नका तर समाजासाठीही काहीतरी करा' असं म्हणून विणकाम करायला उद्युक्त केलं. तिच्या नेतृत्वाखाली आम्ही स्वतः हाताने विणलेले सुमारे ५0 स्वेटर अनाथ मुलींना दिले. याशिवाय अंजलीने एका मैत्रिणीच्या साथीने पाच वर्ष एक बुटी कही चालवलं. पण तिला वाटू लागलं की धंदा करायचा, धंदा चालवायचा तर जी हिशोबी वृत्ती हवी ती आपल्याकडे नाही तेव्हा तिने पाच वर्षांनी ते बुटीक बंद केलं. ही  एकमेव गोष्ट असेल जी तिने सोडून दिली नाहीतर ती हातात घेतलेली कोणतीही गोष्ट अपुरी, मध्येच केव्हातरी अशी सोडून देत नाही. 

नोकरी सोडल्यानंतर तिने 'बाराक्षार'चा अभ्यास केला. 'फ्लॉवर रेमिडी'चा अभ्यास केला. ती अभ्यास करून थांबत नाही तर आपल्या अभ्यासाचा लगेच शक्य त्यांना उपयोग व्हावा म्हणून जे मागतील त्यांना औषध सुद्धा देते आणि आपला अभ्यास सदैव चालू ठेवते. अंजलीला नवनवीन गोष्टी शिकण्याची जबरदस्त हौस आहे. मग ते विषय कोणतेही असोत. आता तिने आपल्या फोनवर ज्या विविध सुविधा असतात  त्यांचा उपयोग करण्यास  सुरुवात केलीआहे. त्यामुळे फेसबुक वर जसं तिचं पान असतं तसंच विविध ठिकाणी चौकशी करून माहिती घेऊन सहली आयोजित करणही तिला छान जमतं. किंबहुना नेतृत्वगुण तिच्यात आहेतच. तिच्या मनात एखादी कल्पना आली की त्याला पाठिंबा देणाऱ्या दहा-बारा मैत्रिणी तिला लगेच जमवता येतात आणि ती तिची नवी कल्पना लगेच अमलातही येते असा माझा तिच्याबद्दलचा अनुभव नेहमीच आहे. 

तिला सहलीला जायला खूप आवडतं. त्यामुळे मैत्रिणी जमवून तिच्या फार्महाउसवरची सहल असेल नाहीतर नातेवाईकांना घेऊन देशातल्या किंवा परदेशातल्या सहली असोत त्या सगळ्याची व्यवस्था अंजलीच करते. हे नेतृत्वगुणही आपल्याला आईकडूनच मिळाल्याचे ती सांगते. याशिवाय अंजली लिखाणही उत्तम करू शकते. प्रसंगी कविताही करू शकते पण त्यात तिने अजून खूप लक्ष घातलेलं नाही हेच खरं! तिच्या या लेखनकलेचं उत्तम प्रत्यंतर आम्हाला तिच्या घरच्या विविध प्रसंगात अनुभवायला मिळालं आहे. एवढेच नव्हे तर आत्ता अशोक यांनी त्यांच्या आवडीचा आणि अभ्यासाचा. एक विषय ज्योतिष, त्यावरची तीन पुस्तकं लिहून पूर्ण केली तेही केवळ अंजलीची  प्रेरणा आणि मदत यामुळेच ,हे  आपल्याला माहितीच आहे!

 

अंजलीला माणसांची खूप आवड आहे. तिच्या आप्तेष्टांचं आणि मैत्रिणींचं वर्तुळ खूप  मोठं आहे. तिच्या गप्पा कोणत्याही ग्रुप बरोबर  चालू असू दे त्यात उल्लेख होणाऱ्या कितीतरी व्यक्ती तिच्या अगदी जवळच्या परिचित असतात !

तर अशीही चौफेर व्यक्तिमत्त्वाची आपली मैत्रीण अंजली. तिच्यातली  ही  उद्योगशीलता  आणि  प्रयोगशीलता सदैव अशीच राहू दे , हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

ऍन. सरिता   भावे

कथाकथन

रोटेरियन प्रदीप वाघ हे आपल्या क्लब मधील एक उत्साही आणि हरहुन्नरी व्यक्तिमत्व. आपल्या क्लबच्या पीस प्रोजेक्ट्स मध्ये कायम त्याचा सहभाग असतो. मृदुभाषी प्रदीप हा कविमनाचा आहे. त्याचे काही कवितासंग्रह प्रसिद्ध झाले असून त्यावर नृत्य व संगीत प्रस्तुती सुद्धा झाली आहे.

हिंदी भाषेवर त्याची पकड आहे. त्याचा जन्म जबलपूरचा असल्यामुळे ती त्याची नैसर्गिक भाषा झालेली आहे. त्याचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व अफलातून आहे. त्यामुळे त्याला RCPS चा "शशी थरूर" असे कौतुकाने म्हंटले जाते. पण त्याने ही कथा मराठीत लिहिलेली आहे. कथाकथनाचा बेत जाहीर झाल्यावर त्याने पटकन "प्रिस्क्रिप्शन" ही कथा लिहिली आणि पाठवली.

खाण्यासाठी जन्म आपुला

कोळंबीचं भुजणं

या वेळची पाकक्रिया पाठवशील का असं वृंदाला विचारलं आणि ती पटकन 'हो' म्हणाली. काही आढेवेढे न घेता. वास्तविक पाहता ती डिस्ट्रिक्ट ला खूपच कार्यमग्न असते. क्लबच्या इतर प्रकल्पात आखणी करण्यापासून ते पार पाडण्यापर्यंत तिचा सहभाग असतो. त्यातून तिचा स्वतःचा समुपदेशनाचा व्यवसायसुद्धा जोरात चालू असतो. तिला विचारताना वाटत होतं की ती पटकन 'मी बिझी आहे. मला शंभर कामं आहेत.' असं म्हणून हात झटकून टाकेल. पण म्हणतात ना, की जो शंभर कामं करतो तो एकशे एकावं काम सहज करू शकतो. पण ज्याला एकही काम नसते तो ते एकही काम करू शकत नाही.

यावेळी वृंदाने कोळंबीचं भुजणं केले आहे. अर्थात त्याची खरी चव चाखायला कधीतरी तिच्याकडे जाऊच...
pdf_Page_2.png
  • गव्हासारख्या मुख्य अन्नाबरोबरच ते ज्वारी, बाजरी, नाचणी आणि राजगिरा ह्यात भरपूर आहे. ह्यावरून हे लक्षात येते की ह्या इतर धान्यांचा वापर आपल्या आहारात कसा करता येईल हे पहायला पाहिजे.

  • डाळीपेक्षा कडधान्यांमध्ये ह्या क्षाराचे प्रमाण जास्त असून मटकी, कुळीथ, चवळी, छोले, राजमा ह्यामध्ये ते विशेषत: जास्त आहे. ह्या कडधान्यांचा वापर वाढवण्याची गरज आहे.

  • पालेभाज्यांच्या समूहात ते माठ, पालक, आंबट चुका, कांदापात ह्यात जास्त आहे.

  • फळभाज्यांमध्ये ते त्यामानाने कमी आढळेत. सर्वात जास्त फक्त लालमुळयात आहे. तसेच भेंडी व बटाटा (सलासकट) ह्यात पण आढळते.

  • हळीव मध्ये जास्त असून हाळीवाचे लाडू पौष्टीक आहेत.

  • सुक्यामेव्यांपैकी बदाम, काजू, अक्रोड आणि चारोळी ह्यात खूप जास्त आहे.

  • फळांच्या समूहात आंबा, प्लम, सिताफळ, केळं, अवाकाडो व द्राक्षे ह्यात बर्‍यापैकी आढळते.

  • मसल्याच्या पदार्थांपैकी जीरे, लवंग, वेलदोडा, मेथ्या, जायफळ, हळद, खसखस, ओवा ह्या सर्वं पदार्थात जास्त आढळते.

  • मांसाहारी पदार्थात विशेषत: मासेंमध्ये हा क्षार आढळतो.

  • इतर पदार्थांमध्ये बडीशेप, भोपळ्याच्या बिया, तुळस पाने, गवती चहा ह्यात पण मॅग्नेशियम जास्त असून त्यांचे कोणत्या रूपात सेवन करता येईल ह्याचा विचार करावा लागेल.

आरोग्य वर्धिनी 

 

मॅग्नेशियम (mg) - शक्तिवान क्षार

शरीरात मुबलक साठा (25 gm) असलेला हा अजून एक क्षार आहे जो जवळ जवळ 300 पेक्षा अधिक रासायनिक क्रियांमध्ये महत्वाचा सहभाग घेतो. त्यामुळेच अनेक महत्वाच्या इंद्रियांच्या कार्यामध्ये त्याचा सहभाग आवश्यक आहे. रोगप्रतिकारक शक्ति सशक्त ठेवणे, हाडांची व दातांची मजबूती राखणे, हृदयाचे ठोके नियंत्रित ठेवणे, मज्जातंतूचे कार्य सक्षम ठेवणे, स्नायुंचे आकुंचन प्रसरण इत्यादि कामांमध्ये ह्या क्षारांची गरज लागते. मायग्रेनसाठी सुद्धा हे उपयोगी आहे.

स्नायूंच्या आकुंचनात कॅल्शियम चा सहभाग आहे तर प्रसारणात मॅग्नेशियमचा. म्हणूनच मॅग्नेशियमच्या कमतरतेने स्नायूंमध्ये पेटके येतात. हाडांच्या वरच्या पृष्ठभागावर तसेच दातांच्या इन्यामल मध्ये कॅल्शियम बरोबर हा क्षार असतो. या क्षाराची दैनंदिन गरज स्त्रियांसाठी 310 ते 360 मिलिग्रॅम एवढी तर पुरुषांसाठी 400 ते 420 मिलिग्रॅम एवढी असते.

 

शरीराच्या साठयातील 30 ते 40 टक्के भाग हा स्नायुंमध्ये असतो व उरलेला 60 टक्के हाडांमध्ये असतो. हा क्षार मोठ्या प्रमाणात आयोनाईझड व औषधासारखा सक्रिय असतो.  पेशींमधील मायटोकाँड्रिया ह्या भागात असल्याने ह्याला शक्तिवान क्षार असेही म्हणतात. कॅल्शियमच्या शोषणासाठी ह्या क्षाराची गरज असते. तसेच इन्शुलिन नियंत्रित करण्यासाठी सुद्धा गरज असते. 40°C तापमानाला हा क्षार सक्रिय होतो म्हणूनच गरम पाण्यातून हा क्षार उपचार म्हणून दिल्यास जास्त प्रभावशाली ठरतो.

लहान आतड्याच्या सुरवातीच्या भागात ह्याचे शोषण होते व जास्तीचा भाग किडनी वाटे बाहेर टाकला जातो. कॅल्शियम प्रमाणेच हा क्षार सुद्धा 25 ते 50 टक्के एवढाच शोषला जातो. मॅग्नेशियमचे जास्त शोषण हे साईट्रेट ह्या रूपात होते. त्यामुळे पुन्हा एकदा लिंबाचे महत्व समजते. ह्याच्या अभावामुळे अर्थातच स्नायुंमध्ये दुखणे, मळमळ, उलट्या, स्नायुंमध्ये अशक्तपणा जाणवणे, बधिरता व मुंग्या येणे, चिडचिड वाढणे इत्यादि विकारांना तोंड द्यावे लागते.  शरीरातील साखरेच्या वापरावर तसेच प्रथिने, स्निग्धांश व DNA च्या उभारणीवर तो परीणाम करतो.  ह्या क्षारांचा अभाव वाढल्यास फिट्स सुद्धा येऊ शकतात. मेनोपॉजमध्ये जेव्हा hormones मध्ये मोठे बदल होत असतात. तेव्हा मॅग्नेशियम जास्त प्रमाणात शरीराबाहेर टाकले जाते. ह्यामुळे मूड बदलणे, मानसिक दौर्बल्य सारखी लक्षणे दिसतात. निरनिराळ्या पदार्थांतून मॅग्नेशियम कसे मिळवता येईल ते खलील तक्यावरून दिसेल.

 

तक्ता क्र. 20: निरनिराळ्या पदार्थांमधील Mg प्रमाण (दर 100 ग्रॅम)

हस्त सामुद्रिक शास्त्र

आयुष्य रेषा

hasta samudrik.jpg

ही रेषा अंगठा गुरुचा उंचवटा यांच्यामधून शुक्र उंचवट्याचा वळसा घालून मनगटाच्या दिशेने प्रवास करते. स्पष्ट व उठावदार रेषा व्यक्तीचे उत्तम आरोग्य, बलवान, आनंदी वृत्ती दर्शवते. या रेषेला आयुष्य रेषा संबोधल्यामुळे ही रेषा जेवढी लांब तेवढे आयुष्य जास्त व आखूड रेषा म्हणजे आयुष्य कमी असा बऱ्याच वेळा समज केला जातो. तो शंभर टक्के विश्वासार्थ नाही. आयुष्य हे तीन चार गोष्टींचा विचार करून मगच सांगता येते.

 

आयुष्याची लांबी ही कोणी कधीही विचारू नये व सांगूही नये. लहान मुलीच्या हातावरील आयुष्यरेषा जस जसे वय वाढत जाते तसतशी ही रेषा १४ वर्षांपर्यंत पूर्ण विकसित होते.

 

या रेषेची विभागणी समजा चार भागात केली तर रेषा सुरू होते तिथून पहिला १/४ हा मार्ग लहानपण त्यातील कष्ट, शिक्षण, आजारपण व कुटुंबातील व्यक्तींचा प्रभाव दर्शवतो. त्यावेळेला साधारणपणे ही रेषा व मस्तकरेषा( हेडलाईन )या दोन एकमेकात मिसळून प्रवास करत असतात व पुढे त्या वेगळ्या होतात. या दोन रेषांमध्ये जर सुरुवातीपासूनच अंतर असेल तर ती व्यक्ती लहानपणापासूनच कुटुंबापासून लांब वेगळी व स्वतंत्र वृत्तीची असते.

 

त्यांना आत्मविश्वास जास्त असतो व स्वभाव स्ट्रॉंग, कडक असतो. खुप अंतर असेल तर व्यक्तीचा आत्मविश्वास थोडा जास्तच असतो व कधीकधी तो त्यांच्या प्रगतीच्या आड येतो. त्या पुढील १/४ भाग हा वयाची २६ ते ५० वर्षे याचा निदर्शक असतो. आयुष्य रेषेतून काही रेषा बाहेर पडत असतात. वरील बाजूस जाणाऱ्या रेषा (रायझिंग लाईन्स) या त्या त्या वयात व्यक्तीचा उत्कर्ष दर्शवितात व खाली जाणाऱ्या रेषा त्या त्या वयात इजा, अडथळे, नुकसान वगैरे दर्शवतात.

 

पुढील ३/४ भाग हा वयाची ५० ते ७५ वर्षे दर्शवतात व त्यापुढील भाग हा ७५ ते शंभर वर्षे आयुष्य दर्शवितात. वरील प्रमाणे पुढील त्या वयात येणारे धोके, अडथळे, नुकसान इत्यादी या वयात दर्शवतात. रेषेवर ठिपके, फुली, त्यातील तुटकपणा, वर्तुळे वगैरे ज्या ठिकाणी असतील त्या त्या वयात त्याचा वाईट अनुभव येतो. तब्येती बिघडायचा योग सुद्धा दर्शवतो. या रेषेच्या शेवटी द्विविभाजन असेल तर जन्मस्थाना पासून वेगवेगळ्या ठिकाणी देशात-परदेशात मृत्यू दर्शवतो. आयुष्य रेषेला समांतर अशी शुक्र उंचवट्याच्या वरील भागात रेषा असेल तरी आयुष्य रेषेला सपोर्टिंग रेषा धरली जाते व आयुष्य रेषेतील दोष कमी करते. आयुष्य रेषेच्या शेवटपर्यंत रेषा असेल तर दीर्घायुष्य दर्शवते. म्हणजे सेंचुरी सुद्धा ही व्यक्ती मारू शकते. आयुष्य रेषेतून शेवटी एक रेषा चंद्र उंचवtyaकडे जात असेल तर त्याला प्रवासाची आवड असते. त्यात हात जर का गुबगुबीत असेल तर चंगळवाद व्यसने असू शकतात.

 

आयुष्य रेषेवरून बऱ्याच गोष्टी अभ्यासता येतात. व्यक्तीची आयुष्यातील प्रगती, नुकसान, आजारपण, चिंता, संकटे, अडचणी प्रेम प्रकरणे, भावनावश हळवा स्वभाव, नातेवाईकांचे व्यक्तीवर असलेले वर्चस्व, त्यांचे आजार इत्यादी बर्‍याच गोष्टी समजू शकतात. व त्याचा सखोल अभ्यास केल्याशिवाय त्या लक्षात येत नाहीत. वरील ढोबळ गोष्टी सांगितल्या आहेत आता पुढील भागात मस्तक रेषे विषयी पाहूया.

              

शुभं भवतु

 

रो.अशोक गाडगीळ

कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी

शिल्पा दर महिन्याला आपल्याला घरातील बागकमाच्या टिप्स देते. यावेळी ती आपल्याला सांगत आहे घरातील मर्यादित जागेत बाग कशी फुलवावी....

साज - शृंगार

जोडवी  (Toe Ring)

"जोडवी" किंवा "बिछवा" हा अलंकार फार प्राचीन काळापासून भारतात असावा. 'मोहकम', 'पादांगुलियकम' वगैरे समानार्थी शब्द जोडव्याला संस्कृत साहित्यात मिळू शकतात. "जुट" किंवा "जुड" या मूळ धातूपासून हा शब्द बनला आहे. याचा अर्थ बंधन असा आहे. विवाहानंतर हा अलंकार अखंड घालावयाचा असल्याने सौभाग्याचे बंधन असाही त्याचा अर्थ आहे. प्रेमाचे, पतिव्रत्याचे बंधन असा त्याचा संदर्भ घेता येतो किंवा प्रतीत होतो.

 

पायात घालण्याच्या प्राचीन अलंकारात पादांगद, तुलाकोटी, मंजीर, नूपुर, हंस, पादकरक या नावांचा उल्लेख होतो. हे अलंकार नक्की कसे होते हे आज सांगता येत नाही. संस्कृत साहित्यात "नूपुर" या अलंकाराचा वारंवार उल्लेख होतो. 'बाणभट्ट'  याच्या कादंबरीतील नूपुरांना रत्ने बसविल्याचे दिसते. अलीकडे जोडव्यांना घुंगरे, मोती, रंगीत आणि मीना खडे यांनी घडविले जाते. जोडप्यांचा किंवा नूपुराचा टपटप टपटप असा आवाज होतो.

 

पोटातील वाट सरकून पोटात दुखू लागले तर पायाच्या बोटात जोडवी घातल्यास पोटदुखीचा त्रास कमी होतो.  वाटोळी आकाराची जोडवी निरनिराळ्या धातूंची केल्यास विविध आजारांमध्ये त्यांचा चांगला उपयोग होतो. उदाहरणार्थ तांब्याची जोडवी अंगठ्यात गोल करून घट्ट घातल्यास पायातील शिरा दुखायच्या कमी होतात.

 

पूर्वीची जोडवी जाडजूड व घडणीत साधी होती. अलीकडील जोडवी नाजूक परंतु नक्षीदार व कलाकुसरयुक्त, रंगीत व अगदी मॅचींग केलेली असतात. पारंपारिक किंवा सामाजिक दृष्टीने मागासलेल्या गणल्या गेलेल्या जातीत जाडजूड मोठाली जोडवी घालण्याची पद्धत आहे तर ब्राह्मण, सीकेपी, सारस्वत वगैरे जमातीत नाजूक व डौलदार वापरली जातात. काही महिलांनी फॅशन म्हणून जोडवी वापरण्यास सुरुवात केली आहे. पूर्वी जोडव्यांच्या आवाजावरून स्त्रीची चाल ओळखता येई. या आवाजात दबदबा निर्माण करण्याचे सामर्थ्य होते. अलीकडे जोडव्यांच्या घुंगराच्या आवाजामुळे माधुर्य व नेटकेपणा येतो. काही जोडवी सुटी असतात तर काही वेढे घातलेली असतात. सुट्या जोडव्यांना  पेढेघाटी जोडवी असे म्हणायचे. ही सर्व जोडवी चांदीत असतात. याच्या जोडीला पायाच्या मधल्या बोटात चांदीची मासोळीच्या आकाराची जोडवी किंवा मत्स्याकृती असते.

 

लग्न झालेल्या स्त्रीसाठी पायात जोडवी घालणे हे बंधन नव्हे तर आपल्या प्रिय व्यक्तीच्या प्रेमाचे प्रतीक आहे असे आपली परंपरा व संस्कृती सांगते. म्हणून ते वापरायला पाहिजे.  हा केवळ सौभाग्य अलंकार नसून ती धारण करण्यामागे वैज्ञानिक कारण सुद्धा आहे. गृहलक्ष्मीचे पूर्ण लक्ष घरातील कामाकडे राहावे म्हणून स्त्रीच्या पायातील बोटात चांदीची जोडवी घालत. चांदी हे चंद्राचे प्रतीक असल्याने ती मनाला स्थिरता देते. तसेच चांदी शीतल असल्याने तI शरीरातील उष्णता शोषून घेते. पायातील अंगठ्याच्या शेजारच्या बोटात जोडवी घातल्यास अंगठ्याच्या ज्या बिंदूवर दाब निर्माण होतो त्याने आज्ञाचक्राचे म्हणजेच pituitory gland चे काम सुधारते. तसेच ज्या बोटात जोडवे घातलेले असते ते घट्ट असून त्यामुळे ज्या नसेवर दाब निर्माण होतो त्यामुळे गर्भाशयाचे काम सुधारण्यास मदत होते तसेच रक्तदाब सुद्धा नियंत्रित होतो. त्यामुळे एकूणच शारीरिक आरोग्य राखण्यास मदत होते असे वैद्यक शास्त्रातील जाणकार सांगतात.

 

पूर्वी राजघराण्यातील खानदानी स्त्रिया पायामध्ये सोन्याची जोडवी घालत असत. परंतु इतर सर्वसामान्य वर्गातील स्त्रियांनी सोने पायात घालू नये असे म्हणतात. कारण ते लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे नंतर सोन्याची जोडवी वापरण्याचे प्रमाण आपोआप कमी होत गेले.

 

रो. राजाभाऊ वाईकर सराफ

WhatsApp Image 2021-10-02 at 6.19.19 PM.jpeg

मनाचे श्लोक - भाग तिसरा

II मन एव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयो: II


अर्थात मानवामध्ये 'बंध' किंवा 'मोक्ष' याचे कारण मन हेच असते. एखादी घटना सुखदायक आहे का दुःखदायक आहे हे मनच ठरवते. व्यवहारात सभोवतीची परिस्थिती बदलत नाही. पण त्याची उपपत्ती आपण कशी लावतो त्यावर आपल्या मनाची शांतता आणि स्थैर्य अवलंबून असते. त्यामुळे आपल्याला आपल्या मनाला शिस्त लावणे हे जरूरीचे ठरते.

अध्यात्मात प्रगती साधण्यासाठी साधकांना ' मनोजय ' करणे आवश्यक असते. कारण तो झाल्याशिवाय देवाकडे जाता येत नाही.

समर्थांनी अगदी सोप्या भाषेत सर्व सामान्य लोकांना समजेल अश्या शब्दात मनोविजय करण्यासाठी उपदेश केला आहे. तो उपदेश म्हणजेच मनाचे श्लोक.

डॉ. मृणाल तिच्या कार्यमग्न व्यवहारातून वेळ काढून दर महिन्याला दोन श्लोकांचे विवरण करते. या वेळी ती श्लोक सहावा आणि सातवा स्पष्ट करीत आहे.

Manache Shlok - Sixth ShlokMrinal Nerlekar
00:00 / 08:29
Manache Shlok - Seventh ShlokMrinal Nerlekar
00:00 / 07:43
bottom of page