top of page

AUGUST 2021 Issue
MEMBERSHIP MONTH

अध्यक्ष पद ग्रहण समारंभ

    प्रत्येक रोटरी वर्षाची सुरुवात ही नवीन प्रेसिडेंटच्या इन्स्टॉलेशनने होते. वर्ष २१-२२ करोना महामारीच्या विविध निर्बंधांना तोंड देत शेवटी २८ जूनचे इंस्टॉलेशन ७ जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता प्रेसिडेंट हॉटेल येथे संपन्न झाले. आपल्याकडील अनेक उत्साही टीम मधील एक टीम म्हणजेच इव्हेंट टीम. याचा लीडर रोटेरियन नितीन नाईक म्हणजे विविध कल्पनांचा एक खजिनाच.आणि त्यातून मग अशा टीमला अत्यंत सक्षम असा आयटी टीमचा बॅकअप मिळाला तर मग कुठलाही समारंभ यशस्वी होणारच. नाही का? सर्व डायरेक्टर आणि काही कमिटी चेअरमन यांची तांत्रिक ओळख करून देण्यापेक्षा त्यांचे स्वतःचेच एक मिनिटाचे बाइट्स अशी नवीन कल्पना मांडली आणि त्यावर सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद पण दिला. त्यामुळे एक प्रकारचा साचेबंदपणा न येता एक वेगळे स्वरूप या कार्यक्रमाला आले. 'मास्टर ऑफ सेरेमनी' हा अशा समारंभांमध्ये एक खूप मोठा दुवा असतो आणि ज्याच्या संभाषणामुळे कार्यक्रम एकदम उंचावर तरी जातो किंवा एकदम तळाला जातो. ही मोठी जबाबदारी अँन पल्लवी गोखले हिने अत्यंत सक्षमतेने सांभाळली. कार्यक्रम एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला. रोटेरियन मानस, जुलै सपोर्ट टीमचा लीडर रोटेरियन रवी आणि त्याची टीम, रोटेरियन मंजिरी, मीनल, शिल्पा, मीना चौधरी, जयश्री, स्वाती जोशी आणि अंजली गोडबोले यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे एक वेगळीच सुसूत्रता या कार्यक्रमाला आली. आपल्या क्लब मधले चिरतरुण जुने रोटेरियन मुकुंदराव, विनूभाऊ, आर्टी  यांच्या उपस्थिती मुळे कार्यक्रमाला एक शोभा आली.

       कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत आणि रोटरी गीत यांनी गिरिजा आणि मंजिरी यांनी केली. त्यानंतर प्रथेप्रमाणे पाहुण्यांचे स्वागत पास्ट प्रेसिडेंट शरद याचा त्याच्या वर्षाचा आढावा, प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी यांनी केलेली कॉलरची अदलाबदल, वर्ष २१-२२ प्रेसिडेंट डॉक्टर शोभाताई यांचे मनोगत आणि सर्व डायरेक्टर्सना नवी  पिन प्रदान करणे हे कार्यक्रम तर आपल्या स्टॅंडर्ड प्रोटोकॉल प्रमाणे असतातच.

      शोभाताईंची मुलगी वैदेही हिने झूम माध्यमातून दिलेल्या तिच्या आईला शुभेच्छा, त्यानंतर शोभाताईंचे मनोगत आणि शोभाताईंच्या मार्गदर्शक डॉक्टर कॅरोल यांनी दिलेल्या शुभेच्छा ही एक आयटी टीमची कौशल्याची छोटीशी झलक होती. पुश टीमने घेतलेले कष्ट डीजींच्या हस्ते पुशचे उदघाटन झाले तेव्हा सर्वांच्या नजरेत आले. एकवीस बावीस वर्षाचे रोस्टर सुद्धा डीजींच्या हस्ते प्रसिद्ध झाले. या रोस्टरचा फायनल ड्राफ्ट बारकाईने तपासणे ही जबाबदारी डॉक्टर रावांनी स्वीकारली होती.

 

       डॉक्टर सी. एस. याज्ञीक यांनी शोभा ताईंच्या पुस्तकाचे अनावरण झूम माध्यमातून केले. डीजी पंकज आणि फर्स्ट लेडी प्रिया यांनी त्यांचे मनोगत आणि क्लबला शुभेच्छा अत्यंत नेटक्या शब्दात दिल्या. या कार्यक्रमाकरिता डिस्ट्रिक्ट मधील पदाधिकारी ए जी संदीप विळेकर, ए जी ए प्रदीप डांगे, संतोष मराठे, अस्मिता पाटील, शितल शहा आणि विवेक दिक्षित हे आवर्जून हजर होते. तसेच डॉक्टर सुधीर राशिंगकर, आणि वर्ष २०-२१ चे साऊथ क्लबचे प्रेसिडेंट सुदर्शन नातू आणि त्यांच्या पत्नी सुगंधा हे सुद्धा या समारंभास आवर्जून उपस्थित होते. इन्स्टॉलेशन समारंभाला क्लब से रोटेरियन व अँन असे ४६ जण आवर्जून आले होते. बाळकृष्ण दामले दाम्पत्य, जे आपले नवीन मेंबर होत आहेत, ते पण उपस्थित होते.  या दिमाखदार कार्यक्रमाची सांगता १२ तारखेचा क्लब प्रोग्रॅम जाहीर करून आणि प्रेसिडेंट एलेक्ट डॉक्टर मृणाल हिच्या सुरेख आभार प्रदर्शनाने झाली व त्यानंतर सर्व उपस्थितांनी जेवणाचा आस्वाद घेतला.

रो. अजय गोडबोले

सेक्रेटरी २१-२२

साप्ताहिक कार्यक्रम

५ जुलै २०२१ - डॉ. प्रकाश अत्रे : रोटरी थीमचा  अध्यात्मिक अर्थ

पाच जुलैला, क्लबच्या  या वर्षाच्या पहिल्या मीटिंगला श्री डॉ. प्रकाश अत्रे यांचे भाषण झाले. श्री अत्रे हे १९७० साली B A M & S मेडीसीन या विषयात विद्यापीठात सर्वप्रथम आले होते. नंतर त्यांनी पारनेर तालुक्यात जिथे कोणत्याही प्राथमिक सोयी नाहीत अशा ठिकाणी वैद्यकीय व्यवसाय चालू केला. तिथे त्यांनी अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम सुरु केले. १९९५ पासून ते पुण्यात वैद्यकीय व्यवसाय करत आहेत. त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी भूषवले गेले आहे. त्यांनी अध्यात्माचा सखोल अभ्यास केला आहे. त्यांनी संतांच्या शिकवणीवर अनेक प्रवचने दिली आहेत. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत.

आपल्या भाषणात त्यांनी रोटरीची कार्यपद्धत आणि अध्यात्म यांचा परस्पर संबंध कसा आहे ते दाखवून दिले. यंदाची रोटरी थीम “Serve To Change Life” आणि संत तुकारामांनी म्हटलेले” जे का रंजले गांजले......” हे कसे एकच आहे हे त्यांनी अनेक उदाहरणे देऊन सिद्ध केले. त्यांनी अध्यात्मा मधल्या ज्ञानयोग, भक्ती योग आणि कर्म योग या वर सुंदर विवेचन केले.

त्यांनी नामदेवाची एक गोष्ट सांगितली आणि श्रीरामाची सेतू बांधण्याची गोष्ट सांगितली आणि त्याचा परामर्ष असा सांगितला की जर कोणीही अहंकार न बाळगता आणि श्रेयाची अपेक्षा न बाळगता काम केले तरच ते यशस्वी होते.

त्यांच्या भाषणातून त्यांचे भाषेवरचे प्रभुत्व वेळोवेळी जाणवत होते आणि त्यांचा अध्यात्माचा व्यासंग किती खोल आहे याची जाणीव सारखी होत होती. अनेक संतांची वचने त्यांना तोंडपाठ आहेत आणि योग्य प्रसंगी ती त्यांना चपखलपणे सांगता येतात याचे प्रत्यंतर आले.

आपल्या वर्षाची सुरुवात एका चांगल्या कार्यक्रमांनी झाली. डॉ अत्रे यांची ओळख मीनल ने करून दिली आणि त्यांचे आभार मानस याने मानले.

रो. मानस वाघ

१२ जुलै २०२१ - महाकवी कालिदास दर्शन - मागोवा एका महाकवीचा

महाकवी कालिदास दिनाच्या दुसऱ्या दिवशी 'कालिदास दर्शन' हे व्याख्यान संस्कृत पंडित 'डॉक्टर प्रणव गोखले' यांनी केले. कालिदासाबद्दल ऐतिहासिक माहिती कमी आहे असे प्रणवजी म्हणाले. भारतातील अनेक प्रतिभाशाली व्यक्ती प्रसिद्धीपरान्मुख होत्या. त्यांच्या कार्यातूनच त्या व्यक्तींचा शोध घ्यावा लागतो. तसेच कालिदासाचे. त्याची ऐतिहासिक माहिती फारशी उपलब्ध नाही. इसवी सनपूर्व एक ते इसवी सन पाच या वर्षामध्ये कधीतरी जन्मलेल्या कालिदासाने अनेक काव्य आणि नाटके लिहिली असतील. पण त्याच्या उपलब्ध असलेल्या सात इन्द्रधनुषी कलाकृतींतून तो अजरामर झाला जर्मन कवी 'गटे' म्हणतो "जर आभाळ आणि पृथ्वी यांचा संगम पाहायचा असेल तर शाकुंतल पहा."

कालिदास या महाकवीला शोधावे, त्याला पहावे आणि त्यांच्या कलेतून कालिदासाच्या अंतःप्रेरणेचा मागोवा घ्यावा हे प्रणवजींच्या व्याख्यानामागील प्रयोजन होते.

आकाशाएवढी उत्तुंग प्रतिभा लाभलेला कालिदास हा चौथ्या शतकातील दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या दरबारी होता असं सर्वसाधारणपणे मानलं जातं. आपण "ऋतुसंहारम्" वाचताना प्रत्येक ऋतूची आणि त्यातील जीवनाची शब्दचित्रे मनःचक्षूंसमोर उभी राहतात अशी शब्ददृश्ये कालिदासाने शब्दांच्या कुंचल्याने चितारली आहेत.  तसेच संस्कृत काव्य आणि नाटक यांवर ज्यांची मोहिनी आजही आहे ते नाटक म्हणजे शाकुंतल असे प्रणव गोखले म्हणाले. कालिदास हा पहिला स्वैर रचना करणारा कवी म्हणून तो एक क्रांतिकारी कवी आहे असे त्यांनी सांगितले. महाकवी जयदेवने कालिदासाला सर्वात प्रथम 'कविकुलगुरू' अशी  उपाधी दिली. कालिदासाचे काव्य शारीरिक शृंगाराकडून अध्यात्मिक सौंदर्याकडे प्रवास करते असे सांगताना देवांपासून ते गवताच्या पात्यापर्यंतचे सूक्ष्म जीवनदर्शन कालिदास आपल्या काव्यात करतो असेही त्यांनी सांगितले.

रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगरच्या प्रोग्राम कमिटीने एक अतिशय सुंदर असा हा प्रोग्राम आयोजित केला होता. व्याख्यानात डॉक्टर प्रणव गोखले यांची विद्वत्ता आणि लालित्य या दोन्हींचा मनोहर संगम होता.

रो. मनोज फुलंब्रीकर

१९ जुलै २०२१ - पंढरपूरची वारी आणि वारकरी संप्रदाय- उल्हासदादा पवार

१९ जुलै रोजी आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला संत परंपरेचे उपासक डॉक्टर उल्हास दादा पवार यांना पी. पी. आनंद नवाथे  यांनी आमंत्रित केले होते .
पंढरपूरची वारी व वारकरी संप्रदाय यावर त्यांनी खूप सुंदर माहिती आपल्या ओघवत्या भाषेत दिली वारकरी पंथाचे बाळकडू त्यांना लहानपणी घरातच मिळाले. वडील रोज हरिपाठ म्हणत, तो कानातून मनात पोचला व हळूहळू विचारात येऊन, गोडी निर्माण झाली.


राम कृष्ण हरी , ज्ञानबा तुकाराम, या गजरात होणाऱ्या वारीची परंपरा, शेकडो वर्षे जुनी आहे . संत तुकारामांचे पुत्र तपोनिधी नारायण महाराज यांनी त्याला व्यापक स्वरूप दिले. वारीचे अद्वैत तत्त्वज्ञान उल्हास दादांनी अभंगांची ,उदाहरणे देऊन सांगितले.

अहंकार मी तू पणा संपवून टाकणे, सर्वजण समान आहेत, सर्व सजीवात देव आहे, जे जे भेटे भूत, ते ते मानिजे भगवंत, अशी शिकवण मिळते.विचार ,उच्चार, अचारण, हे त्या प्रमाणे हवे.  विचार, विवेक, वैराग्य हा वारीचा ,त्रिवेणी संगम आहे.

संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांचे पसायदान जगाच्या कल्याणाची, शांतीची , प्रार्थना करते .वारीचे महत्त्व व पसायदान हे जगभरात पसरले आहे. संत व त्यांचे अभंग याची उदाहरणे देऊन वारीतील भावार्थ व कर्मयोग त्यांनी सांगितला .ओघवते वक्तृत्व व भाषेवरील प्रभुत्व यामुळे भाषण संपू नये असे वाटत होते .रोटेरियन रवी जोशी यांनी त्यांचा परिचय करून दिला व रोटेरीयन गौरी शिकारपूर हिने आभार मानले.

ऍन. स्वाती जोशी 

२६ जुलै - गुरुपौर्णिमेनिमित्ताने ‘गुरुविण वाट कोण दाखवील वाट’ - रो. चंद्रशेखर यार्दी 

२६ जुलै रोजी गुरुपौर्णिमेनिमित्ताने ‘गुरुविण वाट कोण दाखवील वाट’ ह्या महत्वाच्या विषयावर आपल्या क्लबचे Senior Member व Treasurer रो. चंद्रशेखर यार्दी यांनी अतिशय सुंदर विवेचन केले. ते ऐकल्यावर मला ते निष्णात व यशस्वी Senior Chartered Accountant असल्याचा क्षणभर विसरच पडला.  नेहमीप्रमाणेच अतिशय ओघवत्या भाषेत त्यांनी आयुष्यातील गुरूची महती, गुरू व शिक्षकातील फरक, गुरू कसा शोधावा हे छान उलगडून दाखवले. गुरू न.ना. भिडे हे ई. ८ वीत त्यांच्या शिक्षकावरून गुरू कसे झाले हे त्यांनी सविस्तर सांगितले. 


अध्यात्मिक मार्गावर वा ईश्वराकडे जाण्याचे मार्गदर्शन गुरूकडूनच होते. गुरूशी एकरूप होणे व श्रध्दा व  गुरूभावाचे महत्व काय हे त्यांनी छान सागितले. संत मीराबाईसारखी ईश्वरमार्गावर गुरूविना जाण्याची ऊदाहरणे आहेत परंतु ती क्वचितच. 
 

गुरूशिष्य संबंध कसे असावेत हे सांगतांना पूर्वीची पारंपरिक गुरुकुल व्यवस्थेचा दाखला देऊन तिची वैशिष्ट्ये, महत्व व त्यातून भारतीयांना मिळालेल्या सनातन परंपरेमुळे भारत जगाचा आध्यात्मिक मार्गदर्शक कसा झाला हेही त्यांनी सविस्तर सांगितले.

गुरू हा शिष्याचा हात धरतो पण तो न सोडण्याची जबाबदारी शिष्याची असते. गुरू हा Transformer सारखा कसा किंवा आपला आत्मा व २४ कॅरट सोने, गुरू व Gym चा Personal Trainer  अशी कित्येक जीवनातील ऊदाहरणे दिल्याने सर्व मुद्दे सहज समजले. शेवटी त्यांनी गुरू कसा शोधावा, न मिळाल्यास काय करावे, भोंदू गुरू कसे पारखावे व अशी फसगत झाली तरी आपले नुकसान कसे होत नाही इ. शंकांचे निरसनही त्यांनी केले. आजचा हा कार्यक्रम माझ्याप्रमाणे सर्वच मेंबर्सना अतिशय आवडला असेलच परंतु आपल्या गुरूंजींचा विषयाचा सखोल अभ्यास व संस्कृत वचने, त्यांचे विश्लेषण व दाखले मला अतिशयच  भावले. त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार. PDG मुकुंदरावांनी सुद्धा हे आपल्याला अतिशयच समर्पक शब्दांमधे सांगितले त्याबद्दल त्यांचेही आभार.

रो. संजय देशपांडे 

सामाजिक प्रकल्प  : एकलव्य आणि सार्थक

मासिक शिधा प्रदान

गेली कित्येक वर्षे आपण एकलव्य आणि सार्थक या संस्थांना सातत्याने मासिक शिधा देत आहोत आणि त्यातील मुलांच्या सर्वांगीण विकासास हातभार लावत आहोत. यंदाच्या वर्षी सुद्धा आपण हा उपक्रम चालू ठेवणार आहोत.  दि. १ जुलै रोजी एकलव्य न्यास येथे जुलै महिन्याचे धान्य, फ्रीज देणे, मुलांचे वाढदिवस असा छान हृद्य सोहळा डीजी पंकज व फर्स्ट लेडी प्रिया ह्यांच्या उपस्थितीत पार पडला. संस्थेच्या संचालिका रेणुताई गावस्कर यांनी सर्वांचे स्वागत केले. शोभाताई आणि फर्स्ट लेडी प्रिया यांनी मुलांचे वाढदिवसानिमित्त औक्षण केले.

एकलव्यच्या मुलांनी सत्यजित रे यांच्या गोष्टींवर आधारित चित्रे काढून त्याचे पुस्तक आपल्या क्लबला भेट दिले. यावेळी रो. सतीश व रो. अंजली रावेतकर यांनी एकलव्य संस्थेस फ्रिज देणगीदाखल दिला.

 

सार्थक या संस्थेला सुद्धा २ जुलै रोजी महिन्याचा शिधा अर्पण केला गेला.

 

ह्या महिन्याचे एकलव्यचे व सार्थकचे संपूर्ण धान्य आपण देऊ शकलो त्यामागील अर्थशक्ती यांनी पुरवली:-

१) प्रेसिडेंट शोभा २) विनय साठे ३) किरण वाळिंबे ४) अश्विनी अंबिके ५) सुधा पांडे (रो. वृंदाची आई)

ह्या प्रोजेक्टला प्रे. शोभा, डॉ राव, से. अजय, अंजली, वृंदा, गिरीजा उपस्थित होते.

रो. वृंदा वाळिंबे

Sarthak.jpeg

१ जुलै रोजी सार्थक या संस्थेला नेहमीप्रमाणे महिन्याचे धान्य पोचवले गेले

२१ जुलै रोजी सार्थक या संस्थेस शोभाताई, अजय, अश्विनी आणि वृंदा यांनी भेट दिली. अश्विनी तेथील मुलांना नाट्यप्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून एक नाटुकली बसवून घेणार आहे जी १५ ऑगस्ट रोजी सादर करण्याची योजना आहे. सेक्रेटरी अजयने तेथील गोपालन करणाऱ्या लोकांना शास्त्रशुद्ध गोपालन व पशुखाद्य या विषयातील मौलिक माहिती दिली. वृंदाने श्री अनिल कुडीया यांच्याबरोबर बोलून त्यांच्या गरजा जाणून घेतल्या.

या कार्यक्रमास  शोभाताई, डॉ. राव, सेक्रेटरी अजय, अंजली, अश्विनी आणि वृंदा उपस्थित होते.

रो. वृंदा वाळिंबे 

DONATIONS

DONATION TO TRF

To mark the beginning of the New Rotary year, RCPS has contributed $ 1300 to the Rotary Foundation. 11 club members and one Ann contributed to the APF Rs 7,500 each totalling to Rs 90,000 and RCPS Charity Trust contributed Rs 7,500 to the Polio fund. The cheques were handed over to DG Pankaj Shah today by President Shobhatai. I thank RCPS Trust, Ann Anjali Godbole, Pres. Shobhatai, Rtn. Ajay, Rtn. Nitin Naik, PP Guru, PP Satish, PP Anjali, PP Rujuta, Rtn. Aniruddha, Rtn. Milind, Rtn Sachin Joglekar for  their contribution on the very first day. I too have contributed a similar amount. This year we are encouraging every Member to contribute to The Rotary Foundation under the initiative Every Rotarian Every Year. Looking forward to your support.

 

Regards,

PP. Ujwal Marathe

Director Rotary Foundation 2021-22

डिस्ट्रिक्टच्या आवाहनानुसार पूरग्रस्तांच्या सहाय्यासाठी आपल्या क्लबच्या ट्रस्टने रु. २०,००० दिले. याशिवाय चादर व बेड शिट्स यांचे ९२५ संच सभासदांनी उत्सफूर्तपणे पैसे जमवून दिले. शिरीष क्षीरसागर याने या सर्व कामात चोख समन्वय राखला. एकूण अंदाजे रु. २,००,००० पर्यंत आपण मदत जमवली आणि पाठवली.

Manju Phadke.jpeg
WhatsApp Image 2021-07-29 at 10.05.01 PM.jpeg
WhatsApp Image 2021-07-29 at 10.14.25 PM.jpeg

आरोग्यदर्पण 

या महिन्यातील प्रत्येक मंगळवारी ऑल इंडिया रेडिओ पुणे आकाशवाणीवर,एक माहितीपूर्ण कार्यक्रम "आरोग्यदर्पण" संपन्न झाला.

 

  • ६ जुलै रोजी रोटरी क्लब पुणे शिवाजीनगरच्या डॉ वसुंधरा फुलंब्रीकर आणि डॉ स्मिता जोग यांनी कोविड या विषयावर श्रोत्यांना मार्गदर्शन केले.

  • १३ जुलै रोजी रो. डॉ. स्मिता जोग आणि रो. डॉ. मृणाल नेर्लेकर ह्या वरील कार्यक्रमात सहभागी झाल्या. दोघींनी अनुक्रमे PCOS : Gynecological problems and long term sequel व PCOS:Diagnosis, lifestyle changes, stress management  या विषयावर श्रोत्यांना सखोल मार्गदर्शन केले.

  • तसेच दि २० जुलै रोजी सुद्धा या दोघींची  'Carcinoma Breast Cancer' या विषयांवर गौरी लागू यांनी घेतलेली मुलाखत रेडिओवर प्रसृत झाली.  स्त्रियांच्या आरोग्यविषयक प्रश्नांचे त्यांनी निराकरण करून उत्कृष्ट मार्गदर्शन केले.

  • दि. २७ जुलै रोजी दातांच्या व डोळ्यांच्या समस्या यावर डॉ. दीपश्री साठे व डॉ. तन्मयी धामणकर यांनी श्रोत्यांना मार्गदर्शन केले

International Peace

PP. Rtn. Dr.  Pradeep Wagh got a humble but rare opportunity on 31 July 2021 to be part of  a unique meeting. His video of PEACE Focus initiatives is appended.

 
History was created today when Rotary International District, RID 3131, and RID 3272, neighbors across borders , sat  online and talked of ROTARY Fellowship, Service and Peace.  This was a first of its kind meeting in our District's history. The meeting was initiated by RID 3131 District Peace Avenue committee. It was called and coordinated by Rtn.Alison Sutherlands , Chairperson of Rotary  Action Group for Peace from Wales,UK.

 

RI Director Mahesh Kotbagi gave warm opening remarks. 
PDG Sajid Bhatti, RID 3272 was very positive and warm in his response and made useful suggestions about joint Peace conference and other methods of enhancing our International understanding .

 

DG Pankaj Shah expressed great support for initiatives that would be taken.
PP Pradeep Wagh , Counsellor ,Peace RID 3131 spoke briefly of how RCP Shivajinagar and RID 3131  set the ball rolling for PEACE focus in Rotary through its 'International Understanding and Peace Symposium' in 2016-17:ROTARY PEACE AWARDS that are given every year and 'International Service & Peace Webinar' held in June 2020 etc.

 

Rtn.Deva Ghorpade, Director , Peace and Rtn.Smita Vikhankar, Co-Director spoke at length about ambitious plans to conduct activities that shall permeate Peace in the community around in Pune.
Other Rotarians for RID 3272 offered their views and suggestions. 

 

The meeting ended with a Vote of thanks to Rtn.Alison in chair and participants.

Doctors’ Day and CA day – 1st July 2021

 

 

Apart from being the first day of new Rotary year, July 1 is also important nationally because we observe National Doctors’ Day and Chartered Accountants’ Day on this day every year.

Doctors’ day is observed   on 1st July because it is the birth as well as the death anniversary of our country’s renowned physician, Dr. Bidhan Chandra Roy who played a chief role in founding several medical institutions.  He served as the Chief Minister of West Bengal from 1948 until his death in 1962. He was honoured with the highest civilian award, Bharat Ratna on 4th February 1961.

Our club felicitated four leading physicians of Pune on the occasion of Doctors’ Day. They are: Dr. Pramod Jog, leading paediatrician; Dr. V.V. Kaulgud, general physician and family doctor; Dr. Umesh Vaidya, Head of NICU, KEM hospital and Dr. Savita Mehendale, obstetrician. President Dr. Shobha Rao, Dr. Suryaprakasa Rao and Dr. Smita Jog personally met all these doctors and greeted them.

In addition, e greeting cards were sent to all the doctors in our club. Our club members sent several e-cards to their doctor-acquaintances. Through this exercise, we had reached to over 1500 doctors.

July 1 is also observed as National Chartered Accountants’ Day to mark the foundation of the  Institute of Chartered Accountants of India (ICAI).  The ICAI is one of the oldest professional institutions in the country and is the second largest professional accounting and finance body in the world, with a roster of about 2.5 lakh members. Our club recognised CAs in the club with e- greeting cards. Our members also greeted several CAs by sending the cards to their acquaintances. We have reached up to 50 CAs during this year.

The ecards were conceptualized and designed by Mrs. Mrinmayee Angal (daughter of Madhuri and Vijay Gokhale)

 

Rtn. V. Suryaprakasa Rao

Doc Day.jpg
CA Day.jpg

खबर - बखर

 

  1. रोटरी मगरपट्टा इलाईट यांच्या वतीने डॉ. बनसोडे यांना पी पी गौरी शिकारपूर हिच्या हस्ते व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार देण्यात आला

  2. रो. माधुरी गोखले व पी पी शिरीष क्षीरसागर यांनी एकलव्य न्यास या संस्थेच्या विद्यार्थ्यांच्या दहावी नंतरच्या शिक्षणाची जबाबदारी उचलण्याची तयारी दर्शवली आहे.

  3. अँन्सच्या मीटिंगमध्ये आपटे मूक बधीर विद्यार्थ्यांच्या skill development साठी प्रत्येक अँनने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी रु. १००० द्यावयाचे ठरले आहे. त्यानुसार जुलै महिन्यात वाढदिवस येणाऱ्या अँन्सकडून वर्गणी देण्यात आली.

  4. न्यू जनरेशन अव्हेन्यूमध्ये डॉ. भालेराव यांचे मॉडर्न कॉलेजच्या विद्यार्थ्यांसमोर भाषण झाले. विषय होता winning over covid. अतिशय सोप्या भाषेत डॉ. भालेराव यांनी कोविडच्या रचनेपासून लसीकरणापर्यंत विद्यार्थ्यांना माहिती सांगितली.

  5. रोट्रॅक्टर्स व रोटरी क्लब यांच्या संयुक्त प्रयत्नांनी 'अन्नदाता' हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. त्याच्या अंतर्गत आपल्या क्लबकडून पी पी गौरी शिकारपूर हिच्या पुढाकाराने वेल्हे येथील गुंजवणे या गावात शेतकऱ्यांना लागवडीसाठी इंद्रायणी तांदळाचे बियाणे देण्यात आले. तसेच सातारा जिल्ह्यात पारला खंडाळा इथेही सोयाबीनचे बियाणे देण्यात आले. 

  6. डॉ.  शिल्पा नाईक हिचा Urban Organic Farming या विषयावर GLYPHS CCE या चॅनलवर कार्यक्रम झाला. शिल्पाने खूप उपयुक्त माहिती दिली.

  7. गेल्या वर्षी आपण कारगिल दिनाच्या निमित्ताने कारगिल वीरांचा गौरव केला होता. त्यांच्या घरी जाऊन शरद, भारती, आनंद व जयश्री यांनी क्लबच्या वतीने स्मृतिचिन्हे प्रदान केली.

  8. रविवार ३१ जुलै रोजी महू, ब्राझील, इजिप्त, केनिया, पनामा आणि व्हेनेझुएला येथील रोट्रॅक्ट क्लबच्या समोर पी.पी. रो. प्रदीप वाघ यांचे मुख्य वक्ता म्हणून भाषण झाले. विषय होता 'वसुधैव कुटुंबकं'. रोटरी इंटरनॅशनलच्या 'international understanding and peace' या आवेन्यूच्या अंतर्गत वर्चूअल पद्धतीने या कार्यक्रमाचे प्रांत ३०४० यांच्या तर्फे आयोजन करण्यात आले होते. 

 

उपलब्धी...अभिनंदन 

 

  1. रो. प्रताप व पल्लवी यांचा मुलगा कार्तिक याची शिष्यवृत्ती महाराष्ट्र सरकाराच्या उच्च शिक्षण संचानालयाने मंजूर केली.  प्रताप, पल्लवी आणि कार्तिकचे हार्दिक अभिनंदन

  2. पीडीजी दीपक शिकारपूर (RPIC) यांना रोटरी इंटरनॅशनल कडून २०-२१ या वर्षात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल व उद्दिष्टे प्राप्त केल्याबद्दल 'certificate of appreciation' मिळाले.  हार्दिक अभिनंदन.

  3. मोबाईल व्यसनाधीनतेची गंभीर समस्या या विषयावर १जुलै रोजी पुढारी वर्तमानपत्रात पी डी जी दीपक शिकारपूर याचा लेख प्रसिद्ध झाला.
    तसेच दीपकची मुलाखत 'Digital Spying' या विषयावर लोकमत या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली. 
    'ऑलिम्पिकमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा आविष्कार' या विषयावर दीपकचा लेख पुढारी या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले.
    २९  जुलै रोजी पुढारी या वर्तमानपत्रात दीपकचा 'युद्ध आणि आधुनिक तंत्रज्ञान' या विषयावरचा लेख प्रसिद्ध झाला.

  4. 'समतोल' या ज्ञानप्रबोधिनी संपादित अंकात अँन प्रतिमा दुरुगकर हिचा 'कुमाउची भेट' हा लेख प्रसिद्ध झाला.

  5. रो. पी पी अविनाश कुलकर्णी यांच्या व्यवसायाचा विस्तार चाकण येथे करण्यात आला. अतिनील प्रणाली (UV system) मधील सर्व समस्यांचे निराकरण एके ठिकाणी करण्याचे हे सर्वसंकलित ठिकाण आहे. अभिनंदन अविनाश.

  6. प्रांतपाल पंकज शाह यांच्या इन्स्टॉलेशनच्या वेळी प्रेसिडेंट शोभाताई यांचा मेजर डोनर झाल्याबद्दल रोटरी इंटरनॅशनल प्रेसिडेंट शेखर मेहता यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  पी डी जी दीपक आणि गौरी शिकारपूर  यांचासुद्धा मेजर डोनर लेवल ३ झाल्याबद्दल या वेळी सत्कार करण्यात आला.

Highlights of first BOD meeting held on 24th July 2021

  • The BOD will be held on 4th Saturday of every month.

  • We donated Rs. 20000 from Club charity Trust for Kokan Disaster relief.

  • We participated in synergy projects viz. Barkha Rutu @ Rs 5000.00 and Annadata Project @ Rs 5000.00

  • Next month two Honorary Members- Padma Talwalkar & Dr. Mohan Agashe will be inducted

  • SAR invoice is received and payment will be made.

  • Average attendance in July was 60%

  • The proposed date for Ekankika is 13th to 18th December.

  • August- Varsha Trip to nearby place is  under planning

  • Mehandi program for Anns is scheduled on 12th August

  • Proposal for induction of new member Dr. Balkrishna Damle was approved.

  • President Dr. Shobha will be becoming major donor, PDG Dr. Deepak will become 3rd Level Donor. Total donation to foundation $ 2500 till date.

  • Food grains for Month of July were supplied to Sarthak & Ekalavya.

  • PP Anjali donated Refrigerator at Ekalawya.

  • Doctor’s day and CA day were observed by sending e-card to more than 1300 doctor & 100 CA

  • Three Radio talks on important health issues were broadcast by our doctors and Annet Dr Tanmayee, while 4th will be broadcast on 27th July.

  • Lecture of Dr. Devidas Bhalerao @ Modern College on ‘Winning over Covid 19’ was arranged on 19th July.

  • Adult Literacy program of Rtn Vishwas Deshmukh was discussed with DG for required support for applying to Bill Gates foundation.

  • The point of charging Trust administrative charges for donations received, which is in line with the RI Foundation norms, was discussed.  It was decided that  Trustees will discuss this matter and  submit the recommendations  to BOD.

  • The Next BOD will be held on 28th August 2021

Secretary Ajay Godbole

ऑगस्ट मध्ये योजिलेले प्रकल्प

1) Food grain support to Sarthak
2) food grain support to Ekalavya
3) Sport material worth of Rs 10,000/- to Sarthak
4)  Lectures arranged on 4th and 11th August for Rotaractors in Modern college 
5) Small Balnatya of Sarthak children is organised on 15th August 
6) Participation in teachers training workshop organised by District. 10 Teachers from interact school  will participate.

Rtn. Shobha Rao

ऍन्स मीटिंग  

जून मीटिंग - या मीटिंग मध्ये पुढील निर्णय झाले. आपटे स्कूलच्या मुलींना टेबल रनर, पिलो कवर, टेबल मॅट साठी कापड आणून कटिंग करून देणे व शिवून घेऊन अशा प्रकारे आपल्याला त्यांना मदत करता येईल तसेच त्यांच्याकडून साडी कव्हर शिवून घेऊन त्यावर अलका त्यांना पेंटिंग करायला शिकवणार आहे. एक नवीन कल्पना, प्रत्येक जणींनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त आपटे मधील मुलींना हे सर्व शिवण्यासाठी एक मीटर ते पाच मीटर पर्यंतचे कपडाचे पैसे द्यावे म्हणजे ते त्यांना सोयीचे होईल व शिवण कामाला मदत होईल. सध्या हे कापड 150 रुपये ते 170 रुपये मीटर आहे. जुलैच्या 25 तारखेला आपण अंजली गाडगीळ च्या फार्म वर जाण्याचे योजिले आहे हे सर्व 15 जुलैनंतर च्या परिस्थितीवर अवलंबून आहे. 12 ऑगस्टला नेत्राकडे गुरुवारी चार वाजता नागपंचमीनिमित्त मेहंदी साठी भेटणार आहोत .सप्टेंबर महिन्यात रॉक गार्डन शिकण्यासाठी स्वाती जोशीकडे जमणार आहोत. ते सर्व कल्याणी व स्वाती शिकवणार आहेत .ऑक्टोबरला मीना इनामदार कडे नातवंडांचा बाल मेळावा होणार आहे. नोव्हेंबर डिसेंबर मध्ये ऑनलाईन मीटिंग होईलच .जानेवारीत ऍनस पिकनिक हुरडा पार्टी. पुढील सर्व प्रोग्रॅम बाहेरील परिस्थितीनुसार होतील.

जुलै मीटिंग - ऍन्सची या वर्षातील पहिली मीटिंग शुक्रवारी 23 जुलैला झूम वर झाली. माधुरीताई पेठे यांचे 'पावसाळ्यातील आजार' या विषयावर त्यांनी आम्हाला बाराक्षार बाबत छान माहिती सांगितली. त्यानंतर मीना इनामदारने पडवळाची एक सुग्रास अशी रेसिपी व्हिडिओने दाखवली. खूपच टेस्टी होती.

ऍन. अंजली गोडबोले

साप्ताहिकी 

२ ऑगस्ट  - भारत विकास परिषद - रामचंद्र एकबोटे आणि त्यांच्या संस्थेचे 2 सहकारी..!

९ ऑगस्ट - मंगला ताई गोडबोले ( कार्यक्रमाचे नाव व स्वरूप 3/4 दिवसांनी कळेल)

 

१३ ऑगस्ट - Lt Col मनोज कुमार सिन्हा ( सिनर्जी प्रोग्राम - RCP हेरिटेज )

१६ ऑगस्ट च्या सोमवारी सुट्टी

२३ ऑगस्ट - मानद सदस्य पदमाताई तळवलकर यांना सभासदस्यत्व देणे व त्यांची मुलाखत ( मंजिरी)

३० ऑगस्ट - मानद सदस्यत्व श्री मोहन आगाशे

रो. अश्विनी अंबिके 

औक्षवंत व्हा, सुखी व्हा  !


ऑगस्ट

०३ - राहुल पेंढारकर

०५ - अश्विनी अंबिके 

०८ - कल्याणी पेंढारकर

०८ - पद्माताई पिंगळे

१० - ऋजुता देसाई

१६ - सुषमा देशपांडे

१७ - चंद्रकांत गोडसे

बर्थडे फेलोशिप लीडर जुलै  - ऑगस्ट २०२१
रो. अश्विनी अंबिके

रेशीमगाठ वर्धापनाच्या शुभेच्छा

२३ - अनिल व रंजना दामले

ऑगस्ट सपोर्ट ग्रुप 

 

रो. प्रमोद पाठक (लिडर) 
ऍन. नेहा पाठक
रो. राजेंद्र वाईकर 
ऍन. राजश्री वाईकर 
रो. रविंद्र कुलकर्णी  
रो. प्रदीप वाघ 
ऍन. नेत्रा वाघ 
रो. हर्ष बर्वे 
ऍन. मोहिनी बर्वे 

दुरुस्ती

इन्स्टॉलेशन पुशमध्ये डिस्ट्रिक्ट मध्ये २१-२२ या वर्षात कामाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या क्लबच्या सभासदांची माहिती दिली गेली होती. त्यात काही उल्लेख अनवधानाने राहून गेले. ते पुढीलप्रमाणे -

१. आय. पी. पी. शरद डोळे    -  Assistant Governer Associate

२. पी.पी. सी. डी. महाजन - Membership Orientation Co-Chairperson

शोकसंदेश

  1. दि. १६ जुलै २०२१ रोजी रो. प्रदीप दुरूगकर याच्या मातोश्री श्रीमती एम.बी दुरूगकर यांचे वृद्धापकाळामुळे निधन झाले. ईश्वर त्यांना सद्गती देवो.

  2. अँन अरूणा जितुरी हिच्या वडिलांना १९ जुलै २०२१ रोजी देवाज्ञा झाली. ईश्वर त्यांना सद्गती देवो.

डिस्ट्रिक्टच्या घडामोडी 

१९ जुलै २०२१ रोजी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे २०२१-२२ या वर्षीचे प्रांतपाल रो. पंकज शाह यांचे इंस्टॉलेशन रोटरी इंटरनॅशनल प्रेसिडेंट शेखर मेहता यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. 

रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ कल्चरल कमिटी च्या विद्यमाने १७ जुलै रोजी 'बरखा ऋतू' हा कार्यक्रम आभासी (व्हर्चुअल) पद्धतीने सादर करण्यात आला. गायक सौरभ दफतरदार व गायिका मालविका दीक्षित यांनी वर्षा ऋतूची गाणी सुंदर सादर केली. सिनर्जी पद्ध्तीने शिवाजीनगर, निगडी, आकुर्डी, बाणेर, कोथरूड, हिलसाईड व इ क्लब ऑफ पुणे डायमंड हे रोटरी क्लब्जनी यजमानपण भूषवले. आपल्या क्लबच्या पी पी शिरीष क्षीरसागर याने या कार्यक्रमाच्या आयोजनात महत्वाची भूमिका निभावली. त्याचे खूप कौतुक झाले.

Father of Nation once addressed a Rotary Club Meeting in Kolkatta

          Weekly meeting (today Hybrid) is integral part and parcel of any Rotary Club. This concept fosters fellowship and comradery amongst members. All meetings are not expected to be Serious. It should be mix of Education, Rotary information, Entertainment and Enlightenment. Once in a Quarter can be open house (only for members) where members can express ideas, suggestions for betterment of the club. All meetings need not have external speaker. Ideally 15% meetings could have in-house talent participating (individually or in group). Sometimes to break monotony clubs may decide to visit places of interest nearby or even have Picnic. Such Outings brings members together and many a times hidden talent of members/spouses is exposed.

           External Speakers addressing club gatherings is a regular phenomenon and club program committee is always in search of a good speaker. We have realized the hard way Knowledge and Oration are different streams. Very few Individuals have god’s gift of both.  What if club was told next weekly meeting our guest speaker is Mahatma Gandhi.  It’s not a myth. CALCUTTA was the home town for the first Rotary club in the mainland of Asia. R.J. Combes, the manager of a steel products company while on a business trip to U.S.A. was so impressed by the “Friendship, fellowship, and service” aspects of the movement called Rotary that he wanted to introduce the idea to his friends in Calcutta also. There was no difficulty for him to convince enough people and convene the first meeting on 26 September, 1919. The new club was chartered just after three months of the first meeting, on the new year day of 1920 to be exact. All the twenty charter members were non-Indians.. On August 18, 1925, the father of our Nation also fondly known the World over as Mahatma Gandhi addressed the members of Rotary Club of Kolkatta on "THE ECONOMIC AND SPIRITUAL VALUE OF THE CHARKHA" where Charkha means a Spinning Wheel, that was used as a tool to spin yarn from Cotton, manually.  In absence of machines and technology Charkha was source of livelihood for many those days. In addition the cloth made out of it gave a feeling of Swadeshi as well.

Mahatma Gandhi knew Rotary concept very well, and had met many Rotarians later and also spoken at some of the Rotary conferences later. Mahtama Gandhi wrote an article, "My 7 points for a new world order", which appeared in the February 1942 issue of The Rotarian magazine. There is a remarkable similarity in the ways that Rotary's 4 Way Test and Gandhi's Satyagraha were conceived and applied; as well as between Rotary's Motto of Service Above Self and Gandhi's Mission in life of Helping the Helpless.

Rtn. Deepak Shikarpur

deepak@deepakshikarpur.com

Author is Past District Governor RID 3131 and serving Rotary Public Image Co-ordinator Zone 7

Rotary Information

August- Membership and New Club Development Month

 

The designated months highlight Rotary International’s area of focus.


Membership in a Rotary Club offers opportunities to connect with other professionals who are not afraid to lead and are dedicated to making a difference. After this pandemic, spending time with our fellow members - whether to attend a meeting, plan a project, exchanging ideas, or just have fun- can lead to lifelong friendships. When we get involved and make connections, we will inevitably grow as a person and develop new skills. Make membership growth is our club’s top priority. Not only do we need to bring new members but we also need to focus on bringing young members to our club.


It is worth noting that in the year 2010-11, exactly ten years ago, our club membership was around 66 and in the current year it is around 75. Are we really satisfied with this growth? No, we aren't. We have to work hard to get at least 7-8 new members this year. Let everyone in our social network know that you are a proud member of the Rotary Club of Pune Shivajinagar and encourage them to join our club. Share stories about our service projects, tell them loudly what we have been doing for the community and how they improve lives.


It is worth mentioning here that in the year 1990 our club started a new club, Rotary Club of Pune Ganeshkhind. Then it took almost 18 years to start a new club, the Rotary Club of Pune Chandni Chowk. Unfortunately due to some difficulties that club could not survive and had to be merged with some other club. Now it is high time that we should be able to add at least 7-8 new members in our club and also to find out the scope and opportunity to start a new club. 
So let us work hard on achieving these two goals in this current year.

Rtn. Yashwant Gokhale

Lalit Vibhag.png

होममेकर्स आणि बरंच काही 

- गुणवंत 'कल्याणी' -

      अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्को ची मोहनगरी --- मनाला भावलेला मित्र आयुष्याचा जोडीदार म्हणून सोबतीला--- -  दोघांचही उत्तम शिक्षण - ---उत्तम नोकऱ्या आणि त्याही एकाच कंपनीत. !!यथावकाश घरात एक मुलगा आणि मुलगी यांचे बोबडे बोल घुमू लागलेले. ----असं सगळं सेट झालेलं आयुष्य.----पण अमेरिकेत येण्यापूर्वीच दोघांचा निर्णय झाला होता की सहा वर्षांनी परत भारतात यायचं. मग काय ?आले परत. 

        साधारणपणे असं आढळतं की अमेरिकेत जाताना पती-पत्नी दोघही परत भारतात यायचं असं ठरवून जातात पण नंतर खूप ठिकाणी बायकोच परत यायला नाखूष असते असं दिसून येतं. मग तिची कारणं काहीही असोत. पण उपरोक्त जोडीतली पत्नी होती आपली कल्याणी पेंढारकर. त्यामुळे नीट विचारपूर्वक केलेल्या प्लॅन प्रमाणे आणि घेतलेल्या निर्णयाप्रमाणे ती भारतात खुशीने परत आली आणि पुण्यात छान सेटल झाली यात काहीच नवल नाही! 

       कल्याणी मूळची मुंबईची. कॉस्मोपॉलिटन वातावरणात राहिलेली/वाढलेली. वडील ॲबट लॅबोरेटरीज मध्ये उच्चपदस्थ. आई पुण्याची, संगीतात एम ए केलेली; माणिक वर्मा यांकडे शिकलेली रेडिओची स्टार सिंगर.  कल्याणीला दोन मोठ्या बहिणी. वडील राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते. जुहूच्या कॉस्मोपॉलिटन वसाहतीत सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करणारे आणि दरवर्षी धूमधडाक्याने साजराही करणारे. त्यांना वाचनाचीही खूप आवड त्यामुळे घरात वाचनीय अशा सर्व साहित्याची रेलचेल. तर अशा  साहित्य, कला जोपासणाऱ्या आणि सार्वजनिक कार्य करणाऱ्या घरातली कल्याणी सर्वात धाकटी मुलगी. शिवाय बहिणी प्रमाणेच बोर्डात क्रमांक पटकावणारी. त्यामुळे तिच्या लाडांना तोटा नव्हता.

       कल्याणी ने मोठ्या बहिणीप्रमाणे मेडिकलला जावं अशी घरच्यांची अपेक्षा पण कल्याणीने बायाॅलॉजी सोडण्याचा निर्णय घेतला आणि कॉम्प्युटर इंजिनियर व्हायचं ठरवलं.  त्याप्रमाणे ती बीई--झाली आणि टीसीएस मध्ये जॉब मिळवून नंतर इंग्लंडला गेली. इंग्लंड ला गेलेल्या ग्रुप मध्ये कल्याणी बरोबर आणखी एक दक्षिण भारतीय मुलगी होती उमा.कल्याणीची तिच्याशी छान मैत्री जडली आणि दोघींनी नोकरीतून मिळालेल्या मोकळ्या वेळात मनसोक्त भटकंती करून घेतली. कल्याणी म्हणाली मुंबईत राहिल्यामुळे रेल्वे प्रवासाची तसंच पायी चालण्याची तिला सवय होती. त्यामुळे इंग्लंड मध्ये फिरायला काही अडचण आली नाही. त्या दोघी शक्य तेवढ्या फिरल्या. खूप म्युझियम्स पाहिली, राजवाडे पाहिले आणि स्कॉटलंडलाही गेल्या


        कल्याणीचे आई-वडील तिच्याकडे  अमेरिकेला गेले तेव्हा तिला खूप आनंद झाला आणि आपण काहीतरी अचीव्ह केलं असं वाटलं. कल्याणीची मोठी बहीण न्यूराॅलॉजिस्ट आहे तर मधली बहिण सीए आणि सीएस् असून कन्सल्टन्सी करते. त्यांच्यापुढे कल्याणीला तिची पदवी कमीपणाची वाटे. !!(आहे की नाही कल्याणी ची कमाल! असो.)

तर इंग्लंडहून परत आल्यावर कल्याणी आणि राहुल चा विवाह झाला. त्या दोघांची भेट सिऍट टायर्स मध्ये नोकरी दरम्यान झाली. लग्नानंतर सहा महिन्यांनी त्या दोघांनाही अमेरिकेत पीजी आणि  ई  कंपनीत नोकरी मिळाली आणि ते दोघे अमेरिकेला गेले. तेथून परत आल्यावर मात्र ते पुण्यात सेटल झाले. राहुलने तेच काम चालू ठेवले. कल्याणी ने मात्र मुलांची आबाळ होऊ नये म्हणून नोकरीतून ब्रेक घेतला - किंबहुना आता नोकरीसाठी घराबाहेर जायचंच नाही असा निर्णय घेतला. वास्तविक स्वतःचा व्यवसाय करावा असं कधी तिच्या मनात आलं नव्हतं किंवा ते तिचं स्वप्नही नव्हतं. त्यावेळच्या परिस्थितीत मुलांसाठी घरी राहणं श्रेयस्कर आहे असं तिला मनोमन पटलं म्हणून तिने नोकरी सोडली. पण तिला स्वस्थ कसं बसवणार! तिने एका मैत्रिणीच्या बरोबर त्या    मैत्रणीच्याच  रिक्रुटमेंट कंपनीत काम करायला सुरुवात केली - अर्थात घरून आणि तेही फक्त तीन तास. कोणत्याही कंपनीत कोणत्याही कामासाठी योग्य पात्रतेची व्यक्ती असणं किती नितांत गरजेचं असतं  हे सांगायची गरजच नाही. त्यादृष्टीने कोणत्याही कामासाठी योग्य पात्रतेची माणसं कंपन्यांना मिळवून देणे हे फार महत्त्वाचं काम ठरतं. ते आपण उत्तम रित्या करावं असं कल्याणीने मनाशी पक्कं केलं आणि 2011 पासून तिने हे काम करण्यासाठी स्वतःची कंपनी सुरू केली.! 

      नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय करणं हा बदल सोपा नव्हता. त्यासाठी कल्याणीला स्वत:त बदल करावे लागले. ती म्हणाली नोकरी सोडून व्यवसायात पदार्पण म्हणजे पहिली गोष्ट दर महिन्याला हातात येणारं उत्पन्न  बंद. आणि दुसरं तुमच्या  इगो' ला  बसणाराी  चपराक!!व्यवसायात ग्राहक हाच देव असतो त्यामुळे त्यांच्या वेळा, त्यांचे इगो, त्यांच्या अडचणी या साऱ्यांना प्राधान्य द्यावं लागतं. इतकंच नव्हे तर त्यांची न पटणारी वक्तव्य, त्यांची प्रौढी मिरवणारी भाषा असं सारं काही शांतपणे ऐकून घेणं भाग असतं. त्यामुळे डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्याचा चांगलाच सराव अंगवळणी पाडून घ्यावा लागतो. तरीही त्यात मजा आहे असं मला आता वाटतं. !!

       कंपन्यांना त्यांच्या कामासाठी योग्य अशी माणसं पुरवली की 'त्यांना आणि मलाही किती समाधान  मिळतं ते शब्दांत सांगता येणार नाही' असं कल्याणी म्हणते. "काम उत्तम झाल्याने त्या कंपन्यांचा गुडविल मला  मिळतो.आणि मग उत्तम पैसे मिळणं ओघानंच येतं. त्यामुळे व्यवसायात चॅलेंज घेणं मला  आता आवडू लागलं आहे. या प्रवासात नर्वस करणारे प्रसंग आले नाहीत असं मुळीच नाही.मुळात  मी सॉफ्टवेअर डेव्हलप करणारी. पण ते सोडून 'नोकर भरती साठी माणसं पुरवणं हे कसलं काम करतेस तू' असे बोल खूप जणांकडून  ऐकून घेतले. प्रसंगी मलाही ते पटे आणि आपलं चुकतंय असं वाटू लागे. पण कोणतंही काम कमी नाही आणि प्रत्येक उत्तम कामाचं मोल सारखंच आहे असं सांगणारे हितचिंतकही होतेच. त्यांच्यामुळे मनाला उभारी मिळे. शिवाय घरासाठी, मुलांसाठी मी घरातच असणं किती फायद्याचं आहे हे मला  जाणवत  होतं पटत होतं. त्यामुळे घरात राहून स्वतःचा व्यवसाय करणं हा विचारही भुरळ घालत असे. 'त्यातूनच मी पुढे जात राहिले' "असं कल्याणीने स्पष्ट केलं.

     अर्थात यासाठी आवश्यक असतं स्वयम् प्रोत्साहन, चिकाटी, शिस्त, कष्टाची तयारी आणि उत्तम प्लॅनिंग. हे गुण कल्याणीच्या रक्तातच आहेत. त्यामुळे ती हे करू शकली असं मला वाटतं. 

        या साऱ्यात घरच्यांचा पाठिंबा खूप महत्त्वाचा असतो असं तिने सांगितलं. ती म्हणाली "राहूलचा  तसच  आमच्या  काही मित्रांचा मला सदैव पाठिंबा आहे. त्यामुळे कामात काही  अडच़ण  आल्यास ते मला सल्ला  देतात. शिवाय  मााझ्या सासूबाई आणि मी आमचं वेगळच नातं आहे. त्या खूप हुशार आहेत. शिक्षणाची, साहित्याची त्यांना खूप आवड आहे.त्या उत्तम कवयित्री आहेत शिवाय स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या 22 वर्षं कार्यकर्त्या आहेत. त्यामुळे लोकांमध्ये वावरण्याची तसंच सर्वांना समजून घेऊन ज्याला जी हवी ती मदत करण्याचा त्यांचा स्वभाव आहे.त्यामुळे त्याही  माझ्या  पाठीशी आहेतच."


      कल्या़णीच्या माहेरी आणि सासरी दोन्हीकडे अध्यात्मिक पार्श्वभूमी आहे. त्यामुळे प्रथमपासूनच त्या दोघींचं छान नातं तयार व्हायला मदत झाली. तिच्या आई वडिलांप्रमाणेच सासूबाईंचा ही तिच्यावर खूप प्रभाव आहे असं ती सांगते. 

     व्यवसाय करताना डोकं शांत ठेवावं लागतं. सर्वांशी गोड बोलावं लागतं. प्रत्येक गोष्टीची शक्य तेवढी अधिकाधिक माहिती घेऊनच निर्णय ठरवावा लागतो. माणसांची पारख करावी लागते. मनात सदैव सकारात्मकता ठेवावी लागते. शिवाय आपला आत्मसन्मान जपतानाच समोरच्यालाही सन्मानाने वागवावं लागतं तरच समोरचा माणूस आपल्याशी बांधला जातो. अशा अनेक गोष्टी आपल्याला व्यवसाय करताना शिकायला मिळतात. म्हणून कल्याणीला आता असं वाटतं की ज्यांना ज्यांना जेव्हा शक्य असेल तेव्हा त्यांनी स्वतःचा व्यवसाय जरूर करावा. गेल्या दहा वर्षात कल्याणी मध्ये जे बदल झाले ते तिच्या घरच्या मंडळींना जाणवतात असंही तिने नमूद केलं. तिला स्वतःला ती भावनाप्रधानतेकडून त्रयस्थपणे विचार करू शकणारी व्यक्ती झाली आहे असं वाटतं. कल्याणीने तिचं  ऑफिस  जरी  घरी  ठेवलं  असलं  तरी  ती  तिच्या ऑफिसच्या कामात  सकाळी  १०  वाजल्यापासून संध्याकाळी सातपर्यंत  व्यग्र  असते.ती  आता  गृहिणीच्या जवाबदार्यांबरोबरच पूर्णवेळ उद्योग व्यावसायिकाच्या  जवाबदार्यां सांभाळत  आहे. तिच्याकडे सध्या चार आय. टी. प्रोफेशनल  मुली काम करत आहेत. त्यांनाही घरून काम करण्याचे भरपूर फायदे मिळावेत असं कल्याणीला वाटतं. 

    कल्याणीच्या व्यावसायिक यशा बरोबरच तिचं निसर्गप्रेम, फोटोग्राफीची कला, मिनिएचर गार्डनची कलाकुसर आपल्याला माहितीच आहे. तिने शाळेत असताना भरत नाट्यमचंही  पद्धतशीर शिक्षण पाच वर्ष घेतलं आहे. तिला संगीताची खूप आवड आहे. गायक नाही पण उत्तम कानसेन व्हावं असं तिला वाटतं. प्रवासाची तिला खूप आवड आहे, त्यातही सोलो ट्रॅव्हलिंगचं तिचं स्वप्न आहे. त्यात जे अनुभव येतील ते वेगळे असतील असं तिला वाटतं. अशाप्रकारे आपल्याला जे अज्ञात आहे ते अनुभवण्याची तिला आवड आहे. विद्यार्थीदशेत कल्याणीला पोस्टाची तिकिटे जमवण्याचा खूप छंद होता. त्याचा फायदा सांगताना ती म्हणाली "जमवलेल्या तिकिटांचे देश कोणते, त्यांचा इतिहास काय आहे, भूगोल काय आहे आणि संबंधित तिकीट कोणत्या प्रसंगी कोणत्या निमित्ताने काढले आहे अशा प्रकारची खूप माहिती मी जमवत असे. यानिमित्ताने जनरल नॉलेज खूप वाढतं असा तिचा अनुभव आहे. याशिवाय पेन फ्रेंड्स जमवण्यातही तिला रस होता. त्यावेळी तिला शेफिल्ड तसंच त्रिनिदाद इथल्या मैत्रिणी मिळाल्या होत्या. या छंदामुळे पत्र लिहिण्याची कला विकसित होते असं तिला वाटतं. शिवाय मित्र-मैत्रिणी मिळतातच. अशाप्रकारे छंदही व्यवस्थितपणे जोपासणारी कल्याणी आजही प्रत्येक गोष्ट व्यवस्थित पणे करताना दिसते. तिला तिच्या व्यवसायात उत्तम यश लाभो हीच सदिच्छा!!

अँन  सरिता  भावे

मनाचे श्लोक

रो. मृणाल नेर्लेकर हे आपल्या क्लब मधील एक उत्साही आणि हरहुन्नरी व्यक्तिमत्व. व्यवसायाने डॉक्टर असणाऱ्या मृणालचा अध्यात्माचा अभ्यास सुद्धा तितकाच गाढा आहे. त्यातून मृणाल ही उत्तम कीर्तनकार आहे. मनाच्या श्लोकांचे तिने केलेले प्रकटचिंतन हे मालिकेच्या स्वरूपात देण्याची योजना आहे. त्यातील पहिला भाग. 

साज शृंगार  

मंगळसूत्र 

मंगल म्हणजे कल्याणकारी आणि सूत्र म्हणजे धागा असा त्याचा शब्दार्थ आहे. स्त्रीला सौभाग्याहून अधिक मंगल काहीच नसतं. म्हणून लग्न लागताच सौभाग्य चिन्ह म्हणून ते तिच्या गळ्यात बांधण्यात येते. 

केशरी रंगाच्या धाग्याला तीन गाठी मारून त्याच्यात काळी पोत ओवणे एवढेच मंगळसूत्राचे प्राथमिक स्वरूप असल्याचे दाक्षिणात्य साहित्यातील उल्लेखावरून दिसते. तामिळनाडू व केरळमध्ये 'तालीकेट्टू कल्याणम्' नामाचा एक समारंभ असतो. या समारंभात केशराचे पाणी दिलेल्या धाग्यात काळी पोत होऊन तयार झालेली 'ताली' वधूच्या गळ्यात बांधतात. या चालीवरून मंगळसूत्र प्रचारात आले. त्या भागात ताली नावाचा सौभाग्यालंकार अस्तित्वात असून तो सोन्याच्या १०८ बारीक तारा एकमेकात गुंफून तयार करतात. तो वधूच्या गळ्यात बांधण्यापूर्वी त्याला केशराचे पाणी देतात.

 

अर्थात त्या काळी लग्नाच्या वेळी वधूच्या गळ्यात मंगळसूत्र बांधण्याची प्रथा नव्हती. वेदात अथवा त्याकाळी लिहिल्या गेलेल्या साहित्यात त्याचा तसा उल्लेख नाही. कालिदासासारख्या विख्यात कवीने विवाहाची अनेक यथासांग वर्णने केली असली तरी त्या वर्णनात मंगळसूत्राचा उल्लेख नाही. पण माझ्या मते काही ना काही सौभाग्यालंकार असला पाहिजे. मला तरी अजून त्याचा उलगडा झालेला नाही. 

 

मंगळसूत्राची सुरुवात द्रविड संस्कृतीतून आलेली आहे. आर्यांनी ही प्रथा स्वीकारली. मंगळसूत्राच्या या प्रथेचा प्रसार दक्षिण भारतातून कर्नाटकात आणि तेथून विंध्य पर्वतापर्यंत झाला. आर्य आणि द्रविड संस्कृतीचे मिश्रण विशेषतः याच प्रदेशात जास्त प्रमाणात झाले. विंध्य पर्वताच्या उत्तरेकडे ही प्रथा जाऊ शकली नाही.

 

विवाह प्रयोगात मंगळसूत्राला कोठेच स्थान नाही आणि त्याचा उल्लेखही नाही. पण प्रथा मात्र आहे. त्यामुळे पुरोहित वर्गाने या विषयाचा एक श्लोकरूपी मंत्र रचून त्याला विवाह प्रयोगात जागा करून दिली. नवरदेव वधूच्या गळ्यात मंगळसूत्र बांधताना पुढील मंत्र म्हणतो -

मांगल्यं तंतुनानेन 
मम जीवनहेतुना ।
कंठे बंधामि सुभगे 
त्वं जीव शरदः शतम्  ।।

केशरी धाग्यात बांधलेल्या काळ्या पोतीत कालांतराने पदक अथवा सोन्याचा मणी आला असावा.  भिन्न जमातीत व भिन्न प्रांतात पदकाचे आकार भिन्न असतात. महाराष्ट्रात व कर्नाटकात मंगळसूत्राच्या खाली मध्यभागी सोन्याच्या दोन वाट्या व मणी असतात. शिवाय मुहूर्तमणी असतो. मुहूर्तमण्याशिवाय तिकडील मंगळसूत्र होत नाही. कर्नाटकातील वाट्या चपट्या किंवा बसक्या 'कॉइन' टाईप असतात. आपल्याकडे मंगळसूत्रातील वाट्या फुगीर असतात. गोवा, कारवार, उडपी या भागात पोवळी, मोती घालूनच मंगळसूत्र बनवतात. मंगळसूत्रातील दोन वाट्या म्हणजे चंद्र-सूर्याची प्रतीके आहेत. विवाहाच्या वेळी प्राप्त होणारे सौभाग्य 'यावच्चंद्रदिवाकरौ' टिकावे अशी भावना वधूच्या गळ्यात मंगळसूत्र बांधताना असते. दक्षिण कोकणात देवदासीकडून मंगळसूत्र ओवून घेतात. काही ठिकाणी मुहूर्त मणी वेगळ्या पोथीत गुंफून स्वतंत्रपणेही गळ्यात बांधतात. देवदासी नित्य सौभाग्यवती असते. तिच्याकडून ते ओवून घेतल्याने सात जन्म अखंड सौभाग्याचा गुण मंगळसूत्रात उतरतो अशी भावना आहे.

केसरी धाग्यातील काळ्या पोतीपासून सोन्याच्या गंठणापर्यंत मंगळसूत्रात बरीच स्थित्यंतरे होत आहेत. सुवर्णकाराच्या कलाकुसरीमुळे त्यात सतत नावीन्य येत आहे. आज मंगळसूत्राची व वाट्या-मण्यांची शेकडो डिझाइन्स तयार झालेली आहेत. वाट्या-मण्यांचे आकारपण बदलू लागले आहेत. पोत खडे, मीनाकारी, सोन्याचे रंग, खड्यांचे रंग सर्व मॅचिंग ड्रेसनुसार करून घेतात. कोणी काळ्या पोतीत, कोणी मोती-पोवळे घालून आपल्या प्रथेप्रमाणे किंवा आवडीने बाकीचे पदर बनवतात. आधुनिक स्त्रिया काही पोटापर्यंत तर काही गळ्यापर्यंत लांबीचे मंगळसूत्र घालतात. सोन्याच्या चोऱ्यांमुळे पितळेचे मंगळसूत्र घालण्याची आज पाळी आली आहे.

 

मंगळसूत्राचे असे निरनिराळे प्रकार असतात. तसेच ते परिधान करण्याचे विधीही गमतीचे असतात. मंगळसूत्रावाचून सौभाग्यवती स्त्रिया आपला गळा मोकळा ठेवत नाहीत. तसेच घरातील कुलदेवता किंवा महालक्ष्मीसाठी खास जुन्या पद्धतीचे मंगळसूत्र व दोन वाट्या व चार मण्यांसहित मंगळसूत्र करून घेतात. काहीजण माहेरची एक वाटी+दोन मणी आणि सासरची एक वाटी+ दोन मणी म्हणजेच माहेर-सासर एकत्रीकरण म्हणून सुद्धा मंगळसूत्र करवून घेतात. ही आपल्याकडे प्रथा म्हणून संबोधिली जाते.

 

रो. राजाभाऊ वाईकर सराफ

WhatsApp Image 2021-07-27 at 10.05.08 PM.jpeg
WhatsApp Image 2021-07-27 at 10.05.07 PM.jpeg

कथाकथन

यंदा पुश मध्ये नवीन काय घेता येईल आणि आपल्या सभासदांच्या सर्जनशीलतेला वाव मिळेल असा विचार करत असता रो. मंजिरी धामणकर हिला कथा कथनाची कल्पना सुचली. ती तिने क्लब समोर मांडली. या कल्पनेला तात्काळ मिळालेला प्रतिसाद पाहता आम्हा पुश टीमचा उत्साह बळावला. या कथामालिकेतील पहिले पुष्प रो. स्नेहा भावे हिने गुंफले आहे. 

रो. स्नेहा भावे

खाण्यासाठी जन्म आपुला 

रसगुल्ला 

आपण अनेक वेळा आपल्या सभासदांकडून पाककृती घेऊन पुश मध्ये छापल्या आहेत. इतकेच नव्हे तर अश्या पाककृतींचे संकलन करून त्याची पुस्तके सुद्धा आपल्या क्लबने प्रसिद्ध केली आहेत. या वेळी पाककृती दृश्य स्वरूपात देण्याचा मानस पुश टीमने जाहीर केला. त्याला सुद्धा खूप छान प्रतिसाद मिळाला. या मालिकेतील पहिले पुष्प रो. अश्विनीचा मुलगा श्रीरंग याने गुंफले आहे. 

ऍनेट. श्रीरंग अंबिके

आरोग्यवर्धिनी

कॅल्शियमचा ‘आधार’

सूक्ष्म पोषणमूल्यांचा एक महत्वाचा घटक म्हणजे क्षार. जीवनसत्वांइतकीच महत्वाची कार्ये हे क्षार करत असतात. क्षार हे द्रव्यात (पाणी किंवा रक्त) विरघळतात तेव्हा त्यांचे विघटन होते व ते इलेक्ट्रिकल चार्ज वाहण्याचे काम करतात. त्यांना इलेक्ट्रोहाइट्स असे म्हणतात आणि शरीरातील अनेक महत्वाच्या रासायनिक क्रियांमध्ये त्यांचा सहभाग असतो. साहजिकच त्यांच्या अभावाने अनेक व्याधी निर्माण होतात. त्यातील एक प्रमुख क्षार म्हणजे कॅल्शियम

कॅल्शियम – सर्वात महत्वाचा क्षार असून आपल्या शरीरात मुबलक प्रमाणात त्याचा साठा असतो. (1000 – 1200 gms). जवळजवळ 99 टक्के इतका तो हाडांमध्ये असतो तर फक्त 1 टक्का तो सहज मिळवता येइल अशा फॉर्म मध्ये असतो व साधारण 40 टक्के कॅल्शियम हे प्रथिनांबरोबर बांधलेले असते. हाडांची वाढ व मजबूती ह्या खेरीज मज्जासंस्था, पचनसंस्था, रोगप्रतिकार शक्ति आणि हृदयाच्या कामात तो महत्वाचे काम करत असतो. गर्भधारणेच्या वेळी कॅल्शियमची मोठया प्रमाणात गरज असते. रक्तातील सर्वसाधारण पणे पातळी 8.5 ते 10.6 mg/d. एवढी असते व त्यातील 5 mg/dL हा आयोनाईझड फॉर्म मध्ये असतो. रक्तातील पातळी अत्यंत नियंत्रित ठेवली जाते आणि त्यात किडनीचा कार्यभाग महत्वाचा असतो. प्रौढांसाठी दैनंदिन गरज ही सरासरी 1000 mg एवढी सांगितली गेली आहे.

कॅल्शियमचे रक्तात शोषण होण्यासाठी जीवनसत्व ‘ड’ ची गरज असते. हा क्षार आम्लामध्ये विरघळतो त्यामुळे आम्लिक PH मध्ये त्याचे शोषण चांगले होते. कॅल्शियमचा साठा हा आपल्या आहारातील सेवनावर आणि त्याचे लहान आतडयामध्ये योग्य शोषण होण्यावर अवलंबून असते. त्याचप्रमाणे शरीराबाहेर किती प्रमाणात टाकले जाते ह्यावर तितकेच अवलंबून आहे. प्रथिनांचा आभाव असलेला आहार, अतिमेदयुक्त आहार किंवा आहारात जास्त प्रमाणात तंतुमय घटक (fiber) असल्यास कॅल्शियमचे शोषण कमी होते. तसेच आहारात जास्त प्रमाणात मीठ, मांसाहारी पदार्थ असल्यास त्याचा शोषणावर वाईट परीणाम होतो. स्त्रियांमध्ये मेनोपॉझमध्ये जे हार्मोनल बदल होतात त्याचा हि परीणाम शोषणावर होतो. ज्यांना थायरॉईडचे व किडनीचे विकार आहेत त्यांच्या मध्ये कॅल्शियमची पातळी कमी असते.

सेवन केलेल्या कॅल्शियम पैकी फक्त 20 टक्के इतकेच रक्तात शोषले जाते. सर्वात जास्त म्हणजे 30 टक्के इतके शोषण दूधातील कॅल्शियमचे होते. धान्ये आणि डाळी हे आपले मुख्य अन्न आहे. पण त्यातील फायटेट्स (phytate) मुळे शोषण कमी होते. म्हणून भिजवणे (soaking), मोड आणणे (sprouting) आणि आंबवणे (fermenting) ह्या क्रियांनी कॅल्शियम व इतर क्षारांचे शोषण वाढवू शकतो.

कॅल्शियमच्या अभावाने रक्तदाब वाढण्याचा धोका वाढतो. ह्याशिवाय हाडांची कमजोरी, स्नायूंची दुखणे, रक्त क्रियेत अडथळा असे अनेक विकार उद्भवतात. स्त्रियांमध्ये ऑस्टिओपोरॅसिस ह्याचा प्रादुर्भाव खूप प्रमाणात आढळतो. ह्याशिवाय त्वचेचा पोत बिघडतो, नखे ठिसूळ होतात, केस रखरखीत होतात अशी अनेक लक्षणे दिसून येतात.

आहारतून कॅल्शियम मिळवण्यासाठी त्याचे स्रोत खालील तक्त्यात दिले आहेत.

निरनिराळ्या पदार्थांमधील कॅल्शियमचे प्रमाण (दर 100 ग्रॅम)

0002.jpg

वरील माहितीवरून आपल्या हे लक्षात येईल की,

  • नाचणीचे सेवन केल्याने कॅल्शियम जास्त मिळवता येईल. ह्यात नाचणीची खीर, भाकरी, उकड किंवा लाडू असे अनेक प्रकार उपलब्ध होतील. तसेच राजगिरा पण उत्तम स्रोत आहे. राजगिर्‍याच्या पिठाची भाकरी किंवा दुधाबरोबर लाहया किंवा लाडू असे विविधपणे सेवन करू शकतो.

  • डाळींपेक्षा कडधान्यांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक आहे. विशेषत: गडद, चॉकलेटी किंवा काळ्या रंगाच्या कडधान्यांमध्ये जास्त आहे म्हणून मटकी, राजमा, कुळीथ, चवळी वगैरे कडधान्यांचा वापर जास्त करावा.

अर्थातच रात्री भिजवणे, मोड आणणे हे केल्यास त्याची अॅव्हेलेबिलिटी अधिकच वाढते.

  • पालेभाजी समुहामध्ये माठ, चवळई, मेथी, शेवगा पाने, हरभरा पाने किंवा मुळा, बीट, नवलकोल वगैरेंची पाने ह्यांच्या भाज्या करू शकतो.

  • फळांच्या गटात मोसंबी, लिंबू संत्रे, सुके अंजिर हे उत्तम स्त्रोत असून त्यांचा आहारात समावेश करावा.

  • पालेभाज्यांचे सूप, सुकी भाजी, पचडी किंवा पराठे अथवा थालीपीठात मिसळून असे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. अशा पराठ्यांवर किंवा थालीपीठावर थोडे तीळ पसरले तर सोनेपे सुहागा.

  • तेलबियांच्या समूहात कारळे, तिळामध्ये तसेच सुके खोबरे ह्यात कॅल्शियम जास्त असल्याने त्यांचा चटण्यांमध्ये वापर करावा. कडीपत्याची चटणी सुदधा भरपूर कॅल्शियम देते. हिरव्या चटण्यांमध्ये कोथिंबीरीचा वापर भरपूर करा व लिंबू पिळा त्यामुळे कॅल्शियम जास्त उपलब्ध होईल.

  • हळीवात असलेले कॅल्शियम लाडू करून मिळवता येईल.

  • धणे, जीरेची पूड अनेक भाज्यांमध्ये वापरता येईल किंवा दालचिनीची पावडर चहामध्ये वापरा.

  • ह्या व्यतिरीक्त बडीशेप, ओवा, आले, सुंठ, तुळस, गवती चहा तसेच भोपळ्याच्या बियांमध्ये देखील भरपूर कॅल्शियम असून त्याचा वापर कोणकोणत्या पदार्थांत करता येईल हयाचा विचार करावा.

रो. शोभा राव 

हस्त सामुद्रिक शास्त्र 

ऍन गिरीजाने मला पुश मध्ये लिहिण्यास सांगितले .ज्योतिषावर मी अनेक वेळा लिहिले आहे म्हणून मी यावर्षी हस्तमुद्रीक या विषयावर क्रमशः लिहिणार आहे .आपल्या तळ हातावरच्या रेषा आपल्याला अनेक गोष्टी सांगतात, तर हातातचा अभ्यास करताना तळहाताचे दोन भाग केले आहेत.

 

१.तळहातावरील रेषा ,चिन्हे (chirosophy) उंचवटे.

२. हाताचा आकार, बोटे ,अंगठा,रंग ठेवण इत्यादी (Chironomy).

 

पत्रिकेत जसे ग्रहांची माहिती आवश्यक असते तसेच हाताच्या उंचवत्यांना सुद्धा ग्रहांचे उंचवटे दिलेले आहेत.हाताचे निरीक्षण करताना सुरुवातीला हाताचा ठळकपणा अभ्यासता येतो. आपल्याकडे खरं तर जगात सर्वच ठिकाणी हस्तांदोलन करण्याची पद्धत आहे. समोरची व्यक्ती ज्या प्रकारे हात मिळवते त्यावरून तिचा स्वभाव लक्षात येतो.

 

१.हात जास्त वेळ हातात ठेवला तर आपल्याबद्दल आस्था प्रेम आहे.

२.दोन्ही हात धरून हातात घेतले तर आपल्या आधाराची गरज आहे.

३.आपण होऊन हात पुढे केला हात मिळवण्यासाठी तर खूप आनंद झाला आहे असे समजावे.

४.नुसता स्पर्श करून लगेच हात काढून घेतला तर त्याला आपल्याबद्दल फारशी आस्था नाही त्याच्या भानगडीत फारसे पडू नये.

५.हात जोरात दाबला तर शक्तीचा गर्व आहे हे समजावे.

६.ओलसर हात पटकन मागे घेतला तर ती व्यक्ती दडपणाखाली आहे, घाबरत आहे.

७. समोरच्या व्यक्तीचा हात कडक असेल तर स्वभाव मोकळा उमदाअसतो.  हात असेल तर ती व्यक्ती सहसा बदलणारी नसते.


तळहात कसा असावा-- तळहाताचा रंग गुलाबी असावा, मोहक असावा तो पांढरट असेल तर ती व्यक्ती अशक्त असते रक्ताभिसरण चांगले नसते खूप लाल हात असेल तर तब्येत चांगली रक्ताभिसरण चांगले असते.
 

हातांच्या रेषांवरून खूप गोष्टी सांगता येतात. अनेक लोकांना जन्मतारीख, ठिकाण काही माहित नसते अशा वेळेस हातावरील रेषांचा आधार घ्यावा लागतो. ठळक महत्त्वाच्या रेषा 14 व्या वर्षानंतर काय होतात. पण दुय्यम रेषा दर सात वर्षांनी बदलतात. अनेक रेषा नव्याने उदयाला येतात. आपल्या दोन्ही हातांवरील रेषा तितक्याच महत्वाच्या आहेत. त्या संबंधी पुढील लेखात नक्की वाचा.

रो. अशोक गाडगीळ 

fig 1.jpg

कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी

अध्ययन, अध्यापन, पेंटिंग, स्पोर्ट्स, गायन, स्वयंपाक यांच्यात तरबेज असणारी एन शिल्पा नाईक बागकामात सुद्धा तशीच तरबेज आहे. सेंद्रिय (ऑरगॅनिक) पद्ध्तीने आपल्याच सदनिकेच्या गच्चीवर ती चक्क शेती करते. विविध प्रकारच्या फळभाज्या, पालेभाज्या, फुले व औषधी वनस्पती यांची घरची गरज भागण्याइतकी लागवड शिल्पा करते. इतकेच नव्हे तर अशी घरगुती शेती कशी करावी याबाबत इतरांना ती मार्गदर्शनही करते. अनेक वर्तमानपत्रात व दूरदर्शन चॅनेलवर शिल्पाच्या मुलाखती कायम येत असतात.

घरच्या बागकामाबाबत ती आपल्यालाही काही कानमंत्र देणार आहे. पाहू या काय करते ती...

ऍन. शिल्पा नाईक 

bottom of page