top of page

February 2022 Issue:
Peace and conflict
resolution month

WhatsApp Image 2021-06-11 at 11.36.08 AM.jpeg

Message from DG Pankaj Shah

Dear President Shobha, Secretary Ajay, and all members of the Rotary Club of Pune-Shivajinagar,

 

It is my great pleasure to address you through special bulletin of your club.
रोटरी क्लब शिवाजीनगर म्हंटले की सर्वात पहिले मनात येते ते म्हणजे रोटरी एकांकिका स्पर्धा! सातत्य, गुणात्मक वाढ आणि कोव्हिडच्या काळातही स्पर्धक क्लबना आश्वस्त करणे व योग्य नियम पाळून स्पर्धा आयोजित करणे हे खरोखर कौतुकास्पद आहे. 


Conducting cultural competition is obviously not a measurement of any club’s performance as a service organization. However, the Rotary Club of Pune-Shivajinagar has reached great heights in all the avenues of Rotary – be it membership growth including lady members and their contribution in the Rotary activities, Foundation Giving, various Service Projects including Global Grant Projects.


It's the 36th year of your club which is 3 times more than my club’s age.  But it’s not just the age of the club but the impactful work done by your club in society and in our District which is important.
R C Pune-Shivajinagar has hosted important district events, sponsored & nurtured Rotaract and interact clubs, given rotary leaders at the district level including two District Governors. The work done by the Rotarians of R C Pune-Shivajinagar is recognized at the RI level including your serving President Dr. Shobha who had a special meeting with serving RI President Shekhar Mehta. It’s worthy to note that she had received an award from RI in 2013-14 when she was Ann and not a Rotarian. Many Rotarians from R C Pune-Shivajinagar have received RI awards. Needless to mention, my DG and serving vice-Governor Dr. Deepak Shikarpur is assigned some responsibility at the RI level for many years.


I wish all the members of R C Pune-Shivajinagar ‘All the Best’ for their dreams and strategic plans. I wish that the Rotarians of the new clubs take inspiration from the Rotarians of R C Pune-Shivajinagar.

मनोगत


वर्षातले सात महिने संपले आणि मागे वळून पाहताना आनंद होतोय. कारण ठरल्याप्रमाणे प्रोजेक्ट होत आहेत आणि प्रत्येक एवेन्यू डायरेक्टर मनापासून काम करत आहे. खऱ्या अर्थाने Serve to change lives हे या वर्षीच्या थीम प्रमाणे काम करण्याचा प्रयत्न करत चालू आहे. म्हणूनच 'जयपूर फूट' सारखा प्रोजेक्ट भावला आणि सर्वांनी भरभरून त्याला प्रतिसाद पण दिला. याच धर्तीवर मी Global Grant प्रोजेक्टची आखणी केली. मागच्या मार्च/एप्रिल पासून आधी इंटरनॅशनल पार्टनर क्लब शोधायचे प्रयत्न सुरू केले. त्याला शेवटी होकार यायला सहा ते सात महिन्यांचा कालावधी गेला. नोव्हेंबरमध्ये तो मिळाला. त्यानंतर मात्र पीपी नितिनने जोरात काम सुरू करून सर्व कोटेशन्स मागवली. डिसेंबर अखेरीस तो अपलोड सुद्धा झाला. कमी वजनाचे बाळांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात बेबी वॉर्मर व त्यानंतर प्रत्येक आईला बेबी स्लीपिंग बॅग देणे हे त्यात करणार  आहोत व 'आशा वर्कर्स' ना बाळाच्या आहाराबद्दल ट्रेनिंग देणार आहोत. जवळजवळ तीन हजार बाळांना याचा फायदा मिळेल आणि त्यांचे जगणे आरोग्यदायी होईल. या प्रोजेक्टसाठी पुन्हा एकदा सर्वांना मनापासून मदतीची विनंती करते.


नेहमीच्या प्रोजेक्टमध्ये सुद्धा काहीतरी थोडं वेगळं करता येईल का हा प्रयत्न पण चालूच आहे. आत्तापर्यंत दिवाळी पार्टी, पिकनिक, एकांकिका, संयुक्त दाणी स्पर्धा हे मोठे इव्हेंट्स दिमाखात पार पडले. श्रीकांत भावे यांच्या पुढाकाराने पाच पास्ट प्रेसिडेंटनी अरेंज केलेली 'शाम-ए-गझल' हा कार्यक्रम तर अविस्मरणीय झाला. आता पुन्हा थोडे करोनाचे सावट आल्यामुळे आपल्या कामाला थोडा ब्रेक लागला आहे. पण आपण पुन्हा लवकरच नॉर्मलसिकडे जाऊ यात शंका नाही. आता सात तारखेला डी जी व्हिजिट आहे ती छानच पार पडेल यात शंका नाही. त्यानंतर मात्र सर्वांच्या आवडीचे 'क्लब डे' व 'बावर्ची नाईट' हे येऊ घातले आहेतच. त्यामुळे 'पिक्चर अभी बाकी है!' असे म्हणावे लागेल. या सर्व कामात तुम्हा सर्वांची होणारी मदत खूपच मोलाची आहे हे निर्विवाद आहे. आपले हे रोटरी वर्ष आनंदाचे जाईल याची पूर्ण काळजी मी आणि सेक्रेटरी अजय घेत आहोत.

रो. शोभा राव

साप्ताहिक कार्यक्रम

३ जानेवारी - 'संयुक्ता दाणी पुरस्कार'

तीन जानेवारीच्या सोमवारी आपल्या क्‍लबचा वार्षिक सोहळा 'संयुक्ता दाणी पुरस्कार' हा कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडला.


सुरूवातीला 'दीपश्री साठे' व 'हर्षद खोंडे' यांना रोटरीची यथोचित दीक्षा प्रदान केली गेली. त्यानंतर सीमा व शिल्पाने सूत्रे हातात घेतली. यावर्षी दोन देशातून, पंचवीस शहरांमधून ,पंचावन्न शाळांमधून या स्पर्धेला प्रतिसाद मिळाला. एकूण १६५ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यातून शिल्पा, सीमा व नेहा यांनी पहिल्या फेरीचे परीक्षण करून ५६ विद्यार्थी निवडले.


'सूर नवा ध्यास नवा' फेम 'रश्मी मोघे' यांनी त्यानंतर सहा रौप्यपदक विजेते व सहा प्रशस्तीपत्र विजेते असे निवडले. कार्यक्रमाची सुरुवात संयुक्ता ताईंच्या सुरेल गाण्याने झाली.                                                                    

 

चौथी व पाचवीच्या गटात रौप्यपदक
१.  नीता चाफेकर
२. आरोही घाटपांडे
३. अवनी भाले

यांनी पटकावले; तर                
 

प्रशस्तीपत्रक

१. ग्रेटा देशपांडे
२. अर्णव कुकडे
३. स्वरा करंदीकर

यांना मिळाले.

सहावी ते सातवीच्या गटात-
१. निनाद गोखले 
२. तनय नाझीरकर
३. सानवी देशपांडे

यांना रौप्यपदक मिळाले, तर


१. विदेव गाणी
२. ऋत्विज कुलकर्णी
३. मुग्धा मुळीक

यांना प्रशस्तीपत्रके मिळाली.

सर्वच मुलांची तयारी व सादरीकरण अप्रतिम होते आणि ही मुलं गाण्याबरोबरच वाद्य ,नृत्य ,कराटे असे इतरही शिकत आहेत .शेवटी रश्मी मोघे यांनी मनोगत व्यक्त केलं व त्यांचं गाणं ऐकण्याची पर्वणी लाभली. नेहा पाठक ने आभार मानले. गेली सोळा वर्ष सुरू असलेली ही स्पर्धा आता नव्या उंचीवर पोचली आहे. आणि गेल्या दोन वर्षांत ऑनलाइन स्पर्धा भरवण्यामध्ये नितीन नाईक आणि संजीव चौधरी यांचे मोठे सहकार्य लाभत आहे. विनूभाऊ व शोभाताई यांच्या हस्ते बक्षीसं दिली गेली.
                                       

रो. दीपश्री साठे

१७ जानेवारी - डी. बी.  देवधर अवॉर्ड्स

१७ तारखेला आपल्या क्लब मध्ये डी. बी.  देवधर अवॉर्ड्सचा कार्यक्रम झाला.


डॉक्टर राव  यांनी देवधर अवॉर्ड्स ची थोड्क्यात माहिती दिली. देवधर कुटुंबाने ह्या अवॉर्ड्स साठी देणगी दिली होती. १९९१ पासून आपण हा उपक्रम राबवत आहोत, एका नवोदित उभरत्या क्रिकेटियरला आपण हा अवॉर्ड देतो. आपल्याच क्लबमधल्या क्रिकेट खेळणाऱ्या आणि  क्रिकेट जगणाऱ्या नवीन रोटेरिअन प्रदीप गोडबोले ह्यांनी ही मुलाखत घेतली. सुरवातीला ईश्वरीने गेल्या सहा महिन्यात केलेल्या फलंदाजीचे व्हिडीओ बघायला मिळाले. हा खरंच एकदम छान अनुभव होता, आपण जिला अवॉर्ड देत आहोत तिची धडाकेबाज फलंदाजी त्याच कार्यक्रमात बघायला मिळाली. खूप खेळीमेळीच्या वातावरणात ही मुलाखत पार पडली. तिचे प्रशिक्षक मंगेश शिरसाट, भावना गवळी हे दोघेही मिटिंगला आले होते, त्यांना आणि ईश्वरीच्या आई, बाबांना पण प्रदीपनी प्रश्न विचारून बोलतं केलं.  अवॉर्ड तर खरं म्हणजे एकाच व्यक्तीला मिळतं पण त्यामागे किती लोकांचे हात असतात, ते खूप छान ऐकायला आणि बघायला मिळालं. कार्यक्रम ऑनलाईन  करण्याचा एक महत्वाचा फायदा म्हणजे ईश्वरीचे मामा, आत्या, आजी, आजोबा आणि इतर नातेवाईकांना हा कार्यक्रम घरबसल्या अनुभवता आला. रोटेरियन संदीप तपस्वीने मोजक्या शब्दात आभार मानले. 


ह्या कार्यक्रमाची पडद्यामागची सगळी जबाबदारी रो. माधुरी गोखले आणि विजय यांनी उत्तम प्रकारे पार पाडली.

 

ॲन वैशाली तपस्वी

२७ जानेवारी - A G Visit

३१ जानेवारी - डॉ. मृणाल नेर्लेकर – निरूपण

कीर्तन म्हणजे मराठी माणसांच्या मर्मबंधातली ठेव. पूर्वी मनोरंजनाची इतकी उदंड साधने नव्हती तेव्हा मनोरंजन, प्रबोधन, लोकांना एकत्र येण्याचे निमित्त असे अनेक उद्देश कीर्तनाच्या माध्यमातून साध्य होत असत. तेव्हा इतकी लोकप्रियता कीर्तनाला आता नसेल कदाचित, पण आपल्या हृदयातला एक कोपरा कीर्तनासाठी नक्कीच राखीव आहे.

आपल्या क्लबची भावी प्रेसिडेंट डॉ मृणाल नेर्लेकर हिने ३१ जानेवारीच्या कार्यक्रमात कीर्तनाची झलक दाखवून तो कोपरा उजळून टाकला.

आधी नारदीय कीर्तनाची थोडी माहिती देऊन मग परंपरेनुसार ईश्वर वंदन, गुरु वंदन करून जगद्गुरू तुकोबारायांचा अभंग तिने निरुपणाला घेतला.

 

जे का रंजले गांजले | त्यांसी म्हणे जो आपुले ||

तोचि साधू ओळखावा | देव तेथेचि जाणावा ||

मृदू सबाह्य नवनीत | तैसे सज्जनांचे चित्त ||

ज्यासी आपंगिता नाही | धरी त्यासी जो हृदयासी ||

दया करणे जे पुत्रासी | तेचि दासा आणि दासी ||

तुका म्हणे सांगू किती | त्या चि भगवंताच्या मूर्ती ||

 

हा अभंग बहुधा सर्वांना पाठ असतो, पं भीमसेनजींच्या प्रासादिक स्वरात अनेक वेळा ऐकलेला असतो. तसे सगळे शब्दही सोपे. साधारण अर्थ माहिती असलेले. पण एखादा अभ्यासक जेव्हा आपल्याला माहिती असलेलीच गोष्ट टप्प्याटप्प्याने उलगडून सांगतो, तेव्हा ते शब्द, त्यांचा वाच्यार्थ आणि गूढार्थ मनाला भिडत जातो. मृणालच्या निरुपणातून सगळ्यांनाच याची प्रचीती आली असेल- अगदी पहिल्या ‘जे’ या शब्दापासूनच. जात-पात, लिंग, धर्म इत्यादी भेदभावांच्या पलीकडे जाऊन वैश्विक जाणीव त्या ‘ जे’ शब्दातून व्यक्त होते. रंजले-गांजले म्हणजे केवळ गरीब, वंचित नाहीत, तर प्रत्येकच माणसाला आयुष्यात दुःख, चिंता, गांजलेपण कमी अधिक प्रमाणात भोगावेच लागते. त्या सगळ्यांचा अंतर्भाव त्यात आहे. अशांना जो – केवळ थोडीशी मदत करत नाही- तर आपले म्हणतो, तोच खरा साधू – त्याच्या ठायीच देव बघावा. नवनीत – लोणी- मंथन केल्यावरच येते, तसे ज्ञान, विचारांचे मंथन करून सत्वगुणाचे लोणी म्हणजे सज्जनांचे चित्त. ज्याला ज्याला म्हणून कोणी सांभाळणारे नाही, त्याला हृदयाशी धरणारा, आपल्या पुत्राला ज्या सहजतेने आपण क्षमा करू, त्याचे अपराध पोटात घालू, त्याच्या कल्याणासाठी झटू, तितक्याच तळमळीने जो आपले नोकर-चाकर सर्वांच्या भल्यासाठी प्रयत्न करतो, तो केवळ साधूच नव्हे, तर साक्षात भगवंताची मूर्तीच जाणा असे तुकोबा सांगतात.

मृणालने अत्यंत रसाळपणे अभंगातील सर्व शब्दांच्या अर्थांच्या छटा उकलून दाखवल्या. त्यासाठी तिने नरसी मेहता, संत नामदेव यांच्या अभंगांचे दृष्टांत दिले. संतांच्या शेकडो वर्षांपूर्वीच्या रचना आजही लागू पडतात, अबाधित आहेत म्हणून त्यांना ‘ अभंग’ असे म्हटले जाते.

निर्गुण निराकार परमतत्त्व ते देवतांच्या सगुण मूर्ती हा अनुक्रम आणि त्यामागची विचारधारा तिने स्पष्ट केली.

श्रोत्यांपैकी प्रत्येकालाच – आज काहीतरी नवीन कळले-असे समाधान नक्कीच मिळाले असेल.

डॉ. रावांनी मृणालची यथोचित ओळख करून दिली. आनंद नवाथे यांनी सर्वच श्रोत्यांच्या भावना गुंफून समर्पक शब्दांत आभार मानले.

रो. मंजिरी धामणकर

सामाजिक प्रकल्प

Thanks to Alka and Nitin and Anjali Ravetkar for 70 jackets donated to Kinara old age home.

४ जानेवारीला एकलव्यला धान्य पोहोचले

WhatsApp Image 2022-01-28 at 5.21.30 PM.jpeg

३ जानेवारीला सार्थकला धान्य पोहोचले

WhatsApp Image 2022-01-28 at 5.20.25 PM.jpeg

आरोग्यदर्पण

१३ जानेवारीला ग्रामीण पोलीस मुख्यालयात मेडिकल कमिटीचा प्रोजेक्ट पार पडला.
डॉ. स्मिता जोग, डॉक्टर राव, प्रेसिडेंट डॉ. शोभा राव व डॉ. धामणकर असे चौघे जण उपस्थित होते . तेथील पोलिसांना रोटरी चे मास्क आपण वाटले आणि त्यांना सॅनिटायझरचे पाच लिटरचे पाच कॅन्स आपण दिले. या प्रोजेक्टसाठी डी वाय एस पी देशमुख आणि तेथील मेडिकल ऑफिसर पाटील मॅडम यांचे सहाय्य झाले.

रो. डॉ. स्मिता जोग

Oxygen Concentrators to Jehangir Hospital

 

On the 7th of January, the handing over ceremony of oxygen concentrators to Jehangir hospital took place. Our club has donated 10 oxygen concentrators to the hospital. These  Oxygen concentrators will be useful to treat COVID   patients.   We could do this because of the donation that we received from Rotarian Nitin Naik and  Dr. Shilpa Naik.


.president Dr. Shobha Rao, Dr. Rao, Nitin, Shilpa, Ajay and myself attended the project. In the begining we had an informal meeting with the CEO, in his cabin.


He briefed us about the institute. He told that the hospital is run by a charitable trust. It provides free treatment to children who have juvenile diabetes and come from low economic status. He added that they have come up with a pediatric cardiology ward wherein cardiac surgeries are done free of cost for deserving children. He showed us the OPD complex and wellness center where preventive health checkup is done.A short and neat handing over ceremony was organised in the auditorium.We all were felicitated. Shobhatai, and Nitinji  expressed their thoughts.This was followed by sumptuous fellowship.
The striking feature was the warm hospitality that they offered. Over all it was a pleasent experience.

 

Rtn. Dr. Smita Jog

Projects in February

1) Food grain supply to Ekalawya Nyas
2) Food grain supply to Sarthak
3) 7th Feb DG visit at Hotel President
4) Peace award function on 21st February 
5) 28th February Best Scientist Award
6) PHC visits for basic data and inclusion in the GG project

Programs in February

7th Feb - DG Visit at Hotel President 

14th Feb - Dr Anirudhdha Deshpande- नाडी तरंगिणी

21st Feb - Peace Awards

28th Feb - Best Scientist Award

नवीन सदस्यांचे स्वागत

रो. हर्षद खोंडे हा आपल्या क्लबला एक तरुण सभासद लाभला आहे. तो टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करतो. तो B.Com, CCNA झाला आहे. दीपक आणि गौरी शिकारपूर यांच्या संपर्कातून आलेला आहे. त्याची आई (खोंडे मॅडम) या जिल्हा माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत, अनेक वर्ष या शाळेमध्ये आपला क्लब कार्यरत आहे. त्यामुळे त्यांच्याशी आपला खूप चांगला संबंध आहे. हर्षद ची पत्नी अबोली हि MSW झालेली आहे. त्यांना स्वयम् हा मुलगा आहे. तो पहिलीत शिकत आहे.

Harshad Khonde_Page_1_Image_0001.jpg
Harshad Khonde_Page_2_Image_0001.jpg

दन्तवैद्य डॉ. दीपश्री साठे हिचा वेगळा परिचय करून द्यायची गरज नाही. ती आपल्या क्लबची फर्स्ट लेडी आणि रोटेरिअन सुद्धा राहिलेली आहे.

Sathe Deepa.jpg

खबर - बखर

1. Happy to share that Global Grant no 2234500 - Saving lives of Low Birth Weight (LBW) babies in Rural areas of Pune District has been authorized by all partner club presidents, respective DGs, and DRFCs today and has been submitted to Rotary Foundation for their review. The total project cost is $40450. There are 2 partner clubs from Munich - Germany as our international partners for the GG. RCPS will have to raise funds of $ 14,800 for this project. A lot of hard work has been put into this grant by Pres Shobhatai and  PP Nitin Abhyankar. We have now started with the collection of contributions towards RCPS shares.

PP Rtn. Ujwal Marathe

2. We signed an MOU with eZest for our First CSR grant.
TRF Trustee Gulam Vahanvaty & other Dignitaries from the RI Delhi office attended virtually the MOU signing function. This initiative was due to the efforts and connection of PDG Deepak

This year our club will be doing a CSR India grant. eZest Solutions, an IT solutions company has committed a CSR donation of Rs 16 Lakhs.  Our club has committed an additional cash contribution of Rs 2.48 Lakhs and district 3131 is contributing additional Rs 2.4 Lakhs. Thus the CSR grant project value becomes Rs 20 Lakhs and a 5% admin fee of Rs 0.88 Lakhs is borne by our club. Lighthouse communities will be our execution partner for this CSR grant. Under this grant project, we propose to digitally empower 500 adults from weaker sections of society through classroom and hands-on training using digital technologies. The donation of Rs 16 Lakhs by eZest is a reality due to the sustained efforts of PDG Deepak and he deserves our appreciation. PDG Deepak has also donated US $ 1500 for this CSR project.  


The MOU signing ceremony held at eZest office was attended by President Shobhatai, Dr. Rao, Sachin Joglekar, PDG Deepak, and myself from our club's side. DG Pankaj Shah blessed the project by attending the ceremony and the icing on the cake was blessing and guidance by TRF trustee Gulam Vahanvaty. RI Delhi team represented by Sanjay Parmar, Bhawana Verma, and Reeti Mondal also attended the MOUs signing ceremony. eZest CEO Devendra Deshmukh signed the MOU and Lighthouse CEO Ruchi Mathur also participated. 


The cash contribution of Rs 2.48 Lakhs by our club is due to the generous donation of our club members- Vinoobhau Dani,  Chandukaka Godse, PN Dr. Smita Jog, President Dr. Shobha Rao, Ravikiran Desai, Ujwal Marathe, Deepashree Sathe, Bharati Dole, Vikrant Karandikar, PDG Deepak and me. We have raised a total of US $ 3300 for the CSR project. Thank you, all donors, for your wholehearted support.


I also thank President Dr. Shobha Rao for entrusting the responsibility of the CSR Grant Coordinator to me. This grant will keep us busy for the next 12 months and I will be happy to be assisted by our club members who wish to work on this project.

Rtn. Sharad Dole

WhatsApp Image 2022-01-31 at 6.16.34 PM.jpeg

4. District Public Image Award for January to RCP Shivajinagar

Pros: Started using Facebook page to promote their projects.

Cons: Need to use proper hashtags & put more projects on social media platforms

Congratulations RCP Shivajinagar

5. On 15 th Jan our Ekankika Spardha and E waste collection news was included in GML.

6. In the month of jan RCPS was on the 4th position in district

उपलब्धी.....अभिनंदन

1. Rtn. Pradeep Godbole celebrated his 50th birthday of cricketing passion

2. 43rd book written by Deepak "Mobile Guide 5G" was released. Publisher Utkarsha Prakashan at the hands of Dr. Anand Deshpande Founder CMD Persistent systems in presence of Madhuri Sahastrabudhe , Milind Joshi , Laxmikant Deshmukh , Pramod Adkar and Shyam Bhurke

3. मॉडर्न कला, विज्ञान व वाणिज्य महाविदयालय शिवाजीनगर, Pune 5 येथिल   एन सी सी छात्र, कॅडेट कॅप्टन निकिता खोत हिची, २६ जानेवारी २०२२ प्रजासत्ताक दिन संचलन शिबिरासाठी निवड झाली. सहा महिने अथक प्रशिक्षण प्राप्त केल्या नंतर, शेवटी दिल्ली येथे राजपथावरील संचलन कॅम्प मध्ये निवड केली जाते. या वर्षीचा उत्कृष्ट एन सी सी Directorate म्हणून, महाराष्ट्र एन सी सी ला सन्मान मिळाला. त्या साठीची ट्रॉफी मा. पंतप्रधान, श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कॅडेट कॅप्टन निकिता खोत हिला स्वीकारण्याचा सम्मान मिळाला. निकिता मॉडर्न महाविद्यालयामध्ये तृतीय वर्ष बी बी ए या वर्गात शिकत असून महाविद्यालयच्या Navy एन.सी.सी.ची कॅडेट आहे, तसेच ती मॉडर्न रोट्रॅक्ट क्लब ची सभासद आहे.
मॉडर्न महाविद्यालयाचा दुसरा विद्यार्थी सिनिअर अंडर ऑफिसर गितेश धिंगर हा मॉडर्न महाविद्यालयाचा आर्मी एन. सी.सी. चा कॅडेट आहे. दिल्ली येथे प्रजासत्ताक दिना नंतर आयोजित PM Rally या समारंभसाठी मा. पंतप्रधान यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात येतो.   त्याचा ऑल इंडिया Contingent Commander म्हणून गितेश धिंगर याने contingent कमांड केली. गितेश ही मॉडर्न रोट्रॅक्टचा सभासद आहे. तो मॉडर्न महाविद्यालय मधे द्वितीय वर्ष कला या वर्गात शिकत आहे.

अशोक कांबळे

4. BSIM - PP Vrinda Walimbe gave a one hour training programme on' Psychological Emotional Aspects Of Post Partum Period' for the training of lactation counsellors of psychological programs for women.

5. PDG Deepak Shikarpur addressed Rotarians of RCP Lokmanyanagar on "How to raise Funds and undertake Large projects".

WhatsApp Image 2022-01-31 at 4.59.45 PM.jpeg

6. Rtn. Bharati Dole's article was published in Jan 2022 Sampada (a monthly magazine by Maratha Chamber of commerce) - Trademark: An incredible Marketing Tool

7. PP Gauri Shikarpur gave a session on Glimpses of Indian Culture in New Generation Virtual Srevice Exchange Programme Indonesia

8. Prabhat Tutari tune is now Trademarked: Damle Family holds rights to films as well as logo of Prabhat Films. Late V G Damle was the founding partner of Prabhat. The famous Tutari tune was not trademarked and secured. Damle's applied to the Trademark office to get it registered in 2014 & after a lot of clarifications, submissions the tune is now trademarked from 2021. 

10. Pratima Durugkar's article on ' हिमनद्यांच्या प्रदेशात ' was published in 'Punyanagari'

 

11. 'Prajakta Gadgil' daughter-in-law of Ashok and Anjali Gadgil got first prize amongst 44 singers inter rotary singing competition arranged by RCP Kothrud.

WhatsApp Image 2022-01-31 at 4.52.08 PM.jpeg

12. On 9th Jan Rtn.Nitin Abhyankar won consolation prize in Geet Gayan Spardha organised by Rotary Club Kothrud. Ann Shilpa also participated. 

13. Ann Seema and Rt CD acted in the Kheliya ad.

14. On 6th jan Lokmat Newspaper PDG Deepak's  article on recesssion proof career "Cyber Security"

WhatsApp Image 2022-01-31 at 4.11.16 PM.jpeg

15. On 7th Jan PDG Deepak shared his experiences with legendaries at Poona Club

17. ७ जानेवारीला रोटरी क्लब लोकमान्य नगर आणि रोटरी क्लब पुणे हिलसाइड मधे गौरी आणि तिच्या साथीदारांचा सतार वादनाचा कार्यक्रम झाला.

18. On 11 January PDG Deepak was invited as a speaker at Rotary Club of Daund College.

19. १ जानेवारीला पुणे प्राईड आयोजित RYLA मधे पी डी जी दीपक मुख्य अतिथी होते.

20. लोकमत मधे ' कोरोना मुळे एकत्र कुटंब' या विषयावर पी डी जी दीपकचा लेख आला होता

21. १५ जानेवारी रोजी रो. अनिल आणि रंजना दामले यांचा मुलगा अमोल आणि सून आर्या यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली       

Highlights of Minutes of BOD Meeting

DG Visit-President Hotel is booked for DG visit.
The first-hour session will be interaction with groups as below-
Strategic committee- 15 minutes
BOD- 40 minutes
Youth- 5 minutes with President of Interact & Rotaract.


The second part of the DG visit with all club Members will start at 7.30 pm and will be an open forum addressed by DG & the program will be in Hybrid mode followed by dinner.
 

The committee of PP Ujwal, PP Shekhar & PP Vrinda will be looking into matters of modifications of bylaws.
 

Forming a new Interact club at Muktangan English Medium School was approved.


Donation of books and Cupboard for students preparing for competitive exams in village recommended by Shelar Sir is approved for Rs. 13000.
 

Donation of the TV set for Metro station @ Ideal colony costing Rs. 100000.00 was approved. Rs.40000.00 can be made available from RCPS TRUST & an appeal will be made for a balance of 60000.00 to club members.


A committee consisting of President Dr. Shobha, Dr. Mrinal, Dr. Smita Jog, PP Shirish, Rtn Sanjeev will fix up the modalities, place & will put their budget for approval in the next BOD for the proposed Health Expo.


The Annets of the club are actively participating in our projects. The possibility to form a satellite club of Annets will be explored & appeal to Annets the members will be made.


The BOD approved the option of withdrawal from the Nomination election for those members who had completed 20 years in the club on the 1st July of that year. The necessary procedures will be taken for subsequent amendments in the bylaw.


As the District conference in Pune itself, there are no costs of travel or accommodation. The appeal is therefore made to register in large numbers.


Synergy Project with 2-3 partner clubs to have a workshop on Investment, insurance & will is proposed with the support of PP Ujwal, Rtn Pramod. The Board approved the same & requested Rtn Milind & PP Ujwal to work out the modalities.


Treasurer PP Shekhar sought approval for excess expenditure of district Ekankika expenses.

फेब्रुवारी​

औक्षवंत व्हा, सुखी व्हा !


३ - संजीव चौधरी
३ - विक्रांत करंदीकर
४ - डॉ. शोभा राव
५ - सचिन जोगळेकर
१२ - मुकुंदराव अभ्यंकर
२२ - रविकिरण देसाई
२४ - डॉ. स्मिता जोग

रेशीमगाठी वर्धापनाच्या हार्दिक शुभेच्छा !


५ - डॉ. सतीश आणि अंजली रावेतकर

५ - रेश्मा आणि कपिल कुलकर्णी
१५ - राहुल आणि कल्याणी पेंढारकर
१८ - विक्रांत आणि असलेशा करंदीकर
२१ - अच्युत आणि निरुपमा गोखले
२६ - डॉ. शुभांगी आणि प्रवीण वाळवेकर
२७ - डॉ. स्मिता आणि विलास जोग

बर्थडे फेलोशिप लीडर
  ऍन. शिल्पा नाईक

फेब्रुवारी सपोर्ट ग्रूप

 

लीडर - चंद्रशेखर यार्दी
गिरीजा यार्दी
प्रतिमा दुरूगकर 
प्रदीप दुरूगकर
श्याम अर्जुनवाडकर
राधिका अर्जुनवाडकर
शिरीष क्षीरसागर
शरद डोळे 
भरती डोळे 
रविकिरण देसाई 
ऋजुता देसाई 

शोक संदेश

प्रसिद्ध गायक मा. कृष्णराव यांच्या स्नुषा रो. मनोज यांच्या मातोश्री कुंदा फुलंब्रीकर (वय - ८४ वर्ष) यांचं वृद्धापकाळाने निधन झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो.   

डिस्ट्रिक्टच्या घडामोडी

District Peace Webinar was organized on 15th Jan.2022 from 6 PM to 8.30 PM. This bilingual webinar was the first of its kind organized by the Peacebuilding and Conflict Prevention Committee of Rotary District 3131 where the Rotary Club from Pune and semi-urban areas had joined hands together. Many times, the clubs in rural and semi-urban areas hesitate to participate in the synergy projects due to the language barrier.  The webinar aimed at bringing the Marathi speaking clubs in mainstream and convergence of fellowship, service, and positive peace among participating clubs.   RCPS was the Host Club and RC Bhigwan, RC Daund, RC Mahad, RC Rajgurunagar were the synergy clubs. DG Pankaj Shah was the Chief Guest for the webinar.  Rotaractors, Presidents, and members of various Rotary Clubs and non-members too attended the webinar.  Few participants outside India also participated in the webinar. Dr. Pradeep Wagh, Counsellor District Peace committee had taken initiative in organizing the webinar. Rtn. Dr. Bharati Dole, Chairperson, International Service and Peace of RCPS compered the webinar.

The webinar began with the start of the meeting as per Rotary protocol by RCPS President Dr. Shobha Rao. She also welcomed the DG and other participants and presented a brief review of RCPS projects. Peace and conflict resolution is one of the focus areas of Rotary. She pointed out that as compared to other focus areas less activities are carried out in this area and this webinar was the right step in that direction.

DG Pankaj Shah in his inaugural address applauded the passion of the District Peace Committee in carrying out various projects. He also congratulated and appreciated the efforts of the Host club and Synergy clubs in organizing the webinar. He gave a glimpse into the projects in the coming months. He assured the audience that the focus area of Peace will come in limelight soon. After the inaugural speech, various speakers presented their views on various aspects of Peace like activities of the District Peace team, Rotary peace Action Group, Emotional Journey of Peace, inner peace, Peace at Workplace, Sant Sahitya, and Peace   Water the instrument of Peace.

Dr Pradeep Wagh counsellor District Peace Committee elaborated upon the evolution of District Peace Committee, activities of Rotary for peace building and conflict prevention like Rotary National Peace Awards and Peace Fellowship, Global Grants, Enterprise Education series. He also explained in detail the topics covered in Peace Symposium of 2017, Peace Awards, Peace Walk etc to help various clubs to organise activities under Peace Avenue.

Dr. Mrinal Nerlekar, President Elect RCPS spoke on आराधना-- संत साहित्य आणि शांती. She took the audience in the spiritual world by explaining preaching of various saints in Maharashtra to lead a peaceful life. She reiterated importance of empathy, forgiveness and peace as advocated by various Saints.

Dr Vidya Bhate Co-Chair District Peace Avenue unfolded the journey of Emotions and relationship between body and mind, in her speech on Emotions-Release, Relax and Let go for Peace. She gave tips to identify our emotional patterns, symptoms of stress and how to reduce stress.

Smita Vikkhankar, Co-Director District Peace Avenue presented Rotary peace Action Group. She threw light on the composition and purpose of Action Group for Peace and specific efforts and projects for building peace. She gave an interesting example of how few clubs in Pune have established connection with clubs in Pakistan. She explained the process for a club to become a Peace Builder Club and appealed clubs to become Peace Builder club. She also briefed the audience about the Peace Fellowships.

Pravin Walvekar, member of International Service and Peace committee of RCPS and spouse of Rtn Dr. Shubhangi Walvekar touched a very important area of peace in his presentation on Peace at Workplace. He gave an insight into importance of work culture and role of employer and employee in maintaining peace at the workplace.

Satish Khade, Director WASH works very passionately in the area of water. His passion was reflected in his speech on Water as an Instrument of Peace. He explained various within the border and across the border water disputes and their serious effects like the emergence of ISIS and the India-China War and perils to health and wealth due to many domestic water disputes. He cautioned that if the water problem is not handled carefully world will be divided only into two parts -with water and without water. By 2030 there will be a huge migration in the world and within the next five hundred years, mankind will be extinct. Satish also spoke on the solutions to the problem and emphasized the principles of sustainable development and traditions of various religions underlining the importance of water.

This speech was followed by a Question-and-Answer session and feedback by Sanjay Khade President, RC Bhigwan which was one of the synergy clubs.

At the end Deva Ghorpade, Director Peace Committee, presented concluding remarks, future plans of the district peace Committee projects clubs can undertake in the peace area. He thanked DG for his support for the webinar, RCPS and synergy clubs, speakers, and all those associated with the webinar.

The webinar ended with Dr. Shobha Rao adjourning the meeting. The webinar was well received and insightful and motivating for clubs to undertake projects in peace areas.

Rtn. Dr. Bharati Dole

Chairperson, International Service, and Peace, RCPS

Rotary Information

Benefits being a Rotarian

1.      Leadership qualities

2.      Public Speaking Skills

3.      Good Contacts

4.      Camaraderie- Fellowship, Mutual Trust and Friendship

5.      Ability to address Crisis Management like current Pandemic

 

Earlier Rotary Membership was open only for Men.

From 1978, Rotary Membership was thrown open for Women also. The first club to Induct Women is the Rotary Club in California. Now there are 24% women Members in Rotary.

Lapel Pins: Always wear a Lapel Pin with Pride. It shows mutual support and Unity.

 

When we become Rotarian: Our obligations are

1.    Timely payment of Club Dues

2.   Good Attendance in the club meetings is Mandatory. Attend at least 50 % of meetings

        3      Good Participation in club activities and projects.

        4      Ability to spend over Rs.35, 000/- plus per year. (Club Dues, Contribution to Club Trust. Contribution in fundraising activity. Conferences, forums, club picnics etc.

 

        5.    Attend at least 60% of the actual club meeting time.

        6.    Willingness to accept club assignments.

Rtn. Yashwant Gokhale

Rotary International

Imagine Rotary the theme for 2022-2023 explained by RIPE Jennifer Jones.

"Imagine a world that deserves our best, where we get up each day knowing that we can make a difference."

The theme graphic was designed by an Australian indigenous artist to link with the Melbourne convention in 2023.

Circle - connections to one another

Dots around it - Our People
There are 7 Dots because of our Rotary’s 7 areas of focus

Circle + dots around it - Navigation star, our guiding light

Green solid line - digging stick (used when doing hard work);
for us it’s People of Action, represents the tools for getting things done

Colors: Purple, Green & White - 
Celebrate DEI- Diversity, Equity and Inclusion.

Freedom to express ourselves differently but still with a special connection.

Purple- Polio
Green- the Environment
White - Peace

Represents Empowerment and Newness and also the colours were utilised for the women's movement giving us the opportunity to grow our female membership.

WhatsApp Image 2022-01-28 at 6.07.27 PM.jpeg
WhatsApp Image 2022-01-28 at 6.05.39 PM.jpeg

January is Vocational Service Month. This is an opportunity to think about how you and your club and district engages fellow Rotary and Rotaract members through their professional skills or vocations, and how they bring Rotary’s ideals into their workplace. In bringing together people from diverse professions and backgrounds, Rotary recognizes the importance of all skills and occupations. In Rotary, your professional life and vocational service can work together. Members have a responsibility to represent their occupations within their club and to exemplify the ideals of Rotary in their workplace.  We are in Rotary due to our Profession. Any effort to enhance Vocational Skills , impart new knowledge and network with fellow professionals is very important. Here I find RMB (Rotary Means Business) as a Networking platform very relevant and value addition. In RID 3131 RMB is very active . RMB has many chapters in different locations .

In January let us explore what all we can undertake. Many countries in the world are in Lockdown or like situation. But good news is a lot can happen Virtually.

  1. Use your skills to serve a community. Start a project that leverages your area of expertise or support one that’s already being planned. With Online education model many Institutes are searching for professionals with Industry experience to impart practical knowledge. Can we mentor Interact Clubs and Institute based Rotaract with Professional theme based RYLA ?
     

  2. Share your expertise. Join a Rotary group related to your profession to share your knowledge. Your unique skills and professional experience can help increase the impact of projects around the world. 

    1. If you have technical expertise in one of Rotary’s six areas of focus or in project planning and implementation, If your expertise fits one of the 27 Rotary Action Groups, contact the group’s leaders to get involved. These international teams of Rotary members and friends lend their skills and experiences to help clubs design more sustainable and impactful service projects. 

    2. If you have professional skills in Rotary’s areas of focus or financial auditing, apply online to be considered for TRF’s Cadre of Technical Advisors. Use your expertise to advise Rotary members who are planning and working on Rotary Foundation grant projects. 
       

  3. Connect with others. Explore your profession with others by joining one of Rotary’s Fellowships. Find friends outside of your club to expand your international network, engage in common interests, and develop a more global perspective. There are many vocation-related fellowships such as the ones for Editors and Publishers, Educators, Executive Managers, Graphic Designers, Healthcare Professionals, Lawyers, Photographers, Police and Law Enforcement, Quilters and Fiber Artists, and more.  
     

  4. Help young professionals achieve their career goals. Mentor younger members of the Rotary family such as Rotaractors, Interactors, and Rotary Community Corps members and create opportunities for them to develop their professional and leadership skills.

PP. Rtn. Deepak Shikarpur

w0262_1s_Watercolor-Floral-Pattern-Wallpaper-for-Walls-Pastel-Flowers_Repeating-Pattern-Sa
Lalit Vibhag.png
Jog Smita.png

होममेकर्स आणि बरंच काही 

शांतिप्रिय स्मिताताई


ओळखीच्या दोन व्यक्ती अचानक भेटल्या की साधारणपणे संवाद होतो "काय म्हणताय? काय हालहवाल? 

ठीक आहे? तुम्ही काय म्हणताय?"

"आम्ही ठीकच!"

 आणि हा संवाद पुढे बराच वेळ चालू राहिला तर मात्र मग दोन्ही बाजूंकडून आप-आपल्या समस्या मांडल्या जाऊ लागतात. 

तसंही समस्या नसलेला माणूस भेटणे अशक्य! फक्त प्रत्येकाच्या त्या त्या वेळच्या समस्या वेगवेगळ्या. कोणाच्या आर्थिक, कोणाच्या कौटुंबिक, कोणाच्या शैक्षणिक तर कोणाच्या मानसिक/ भावनिक.... एक ना दोन!  समस्या, त्या त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वपरत्वे आणि स्थलकाल परिस्थिती नुसार बदलणाऱ्या असल्या तरी काही कार्यक्षेत्र अशी आहेत की जिथे समस्या उद्भवण्यास भरपूर वाव आहे. उदाहरणार्थ आपल्या डॉक्टर स्मिताताई यांचं कार्यक्षेत्र - त्या प्रसुतीशास्त्रतज्ञ आहेत. त्यांच्या कामात सदैव दोन जीवांचा प्रश्न एकमेकांत गुंतलेला. त्यामुळे समस्या उद्भवण्यास दुप्पट वाव! या दोन जीवांखेरीज त्यांच्या नातेवाईकांच्या मानसिक, आर्थिक आणि कौटुंबिक समस्यांनाही  स्मिता ताईंना तोंड द्यावं लागतं   सहाजिकच छोट्या-मोठ्या समस्या सोडवणं हे जणू त्यांचं नित्याचंच काम. 

नित्याचंच काम झालं तरी समस्या सोडवताना काही ना काही टेन्शन येतं त्याचं काय? सतत टेन्शन! हे कसं पेलायचं माणसानं? त्यावर स्मिताताई म्हणाल्या "समस्या आली की कोणालाही टेन्शन येणारच. पण या प्रश्नावर आपणच उत्तर काढायचं आहे आणि तेही त्वरित हे पक्कं ध्यानात ठेवलं की समस्येवर मनात विचारमंथन होणं आणि मार्ग काढणं ही प्रक्रिया सुलभ होत जाते. शिवाय अनुभव आणि परिस्थिती आपल्याला सदैव शिकवतच असते. त्यामुळे त्या त्या परिस्थितीचे परिणाम त्यांचे फायदे-तोटे हे सारं कळत असलं तरी हळूहळू ते आपल्याला  वळू  लागतं आणि समस्येवर उत्तर शोधलं जातं".  

तशा स्मिताताई लहानपणापासूनच शांत स्वभावाच्या! त्या सांगतात त्यांची आजी म्हणजे आईची आई खूप शांत, सोशिक, सहनशील पण विचारी होती. तिचा स्मिताताईंवर खूप प्रभाव होता. स्मिताताईंचे वडीलही खूप शांत होते. याचा परिणाम त्यांच्यावर होणं स्वाभाविक होतं. तशातच त्या चार भावंडात थोरल्या होत्या. सहाजिकच थोरल्याकडून समजूतदारपणाची अपेक्षा सदैव केली जात असतेच. शिवाय स्मिताताईंची आई तापट स्वभावाची होती आणि वडील शांत! त्यामुळे दोन्ही बाजू समजून घेण्याची सवय स्मिताईंना लहानपणापासूनच होती. पर्यायाने त्या नेहमी शांत राहत आणि सर्वांना समजून घेत.

स्मिताताईंचे वडील मूळ कर्नाटकातले होते. ते गलगली या गावचे. शेतकी खात्यात वरिष्ठ अधिकारी होते. त्यांच्या नेहमी बदल्या होत. त्यामुळे ताईंचं शालेय व महाविद्यालयीन शिक्षण निपाणी, बेंगलोर व नंतर पुण्यात बी जे मेडिकलला झालं. त्या पूर्वाश्रमीच्या पद्मा हब्बू. त्यांच्यासह सर्वच भावंडं लहानपणापासून खूप हुशार होती. त्यामुळे कोणत्याही परीक्षा किंवा स्पर्धेत ही भावंडं भाग घेत असली की इतर सर्वांना हीच मुलं जिंकणार किंवा हीच मुलं पहिले क्रमांक पटकावणार याची खात्री असे. स्मिताताई म्हणाल्या "वडिलांना वाचनाची खूप आवड होती, तसेच आई पण फार हुशार होती. विशेषत: गणितात तर ती फारच तरबेज होती. शिवाय परीक्षेतल्या यशाबाबत आईचा फार कटाक्ष असे. त्यामुळे ही सर्व भावंडं परीक्षेत पहिला नंबर पटकावावा याबाबत नेहमीच दक्ष असत. अर्थात अभ्यासाबरोबरच इतर वक्तृत्वासह विविध स्पर्धा, गॅदरिंग वगैरेतही ही भावंडं सदैव अग्रेसर असत. 

विविध गावातल्या वास्तव्यामुळे स्मिताताईंना लहानपणापासूनच कन्नड तसेच मराठी आणि इंग्रजी या भाषा उत्तम अवगत राहिल्या. शिवाय गर्ल गाईड, एनसीसीतल्या सहभागामुळे त्यांना छान एक्सपोजर मिळालं. यांच्याद्वारे होणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमात स्मिताताई नेहमी सहभागी असत. कोयना भूकंपग्रस्तांसाठी मदत गोळा करण्यापासून ते गावोगावी जाऊन पथनाट्याद्वारे सामाजिक प्रश्‍न मांडण्यापर्यंतच्या कामांचा त्यांना त्या वयात अनुभव मिळाला. पर्यायाने सामाजिक बांधिलकी त्यांच्या मनात रुजली गेली. समाजकार्याबाबत त्यांना आपुलकी वाटू लागली. 

स्मिताताई प्रथमपासूनच खूप हुशार होत्या. त्यामुळे शाळेत प्रवेश करतेवेळी त्यांना एकदम तिसरीत बसवण्यात आलं. त्यामुळे त्यांचे शिक्षण लवकर झालं आणि बी.जे.च्या प्रवेशाच्या वेळी त्यांचं वय गरजेपेक्षा कमी राहिलं. तेव्हा त्यांना बी.जे.ला प्रवेश देण्यात आला पण प्रत्यक्ष प्रवेशासाठी त्यांना एक वर्ष थांबावं लागलं. अर्थात या अंडरएजचा फायदा सांगताना त्या म्हणाल्या, "एक वर्ष मला थांबावं लागलं, पण त्यामुळे मी आणि विलास (डॉक्टर विलास जोग) एका बॅचला आलो आणि मला जन्माचा जोडीदार मिळाला". 

एमबीबीएस झाल्यावर लगेचच त्यांनी विवाह केला. त्यांना एमडी करायचं होतं आणि डॉक्टर विलासना एम एस. परंतु त्यांची कन्या किमया हिचा जन्म झाल्यामुळे स्मिताताईंना एम डी ला प्रवेश घेऊनही काही काळ थांबावं लागलं. तसंच पूर्णवेळ करावी लागणारी हाऊस पोस्ट सोडावी लागली.  पण त्याला इलाज नव्हता. किमयाला सांभाळून जेव्हा अभ्यास शक्य झाला तेव्हा त्यांनी एमडी पूर्ण केलं. दरम्यान त्यांनी सदाशिव पेठेत हॉस्पिटल सुरू केलं होतं. पण स्वप्न मोठ्या हॉस्पिटलचा होतं! त्यानुसार १९८७ मध्ये त्यांच्या पौड रोडच्या हॉस्पिटलचं बांधकाम सुरू झालं. १९८८ मध्ये हॉस्पिटल प्रत्यक्षात सुरू झालं आणि स्मिताताई कामात बुडून गेलेल्या. त्यांना कन्नड भाषा उत्तम अवगत असल्यामुळे त्याचा त्यांना हॉस्पिटल चालवताना खूप उपयोग झाल्याचं त्यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या, हॉस्पिटलच्या परिसरात बरेच कानडी लोक होते. त्या स्त्रिया हॉस्पिटलमध्ये आल्या आणि मी कानडीत बोलू लागले की त्यांना खूपच जवळीक वाटे. वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर आणि पेशंट यांच्यामध्ये अशी आपुलकी वाटणं दोन्ही बाजूंना श्रेयस्कर असतं. त्याचा मला छान फायदा झाला". 

स्मिताताईंना नवनवीन गोष्टी शिकण्याचा सदैव उत्साह आहे. शिवाय त्यांच्या क्षेत्रात तर नव्या तंत्रज्ञानाची माहिती असणं गरजेचं असतं. त्यानुसार त्यांनी दरम्यानच्या काळात लॅप्रोस्कोपी, सोनोग्राफी इ तंत्रं शिकून घेतली होती. दिवसेंदिवस हॉस्पिटलचा काम वाढत होता. त्यांचा मुलगा 'आशिष' याचा जन्म होऊन शिक्षण चालू झालं होतं. त्यावेळीही स्मिताताईंनी हॉस्पिटलचं काम केलं ते घरसंसार सांभाळूनच. किमया आणि आशिष दोघांचीही शिक्षणं/विवाह या सार्‍या घरच्या जबाबदाऱ्यांना स्मिताताईंनी नेहमीच प्राधान्य दिलं. हॉस्पिटल आणि स्वतःचा निवास एकाच इमारतीत असणं अशा वेळी फार गरजेचं आणि उपयुक्त ठरत असल्याचा अनुभव त्यांनी बोलून दाखवला. 

या काळात त्या ऑबस्ट्रॅस्टिक्स एन्ड गायनॅकॉलॉजिकल सोसायटीचं काम करत होत्या.  २००६-०७   मध्ये त्या सोसायटीच्या सेक्रेटरी झाल्या. त्या वर्षी सोसायटीच्या नॅशनल ऑर्गनायझेशन तर्फे ए ग्रेड सोसायट्यांमध्ये पुण्याच्या सोसायटीला बेस्ट सोसायटी म्हणून ट्रॉफी मिळाली. एवढेच नव्हे तर दोन २००८-०९  या वर्षात स्मिताताई सोसायटीच्या अध्यक्ष झाल्या आणि त्या वर्षीही पुण्याच्या सोसायटीला बेस्ट सोसायटीची ट्रॉफी मिळाली. त्यांना या सोशल वर्क मुळे खूप समाधान प्राप्त झालं. २०१० नंतर दहा वर्ष त्यांनी कॉसमॉस बँकेच्या एक डायरेक्टर म्हणून जबाबदारी घेतली. त्या म्हणाल्या फायनान्स माझा विषय नाही; पण बँक कर्मचार्यांसाठी स्ट्रेस मॅनेजमेंट, हेल्थ चेकअप इत्यादी बाबत व्याख्यानं शिबिरं वगैरे उपक्रम आयोजित करून मला खूप काम करता आलं."  त्यांचं काम पाहून रिझर्व बँकेने ही त्यांना ट्रेनिंग फॅकल्टी म्हणून निमंत्रित केलं. अशा तऱ्हेने बँकेद्वारेही त्यांना खूप समाज कार्य करण्याची संधी मिळाली. त्याचा त्यांना खूप आनंद आहे. आता त्या आपल्या क्लबच्या अध्यक्ष होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाचा ज्ञानाचा आपल्यालाही लाभ करून घेता येणार आहे. तसं तर त्या क्लब मध्ये आल्यापासूनच क्लब तर्फे होणार्या वैद्यकीय उपक्रमात त्या मोलाचे योगदान करतच आहेत. 

या सर्व कामात आणि हॉस्पिटलच्या व्यापात त्यांच्या शांत स्वभावाने त्यांना छान साथ दिली. त्या म्हणाल्या मेडिकलला शिकत असताना त्यांच्या शिक्षकांनी त्यांना एक मंत्र दिला होता तो अट्टाहास न धरण्याचा. म्हणजे एखाद्या रुग्णाला एखादी ट्रीटमेंट लागू पडत नाही असं दिसलं तर आपल्याच ट्रीटमेंटचा अट्टाहास धरायचा नाही तर दुसरे उपचार दुसरे मार्ग विचारात घ्यायचे. स्मिताताई म्हणतात हा मंत्र खरंतर सगळीकडेच लागू पडतो. किंबहुना मी तो सगळीकडेच उपयोगात आणते. त्यामुळे कोठेही वादविवाद न करता 'लेट इट गो', 'फर्गेट  इट' हे तत्व त्या आचरणात आणतात. पर्यायाने त्यांना शांतता मिळते, त्या शांत राहू शकतात. 

स्मिताताईंची दोन्ही मुलं उत्तम डॉक्टर झाली. मुलगी ऑप्थल्माॅलाॅजिस्ट आणि मुलगा एम एस. तो अमेरिकेत सुपर स्पेशालिटी बाबत शिक्षण घेऊन येथे आला. वर्षभर त्यानी काम केलं आणि पुन्हा काही शिकायला तो अमेरिकेत गेला. आता मात्र त्याच्या मते त्याला अमेरिकेतच कामाला वाव आहे. त्यामुळे तो तेथेच राहू इच्छितो. यालाही स्मिताताईंनी शांतपणे संमती दिली. 

मध्यंतरी डॉक्टर विलास यांना काही आजारपण आलं. त्यामुळे ते आता हॉस्पिटल बघू शकत नाहीत. त्यामुळे स्मिताताईंना एकटीला सर्व सांभाळणे जिकिरीचे वाटू लागलं. तेव्हा या समस्येतून मार्ग काढण्यासाठी त्यांनी शांतपणे विचार केला आणि 'जोग हॉस्पिटल' जहांगीर हॉस्पिटलला देण्याचा निर्णय घेतला. ही गोष्ट २०१७ सालची. आता स्मिताताई जहांगीर मध्ये जाऊन कन्सल्टन्सी सांभाळतात. पण संपूर्ण हॉस्पिटलच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यामुळे त्यांना मोकळं वाटतं. 

त्या म्हणाल्या "आपण जे केलं ते आपणच बंद करायचं याचा त्रास कोणालाही होणारच. पण वयाचा विचार, आमच्या तब्येती आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या बदलत्या वातावरणाचा विचार करता मला हॉस्पिटल बंद करणं श्रेयस्कर वाटलं. त्यामुळे हा निर्णय घेतला. पण त्याचा मला त्रास होत नाही. आज काल वैद्यकीय क्षेत्रातील 'कट प्रॅक्टिस' सह जे बदलते वातावरण आहे ते, आणि समाजात विघातक प्रवृत्ती वाढत आहेत त्याचेही आम्ही अनुभव घेतले. त्यात आपल्याला आपल्या तत्त्वांनी काम करणं शक्य नाही त्यामुळे मी आता शांतपणे मला करायच्या कामात सोशल वर्क चा विचार करते. माझी आजी म्हणायची प्रसंगी तुम्ही एक पाऊल मागे घ्या पण आपल्यामुळे कोणाला नुकसान होऊ नये. आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये हे मला पटतं. त्यामुळे सगळीकडेच मर्यादा राखणं ही मला आवडतं. त्या दृष्टीने मी आमच्या सोसायटीच्याही राज्य आणिअखिल भारतीय पातळीवरच्या जबाबदाऱ्या घेतल्या नाहीत. माझं हॉस्पिटल होतं तेव्हा मी त्या कामाचा पूर्णपणाने आनंद घेतला. हे स्मरून मी आता शांत राहते एवढेच नव्हे तर देवाने मला सर्वकाही दिल्याबद्दल मी त्याचे आभार मानते. माझं जीवन मला आता एका संथ पाण्याच्या शांत प्रवाहासारखं वाटतं. लाटा आल्या गेल्या, अजूनही येतील जातील पण लाटा सगळ्या तळाशी बसल्या की पृष्ठभागावर जसं शांत सुंदर पाणी आपल्याला दिसतं तसं त्या सरोवरासारखं मला माझं जीवन  वाटतं. त्यामुळे मी आता पूर्णतः शांत आणि समाधानी आहे."

ॲन सरिता भावे.

कांदा मुळा भाजी...

 

पॉट हँगिंग्ज

ॲन शिल्पा नाईक आपल्याला दर महिन्यात बागकामाबाबत उपयुक्त माहिती देते.

या महिन्यात तो आपल्याला 'पॉट हँगिंग्ज' बाबत टिप्स देत आहे. 

कथा - कथन

 

दुष्टचक्र


मानसोपचारतज्ञ रो. वृंदा वाळिंबे आता एक प्रथितयश लेखिका म्हणून आपली ओळख प्रस्थापित करत चाललेली आहे. गेली दोन वर्षे क्लबच्या एकांकिकेचे लेखनसुद्धा तिने केले हे आपल्याला माहीतच आहे. या महिन्यात 'कथाकथन' या सदरासाठी 'दुष्टचक्र' ही कथा तिने लिहिली आहे आणि कथन केली आहे.                                   

खाण्यासाठी जन्म अपुला

 

'बनाना मफिन्स'

ॲन रोहिणी पालेकरच्या हातच्या विविध पदार्थांचा स्वाद आपल्या क्लबमधील अनेकांनी वेळोवेळी घेतलेला आहे. आपल्या या महिन्याच्या पुशसाठी रोहिणी 'बनाना मफिन्स' बनवून दाखवत आहे. मी तिच्या हातचे 'बनाना मफिन्स' चाखले आहेत. मस्त लागतात. तुम्हीही करून बघा.

ॲन. गिरिजा यार्दी

हस्त सामुद्रिक शास्त्र

हृदय रेषा (Heart Line)

रेषेची सुरुवात गुरु उंचवट्याच्या जवळून किंवा खालून सुरू होऊन पंजाच्या दुसऱ्या बाजूला इतर उंचवट्याच्या खालच्या बाजूने प्रवास करत ती पुढे सरकत करंगळीच्या खालच्या उंचवट्यावर पर्यंत जाते.


या रेषेवरून व्यक्तीच्या भावना, हृदय विकार, प्रेम व वासना इत्यादींचा विचार होतो. ही रेषा जर का पांढरट रंगाची असेल तर ते कमकुवत हृदय दाखवते व त्याची तपासणी गरजेची असते. थंडपणा जास्त असतो प्रेमळपणा कमी असतो. तांबूस रंगाची हृदय रेषा व्यक्तीचा हट्टी व गर्विष्ठ स्वभाव दर्शवितो. ही रेषा गुलाबी रंगाची असली तर मात्र ती व्यक्ती उत्साही ,खंबीरपणा ,प्रेमळ अशी असते. पिवळट रंगाची रेषा उदासीन वृत्ती दर्शविते. संशयी स्वभाव गुन्हेगारी प्रवृत्ती असते. फसवाफसवी करणारी असते. निळसर काळपट रंगाची रेषा हृदयदोष दर्शविते. रक्ताभिसरण नीट होत नाही व त्यामुळे विकार दर्शवते.
 

हृदय रेषेवर सुद्धा यव चिन्ह, ठिपके, आडव्या रेषा, खंडत्व नसावे. असेल तर त्याठिकाणी व्यक्तीच्या त्या-त्या वर्षी संकटे, अडथळे दर्शविते. या रेषेवरून दर्शविलेल्या त्या त्या वयात हृदय पीडा दर्शवितो.
 

गुरु उंचवट्यावरुन सुरू होणारी रेषा व्यक्तीचा स्वभाव समतोल वृत्तीचा असतो प्रॅक्टिकल वागणे असते.
 

सरळ रेघ मारलेली हृदय रेषा चांगली नाही. अशी व्यक्ती सर्व गोष्टी सहज करत आयुष्य काढत असते. अजिबात कुठलाही प्रतिकार न करता आतल्याआत कुढत असतात. जेव्हा हृदय रेषा व मस्तक रेषा एकमेकांना मिसळत असतात त्यावेळेस मात्र प्रेमभंग होण्याची चिन्हे असतात. हृदय रेषेला समांतर अशी दुसरी रेषा असेल तर अशा व्यक्तीला चांगला जोडीदार मिळतो. पती-पत्नी दोघांच्या हृदय रेषा सारख्याच आकाराच्या व लांबीच्या असतील तर त्या एकमेकांना सपोर्टिव असतात. या रेषेवरून भावना, प्रेमाचे स्वरूप, ध्येयवाद ,मत्सरीपणा, फसवणूक, दुष्टपणा, चिडखोरपणा, व्यावहारिक दृष्टिकोन इत्यादी गोष्टी पाहता येतात. या रेषेच्या शेवट जितक्या फाट्यांमध्ये झाला असेल तेवढी त्या व्यक्तीची प्रेम प्रकरणे असतात.

 

रो. अशोक गाडगीळ

आरोग्यवर्धिनी

सोडीयम (Na)

सोडीयम हा अजून एक महत्वाचा क्षार असून तो महत्वाच्या कार्यांशी निगडीत आहे. आपल्या शरीरात साधारण 250 gm इतके सोडीयमचा साठा असतो. त्यातील 30 टक्के हा हाडांमध्ये साठलेला असतो. तर उरलेला 70 टक्के हा द्रव्यांमध्ये म्हणजे रक्त, त्यातील प्लाझमा, अश्रू, लघवी, घाम आणि वीर्य ह्यात असतो. ह्याची पाण्याबरोबर जास्त जवळीक असते.

ह्याची दैनंदिन गरज 2 ते 3 gm एवढी असते पण बहुतेक वेळा आपण ह्याचे जास्तच सेवन करत असतो. नेहमीचे मीठ (Table Salt) हा ह्याचा मुख्य स्त्रोत आहे आणि त्यात 40 टक्के एवढे सोडीयम असते. पाश्र्चात्य देशांमध्ये जिथे प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे प्रमाण खूप जास्त असते त्यांचे सोडीयमचे सेवन हे खूपच हस्त असते. असे दिसून आले आहे. शिवाय अनेक पदार्थांमधून पण आपल्याला हा क्षार मिळतच असतो.

 

ह्या क्षारांचे मुख्य काम म्हणजे रक्तदाब नियंत्रित ठेवणे. शिवाय स्नायू आणि मज्जातंतूचे काम व्यवस्थित चालू राहण्यासंठी पण हा क्षार उपयोगी आहे. हा एक महत्त्वाचा इलेक्ट्रोलाइट असल्यामुळे पेशींच्या बाहेरील व आतील द्रवाचे योग्य संतुलन ठेवण्यासाठी हा महत्त्वाचे कार्य करतो. अन्नपचनानंतर ह्याचे शोषण लहान आतड्यात होते. ह्याचे शोषण होताना ते पाण्यासहित होते. साखर आणि अॅमिनो अम्लांचे शोषण होण्यासाठी पण हा मदत करतो.

 

ह्या क्षाराची रक्तातील सर्वसाधारण पातळी ही 135 – 145 मिली इक्वीब्लँटस / लिटर अशी असते. ह्या क्षाराची पातळी कमी होण्यासाठी अनेक कारणे आहेत. त्यात काही विशिष्ट प्रकारची औषधे, किडनी किंवा यकृताचे आजार, थायरॉईड हार्मोनची पातळी कमी होणे किंवा खूप जास्त प्रमाणात पाणी पिणे अशी आहेत. त्यामुळे दिसणारी लक्षणे म्हणजे मळमळ, उलट्या, थकवा, डोकेदुखी, चिडचिड, अस्वस्थता, वैताग अशी आहेत. ह्या उलट सोडीयमची पातळी जास्त वाढण्याची कारणे म्हणजे उलट्या / जुलाबमुळे शरीरातून पाणी बाहेर जाणे किंवा पाणी खूप कमी पिणे, जेवताना जास्तीचे मीठ घेणे, स्टीरॉईडस् यासारख्या औषधांमुळे, काही रक्त दाबावरची औषधे, मधुमेह, प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे अतिसेवन इत्यादि होत. ह्याची लक्षणे सोडीयमची पातळी खूप जास्त झाल्याशिवाय दिसत नाहीत. पण एकदम उभे राहिल्यावर किंवा स्थिति बदलल्यावर चक्कर येणे अथवा सारखी तहान तहान होणे अशी आहेत. आपले शरीर रक्ताचे आकारमान व सोडीयमचे प्रमाण हे सतत तपासत असते. सोडीयमची पातळी जेव्हा वाढते तेव्हा मेंदू आणि रक्तवाहिन्या किडनीला सोडीयम जास्त बाहेर टाकायचा निर्देश देतात. ह्या उलट जेव्हा ह्या क्षाराची पातळी कमी होते तेव्हा किडनीला सोडीयम साठवून पोटॅशियम बाहेर टाकायचा निर्देश दिला जातो. अशावेळी लघवीचे प्रमाण कमी होते. ह्या सर्व प्रकारात तहान लागण्याचे पण संतुलन बारकाईने केले जाते.

 

इथे मुद्दाम नमूद करावेसे वाटते कि हा क्षार पेशी बाहेरील द्रव्यात असतो तर पोटॅशियम पेशीच्या आतील द्रवात असतो आणि पेशींचे संतुलनासाठी हे दोन्ही क्षार महत्त्वाचे आहेत.  सोडीयम जास्त झालं कि शरीर पाणी साठवू लागते. त्यामुळे सूज (Oedema) दिसते. तसेच किडनीला रक्तात जास्त पाणी सोडण्याचा निर्देश दिला जातो त्यामुळे रक्ताचे आकारमान वाढते आणि रक्त दाब पण वाढतो. शरीरातील पाण्याच्या संतुलनाबरोबरच आम्लिक / अल्कलीक संतुलन राखण्याचे पण महत्त्वाचे कार्य हा क्षार करतो. जेव्हा शरीराबाहेर पाणी जाऊ लागते तेव्हा कधी कधी i) क्षारापेक्षा पाणी जास्त जाते किंवा ii) पाण्यापेक्षा क्षार जास्त जातो किंवा iii) दोन्ही समप्रमाणात जाते.  ह्यातील तिसरी स्थिति ही सर्वसाधारणपणे होत असते. परंतु पहिल्या दोन प्रकारात मात्र मेंदूशी निगडीत गंभीर समस्या उदभवू शकते. पहिल्या प्रकारात मेंदूला सूज येते तर दुसर्‍या प्रकारात seizures नावाची समस्या निर्माण होते. अशावेळी उपचार खूप काळजीपूर्वक करावे लागतात, नाहीतर मेंदूला इजा होण्याची शक्यता असते.

 

नेहमीच्या मिठाच्या तुलनेत काळं मीठ खूप फायदेशीर असते व त्याच्या सेवनाने जडत्व, बद्धकोष्ठता  स्नायूंमधील तीव्र वेदना हे सर्व कमी होते असे दिसून आले आहे व आम्लपित्ताचा त्रास कमी होतो. खाली तक्त्यात पदार्थांमधील सोडीयमचे प्रमाण दिले आहेत व कमी सोडीयमचे पदार्थ विशेष नमूद केले आहेत. वर सांगितल्याप्रमाणे सोडीयम इतकाच पोटॅशियम महत्त्वाचा असून सोडीयम व पोटॅशियम 1 : 3 ह्या प्रमाणात असणे आवश्यक मानले जाते. म्हणून सोडीयम व पोटॅशियम दोन्हीचे प्रमाण खलील तक्यात दिले आहेत.

Table 22 : निरनिराळ्या पदार्थांतून पोटॅशियम कसे मिळवता येईल ते खलील तक्यावरून दिसेल.

Push -Na.png

संशोधनपर अभ्यासातून हे दाखवले गेले आहे की आहारातून मिठाचे सेवन कमी केल्याने उच्च रक्तदाब कमी होतो व हृदयाला संरक्षण मिळते. तसेच लघवीतील अल्बूमिनचे प्रमाण कमी होऊन किडनीला संरक्षण मिळते व लघवीतील कॅल्शिअमचे प्रमाण कमी होऊन मुतखडा होण्याचा धोका कमी होतो. त्याचप्रमाणे आहारात सैंधव मीठ वापरल्याने बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होते, पायातील पेटके कमी होतात आणि शरीरातील पाणी साठण्याचे प्रमाण कमी होऊन ऍसिडिटी पण कमी होते असे दिसून आले आहे.

आतापर्यंत आपण ह्या अगोदरचे क्षार पाहिले ते कोणत्या पदार्थातून जास्त मिळतील असा विचार केला परंतु सोडीयमच्या बाबतीत मात्र कोणत्या पदार्थातून कमी मिळेल असा विचार करण्याची गरज आहे कारण आपला मिठाचा वापर खूप प्रमाणात होत असतो. 

  • धान्यांमध्ये नेहमीची धान्ये बरी असली तरी मका हा जास्त सोडीयम व कमी पोटॅशियम असल्याने जास्त वापरू नये. ह्या उलट मागे पाहिल्याप्रमाणे भगर आणि राजगिरा व नाचणी ह्यांचा वापर कसा वाढवता येईल ते पहावे.

  • डाळी व कडधान्यांच्या समूहात हरभरा डाळ, उडीद  डाळ व मसूर ह्यांचा वापर कमी असावा.

  • पालेभाज्यांपैकी अनेकांमध्ये सोडीयम कमी असून फक्त करडई आणि सॅलड त्याला अपवाद आहेत.

  • कंदमुळांमध्ये बीटात सोडीयम जास्त आहे तर फळभाज्यांमध्ये नवलकोल, फ्लॉवर व पडवळ ह्यात खूप जास्त सोडीयम आहे.

  • बाकीच्या भाज्यांमध्ये सोडीयम : पोटॅशियमचे गुणोत्तर 1 : 3 च्या वर असल्याने त्यांच्या सेवनाने काही तोटा होणार नाही.

  • मसाल्याचे पदार्थ नेहमीप्रमाणे चांगलेच ठरतात.

  • फळांपैकी मात्र लिची, पायनॅपल, टरबूज व संत्रे ह्यांचे सेवन कमी ठेवावे. सफरचंदात सुद्धा त्यामानाने जास्त सोडीयम असल्याचे दिसते. विशेष म्हणजे लिंबू, मोसंबी, डाळिंब, प्लम, पीच, केळे, आवळा वा चिकू ह्यात सोडीयम अगदी नगण्य असल्याने त्याचे सेवन वाढवावे.

  • सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाजारात मिळणारे सर्व प्रक्रिया केलेले हवा बंद डब्यातील पदार्थ, शीत पदार्थ, ब्रेड वर पसरवण्याचे पदार्थ, सॉसेजेस, हॅम, सलाबी व बेकन हे मांसाहारी पदार्थ ह्यात भरपूर सोडीयम असते. बेकरीच्या सर्व पदार्थात ते 15 ते 20 टक्के इतके असते. तसेच चीज, पिझ्झा, पास्ता ह्यातही क्षाराचे प्रमाण खूप असते.

त्यामुळे मिठाच्या सेवनाच्या बाबतीत काळजी घेणे जरुरीचे आहे. नेहमीच्या एक किलो मिठात 100 ते 150 ग्रॅम इतके सैंधव मिसळले तरी बराच फायदा होऊ शकतो कारण त्यात पोटॅशियम जास्त असते. त्याचप्रमाणे जाणीवपूर्वक पोटॅशियम जास्त असलेल्या फळांचे सेवन करावे.

रो. शोभा राव

मनाचे श्लोक

कीर्तनकार असणारी रो. मृणाल दर महिन्यात आपल्याला समर्थ रामदास विरचित 'मनाचे श्लोक' या विषयावर तिच्या भावगर्भ शैलीत निरूपण करते. या महिन्यात दहाव्या श्लोकाचे ती निरूपण करीत आहे.  

अध्यात्म जिज्ञासा

 

पूजाविधान - भाग १

आपल्या क्लबमधील 'अध्यात्म' या विषयाची आवड असणाऱ्या सभासदांसाठी रो. चंद्रशेखर यार्दी यांची 'अध्यात्म जिज्ञासा' ही अध्यात्म विषयाला वाहिलेली मालिका गेल्या ६ वर्षांपासून सुरु आहे. प्रत्येक महिन्यात होणाऱ्या एका सत्राची सुरुवात गौरी शिकारपूर ही अध्यक्ष असलेल्या वर्षापासून झाली. या महिन्यात 'पूजाविधान भाग १' हे सत्र झाले. ते येथे दिले आहे. 

कौतुक

सी. डी. आणि सीमा महाजन यांची नात - राही हिची चित्रकला

सतीश आणि अंजली रावेतकर यांची नातं - ईशानीचे कीबोर्ड वादन

दोघींचंही खूप खूप कौतुक

© Rotary Club of Pune Shivajinagar | For private Circulation Only.

President: Rtn. Shobha Rao : 9850071279 | Secretary: Rtn. Ajay Godbole : 9923599490 | Editor: Ann. Girija Yardi : 9881402784

Co-editor: Rtn. Sanjeev Chaudhary, Ann. Sarita Bhave, Rtn. Manjiri Dhamankar, Rtn. Chandrashekhar Yardi

We meet every Monday at 7:00 pm at Pusalkar Hall, Lala Lajpatrai Hostel, Near Shivaji Housing Society, Senapati Bapat Road, Pune - 411016

bottom of page