MAY 2022 Issue:
YOUTH SERVICES month

38th Club Day - April 30, 2022

कोरोना संक्रमणानंतर म्हणजे जवळजवळ दोन वर्षांनी या वर्षी क्लब डे ची महफिल नेहमीच्या उत्साहात पार पडली. या वर्षीच्या क्लब डे ची संकल्पना होती - Old is Gold.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला रो. मृणाल नेर्लेकर, रो. शोभाताई राव आणि रो. सूर्यप्रकाश राव यांना पॉल हॅरिस फेलो पिन्स  देऊन सत्कार करण्यात आला.

मैफिलीची सुरुवात अर्थातच गणेश वंदनेने झाली ज्यावर ॲन अंजली गाडगीळ यांनी सुरेख नृत्य सादर केले.

त्यानंतर प्रतिमा दुरुगकर यांनी लिहिलेले "श्यामची आई" यावरील "श्रीमंत श्यामची आई" हे विडंबन त्यातील खुसखुशीत संवाद, बांधीव पटकथा,आणि शेखर यार्दी, प्रतिमा दुरुगकर, गिरिजा यार्दी, यांनी केलेल्या नेटक्या आणि संयत अभिनयाने चांगलेच रंगले.

राहुल पेंढारकरांनी गायलेले "ख्वाब हो तुम या" या गाण्याने प्रेक्षकांना ठेका धरायला भाग पाडले. ॲन नेहा पाठक आणि रोटे.अनिरुद्ध इनामदार यांनी गायलेले "याद किया दिलने कहा हो तुम" हे द्वंदगीत प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरले. नंतर रोटे. शिरीष क्षीरसागर यांनी व्हायोलिनच्या सुरावटीवर सादर केलेले "मेरे नैना सावन भादो"हे गाणे तर अप्रतिमच. रोटे. मानस वाघ यांनी सादर केलेले "हम और तुम और ये समा" या गाण्याने मैफिलीत एक "समा"च तयार झाला. रोटे. नितीन अभ्यंकर यांनी गायलेल्या "कई बार युही देखा है" तसेच रोटे. नितीन आणि ॲन शिल्पा यांच्या "शुक्रतारा मंद वारा" ह्या गाण्याने श्रोत्यांना पुनःप्रत्ययाचा आनंद दिला.

माउथ ऑर्गन या वाद्याच्या बाजाचे नसलेले "नका सोडून जाऊ रंग महाल" या गाण्याचे आव्हान आशिष नेर्लेकर यांनी लीलया पेलले. ॲन सीमा महाजन आणि प्रेसि. शोभाताई  यांनी उत्तम गायलेले "गोरे गोरे बाके छोरे" आणि त्यावर अंजली अभ्यंकरांनी केलेले नृत्य तर लाजवाब.

ॲन शिल्पा हिने गायलेले "ओ सजना बरखा बहार आयी" आणि नितीन अभ्यंकर, सीमा महाजन यांनी गायलेले "संधीकाली या अशा" या गाण्यांनी श्रोते पुन्हा एकदा जुन्या आठवणीत रमले. आशिष नेर्लेकर यांनी गायलेले "है अपना दिल तो आवारा" आणि "रमय्या वस्तावय्या" या कोरस गाण्याने उपस्थित प्रेक्षकांना नाचायला लावले नसते तरच नवल.

याव्यतिरिक्त ऐनवेळी रोटे. प्रदीप गोडबोले यांनी सादर केलेले "लाखो है निगहो में" तर "क्या कहने" तसेच रो. रेश्मा कुलकर्णी हिने सादर केलेले जपानी गीत ही तितकेच आशयपूर्ण.

या सगळ्या गीतांना एका सूत्रात बांधून रोटे. माधुरी गोखले यांनी आपल्या खुमासदार शैलीत केलेले सूत्रसंचालन म्हणजे "सोने पे सुहागा"च. या सगळ्याचे श्रेय आहे ते ॲन सीमा महाजन यांना कारण सगळ्या कलाकारांना प्रोत्साहित करून त्यांच्या वेळा सांभाळून तसेच दीपक उपाध्ये सरांची आणि कलाकारांची सांगड घालून कार्यक्रम यशस्वी करणे म्हणजे तारेवरची कसरतच, आणि त्याच्या तालमीसाठी घरी सगळ्यांची चोख व्यवस्था ठेवणारे नितीन आणि शिल्पा नाईक या तिघांनाही सलाम.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रेसि. शोभाताई यांनी केले. आणि अशा रीतीने RCPS  का क्लब डे अपने परंपरागत हर्ष उल्हास के साथ संपन्न हुआ.

 

रो. प्रमोद पाठक

WhatsApp Image 2022-05-08 at 1.03.52 PM (1)
WhatsApp Image 2022-05-08 at 1.03.52 PM (1)

press to zoom
WhatsApp Image 2022-05-08 at 1.03.51 PM (2)
WhatsApp Image 2022-05-08 at 1.03.51 PM (2)

press to zoom
WhatsApp Image 2022-05-08 at 1.03.48 PM
WhatsApp Image 2022-05-08 at 1.03.48 PM

press to zoom
WhatsApp Image 2022-05-08 at 1.03.52 PM (1)
WhatsApp Image 2022-05-08 at 1.03.52 PM (1)

press to zoom
1/13

साप्ताहिक कार्यक्रम

११ एप्रिल

११ तारखेच्या सोमवारी आपल्याकडे श्रेयस हॉटेलचे पार्टनर श्री चिंतामणी चितळे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ मृणालिनी चितळे हे आले होते. हॉटेल श्रेयस तर आपल्या सर्वांना माहीतच आहे. पन्नासहून अधिक वर्षे हे त्या व्यवसायात आहेत. पण त्याचबरोबर समाजोपयोगी अशी अनेक कामे त्यांनी केलेली आहेत. या सर्व कार्यात त्यांच्या पत्नीचा पण सहभाग असतोच. मृणालिनीताईंना आपण त्यांच्या कथा, ललित लेख, मुलाखत, अनेक पुस्तके यामधून ओळखतोच. त्यांच्या कित्येक पुस्तकांना पारितोषिके मिळालेली आहेत. महर्षी स्त्री शिक्षण संस्थेच्या संचालक पदावर बारा वर्षे कार्यरत, काउन्सिलिंग आणि कुटुंब न्यायालय या क्षेत्रात विशेष काम, दूरदर्शन आणि आकाशवाणी वरील कार्यक्रमात सहभाग. "श्री प्रतिष्ठान"तर्फे मुळशी भागात चाललेल्या या सामाजिक कार्यात दोघांचाही सक्रिय सहभाग आहे. मुळशी तालुक्यात त्यांनी एक शाळा चालू केली. नापास झालेली मुलं तिथे शिकू शकत होती. जवळच्या खेड्यातील मुलांना शिक्षणाची संधी मिळू लागली. त्यांच्यासाठी त्यांनी वसतिगृहाची पण सोय केली. या मुलांच्या कुटुंबातील व्यक्तींना पण भेटायला हे दांपत्य जात असे, जेणेकरून त्यांच्या घरातील परिस्थितीची माहिती पण त्यांना असावी. या मुलांना गुन्हेगारीपासून वाचविणे हे  महत्त्वाचे काम त्यांनी केले. त्यासाठी संस्कार वर्ग सुरू केले. त्याचप्रमाणे व्यसनांपासून मुक्त करणे हे पण महत्वाचे कार्य साध्य झाले. बारावीनंतर मुलं शाळा सोडून जातात पण तरी ते संपर्कात असावे म्हणून बचत गट सुरू केला आणि तो शाळेतून बाहेर पडलेल्या मुलांनी चालू ठेवला आहे. चितळे दांपत्याच्या या मनापासून केलेल्या प्रयत्नांना मुलांनी आपल्या प्रयत्नांनी साथ दिली आहे. बरीच मुले उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला पण जाऊन आली आहेत. त्यांच्या एका विद्यार्थ्याचा उल्लेख येथे करावासा वाटतो. मुळात गरीब पण चांगले शिकून नोकरीला लागलेल्या ह्या मुलाने अचानक नोकरी सोडली का तर त्याला एक वर्ष देशाची सेवा करायची इच्छा होती. असेच महेश, कैलास, संतोष यासारखे अनेक उत्तम नागरिक त्यांनी घडविले. सतत सव्वीस सत्तावीस वर्षे अविरत त्यांचे हे काम चालू आहे. असे हे चितळे दाम्पत्य वेळात वेळ काढून आपल्याकडे आले आणि त्यांच्या या अफाट कार्याची आम्हाला ओळख करून दिल्याबद्दल रो. मिलिंद पालकर यांनी आभार मानले आणि वंदनाने ओळख करून दिली.

ॲन वंदना पालकर

WhatsApp Image 2022-04-21 at 5.57.53 PM (1).jpeg
WhatsApp Image 1 2022-04-21 at 5.57.53 PM.jpeg

१८ एप्रिल - लेफ्टनंट जनरल कर्नल निंभोरकर

१८ तारखेला आपल्या क्लब मध्ये लेफ्टनंट जनरल राजेंद्रजी निंभोरकर आले होते. खरंच आपले परमभाग्य ही परम विशिष्ट सेवा मेडल मिळवणारी महान व्यक्ती आपल्याला वक्ता म्हणून लाभली. अतिशय साधे व्यक्तिमत्व. अनेक पदव्या. मेडलसनी विभूषित. त्यांच्या पस्तीस वर्षाच्या करिअर मधील सोळा, अठरा वर्ष त्यांनी कश्मीरमध्ये घालवली आहेत. लेह-लडाख, पुंच, राजुरी, नॉर्थ ईस्ट अशा sensitive भागातच त्यांनी काम केले आहे. "ऑपरेशन विजय" तील लाईन ऑफ कंट्रोल मधील ऑपरेशनमध्ये ते critically injured झाले होते. त्यांच्या मेडल्सची यादी इतकी मोठी आहे की हा लेख सर्व त्यांनीच भरून जाईल. त्यांना उरी सर्जिकल स्ट्राइक वर बोलायचे होते. त्यांनी अनेक चित्तथरारक घटना सांगितल्या. ऑपरेशन करताना किती गुप्तता बाळगावी लागते. त्यांच्याविषयी शिवाय कोणालाही अगदी पत्नीला सुद्धा अनेक ऑपरेशन्स नंतरच कळतात. त्या खोलीची किल्ली फक्त ते स्वतः व त्यांना काही झाले तर त्यांची जागा घेणारा या दोघांकडेच असते. गोपनीयता, पराकोटीची सावधगिरी, शत्रूला बेसावध ठेवून हल्ला करावा लागतो. काही स्थानिक लोकांची मदत घ्यावी लागते. परफेक्ट टाइमिंग पाळावेच लागते. मला सगळ्यात भावले की ते म्हणाले कश्मीरमध्ये काही अतिरेक्यांना मारायचे होते. त्यांचा रोजा चालू होता. त्यांची नमाज पडायची वेळ पहाटे चार ते सव्वा चार असते. सुरक्षादलांचे एक तत्व आहे की अडचणीच्या वेळी मारायचे नाही, म्हणून त्यांनी गाढ झोपेची साडेतीनची वेळ निवडली. आधीच जाण्याचा मार्ग सुरक्षित करून ठेवला होता. अजिबात आवाज नको म्हणून एकदम जाऊन अक्षरशः त्यांचे गळे चिरले. अंधारात त्यांच्या तोंडातून शब्द, आवाज बाहेर पडणे धोक्याचे होते. जशास तसे याच न्यायाने कठोर आणि निष्ठूर होऊन शत्रूशी दोन हात करावे लागतात. त्यातही ते माणुसकी जपतात.
             

आपल्या सरकारची विशेषता मनोहर पर्रीकर यांची स्तुती करताना म्हणाले, "आमच्यावर राजकीय दबाव नसतो, जे मागू ते मिळते. पण गाईडलाईन्स आहेत त्याप्रमाणे आम्ही वागतो." आर्मी, नेवी, एअर फोर्स हे तिन्ही दले अतिशय समन्वय साधून काम करतात. म्हणूनच आपण सुखाचा श्वास, सुखाची निद्रा घेऊ शकतो. त्यांना क्लबमध्ये परत येण्याचे आमंत्रण दिले चाहे. राजेंद्रजी आणि त्यांच्या सारख्या देशासाठी काम करणाऱ्या सर्वांना त्रिवार सलाम.

 

ॲन अंजली गाडगीळ

WhatsApp Image 2022-04-22 at 6.11.04 PM (1)
WhatsApp Image 2022-04-22 at 6.11.04 PM (1)

press to zoom
WhatsApp Image 2022-04-22 at 6.11.04 PM (2)
WhatsApp Image 2022-04-22 at 6.11.04 PM (2)

press to zoom
WhatsApp Image 2022-04-22 at 6.11.05 PM
WhatsApp Image 2022-04-22 at 6.11.05 PM

press to zoom
WhatsApp Image 2022-04-22 at 6.11.04 PM (1)
WhatsApp Image 2022-04-22 at 6.11.04 PM (1)

press to zoom
1/4

२५ एप्रिल : दास्तान - ए - नय्यर

In House Talent या आपल्या क्लब च्या साप्ताहिक मीटिंग च्या सत्रात २५ एप्रिलची संध्याकाळ मधुर सुरांचा Nostalgia घेऊन आली. आपल्या क्लब चे " जाने माने, उभरते हुए कलाकार "रो. प्रमोद पाठक यांनी "दास्तान-ए-नय्यर" या कार्यक्रमात संगीतकार ओ. पी. नय्यर यांचा सांगितिक प्रवास उलगडून दाखवला. त्याचबरोबर अनेक गाजलेल्या चित्रपटांमधली गाजलेली गाणी दृक-श्राव्य माध्यमातून सर्वांना बघायला ही मिळाली. हे चित्रपट त्यातल्या गाण्यांमुळेच गाजले होते हे वेगळं सांगायला नकोच.

ओ. पी. नय्यर यांचा मुंबईत आल्यावर करियरमधला सुरुवातीचा संघर्ष, त्यांनी संगीतबदध केलेलं सगळ्यात पहिलं गाणं, सगळ्यात पाहिलं प्रसिद्धीस आलेलं आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेलं गाणं आणि त्यानंतर मागे वळून न पाहता एकामागोमाग एक हिट गाणी, ज्यांमुळे ते सिनेमे पण गाजले असे अनेक, उदा.. कश्मीर की कली, हावडा ब्रिज, नया दौर, CID, एक मुसाफिर एक हसीना असे अनेक. यादी बरीच मोठी आहे.

प्रमोदने हे सगळं काही अतिशय शिस्तबदध, त्याचे सुयोग्य संकलन करून आणि आपल्या मीटिंगच्या वेळेत अगदी चपखल बसवून तांत्रिक दृष्ट्या उत्तम सादरीकरण केले. सुयोग्य पद्धत आणि हिंदी भाषेचा वापर केल्यामुळे सादरीकरणाला नजाकत आली होती.

त्याला अश्या अनेक कलाकारांविषयी माहिती शोधून त्यांचे संकलन करण्याचा छंद आहे. त्यामुळे अर्थातच आता वाट बघूया, तो पुढील कलाकार कोणता निवडतो याची.

प्रमोदच्या या कार्यक्रमाला त्याची अर्धांगिनी नेहा अगदी समरसून मदत करते. याही कार्यक्रमात त्याला नेहाची साथ होतीच. आता उत्सुकता आहे, या दोघांच्या पुढील सादरीकरणाची.. दोघांनाही खूप शुभेच्छा...!

रो. अश्विनी अंबिके

Heritage Walk

पर्वती


RCPS चा सातवा हेरिटेज वॉक १७ एप्रिल रोजी पर्वतीवर आयोजित केला होता. पर्वती म्हणजे पेशव्यांची आवडती आणि समस्त पुणेकरांची लाडकी. हेरिटेज वॉक ठरविताच नेहमीप्रमाणे उत्साहाने जवळजवळ तीस सभासदांनी नोंदणी केली. सकाळी साडेसात वाजता सर्वजण पर्वतीवर दाखल झाले. सकाळची प्रसन्न वेळ होती. अनेक पुणेकर पायऱ्या चढून वर येत होते. काही जण तेथे व्यायाम करीत होते. PP उज्वलचे व्याही श्री भागवत हे देवदेवेश्वर संस्थानचे ट्रस्टी आहेत. त्यामुळे उज्वलने संयोजनाची जबाबदारी स्वीकारली.श्री कानिटकर हे या वॉकमध्ये इतिहासतज्ञ म्हणून आले. त्यांनी नानासाहेबांच्या समाधीस्थळाजवळ पेशव्यांचा इतिहास सांगितला. त्यानंतर कार्तिकेय मंदिर, समाधीस्थळ पाहिले. विष्णू मंदिर बघितले. नेपाळमधील गंडकी नदीमधील शाळीग्राम शिळेतील 'माधव  मूर्ती' अतिशय मनमोहक होती. त्यानंतर विठ्ठल रखुमाई मंदिर आणि शेवटी देवदेवेश्वर मंदिर बघितले. पंचायतन प्रकारातील हे शिवमंदिर असून भोवती सूर्य, विष्णू, गणेश आणि भवानी मंदिरे आहेत. मुख्य गाभार्‍यात शिवपिंडीबरोबरच शंकराची पार्वती व गणेशासहीत चांदीची मूर्ती आहे. मुळात ६७ किलो वजनाची सोन्याची मूर्ती होती, ती निजामाने पुणे स्वारीत लूटून नेली.


पर्वतीवरील पेशव्यांच्या वाड्यात सर्वांनी चाफ्याच्या झाडाखाली पोहे, लाडू, चहाचा आस्वाद घेतल. संस्थांनतर्फे सर्वांना माहितीपुस्तिका दिली. प्रतिमाने आभार प्रदर्शन केले. सर्वांनी म्युझियम बघितले व खाली येताना प्राचीन व्यापारी मार्गावरील दगडी गुंफा बघितल्या.
 

पुण्यात राहात असूनही पर्वती खऱ्या अर्थाने आत्ता पाहिली अशीच सर्वांची भावना झाली. छोटी क्रिएशा व राही यांनी हजेरी लावल्यामुळे त्यांच्या पिढीलाही आपण वारसा दाखवत आहोत ही भावना आनंददायक होती. पुढच्या हेरिटेज वॉकची आम्ही उत्सुकतेने वाट पाहात आहोत ,असे म्हणत सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला

ॲन प्रतिमा दुरूगकर

WhatsApp Image 2022-04-22 at 7.42.38 PM
WhatsApp Image 2022-04-22 at 7.42.38 PM

press to zoom
WhatsApp Image 2022-04-22 at 7.42.38 PM (1)
WhatsApp Image 2022-04-22 at 7.42.38 PM (1)

press to zoom
WhatsApp Image 2022-04-22 at 7.38.18 PM
WhatsApp Image 2022-04-22 at 7.38.18 PM

press to zoom
WhatsApp Image 2022-04-22 at 7.42.38 PM
WhatsApp Image 2022-04-22 at 7.42.38 PM

press to zoom
1/16
WhatsApp Audio 2022-04-22 at 7.42.39 PMArtist Name
00:00 / 17:22

सामाजिक प्रकल्प

२० एप्रिलला ॲन अलका अभ्यंकर हिने आपटे शाळेतील मुलींना साडी कव्हर शिवायला शिकवले व ॲन अंजली गाडगीळने टीप व्यवस्थित कशी मारायची त्याचे प्रात्यक्षिक दाखवले. या प्रोजेक्टसाठी रो. शोभाताई स्वतः, ॲन अंजली गाडगीळ, रो. अंजली रावेतकर ,ॲन अलका अभ्यंकर व ॲन अंजली गोडबोले होत्या 

WhatsApp Image 2022-04-21 at 4.44.22 PM (1)
WhatsApp Image 2022-04-21 at 4.44.22 PM (1)

press to zoom
WhatsApp Image 2022-04-21 at 4.44.23 PM
WhatsApp Image 2022-04-21 at 4.44.23 PM

press to zoom
WhatsApp Image 2022-04-21 at 4.44.22 PM (2)
WhatsApp Image 2022-04-21 at 4.44.22 PM (2)

press to zoom
WhatsApp Image 2022-04-21 at 4.44.22 PM (1)
WhatsApp Image 2022-04-21 at 4.44.22 PM (1)

press to zoom
1/5

१३ एप्रिल रोजी अंध शाळेतल्या दहावीच्या मुलींचा सेंड ऑफ होता. त्याला शोभाताई आणि रो. अंजली रावेतकर हजर होत्या.

WhatsApp Image 2022-04-13 at 9.24.11 PM (1)
WhatsApp Image 2022-04-13 at 9.24.11 PM (1)

press to zoom
WhatsApp Image 2022-04-13 at 9.24.11 PM
WhatsApp Image 2022-04-13 at 9.24.11 PM

press to zoom
WhatsApp Image 2022-04-13 at 9.24.10 PM (1)
WhatsApp Image 2022-04-13 at 9.24.10 PM (1)

press to zoom
WhatsApp Image 2022-04-13 at 9.24.11 PM (1)
WhatsApp Image 2022-04-13 at 9.24.11 PM (1)

press to zoom
1/4

एकलव्यला एप्रिल महिन्याचे धान्य पोचले

WhatsApp Image 2022-04-07 at 4.41.47 PM.jpeg

सार्थकला एप्रिल महिन्याचे धान्य पोचले

WhatsApp Image 2022-04-29 at 12.45.11 PM.jpeg

आरोग्यदर्पण

हेल्थ एक्सपो - आरोग्य संपदा


प्रतिथयश डॉक्टरांची व्याख्याने हा आपल्या क्लबचा एक अतिशय लोकप्रिय आणि यशस्वी असा  उपक्रम अनेक वर्ष चालू होता. काही काळानंतर त्यात तोचतोचपणा येणं स्वाभाविक होतं म्हणून गेली काही वर्ष आपण तो हेतुपूर्वक स्थगित ठेवला होता. आता कोरोनाच्या दोन वर्षांच्या अनुभवानंतर आरोग्यविषयक सर्वच बाबींचे पुनरावलोकन करण्याची गरज भासत होती. अशावेळी आपल्या अध्यक्ष डॉ. शोभाताई राव यांना हा विषय पुन्हा हाताळावा असं वाटलं. त्यातूनच "हेल्थ एक्स्पो-आरोग्य संपदा" ह्या उपक्रमाचेआयोजन करण्यात आले.

रविवारी तीन एप्रिलला हर्षल हॉलमध्ये झालेल्या या दिवसभराच्या उपक्रमात आरोग्य विषयक प्रदर्शन मोफत आरोग्य तपासणी आणि प्रथितयश डॉक्टर यांची व्याख्याने असा तिहेरी कार्यक्रम अतिशय नेटकेपणाने आयोजित करण्यात आला होता. आरोग्य विषयक विविध उपकरणे प्रत्यक्ष आरोग्य तपासणी आणि आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असे पौष्टिक खाद्यपदार्थ तसेच आरोग्यविषयक विम्याचे पर्याय अशी सर्वांगीण  माहिती देणारे १९ स्टॉल या वेळच्या प्रदर्शनात उभारण्यात आले होते. तिथे  हिमोग्लोबिन, वजन-उंची, बी एम आय, बोन डेन्सिटी तसेच डोळे मोफत तपासणी यांची सुविधा उपलब्ध ठेवण्यात आली होती.

 

या सर्व उपक्रमाचे आणि प्रदर्शनाचे उद्घाटन नगरसेविका आणि सकस या खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या संस्थेच्या चालक माधुरी सहस्रबुद्धे यांच्या हस्ते करण्यात आले. त्या स्वतः "मुलांचा विकास" या विषयात अनेक वर्ष प्रत्यक्ष कार्यरत आहेत. आरोग्यासाठी  व्यायाम  आणि पौष्टिक आहार घे़णं किती महत्त्वाचं असतं ते लहानपणी मुलांच्या मनावर बिंबवलं गेलं पाहिजे, या भूमिकेतून त्यांनी बालरंजना द्वारे मुलांच्या मनावर हे विषय बिंबवण्याच्या दृष्टीने अनेक वर्ष कार्य केले आहे. सहाजिकच त्यांना आपल्या क्लबचा  हेल्थ एक्सपो हा उपक्रम अतिशय आवडला.

प्रारंभी पी. पी. वृंदा हिने माधुरीताईंची ओळख करून दिली. त्यानंतर अध्यक्ष शोभाताई यांनी क्लबच्या आरोग्यविषयक उपक्रमांची माहिती दिली. मग डॉक्टर स्मिताताई जोग यांनी आपले आरोग्य विषयक प्रकल्प ज्या संस्थांच्या सहकार्याने प्रत्यक्षात आणले जातात त्या संस्थांचे आभार मानले तसेच त्यांच्या प्रतिनिधींचे सत्कार केले. 


प्रमुख पाहुण्या माधुरीताई यांनी आपल्या भाषणात स्त्रियांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या, "सर्व कुटुंबाची काळजी घेताना स्त्रियांचे स्वतःकडे दुर्लक्ष होतं ते त्यांनी कटाक्षाने टाळण्याची गरज आहे. शेवटी प्रेसिडेंट इलेक्ट मृणाल  नेर्लेकर  यांनी आभार प्रदर्शन केले.


यावेळी विविध स्टॉलवर नागरिकांनी मोफत तपासणीचा लाभ घेतला. त्यानंतर दुपारी चार वाजता आरोग्य विषयक व्याख्यानांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आला होता त्यामध्ये डॉक्टर अविनाश भोंडवे आणि डॉक्टर प्रमोद जोग यांची व्याख्याने झाली. 

 

ॲन सरिता भावे

WhatsApp Image 2022-04-28 at 8.06.06 AM
WhatsApp Image 2022-04-28 at 8.06.06 AM

press to zoom
WhatsApp Image 2022-04-28 at 8.06.07 AM (1)
WhatsApp Image 2022-04-28 at 8.06.07 AM (1)

press to zoom
WhatsApp Image 2022-04-28 at 8.06.06 AM (1)
WhatsApp Image 2022-04-28 at 8.06.06 AM (1)

press to zoom
WhatsApp Image 2022-04-28 at 8.06.06 AM
WhatsApp Image 2022-04-28 at 8.06.06 AM

press to zoom
1/6

Jaipur Foot

We had the Jaipur Foot project on the 18th of April at BVP. Prez Shobhatai, PP Dr. Rao, PP Sharad, and Milind attended and handed over donations from Rtn Bharati.

WhatsApp Image 2022-04-18 at 9.01.06 PM (1)
WhatsApp Image 2022-04-18 at 9.01.06 PM (1)

press to zoom
WhatsApp Image 2022-04-18 at 9.01.08 PM
WhatsApp Image 2022-04-18 at 9.01.08 PM

press to zoom
WhatsApp Image 2022-04-18 at 9.01.07 PM
WhatsApp Image 2022-04-18 at 9.01.07 PM

press to zoom
WhatsApp Image 2022-04-18 at 9.01.06 PM (1)
WhatsApp Image 2022-04-18 at 9.01.06 PM (1)

press to zoom
1/4

उपलब्धी

१. २४ एप्रिलला तळेगाव, कलापिनी बालनाट्य महोत्सवात रो. अश्विनी अंबिके हिचा उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून व्यासपीठावर आमंत्रण आणि सत्कार करण्यात आला.

WhatsApp Image 2022-04-25 at 8.00.37 AM.jpeg
WhatsApp Image 2022-04-25 at 7.58.36 AM.jpeg

२. रविवारी १८ एप्रिल रोजी नूमवीय ६२ चा वासंतिक कार्यक्रम पी पी आनंद नवाथे यांच्या बंगल्यामागच्या हिरवळीवर झाला.त्यामध्ये प्रेसिडेंट इलेक्ट मृणाल नेर्लेकर हिचे कीर्तन झाले.तुकाराम महाराजांचा एक अभंग निरुपणासाठी घेऊन पूर्वरंगामध्ये महावीर बाजीप्रभू देशपांडे यांची घोडखिंडीतील लढाई ह्यावर आख्यान दिले. अत्यंत ओघवत्या भाषेत व सुरेल आवाजात त्याला श्लोक, अभंग, गाणी, पोवाडे ह्यांची साथ देऊन त्या लढाईचा इतिहास प्रत्यक्ष जिवंत उभा केला. शंभरच्या वर उपस्थित लोक ह्यामध्ये मंत्रमुग्ध झाले होते. त्यावेळेची काही क्षणचित्रे.

WhatsApp Image 2022-04-19 at 7.53.17 PM.jpeg

३. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या "मराठी भाषा" अभ्यासक्रम पुनर्रचना समितीत तज्ज्ञ सभासद म्हणून संगणक तज्ज्ञ पी डी जी डॉ. दीपक शिकारपूर ह्यांची निवड झाली आहे.

४. रविवारी १८ एप्रिलला लोकमत मधे पी डी जी दीपकचा "युद्धात उतरलेल्या रशियाच्या फौजफाट्यात हा 'कुबला' कोण ?" या विषयावर लेख आला होता.

५. १७ एप्रिलला महाराष्ट्र टाईम्स मधे पी डी जी दीपकचा "घरी आले पुण्याचे पाहुणे" या विषयावर लेख आला होता.

६. P D G Deepak was invited as the chief guest for Rotary club of wisdom's Vardhapan Din.

WhatsApp Image 2022-04-27 at 4.31.38 PM.jpeg

७. P D G Deepak addressed  RCP Pride BOD Training as a faculty on "Changing Face of Rotary" on 17th april

WhatsApp Image 2022-04-17 at 9.19.11 PM.jpeg

८. यू ट्यूबवर "एक हटके करिअर" हा पी डी जी दीपकचा लेख ७ तारखेच्या लोकमत मधे आला होता.

९. ६ एप्रिल रोजी अजंठा ज्येष्ठ संघात गौरी शिकारपूरचा कार्यक्रम झाला.

१०. १० एप्रिल रोजी पुण्यनगरीत प्रतिमा दुरूगकर हिचा लेख आला होता.

११. 1st April RCP Sinhagad gave away it's peace awards at the hands of PP Pradeep Wagh, Counsellor Peace RID 3131

WhatsApp Image 2022-04-04 at 6.23.25 PM (1)
WhatsApp Image 2022-04-04 at 6.23.25 PM (1)

press to zoom
WhatsApp Image 2022-04-04 at 6.23.25 PM
WhatsApp Image 2022-04-04 at 6.23.25 PM

press to zoom
WhatsApp Image 2022-04-04 at 6.23.25 PM (1)
WhatsApp Image 2022-04-04 at 6.23.25 PM (1)

press to zoom
1/2

१२. 1st April P D G Deepak addressed the District Conference of RID 3250 in Puri. He was felicitated by DG Pratim Banerjee.

WhatsApp Image 2022-04-04 at 6.13.11 PM.jpeg

१४. Reshma won 2nd prize in singing competition organised by Tilak Maharashtra Vidyapeeth

खबर - बखर

1. March-April birthday fellowship celebrated at Ishan hotel. Rtn.Bharati organized it.

2. Delighted to share that our Global grant no. 2234500 has just been approved by TRF.

This grant focuses on Baby warmers and baby sleeping bags along with vocational training to ASHA workers for the social outreach across the rural part of Pune.

The project cost is 40,425 USD.


Nitin Abhyankar
(Chairman - Grants)

3. On 7th march new Interact club of Muktangan English Medium School, Pune has been sanctioned and the Charter has been received.

4. In District 3131, our club is now ranking 5th in overall performance

WhatsApp Image 2022-05-08 at 1.22.34 PM.jpeg
WhatsApp Image 2022-04-23 at 3.25.35 PM (1)
WhatsApp Image 2022-04-23 at 3.25.35 PM (1)

press to zoom
WhatsApp Image 2022-04-23 at 3.25.35 PM (2)
WhatsApp Image 2022-04-23 at 3.25.35 PM (2)

press to zoom
WhatsApp Image 2022-04-23 at 3.25.35 PM
WhatsApp Image 2022-04-23 at 3.25.35 PM

press to zoom
WhatsApp Image 2022-04-23 at 3.25.35 PM (1)
WhatsApp Image 2022-04-23 at 3.25.35 PM (1)

press to zoom
1/6

औक्षवंत व्हा, सुखी व्हा !

 

३ मे - सरिता भावे
५ मे - कपिल कुलकर्णी
७ मे - नितीन नाईक
११ मे - नेत्रा वाघ
१२ मे - रेश्मा कुलकर्णी
१५ मे - विजय रायगांवकर
१५ मे - उज्वल मराठे
१७ मे - विलास जोग
२५ मे - श्रीकांत पिंगळे
३० मे - नितीन अभ्यंकर

रेशीमगाठी वर्धापनाच्या हार्दिक शुभेच्छा !

 

५ मे - मानस आणि मीनल वाघ
७ मे - नितीन आणि शिल्पा नाईक
१५ मे - प्रदीप आणि प्रतिमा दुरुगकर
१६ मे - अजय आणि अंजली गोडबोले
१८ मे - यशवंत आणि प्रतिभा गोखले
१९ मे - मुकुंदराव आणि अंजलिताई अभ्यंकर
२० मे - श्रीप्रकाश आणि श्रीप्रिया जोशी
२२ मे - प्रताप आणि पल्लवी गोखले

बर्थडे फेलोशिप लीडर
  ऍन. रोहिणी पालेकर

मे सपोर्ट ग्रूप

 

 पी पी रो. अशोक गाडगीळ (प्रमुख)
ॲन अंजली गाडगीळ
रो. मिलिंद पालकर
ॲन वंदना पालकर
रो. प्रकाश गायकवाड
ॲन पूनम गायकवाड
रो. चंद्रकांत गोडसे
ॲन हेमलता गोडसे

Upcoming Projects in May

1. Food grain supply to Ekalawya Nyas
2. Food grain supply to Sarthak Seva Sangh
3. Skill development for deaf and dumb girls from Apte school
4. Graphic design course for 20 deaf and dumb boys for 2 months started.
5. Bawarchi night will be celebrated on 28th May
6. Anns' project for Tray Garden will be arranged

Programs in May

 

2 May - No meeting (in lieu of Club day on 30th April)

9 May - No Meeting (in lieu of Dist Conf on 7-8th May) 

16 May - Yet to be decided

23 May - Yet to be decided

28 May - Bawarchi Night

30 May - Holiday

डिस्ट्रिक्टच्या घडामोडी

District Training Assembly

District training Assembly was for president Elects and Bod members of Rotary year 22-23. It was conducted in Symbiosis School of skill development Kiwale, Pune on 24th April 22 from 8:30 to 5 p.m.

This training was intended for President Elects, Club secretaries, treasurers, trainers, IT officers, and Club committee chairpersons. From our club following members attended the training program, President-Elect Rtn. Dr. Mrinal Nerlekar, Service project Director Non-Medical Sachin Joglekar & Youth director Sanjiv Chaudhari. Following were the speakers for various avenues from our club for the break-out session.

 1. President Dr. Shobha Rao:  Mother and child health 

 2. Past President Rujuta Desai: Proposed projects under environmental awareness. She is the chairperson of the environment awareness committee & she is also going to be the Director of Medical Avenue during the year 22-23. 

 3. Past President CD Mahajan spoke on the topic of Youth in membership. 

 4. IPP Sharad Dole attended the seminar as AG elect. 

PDG Dr. Deepak Shikarpur was the session moderator on sports, fellowship, and cultural avenues. He was felicitated by DGE Anil Parmar for being the faculty for all training events starting from PrePETs.

PP Vrinda was the MOC for the event. She is also the secretary for DJ visits during the year 22-23. Her tireless work was appreciated by DGE Dr. Anil Parmar and was felicitated for the same. She is also going to be the Club Trainer for the year 22-23.

The keynote address was by RI Director A.S. Venkatesh.

The welcome was done by host club President Asis Ray and a vote of thanks was given by DSE Sanjay Karava.


Convenor of the event was PP Pallavi Sabale.

This was a very useful Training for all the President Elects and the Board members.

P.E.Rtn Dr.Mrs Mrinal Nerlekar.

WhatsApp Image 2022-04-27 at 12.17.23 PM
WhatsApp Image 2022-04-27 at 12.17.23 PM

press to zoom
WhatsApp Image 2022-04-27 at 12.17.43 PM
WhatsApp Image 2022-04-27 at 12.17.43 PM

press to zoom
WhatsApp Image 2022-04-27 at 12.17.43 PM (1)
WhatsApp Image 2022-04-27 at 12.17.43 PM (1)

press to zoom
WhatsApp Image 2022-04-27 at 12.17.23 PM
WhatsApp Image 2022-04-27 at 12.17.23 PM

press to zoom
1/4

2. Rtn. Mrunal Nerlekar attended the PETS on the 9th and 10th in Novotel Khopoli.
All the sessions were very informative. Thus, got an idea of next year's functioning.
We had a good representation of our Club members as speakers and their presentations were well appreciated.


1. PPGauri Shikarpur on Environment.
2. PP CD Mahajan on Membership.
3. President Shobha Rao on Maternal and Child Health.
4. PDG Deepak Shikarpur in Public image.
IPP Sharad Dole was also present as AG.
All the Presidents received certificates of Attendance

PP Vrunda was the MOC and did a fabulous job which was well appreciated.

Rtn. Mrunal Nerlekar one of the faculties as District Secretaries DG Visits

WhatsApp Image 2022-04-11 at 1.56.20 PM.jpeg

3. रोटरी इंटरनॅशनल प्रेसिडेंट शेखर मेहता यांचा चॅलेन्ज होता की महिन्याभरात जास्तीत जास्त नवीन रोटरॅक्ट क्लब स्थापन करायचे. सर्व नियमांचे पालन करत आपण ९ नवीन रोटरॅक्ट स्थापन केले. मेंबरशिप ६००+ वाढली. त्यामुळे आपला डिस्ट्रिक्ट ३ -या नंबरवर आला. रोटरी आणि रोटरॅक्ट दोन्ही टीमस् ने खूप मेहनत घेतली होती.

रो. गौरी शिकारपूर

Highlights of Minutes of Board Meeting held on 25th March 2022

 • Club Day will be celebrated on 30th April 2022.

 • Bavarchi Night will be held on 28th May 2022 @ Farm House of PP Shirish Kshirsagar

 • Preparations for Health Expo were discussed and Budget Approval for Health Expo for Rs.1,00,000 was given by the Board.

 •  Birthday Celebration of Apte School students done.

 • Participation in the Adult Literacy project of the district is approved for which the cost is Rs.10,000

 • Heritage Walk is organized on 17 April at Parvati.

 • Total Donations to date to the foundation by GG, CSR & API are $41,600

 • The procedure for starting a new Interact club at Muktangan English Medium School was completed.

 • The adult literacy project initiated last year near Khopoli was continued for 3 months (July to Sept) this year and the payment of Rs. 15000.00for the teacher was approved.

Rotary Information

May is Youth Service Month

 

May is Youth Services (formerly called New Generations) Month when Rotary Clubs, around the world focus on youth services, Rotaract, Interact, RYLA, Youth Exchange, and in our District - Earlyact.

 

ROTARACT


Rotaract is a Rotary-sponsored service club for young people ages 18-30.  Rotaract clubs are usually community or university-based and are sponsored by a local Rotary club, making them true “partners in service” and key members of the Rotary family.

Young adults augment their knowledge and skill and also address the physical and social needs of their communities while promoting international understanding and peace through a framework of friendship and service.  Rotaractors also often spearhead the formation of Interact clubs and participate in RYLA. 

Rotaract is one of the fastest-growing programs of Rotary service with more than 9,500 Rotaract Clubs with 291,000 members in 177 countries.

 

INTERACT


Interact is a Rotary-sponsored service club comprised of 14-18-year-olds.  Interact gives young people the opportunity to take part in fun, meaningful service projects.  Along the way, Interactors develop their leadership skills and initiative while meeting new friends.  Members exchange ideas, opinions, and plans with other talented, energetic people, in an atmosphere free from negative pressures and distractions.  Interact strives to promote student leadership, and local volunteer service, and to make members aware of the many global and world issues that affect people every day. 

 

Ultimately, students can:

•   Become acquainted with a premiere service organization (Rotary International) and proven leaders from communities throughout Rotary;
•   Learn how to manage and head community service projects;
•   Learn about other Rotary club programs including Rotaract (service club for young adults), Earlyact (a service club for primary school students), youth exchange (a chance to live and study abroad ) and 

 

Rotary Youth Leadership Awards (RYLA)

 

Rotary Youth Leadership Awards is a leadership program coordinated by Rotary Clubs around the globe. Each year, thousands of young people are chosen to participate in this highly selective program. Young people ages 13–30 are sponsored by Rotary Clubs to attend the event run by the club's district committee.
 

Rtn. Yashwant Gokhale

Rotary International

1. People and Connections – The Logo of the 2022-23 Presidential Theme

 

"Imagine Rotary” is the 2022-23 presidential theme that RI President-elect Jennifer Jones revealed on 20 January. She is asking Rotary members to dream big and take action: “We all have dreams, but acting on them is a choice. Imagine a world that deserves our best, where we get up each day knowing that we can make a difference.”

The logo for the theme was designed by Riki Salam, an Australian artist and graphic designer specializing in contemporary Indigenous art, design, and communications. He also created the 2023 Rotary International Convention logo which will be held in Melbourne, Australia, thus connecting the two by a shared visual language.

Meaning of the design elements


There is, of course, a deeper meaning behind each element of the design. The circle in aboriginal culture, for instance, signifies our connections to one another. The dots around it represent people and there are seven because of Rotary´s areas of focus.

The circle and the dots together become a navigation star – our guiding light. The solid line underneath is what is referred to as a digging stick and it is used when doing hard work. And since Rotary members are people of action – it represents a tool for getting things done.

The Colors


The colors green, purple, and white are not necessarily connected to aboriginal culture. President-elect Jennifer Jones asked the new crew of Governors to use one, two, or all three when dressing for official events instead of using a theme jacket. “As we celebrate diversity, equity and inclusion, I wanted all of us to be able to express ourselves differently in what we wear, but still have a connection,” she explained.

There are several ways to interpret the colors: Purple for example stands for polio eradication, green for the environment, the newest addition to our areas of focus, and white for peace, our core mission. Together, they are the colors of the women’s movement, the Suffragette – a subtle nod to this history as Jones pointed out since she will be the first female RI president.

PDG Dr Deepak Shikarpur

2. Great achievements by our RID Dr. Mahesh Kotbagi - A learned Director with clear vision. He got his resolution ( on RI constitution) passed with 89% "yes" voting. Not only our District but all districts in zone 7 are be proud of him.

WhatsApp Image 2022-04-14 at 3.40.11 PM
WhatsApp Image 2022-04-14 at 3.40.11 PM

press to zoom
WhatsApp Image 2022-04-14 at 3.40.10 PM
WhatsApp Image 2022-04-14 at 3.40.10 PM

press to zoom
WhatsApp Image 2022-04-14 at 3.40.11 PM (1)
WhatsApp Image 2022-04-14 at 3.40.11 PM (1)

press to zoom
WhatsApp Image 2022-04-14 at 3.40.11 PM
WhatsApp Image 2022-04-14 at 3.40.11 PM

press to zoom
1/3
w0262_1s_Watercolor-Floral-Pattern-Wallpaper-for-Walls-Pastel-Flowers_Repeating-Pattern-Sa
Lalit Vibhag.png
Damle Ranjana.jpg

सौजन्य मूर्ती रंजना


स्त्री म्हटलं की ती प्रथम मुलगी, बहीण, नंतर बायको, सून, वहिनी, जाऊ, काकी, मामी, मावशी, आत्या, ऩ़णंद, त्यानंतर आई व शेवटी सासू आणि आज्जी एवढ्या किमान भूमिका एका आयुष्यात बजावत असतेच. पण आपली एक मैत्रीण या चौदा भूमिकांवर थांबलेली नाही तर आणखी तीन भूमिका ती इमानेइतबारे हसत मुखाने आणि आनंदाने आयुष्यभर पार पाडत आहे. त्या भूमिकाही साध्यासुध्या नाहीत तर आपल्या सर्व सर्वसाधारण चाकोरीबाहेरच्या !  त्या भूमिका आहेत एक शेतकरी़ण, एक इंटिरियर डेकोरेटर आणि एक टूर ऑपरेटर! या वर्णनावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की ही आपली मैत्रीण म्हणजे रंजना-रंजना दामले .


रंजना पूर्वाश्रमीची रंजना आंबर्डेकर. रंजनाचे वडील, काका, आजोबा, तिची सगळी भावंड आणि त्यांचे जोडीदारही डॉक्टर  ! या सगळ्या डॉक्टरांच्या गोतावळ्यात रंजना एक वेगळी होती !  तीही प्रथम पासून तिला मेडिकल लाईन बाबत कधीच आकर्षण वाटलं नाही किंवा त्याबाबतच्या विषयांचा अभ्यास करावा अशी इच्छाही झाली नाही. प्रथम पासूनच तिला आर्किटेक्चर विषयी आकर्षण होतं. रंजनाचे वडील काही वर्ष सरकारी नोकरीत होते. त्यामुळे त्यांच्या बदल्या होत. या बदल्यांमुळे लहानपणी रंजनाचं रहाणं वाईला झालं. वडिलांनी नोकरी सोडून बारामतीला स्वतःचा दवाखाना सुरू केला तेव्हापासून रंजना बारामतीला राहिली. शालेय शिक्षण झाल्यानंतर पुण्याला अभिनव महाविद्यालयात आर्किटेक्चर ला जावं असा रंजनाला वाटत होतं. पण तेव्हाच जोशी-अभ्यंकर हत्याकांडातले सगळे आरोपी हे अभिनवचे विद्यार्थी असल्याचे जगजाहीर झालं. त्यामुळे रंजनाच्या वडिलांना तिने अभिनवला जावे हे मुळीच रुचले नाही तेव्हा रंजनाने सरळ बीए चा रस्ता धरला आणि एफ वाय नंतर एस वाय टी वाय करायला ती पुण्यात आली. पुण्यात तिच्या वडिलांनी लॉ कॉलेज रोडच्या भक्तिमार्ग रस्त्यावर पूर्वीच बंगला बांधलेला होता. पण ते सगळे बारामतीत होते म्हणून त्यांनी तो त्यांचे मित्र दामले (अनिलचे  काका) यांना भाड्याने दिला होता. अनिलचे  काका तळमजल्यावर राहत होते आणि रंजना तिचे दोघे भाऊ आणि बहीण हे कॉलेज साठी पुण्यात आल्यावर त्या बंगल्याच्या वरच्या मजल्यावर राहू लागले. मग काय ! दामले यांची मुलं आणि आंबर्डेकर यांची मुलं एकमेकांचे दोस्त झाले नाही तरच नवल!


रंजना टी. वायला असतानाच तिची आणि अनिलची मैत्री प्रेमात बदलली. दोन्ही घरच्या पालकांच्या आग्रहामुळे रंजना ची परीक्षा संपताच त्यांचं लग्न झालं आणि रंजना दामले यांच्या घरात प्रवेश करती झाली .


त्यावेळी अनिल बीएससी झालेला होता पण त्याला शेतीत फारच इंटरेस्ट होता. त्यामुळे खामगावला आठ एकर जमीन घेऊन तो पूर्णवेळ शेती करत होता. त्यामुळे रंजनाही शेतकरीण बनून  खामगावच्या शेतावर राहू लागली . १२ बाय ८ च्या त्या पत्र्याच्या खोलीत लाइट नाही, फोन नाही, खोलीपर्यंत जायला नीट रस्ता नाही, स्वयंपाकासाठी गँस नाही अशा त्या शेतावरच्या घरात रंजना आठवड्यातले चार दिवस राही. उरलेले दिवस लॉ कॉलेज रोडवर  दामल्यांच्या घरात  सासू-सासरे दीर जावांबरोबर राही. अनिलने पूर्ण तेरा वर्षे शेतीच केली. या दरम्यान केतकी आणि अमोल यांचे जन्म झाले. तेव्हा अनिल आणि रंजना दोघांच्याही लक्षात आलं की शहरी जीवनाची सवय असलेल्या आपल्याला कायम शेतावर राहणं जमणार नाही. शिवाय शेतीतून हातात येणारी रोकड समाधानकारक वाटत नव्हती. तेव्हा चरितार्थासाठी काही वेगळं करणं गरजेच आहे हे दोघांनाही पटलं. तेव्हा त्यांनी शेती विकली. अनिलने लॉचा अभ्यास करायचं ठरवलं आणि रंजनाने इंटिरियर डिझाईनचा कोर्स !

दरम्यान दामले पथाच्या विकासाचं काम सुरू होतं तेव्हा अनिलने त्याचा आर्किटेक्ट मित्र भूषणच्या मदतीने बांधकाम व इंटिरिअर बाबत सर्व गोष्टी माहिती करून घेतल्या आणि त्यांचे राहते घर काकांचे बंगले इत्यादीची काम स्वतः केली. त्यानंतर दोन वर्षाचा लॉचा अभ्यास त्याने संपवला तरी तो पूर्ण वेळ इंटिरिअरच्या कामांना देऊ लागला. रंजनाने दोन वर्षाचा कोर्स पूर्ण केला होता त्यामुळे तीही  अनिलला या कामात मदत करू लागली. अनिलने शेती विकली तरी त्याला शेतीची मनापासून आवड आहे. त्यामुळे भूगाव इथे त्याने सव्वा एकर जमीन घेतली आणि तो तेथे आपली शेतीची हौस भागवू लागला. त्यामुळे रंजनाला छोट्या का होईना पण शेतकऱ्याची बायको शेतकरीण ही भूमिका बजावणे क्रमप्राप्तच होतं. शिवाय अनिलच्या इंटिरिअरच्या कामात ती मदत करू लागली होतीच. बघता बघता तिचा या कामातला सहभाग कधी पूर्ण वेळ झाला ते तिलाही कळलं नाही ! पण हा विषय विद्यार्थीदशेपासूनच तिच्या आवडीचा होता त्यामुळे त्यात ती रमून जाऊ लागली. शिवाय या व्यवसायात आर्थिक उत्पन्नही मनासारखं मिळू लागलं. त्यामुळे तिने ते काम जोरात चालू ठेवलं. 


शेती आणि इंटिरियर प्रमाणेच अनिलला प्रवासाची खूप आवड. शेती करतानाच 'बर्ड वॉचिंग' शिबीरही भरवत होता. त्यामुळे रंजना त्यातही मदत करत होती ! पक्षी प्राणी यांच्याबाबतच्या आवडीतूनच त्या दोघांनी १९९० मध्ये प्रथम केनियाची ट्रिप केली. बरोबर काही मित्र होते. त्यांची ती ट्रीप खूप छान झाली. केनिया वरचे लेख अनिलने साप्ताहिक सकाळमध्ये वर्षभर लिहिले तेव्हा ९२-९३ मध्ये काही लोकांनी गळ घातली की आम्हाला केनिया दाखवा ! अशा दोन ट्रीप्स झाल्या. तेंव्हा व्यवसायाची कल्पनाही त्यांच्या मनात नव्हती. पण कोणी सुहृदाने त्यांना सुचवलं की अशा नुसत्या ट्रीपला जाण्याचा खर्च करताय त्यापेक्षा तुम्हीच अशी ट्रीप अरेंज करून लोकांना न्या.  म्हणजे तुम्हालाही त्यातून अर्थप्राप्ती होईल.  मग १९९३ पासून अनिल रंजनाने अधिकृतपणे ट्रिप न्ययला सुरुवात केली. तशी रंजनाला प्रवासाची आवड होतीच त्यामुळे अनिलच्या या  व्यवसायातही ती सहजपणे मिसळून गेली. आणि इथेही जुन्या गोष्टींची री ओढली गेली !!म्हणजे जसं अनिलची इंटिरिअरची सगळी कामं हळूहळू रंजना सांभाळू लागली तसंच अनिलच्या या प्रत्येक ट्रिपमध्ये रंजना त्याला भरपूर मदत करू लागली आणि २००१ पासून ती स्वतंत्रपणे ही ट्रिप नेऊ लागली !!

या सगळ्या प्रवासात शेतीत आपल्याला रस आहे का याचा जसा रंजनाने विचार केला नव्हता तसेच प्रवास आवडत असला तरी टूर नेणं हीअगदीच वेगळी जबाबदारी असते, ते आपल्याला आवडतंय का, याचाही रंजनाने विचार केला नाही. शेतीच्या वेळी ती नव्याने लग्न होऊन दामल्यांच्या घरी आली होती शिवाय अनिलला काही वेगळं करायला आवडतं ही गोष्ट तिला मनापासून भावली होती. शेतीच्या निमित्ताने निसर्गात राहायला मिळतं त्यानेही रंजना खुश होती. आणि इंटिरियर करणं हे तिच्या आवडीचं क्षेत्र होतं त्यामुळे अनिलच्या या दोन्ही व्यवसायात तिने रस घेतला. आता विविध देशात किंवा गावात टूर नेणंही तिला आवडू लागलंय का याबद्दल ती म्हणाली,  "मला माणसं जमवायला खूप आवडतात. टूरच्या निमित्ताने खूप माणसं भेटतात. सगळ्यांची क्षेत्रं वेगळी, स्वभाव वेगळे, आशा-आकांक्षा वेगळ्या, दृष्टी वेगळी असल्यामुळे आपला अनुभव खरोखरच समृद्ध होतो."

तिच्या वडिलांचं  तिच्या मनावर कायमचं कोरलं गेलेलं तत्त्व म्हणजे कोणत्याही संधीला नाही म्हणायचं नाही त्या संधीत झोकून देऊन तिचं सोनं करायचा प्रयत्न करायचा. त्यामुळे रंजना म्हणाली, "माझ्यासमोर शेतीची कामं येवोत, नाहीतर आलेल्या पिकाचा किंवा फळाचा बटवारा करणं असू दे, मी सगळ्या कामात मनापासून सहभागी झाले. जी गोष्ट शेतीची तीच टूर ने़ण्याबाबतची. टूरमध्ये सगळ्यांची व्यवस्था नीट व्हायला हवी. सगळ्यांना त्यांच्या मनासारखे झाल्याचं समाधान मिळायला हवं. या गोष्टी ही तर आमची ध्येये आहेत त्यामुळे त्यात आपोआपच मन लावून मी काम केलं आणि ह्या कामात हि मला आनंद मिळतो आहे मी रमून जाते आहे असं माझ्या  लक्षात आलं ".


रंजनाला टापटिपीची किती विलक्षण आवड आहे ते आपल्याला दिसतंच. तिच्या पोषाखापासून ते तिच्या संपूर्ण घरापर्यंत तिचा व्यवस्थितपणा आणि सौंदर्यदृष्टी आपल्याला ठळकपणे जाणवते. तिच्या या आवडीचं  मूळ कशात याचा मागोवा घेतला तेव्हा ते मूळ तिच्या मामीमध्ये असल्याचं दिसलं.ती म्हणाली, "लहानपणी मी मुंबईला जात असे आणि मामा-मामी, आजोबा, मावशी, मावसबहीण यांच्याबरोबर राहत असे. माझी मामी माहेरची खूप श्रीमंत होती. तिचा चॉईस फार सुंदर होता. तिचे कपडे असोत दागिने असोत नाहीतर घराची मांडणी असो, सगळ्यात एक सौंदर्यदृष्टी आणि खूप टापटीप असायची. तसंच माझी एक मावसबहीण आहे तिला याबाबत फारच छान दृष्टी होती. लहानपणी या दोन्हींचा प्रभाव माझ्या मनावर पडला."

माहेरी सर्व भावंडात रंजना थोरली आहे. त्यामुळे बालपणापासूनच तिच्या वागण्या बोलण्यात एक थोरलेपणाचा बाज निर्माण झाला, त्याला लग्नानंतर खतपाणी मिळालं. कारण  दामल्यांचं कुटुंब खूप मोठं. त्यातली चुलत माणसं सोडली तरी  सख्यातही  रंजनाला  दोन दीर, दोन दोन जावा, एक नणंद, घरात सासू-सासरे ़ आजे सासुबाई आणि अनिलसह भावांचीही मुलं. या सर्वात अनिल सर्वात मोठा मुलगा. त्यामुळे रंजनाकडे मोठी सून, मोठी जाऊ या जबाबदाऱ्या आल्याच. खूप माणसांची आवड आणि प्रसंगपरत्वे आणखीन जमतील तेवढ्याना जमा करण्याची आवड. अर्थात या सगळ्यांना जमवल्यावर सगळ्यांच्या खानपानाची उत्तम व्यवस्था करणं ही जबाबदारी आपल्यावरच आहे अशी तिची धारणा आहे. त्यामुळे दामले यांची ही मोठी सून घरच्या आणि दारच्या कार्यक्रमांमध्ये सदैव बुडलेली असते. यातच तिला कोणालाही आणि कशाला नाही म्हणायला आवडत नाही. पर्यायाने बाराही महिने तिची धावपळ चालूच राहते. हे असं धावपळीचं जीवन होत असलं तरी तिला इंटिरियरचं काम आता थांबवावं असं काही मनाला पटत नाही. एक तर हे काम आवडतं आणि दुसरं अजून भरपूर  कामं मिळत आहेत मग चांगला चालू असलेला व्यवसाय कशाला बंद करायचा? असं तिला वाटतं. दोन वर्षाचा   इंटिरिअरचा  कोर्स जेव्हा तिने केला तेव्हा केतकी जेमतेम तीन वर्षाची होती आणि अमोल सहा-सात वर्षांचा. त्यामुळे  रंजनाची खूप धावपळ होई पण तिने काहीतरी वेगळे शिकावं आणि स्वतःच्या पायावर उभे राहावे असं तिच्या सासूबाईंना प्रकर्षाने वाटे.  त्यामुळे तिच्या शिकण्याला आणि तिच्या काम करण्याला सासूबाईंचा सदैव जबरदस्त पाठिंबा होता. शेतीतलं उत्पन्न समाधानकारक वाटत नव्हतं म्हणून रंजनाला स्वतःला काही करावं असं वाटत होतं. त्यातच सासूबाईंच्या प्रचंड आग्रहामुळे तिला शिकायला जाणं खूप सुलभ झालं. ती म्हणाली, "सासूबाईंनी स्वतः त्यांची मुलं मोठी झाल्यावर बारावी पासून एम ए पर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि आयुष्यभर मतिमंद मुलांसाठी संगीत शिकवायला जाऊन समाज कार्य केलं. त्यामुळे शिक्षण उद्योग व्यवसाय आणि समाजकार्य या साऱ्याला त्यांचा सदैव पाठिंबा  राहिला. जेव्हा रंजनाने इंटिरियर चा कोर्स केला तेव्हा कुकरीचाही कोर्स पूर्ण केला पण तो व्यवसाय म्हणून करावा असं तिला कधी वाटलं नाही. इंटिरिअरच्या निमित्ताने तसंच टुर्सच्या निमित्ताने तिला अनेक माणसं भेटली. पण त्यात बहुतांशी माणसं चांगली भेटली असं ती आवर्जून सांगते. ती म्हणाली, "आम्हाला दोघांना प्रवासाची आवड होतीच पण या व्यवसायाच्या निमित्ताने तर मी खरोखरीच जगभर फिरले त्या निमित्ताने विविध प्रकारच्या अनुभव घेता आले. ग्रेट म्हणता येतील अशा माणसांचा सहवास लाभला. अर्थात व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने त्यातही माणसांचे असंख्य नमुने पाहायला मिळाले. तसं तर माणसांचे नमुने पाहण्याची तिला लहानपणापासूनच सवय होती कारण तिचं माहेर आणि सासर दोन्हीकडची कुटुंबं भरपूर मोठी, त्यामुळे सहजच माणसांचे विविध नमुने पहातच ती लहानाची मोठी झाली. पण एक गोष्ट तेवढीच खरी की तिला आत्तापर्यंतच्या आयुष्यात चांगली माणसं भेटत गेली त्यामुळे तिची माणसांची आवड कायम राहिली, नव्हे, ती वाढतच गेली. एवढ्या माणसांशी जमवून घेताना प्रारंभी गरज म्हणून कधी नाईलाज म्हणून मी शांत राहत असे असं रंजनाने स्पष्ट केलं. ती म्हणाली, "शांत राहण्याचे फायदे मला अधिकाधिक अनुभवाला येऊ लागले तेव्हापासून मी खरच शांत होऊन गेले, अनेक गोष्टी  सोडून द्यायला शिकले आणि आता याचा फार मोठा उपयोग मला माझ्या जीवनात होतो आहे. सहलीच्या निमित्ताने सुमनताई किर्लोस्करांसाऱखी माणसं सहवासात आल्यामुळे  विचारात  सकारात्मकता वाढत गेली."

ती म्हणाली, "अडचणी येतातच किंबहुना अडचणी येणारच पण त्याने खचून न जाता त्यातून मार्ग काढायचा ही सवय मनाला लागली. माझे वडील नेहमी सांगायचे 'जो बसला तो संपला म्हणून सतत कार्यरत राहायलाच हवं ' या भूमिकेतूनही मी अनिलला  प्रत्येक गोष्टीत सहकार्य करत गेले. अर्थात त्याने मला त्याच्या कामात सहभागी करून घेतलं. त्यामुळे दोघांना एकमेकांची मदत झाली." यापुढेही जमेल तेवढे दिवस आत्ताच्या ऍक्टिव्हिटीज चालू ठेवायच्याच आणि शिवाय ड्रॉइंग, पेंटिंग, मैत्रिणींबरोबर गप्पा, प्रवास असं करायचं अशी रंजनाची इच्छा आहे. तिच्या सगळ्या कामात यश मिळो तसंच तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना . 

 

ॲन सरिता भावे

हस्तसामुद्रिक शास्त्र

बुध-आरोग्य रेषा

मागील लेखात आपण आयुष्य, मस्तक, भाग्य, हृदय व रवी रेषा विषयी पाहिले. आता ही सहावी रेषा.

बुध आरोग्य रेषा/ लाइन ऑफ मर्क्युरी महत्त्वाच्या सहाव्या रेषांपैकी ही शेवटची रेषा. या रेषेचे वैशिष्ट्य म्हणजे ही रेषा व्यक्तीची प्रकृती, आरोग्य, व्यक्तीचा धंदा, व्यवसाय याविषयी व त्यातले चढ-उतार सुद्धा दर्शवते.
 

प्रथम आपण आरोग्याविषयी चर्चा करू. ही रेषा सर्वसाधारणपणे हाताच्या खालच्या भागावरून सुरू होऊन बुध उंचवट्याच्या कडे जाते. काहींच्या मते ही रेषा नसली तरी चांगले. ही रेषा असेल तर व्यक्तीची प्रकृती चांगली वाईट स्थिती दर्शवते. ही रेषा नसेल तर व्यक्तीची प्रकृती चांगली असायला हवी.


ही रेषा व्यक्तीचे मानसिक विकार, ब्लडप्रेशर हृदयविकार, पित्ताचा त्रास, लिव्हरचा त्रास, पचनक्रिया इत्यादी गोष्टी दर्शविते. ही रेषा असेल तर ती सरळ कुठल्याही अडथळे नसलेली स्पष्ट असलेली असेल तर  एक चांगले आरोग्य व दीर्घायुषी दर्शवते.
 

ही रेषा हाताच्या कडे पासून सुरू होते तर व्यक्ती चंचल स्वभावाची व अस्थिर मनोवृत्तीची असते. यव चिन्हापासून ही रेषा सुरुवात करत असेल तर झोपेत चालण्याची सवय असते. ही रेषा तांबूस असेल तर हृदय विकार होण्याची शक्यता असते व रक्ताभिसरण नीट होत नसते. या रेषेला साखळी असेल तर पित्ताचा त्रास होतो. तसेच मूत्रपिंडाचे विकार दर्शवते या रेषेत खंड पडत असेल तर पचन क्रिया बिघडलेले असते.
 

या रेषेवर चांदणी सारखी खूण चिन्ह असेल तर हे चांगले लक्षण नाही. या रेषेवर चौकोन चिन्ह असेल तर ती व्यक्ती जीवावर बेतलेल्या आजारातून सुद्धा बरी होते. व्यक्तीचे आरोग्य कधी बदलेल हे सांगणे कठिण पण त्याची पूर्वकल्पना दिली तर व्यक्ती स्वतःची काळजी घेऊन आपली प्रकृती चांगली ठेवायचा नक्कीच प्रयत्न करेल.
 

व्यवसाय


आता व्यवसायातील चढ उतार ही रेषा कशी दर्शवते ते पाहू. ही रेषा जर हाताच्या खालच्या बाजूला सुरू होऊन सरळ कोणताही अडथळा नसताना बुध उंचवट्याकडे जात असेल तर उद्योग, धंदा, व्यवसायात उत्तम यश मिळते. ही रेषा आयुष्य रेषेला स्पर्श करत असेल तर व्यवसायानिमित्त बरेच लांबचे प्रवास दर्शवते.
 

बुध रेषा व आयुष्य रेषेपासून सुरू होत असेल तर ती व्यक्ती स्वकर्तुत्वावर कष्टाने यशस्वी होते. नेपच्यून उंचवट्यावरुन सुरू होणारी रेषा व्यक्तीला पैसा भरपूर मिळवून देते. पण खर्च ही तितकाच करते. विशेषतः दानशूर व्यक्ती असते व आपली संपत्ती दान करण्यात त्यांना समाधान असते. बुध रेषेवरून वरच्या बाजूला जाणाऱ्या रेषा व्यवसायात यश दाखवतात व खाली जाणाऱ्या रेषा व्यवसायात अडचणी, नुकसान दाखवतात (रायझिंग अंड फॉलींग लाइन्स). जेव्हा अशा खाली जाणाऱ्या रेषा असतात तर व्यक्ती परिश्रम करून व कष्ट करून व्यवसायातल्या अडचणी दूर करू शकते. या रेषेतून एक फाटा जर गुरू उंचवट्याकडे जात असेल तर व्यक्तीला त्याच्या महत्त्वाकांक्षेमुळे व चांगल्या मित्रपरिवारामुळे चांगले यश मिळते. बुध रेषेतील एक फाटा शनी उंचवट्याकडे जात असेल तर व्यक्ती विद्वान असते. बुध उंचवट्यावरील एक फाटा रवी उंचवट्याकडे जात असेल तर ती व्यक्ती चतुर व यशस्वी असते. बुध व रवी रेषा यांना जोडणारी रेषा असेल तर व्यक्तीला समृद्धी व ऐश्‍वर्य प्राप्त होते.


अशा रीतीने ही रेषा अजून बरेच काही प्रकृती व धंद्याविषयी गोष्टी दर्शवते. पुढील लेखात इतर महत्त्वाच्या दुय्यम रेषांविषयी पाहू या.
 

शुभम भवतु
 

पी पी अशोक गाडगीळ

खाण्यासाठी जन्म आपुला

आपली मीना सुगरण आहे हे सगळ्यांना माहितच आहे. आपण सगळ्यांनी अनेक वेळा तिचे पदार्थ चाखले आहेत. या वेळी मीना आपल्याला तिची प्रसिद्ध - कांद्याच्या पतीची कोशिंबीर शिकवत आहे.

कथा - कथन

पी पी आनंद नवाथे गोष्टीवेल्हाळ आहे हे सर्वांना माहित आहे. त्याला गोष्टी ऐकायला तसंच सांगायला आवडतं. आपल्या पुशसाठी तो यावेळी गोष्ट सांगणार आहे. "कल्पिताचं वास्तव" ही गोष्ट त्याने मला सांगितली तेंव्हाच मला ती खूप आवडली. मी त्याला त्याचा व्हिडीओ पाठवायला सांगितलं आणि त्यानं तो पाठवला. तुम्हीही ऐका..तुम्हालाही आवडेल. 

ॲन गिरिजा 

मनाचे श्लोक - श्लोक १३, १४, १५

कौतुक

1. Devashish (son of Pratap and Pallavi Gokhale) was recognized for his work on water at MIT by Elina & Nikhil Meswani and the family of Reliance Industries by a semester fellowship known as the Rasikbhai Meswani fellowship.

WhatsApp Image 2022-04-23 at 9.52.10 PM.jpeg

2. प्रदीप आणि नेत्र वाघ यांची नात - सिया हिने "OAK BROOK TENNIS CENTER SPRING BREAK OPEN - L6 GIRLS 12 SINGLES CHAMPION“ मध्ये tournament जिंकली.

WhatsApp Image 2022-04-29 at 1.42.25 PM.jpeg

3. Siya (granddaughter of Pradeep and Netra Wagh) performed Bharatnatyam on' Mahalaxmi Mukta Samvad' written by Pradeep and choreographed by Anuya (Pradeep's daughter).

WhatsApp Image 2022-04-29 at 1.43.00 PM.jpeg